साहित्य :
टॉर्टिया –
१ वाटी मक्याचे पीठ,
२ चमचे मैदा,
१ चमचा तेल ल्ल किंचित मीठ
स्टफिंग –
दीड वाटी शिजलेल्या ब्लॅक बीन्स (कॅनमधील)
१/२ वाटी स्वीट कॉर्न, वाफवलेले
१/२ वाटी चिरलेला कांदा
१/२ वाटी चिरलेली सिमला मिरची
२-३ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
१ चमचा तेल ल्ल चवीपुरते मीठ
१/२ चमचा रेड चिली फ्लेक्स
२-३ तुकडे पिकल्ड अलापिनो पेपर्स, चिरून
१ वाटी किसलेले चीज
एंचीलाडा सॉस-
१ चमचा तेल ल्ल १ चमचा मैदा
पाणी
१/२ चमचा ओरेगानो
१/२ चमचा जिरेपूड
१/२ चमचा लाल तिखट
२ ते ३ चमचे टोमॅटो प्युरी
२ लसूण पाकळ्या किंवा १/२ चमचा गार्लिक पावडर
चवीपुरते मीठ
चिमटीभर साखर
इतर साहित्य
किसलेले चीज
कृती
१) मक्याचे पीठ, मैदा, तेल आणि मीठ घालून मिक्स करावे. पाणी घालून मऊ गोळा मळून घ्यावा. पुरीपेक्षा थोडय़ा मोठय़ा लाटय़ा कराव्यात. छोटय़ा छोटय़ा पोळ्या लाटून तव्यावर भाजून घ्याव्यात.
२) कढईत १ चमचा तेल गरम करावे. आच मंद ठेवावी. लसूण परतून घ्यावी. मैदा घालून अर्धे मिनिटभर परतावे. टोमॅटो प्युरी आणि दीड वाटी पाणी घालून नीट मिक्स करावे. चवीनुसार मीठ, लाल तिखट, ओरेगानो, जिरेपूड घालून मंद आचेवर उकळी काढावी.
३) कढईत १ चमचा तेल गरम करून त्यात लसूण आणि कांदा परतून घ्यावा. नंतर सिमला मिरची घालून परतावी. ब्लॅक बीन्स थोडय़ा चेचून घ्याव्यात. कॉर्न आणि ब्लॅक बीन्स घालून मिक्स करावे. चवीनुसार मीठ, अलापिनो पेपर्स आणि रेड चिली फ्लेक्स घालून मिक्स करावे.
४) मक्याची पोळी घेऊन त्यात थोडे थोडे स्टफिंग भरून रोल तयार करावा. आत थोडे चीजसुद्धा घालावे. बेकिंग ट्रेला तेलाचा हात लावून घ्यावा. तयार रोल्स एकमेकांना चिकटून ठेवावेत. वरून गरजेनुसार सॉस घालावा. वरून भरपूर किसलेले चीज घालावे. मायक्रोवेव्हमध्ये ग्रिल ऑप्शन सिलेक्ट करून एंचीलाडा ग्रील करावे. चीज मेल्ट झाले की बाहेर काढून सव्र्ह करावे.
नाचोज
साहित्य
कॉर्न टॉर्टिया चिप्ससाठी-
दीड वाटी मक्याचे पीठ
१/२ वाटी मैदा ल्ल १/२ चमचा मीठ
२ चमचे तेल
टॉमेटो सालसासाठी-
२ मध्यम टोमेटो- लालबुंद आणि रसरशीत. (बारीक चिरून)
१ मध्यम कांदा- बारीक चिरून
१ हिरवी मिरची- बिया काढून
२-३ टे.स्पून कोथिंबीर
१/२ पिकल्ड अलेपिनो पेपर (व्हिनेगरमध्ये मुरवलेली जाड मिरची)
१ लसूण पाकळी, बारीक चिरून (किंवा गार्लिक पावडर मिळाल्यास उत्तम, २-३ चिमटी वापरा)
१/२ टीस्पून रेड वाइन व्हिनेगर (ऐच्छिक) (यामुळे स्वाद चांगला येतो)
चवीपुरते मीठ, चिमूटभर साखर
किसलेले चीज ल्ल ऑलिव्हचे १५-२० काप
१/२ वाटी स्वीट कॉर्न, वाफवलेले
१ पिकल्ड अलेपिनो पेपर,
चिरून किसलेले चीज
कृती :
१) सालसासाठी दिलेले सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे. चव पाहून लागल्यास लिंबाचा रस घालावा. हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये घालून १-२ सेकंद फक्त फिरवावे. भरडसरच राहायला हवे.
२) कॉर्न चिप्ससाठी दिलेले साहित्य एकत्र करावे. पाणी घालून गोळा मळून घ्यावा. पोळीप्रमाणे लाटून तव्यावर अर्धवट कच्चे भाजून घ्यावात.
३) भाजलेल्या प्रत्येक पोळीचे ८ ते १० त्रिकोणी भाग करावेत. गरम तेलात तळून काढावेत.
४) तळलेल्या चिप्सपैकी थोडे बेकिंग ट्रेवर अरेंज करावे. त्यावर सालसा, स्वीट कॉर्न, ऑलिव्ह, अलेपिनो पेपरचे तुकडे आणि चीज पसरवावे. ओव्हनमध्ये चीज मेल्ट होईस्तोवर बेक करावे.
५) कोथिंबिरीने सजवून सव्र्ह करावे.
टीप :
यामध्ये आवडते टॉपिंग घालू शकतो, जसे थोडे अननसाचे तुकडे, ब्लॅक बीन्स इत्यादी.
मेक्सिकन राइस
साहित्य :
१ वाटी तांदूळ
३ ते ४ वाटय़ा वेजिटेबल स्टॉक
२ चमचे तूप
१ चमचा लसूणपेस्ट
१ वाटी कांदा, पातळ उभा चिरून (लांबी एक इंच)
१/२ वाटी भोपळी मिरची, लहान चौकोनी तुकडे
१/२ चमचा लाल तिखट
२ मध्यम टोमॅटो
१/२ वाटी कोबी, उभी चिरून
१/४ कप राजमा किंवा ब्लॅक बीन्स (टीप)
२ टेस्पून उकडलेले मक्याचे दाणे
१ तमालपत्र
चवीनुसार मीठ
किसलेले चीज (ऐच्छिक)
कृती :
१) बीन्स ६ ते ७ तास पाण्यात भिजवून ठेवावेत. नंतर थोडे मिठ घालून प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. बीन्स अख्ख्ये राहिले पाहिजेत.
२) तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावा. पॅनमध्ये स्टॉक गरम करावा. त्यात धुतलेले तांदूळ घालावे. थोडे मीठ आणि तेल घालून तांदूळ मोकळा शिजवून घ्यावा. भात शिजला की गाळून घ्यावा. परातीत किंवा ताटलीत मोकळा करून गार करावा.
३) पातेल्यात पाणी गरम करावे. उकळत्या पाण्यात टोमॅटो घालावा. १-२ मिनिटांनी गॅस बंद करावा. टोमॅटो बाहेर काढून गार पाण्यात घालावेत. यामुळे टोमॅटोची साले निघतील. ती काढून आतला गर अलगद काढून सुरीने बारीक चिरून घ्यावा.
४) नॉनस्टिक पॅनमध्ये तूप गरम करावे. त्यात तमालपत्र आणि लसूणपेस्ट परतावी. लाल तिखट आणि कांदा घालून परतावे. कांदा १/२ मिनिटेच परतावा आणि लगेच भोपळी मिरची घालावी. अर्धवट शिजवावे आणि त्यात टोमॅटो घालून थोडा वेळ परतावे. तमालपत्र काढून टाकावे.
५) नंतर शिजवलेल्या बीन्स आणि मक्याचे दाणे घालून १/२ ते १ मिनिट परतावे. शिजवलेला भात घालून मोठय़ा आचेवर परतावे. गरजेपुरते मीठ घालावे.
६) सव्र्ह करताना किसलेले चीज आणि पाती कांदा घालावा.
टीप :
व्हेजिटेबल स्टॉक नसेल किंवा करायला वेळ नसेल तर तांदूळ साध्या पाण्यातही शिजवू शकतो.
वैदेही भावे