मी सातवीत होतो तेव्हापासून फुटबॉल बघायला लागलो. मला मॅन्चेस्टर युनायटेड ही टीम आवडते. सोशल नेटवर्किंग साइटवरदेखील या टीमला पाठिंबा देणारे बरेच ग्रुप्स आहेत. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये अर्जेटिना ही टीम आवडते. माझ्या मित्रांकडे त्यांना आवडणाऱ्या टीमचे टी-शर्ट्स, बॅग वगैरे गोष्टी आहेत. पहाटे ३ वाजता उठूनसुद्धा मी मॅच बघतो.
-निशांत तांबे, जी.एल.सी. लॉ कॉलेज, मुंबई.
मी २००६चा फिफा वर्ल्डकप जो जर्मनीत झाला होता, तेव्हापासून फुटबॉलच्या मॅचेस बघतो. ई.पी.एल.मधील चेल्सीचा फुटबॉल क्लब खूप आवडतो. आवडते खेळाडू लिओनेल मेस्सी, फ्रँक लॅम्पार्ड, एडर्न हेझार्ड. क्रिकेटपेक्षा फुटबॉलच मला आवडतो. या वर्षीच्या वर्ल्डकपमधील जर्मनी, ब्राझील, स्पेन, अर्जेटिनाच्या मॅचेस बघण्यासारख्या असतील.
– शौनक घैसास, वझे केळकर कॉलेज, मुंबई.
फुटबॉल माझा आवडता खेळ आहे. क्लब व इंटरनॅशनल अशा दोन्ही प्रकारच्या मॅचेस अगदी उशिरा जागूनपण बघतो. मला फुटबॉल खेळायलाही आवडते. आर्सेनल ही माझी आवडती टीम आहे. टीमला सपोर्ट करायला मी त्या क्लबचा टी-शर्टपण घेतला आहे. जर्मनी ही आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील आवडती टीम, तर जर्मनीचाच ओझील हा फेव्हरेट खेळाडू.
– पराग जोगळेकर, महात्मा कॉलेज, मुंबई.
गेली सात ते आठ वर्षे फुटबॉल फॉलो करतो आहे. मॅँचेस्टर युनायटेड हा आवडता क्लब आहे. त्याचा टी-शर्ट विकत घेतला आहे, पण बाकीच्या गोष्टी घ्यायला आवडत नाहीत. क्वचित मॅचचे स्क्रिनिंग बघायला जातो क्लबमध्ये. मला रात्री जागून मॅच बघायला आवडतात. आवडता संघ आहे इंग्लंड. वेन रुनी हा माझा आवडता खेळाडू आहे.
– रवी लागू, पाश्र्वनाथ कॉलेज, मुंबई.
वेन रुनी हा माझा आवडता खेळाडू आहे व इंग्लंड ही फेव्हरेट टीम. ब्राझील व स्पेनच्या मॅचेस बघण्यासारख्या असतील असे वाटते. मॅंचेस्टर युनायटेड हा आवडता क्लब. गेल्या
३-४ वर्षांपासून फुटबॉल बघतोय.
– ऋग्वेद बापट, एन. एम कॉलेज, मुंबई.