प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, असे म्हटले जाते. तशी अनेक उदाहरणेही आपल्या डोळ्यासमोर असतात. फुटबॉलपटू म्हणजे तरुणींच्या गळ्यातील ताईतच. त्यांना मिळणारा पैसा, स्टारडम, त्यांची झगमगीत जीवनशैली याचे आकर्षण सर्वानाच असते. त्यामुळे या फुटबॉलपटूंवर फिदा होणाऱ्या अनेक तरुणी असतात. फुटबॉलपटू आणि त्यांच्या गर्लफ्रेंड्स किंवा स्टार पत्नी हा चर्चेने चघळला जाणारा विषय असतो. सध्या फुटबॉल विश्वचषकादरम्यान फुटबॉलपटूंच्या व्ॉग्स (गर्लफ्रेंड्स किंवा पत्नी) या विषयीही बरीच चर्चा होताना दिसत आहे. आपल्या प्रियकराला पाठिंबा देण्यासाठी अनेक व्ॉग्स ब्राझीलच्या मैदानांवर हजेरी लावताना दिसत आहेत.
या व्ॉग्सची उच्च प्रतीची वस्त्रप्रावरणे, शॉपिंग, पाटर्य़ा, चमकोगिरी याचीही बरीच चर्चा कानावर पडते. २००२मध्ये जर्मनीत झालेला फुटबॉल विश्वचषक ‘व्ॉग्स’ संस्कृतीच्या आक्रमणानेच गाजला. ‘बाडेन-बाडेन’ शहरात इंग्लंड फुटबॉलपटूंच्या ‘व्ॉग्स’नी केलेली पुरेपूर मजामस्ती सर्वाधिक चर्चेत राहिली. या चंगळवादामुळे इंग्लंडला उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागल्याच्या वावडय़ा उठल्या होत्या. इंग्लंडच्या डेव्हिड बेकहॅमची पत्नी व्हिक्टोरिया बेकहॅम ही बहुचर्चित ‘व्ॉग्स’पैकीच एक आहे. फुटबॉलपटू आणि त्यांच्या व्ॉग्स याविषयीची रंजक माहिती घेण्याचा हा ऊहापोह-
बार्सिलोना फुटबॉल क्लबचा खेळाडू आणि २०१०मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या फिफा विश्वचषक विजेत्या स्पेन संघाचा प्रमुख खेळाडू म्हणजे गेरार्ड पिक. आणि ३७ वर्षीय पॉपगायिका शकिराबद्दल सांगण्याची कुणालाही गरज नाही. आपल्या गाण्यांच्या ठेक्यावर शकिराने अनेकांना घायाळ केले आहे. गेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठीच्या ‘वाका, वाका, दिस टाइम टू आफ्रिका’ या शकिराच्या अधिकृत गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान गेरार्ड पिक आणि शकिराची ओळख झाली. हे दोघे एकत्र आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. दोघांच्या मैत्रीचे रूपांतर विवाहबंधनात झाले. चार वर्षांनंतर पिक आणि शकिरा यांना मिलान नावाचे पुत्ररत्नही झाले. जगातील सर्वोत्तम लोकप्रिय जोडप्यांमध्ये पिक आणि शकिरा यांना फोर्ब्सच्या यादीतही स्थान मिळाले. आजच्या घडीला शकिराचे ७० दशलक्षपेक्षा जास्त अल्बम्स विकले गेले आहेत. पिकने २०१० फिफा विश्वचषक आणि २०१२ युरो चषक जेतेपदात स्पेनच्या यशात मोलाचा वाटा उचलला आहे.
गियानलुइगी बफन आणि अॅलेना सेरेडोव्हा
या दशकातील जगातील सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून इटलीचा कर्णधार गियानलुइगी बफनची ख्याती आहे. सलग पाचव्यांदा फिफा विश्वचषकात खेळणारा तो एकमेव गोलरक्षक ठरला आहे. फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलरक्षक होण्याचा विक्रम बफनच्या नावावर आहे. २००५मध्ये त्याची मैत्री अॅलेना सेरेडोव्हा हिच्याशी झाली. अॅलेना ही झेक प्रजासत्ताकची आघाडीची मॉडेल आणि अभिनेत्री. जवळपास सहा वर्षे एकत्र घालवल्यानंतर दोघांनीही २०११मध्ये विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. लुइस आणि डेव्हिड अशी दोन मुलेही त्यांना आहेत. तीन वर्षांच्या संसारानंतर अखेर गेल्या महिन्यात दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. झेक प्रजासत्ताकची मॉडेल असलेली अॅलेना ही १९९८च्या मिस पेजन्ट या स्पर्धेत सहभागी झाली होती. ही स्पर्धा तिला जिंकता आली नाही. पण बफनच्या साथीने तिने २००६चा विश्वचषक मात्र पटकावला.
बास्तियन श्वाइनस्टायगर आणि सारा ब्रँडनेर
मधल्या फळीतील मास्टरमाइंड अशी बास्तियन श्वाइनस्टायगरची ओळख. बायर्न म्युनिक आणि जर्मनी या संघाचा भरवशाचा खेळाडू असलेल्या बास्तियनला २०१३मध्ये जर्मनीचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. या वेळी फिफा विश्वचषकासाठी जर्मनी संघ दावेदार समजला जात असून बास्तियनच्या कामगिरीकडे सर्वाच्या नजरा असतील. २००७मध्ये म्युनिक येथे शॉपिंग करत असताना बास्तियनची ओळख सारा ब्रँडनेर हिच्याशी झाली. पण इबिझा येथे सुट्टीनिमित्त फिरायला गेले असताना त्यांची मैत्री अधिक दृढ होत गेली. जर्मनीची मॉडेल असलेली सारा ही वयाच्या १४व्या वर्षांपासूनच मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत आहे. स्पोर्ट्स इलस्ट्रेटेडच्या बॉडी पेंटिंग अंकात ती कव्हर पेजवर झळकली होती. श्वाइनस्टायगरच्या प्रत्येक सामन्यांना सारा हजेरी लावत असते.
सॅमी खेडिरा आणि लेना गेरके
मधल्या फळीतील अप्रतिम खेळाडू आणि रिअल माद्रिद तसेच जर्मनीचा भरवशाचा खेळाडू म्हणजे सॅमी खेडिरा. मे २०११ पासून सॅमी हा जर्मनीची टॉप मॉडेल लेना गेरके हिच्याशी डेटिंग करताना आढळतोय. लेना ही मॉडेल आणि टीव्ही पर्सनॅलिटी, हुशार आणि स्वत:चे मार्केटिंग करण्यात वाकबगार. लोकप्रिय मॅगेझिनच्या कव्हरपेजवर झळकलेली आणि जर्मनीतील टीव्ही शोमध्ये वारंवार दिसणारी. सॅमी खेडिराच्या यशात लेना गेरकेचा मोठा वाटा आहे. लेना गेरके हिच्याशी डेटिंगला जाऊ लागल्यापासून सॅमीच्या कारकिर्दीचा आलेख उंचावू लागला आहे. सॅमीने या मोसमात रिअल माद्रिदकडून जबरदस्त कामगिरी केली. २०१०मध्ये न्यू यॉर्क फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉकही केला होता. हे दोघेही लवकरच लग्न करणार आहेत.
आयकर कसिल्लास आणि सारा काबरेनेरो
रिअल माद्रिद आणि स्पेन संघाचा कर्णधार आयकर कसिल्लास म्हणजे या पिढीतील सर्वोत्तम गोलरक्षकांपैकी एक. कसिल्लासने स्पेन संघाला सुवर्णदिन दाखवून दिले. युरो २००८, फिफा विश्वचषक २०१० आणि युरो २०१२ या प्रतिष्ठेच्या स्पर्धाची लागोपाठ जेतेपदे पटकावणारा तो एकमेव कर्णधार ठरला आहे. २०१०च्या विश्वचषकादरम्यान सारा काबरेनेरो हिने कसिल्लासचे लक्ष विचलित केले. त्यामुळेच स्पेनला स्वित्र्झलडकडून अनपेक्षित पराभव पत्करावा लागला, असे बोलले जाते. सारा ही व्यवसायाने वृत्तवाहिनीची क्रीडा पत्रकार. या सामन्यानंतर तिने आपला बॉयफ्रेंड असलेल्या कसिल्लासची मुलाखत घेतल्यानंतर हा संशय आणखीन बळावला. मात्र कसिल्लासच्या सुरेख कामगिरीमुळे स्पेनने विश्वचषकावर नाव कोरले. विश्वचषक विजेतेपदानंतर मुलाखत घेताना आयकर-सारा चुंबनदृश्य चांगलेच गाजले होते. जुलै २००९मध्ये अमेरिकेच्या एफएमएचने घेतलेल्या मतचाचणीत जगातील सर्वात सेक्सियस्ट पत्रकार म्हणून साराची निवड झाली होती. विवाहबंधनात अडकलेल्या या जोडप्याने जानेवारी २०१४मध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. आता आपल्या मुलासह सारा फिफा विश्वचषकासाठी ब्राझीलमध्ये मुक्काम ठोकून आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डो म्हणजे तमाम तरुणींच्या गळ्यातील ताईत. रोनाल्डोची एक छबी टिपण्यासाठी त्या घायाळ होत असतात. काही दिवसांपूर्वीच सराव करत असताना एका तरुणीने रोनाल्डोचे आलिंगन घेण्यासाठी सुरक्षारक्षकांचे जाळे तोडले होते. सुरुवातीला एलिस गुडविन आणि गेम्मा अॅटकिन्सन या इंग्लिश मॉडेलशी डेटिंग करणारा रोनाल्डो २०१०मध्ये इरिना श्ॉक हिच्या प्रेमात पडला. रशियाची मॉडेल असलेली इरिना ही २०११मध्ये स्पोर्ट्स इलस्ट्रेटेडच्या कव्हरपेजवर झळकली होती. एका कार्यक्रमादरम्यान ते दोघे भेटले आणि गेली चार वर्षे एकमेकांसोबत डेटिंगला जातात. फिफा विश्वचषकासाठी पोर्तुगालचा संघ ब्राझीलला रवाना होत असताना इरिना रोनाल्डोसोबत होती. आता तीसुद्धा आपल्या बॉयफ्रेंडला चिअर-अप करण्यासाठी ब्राझीलला रवाना झाली आहे. रिअल माद्रिदचा स्टार खेळाडू आणि या वर्षीचा बलॉन डी’ऑर हा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावल्यामुळे रोनाल्डोकडून पोर्तुगालला विश्वचषकाच्या आशा आहेत.
मँचेस्टर युनायटेड आणि इंग्लंडचा भरवशाचा खेळाडू म्हणजे वेन रुनी. फिफा विश्वचषकात इंग्लंडची मदार रुनीच्याच खांद्यावर आहे. वेन रुनी आणि कुलीन हे लहानपणापासूनचे मित्र. इंग्लंडमधील निवेदिका, स्तंभलेखिका आणि सेलिब्रेटी अशी कुलीनची ओळख. वयाच्या १२व्या वर्षी कुलीनची रुनीशी ओळख झाली. त्यानंतर १६व्या वर्षांपासून कुलीन रुनीशी डेटिंगला जाऊ लागली. १२ जून २००८ला झालेल्या या जोडप्याच्या विवाहाचे फोटो प्रसिद्ध करण्यासाठी ओके या ब्रिटनच्या नियतकालिकाने त्यांना २.५ दशलक्ष युरो दिले होते, असे वृत्त आहे. यावरूनच रुनीचा स्टारडम किती मोठा आहे, हे दिसून येतो. काय आणि क्लाय अशी दोन मुलं त्यांना आहेत. आपल्या दोन मुलांना घेऊन कुलीन ब्राझीलला रवाना झाली आहे. तिला रुनीसोबत राहण्याची परवानगी इंग्लंड संघव्यवस्थापनाने दिली नसली तरी इपानेमा बीचजवळ तिचे वास्तव्य आहे. रुनीच्या सर्व सामन्यांना ती हजर राहणार असल्यामुळे कुलीनकडेही सर्वाचे लक्ष असेल.
सर्वानाच ‘मेस्सीमॅनिया’ने भुरळ घातलेली आहे. अँटोनेला रॉक्युझो हीदेखील त्यापैकीच एक. लिओनेल मेस्सी म्हणजे जगभरातील तमाम तरुणींसाठी प्रेरणास्थान. सुरुवातीला अर्जेटिनाची ग्लॅमरस मॉडेल लुसियाना सालाझार हिच्यासोबत डेटिंग करणारा मेस्सी नंतर अँटोनेला रॉक्युझो हिच्या प्रेमात पडला. एका उत्सवादरम्यान या दोघांची भेट झाली. २०१२मध्ये या जोडप्याला पुत्ररत्नाचा लाभ झाला. थिआगो असे त्याचे नाव. मेस्सी कोणत्याही सामन्यात खेळत असो, त्याला पाठिंबा देण्यासाठी अँटोनेला जातीने हजर असते.
दौऱ्यावर असताना मेस्सीही आपल्या या जिवलग सहचारिणीला बर्थ-डेच्या शुभेच्छा देण्यासाठी विसरत नाही. चार वेळा बलॉन डी’ऑर पुरस्कार पटकावणाऱ्या लिओनेल मेस्सीच्या कामगिरीविषयी कुणालाही शंका नाही. पण देशाकडून खेळताना तो कायम अपयशी ठरतो, अशी त्याच्यावर टीका होत असते. आता दिएगो मॅराडोना याच्यानंतर मेस्सी अर्जेटिनाला विश्वचषक जिंकून देतो का, याकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत.