क्रिकेट व फुटबॉल यांच्यातील सर्वात लोकप्रिय खेळ कोणता अशी चर्चा नेहमीच होत असते. क्रिकेट हा अगदी मोजक्याच देशांमध्ये खेळला जातो. फुटबॉल मात्र जगातील बहुतेक सर्व देशांमध्ये खेळला जातो व त्याचे चाहतेही अगणित आहेत. फुटबॉलच्या सामन्यात गोल होण्याचे क्षण अगदी मोजकेच असले तरी या सामन्यातील वेगवान हालचाली, जीव मुठीस धरणाऱ्या चाली व गोल करताना खेळाडूंनी दाखविलेली अप्रतिम शैली यामुळेच फुटबॉल हा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे.
फुटबॉल हा जसा मनोरंजक खेळ आहे, तसाच त्याचा इतिहासही अतिशय रंजक आहे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धाचे जनक असलेल्या ग्रीसमध्येच फुटबॉलचा जन्म झाला असे सांगितले जाते. इसवी सन पूर्व ५०० मध्ये स्पार्टा येथे या खेळाचा जन्म झाला अशी इतिहासात नोंद आहे. रोमन लोकांमध्ये हा खेळ अतिशय लोकप्रिय होता. या खेळाला हरपास्टम असेही त्या वेळी नाव होते. चीनमध्ये हा खेळ ‘त्सू-चू’ या नावाने ओळखला जात असे. या खेळाचा प्रसार अन्य प्रदेशातही झाला. इंग्लंडमध्ये या खेळाची लोकप्रियता एवढी वाढली की तेथे प्रचलित असलेला धनुर्विद्या या खेळाच्या लोकप्रियतेवर त्याचा अनिष्ट परिणाम होऊ लागला. १३२४ मध्ये इंग्लंडचा राजा एडवर्ड (द्वितीय) याने या खेळावरच बंदी घातली. कोंबडे झाकले तरी ते ओरडण्याचे थोडेच थांबते असाच अनुभव पाहावयास मिळाला. या बंदीमुळे अन्य
या खेळास तंत्रशुद्ध स्वरूप लाभावे व हा खेळ अधिक संघटित व्हावा या हेतूने १८६२ मध्ये या खेळाची नियमावली तयार करण्यात आली. १८६३ मध्ये फुटबॉल असोसिएशन ऑफ इंग्लंडची स्थापना झाली. १८७२ मध्ये इंग्लंड व स्कॉटलंड यांच्यात झालेल्या सामन्यामुळे त्यास आंतरराष्ट्रीय सामन्याचेही स्वरूप प्राप्त झाले. ग्लासगो येथे झालेला हा सामना गोलशून्य बरोबरीत राहिला, मात्र या सामन्यामुळे फुटबॉल संयोजकांचा उत्साह वाढला. अधिकाधिक देशांपर्यंत या खेळाचा प्रसार होण्यासाठी चालना मिळाली. या खेळाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतही त्याचा समावेश होण्यास फार वेळ लागला नाही. १९०० व १९०४ मध्ये या खेळाचा प्रदर्शनीय खेळ म्हणून समावेश करण्यात आला होता. ऑलिम्पिक संयोजकांनी त्यास स्पर्धात्मक दर्जा देण्यास मान्यता दिली. १९०० मध्ये इंग्लंडने विजेतेपद मिळविले तर १९०४ मध्ये कॅनडाचा संघ विजेता ठरला. संघटनात्मकदृष्टय़ा फुटबॉलचे सामने फारसे यशस्वी झाले नाहीत, अशी संघटकांना खंत वाटत होती. १९०४ मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाची (फिफा) स्थापना करण्यात आली. त्यामुळे या खेळास खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता लाभली. लंडन येथे १९०८ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत फुटबॉल खेळास स्पर्धात्मक क्रीडा प्रकाराचे स्थान मिळाले. १९०८ व १९१२ मध्ये इंग्लंडने या खेळाचे सुवर्णपदक जिंकले. या दोन्ही स्पर्धाच्या वेळी फक्त हौशी खेळाडूंकरिताच ही स्पर्धा ठेवण्यात आली होती. फिफाने ऑलिम्पिक स्पर्धेऐवजी आपली वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न १९०६ मध्ये केला. स्वित्र्झलडमध्ये त्यांचा हा प्रयत्न यशस्वी ठरला नाही. कदाचित फुटबॉलसाठी आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे सामने ही वेगळीच संकल्पना असल्यामुळे अनेक देशांनी या स्पर्धेस सकारात्मक सहकार्य केले नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा