आज इंटरनेटमुळे जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातला प्रवास अगदी बिनघोर करता येतो. सगळ्याचं बुकींग घरबसल्या करता येतं. काहीही अडचण आलीच तर हातात मोबाइल असतोच. असं काहीही नसतानाच्या काळातला एक प्रवास-
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सतत परदेश प्रवास करणारा माझा मुलगा अगदी अल्प मुदतीत प्रवासाचे तिकीट, परदेशी चलन, प्रवासासाठी आरक्षण, परदेशातील मीटिंगचे पूर्ण तपशील, राहण्याची व्यवस्था आदी गोष्टी संपर्क व माहितीच्या आधुनिक ई-तंत्रज्ञानाच्या आधारे करून घेतो. डिसेंबर १९७७ मध्ये संयुक्त राष्ट्राचे तज्ज्ञ म्हणून सोमालियासारख्या अप्रगत देशाला जातानाचा प्रवास व तेथे काम करताना हे तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. पण निव्वळ नशिबाची साथ, परक्या लोकांची सहानुभूती व अनपेक्षितपणे अनोळख्या व्यक्तींकडून मिळालेल्या मदतीमुळे प्रवास व यूएनआयडीओ तसंच युएनडीपी (वठकऊड/वठऊढ) ने सोपविलेल्या कामाची पूर्ती, भारत सोडताना खिशांत फक्त ६० डॉलरचे परकीय चलन ठेवून कशी केली याचे वर्णन जवळपास ४० वर्षे जुने असले तरी वाचकांना भावेल असे वाटते.
संयुक्त राष्ट्र संघटनेखालील ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे प्रमुख कार्यालय असलेल्या व यूएनआयडीओ तसंच युएनडीपी या संस्थांकडे सोमालियाच्या केनिया सीमेजवळ असलेल्या कुल्मीस या कोळ्यांच्या खेडय़ात पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी सोमालियाच्या सरकारने प्रस्ताव पाठविला होता. सोमालिया अतिशय मागासलेला व अप्रगत देश असल्यामुळे व कुल्मीसजवळ पिण्यालायक पाणी उपलब्ध नसल्यामुळे खाऱ्या पाण्यापासून पिण्याचे पाणी तयार करणे (ऊी२ं’्रल्लं३्रल्ल) हाच एक पर्याय होता व त्यासाठी सौर ऊर्जाच वापरावी लागणार होती. या संबंधात भारतातील भावनगरच्या संस्थेत होत असलेल्या कामाकडे यूएनडीपीचे लक्ष गेले. भारत सरकारच्या दिल्लीतील संबंधित कार्यालयांशी संबंध साधून डॉ. टकला नावाचे तज्ज्ञ भावनगरला १९७७ साली आले. त्यांनी भावनगरच्या सेन्ट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिटय़ूटच्या सौर बाष्पीभवन पद्धतीचा वापर करून संस्थेकडून तांत्रिक मदत घेण्याचे ठरविले. या कामासाठी माझे व सिव्हील इंजीनिअर घोघारी यांची नावे डॉ. टकला यांनी या प्रकल्पाचे सल्लागार म्हणून सुचविली. आम्ही दोघे दिल्लीच्या यूएनडीपीच्या कार्यालयात मुलाखत देण्यासाठी गेलो. सल्लागार नियुक्तीचे पत्र सर्व अटींचा समावेश करून आम्हाला मिळाले. त्यानुसार प्रवासाचा खर्च म्हणून प्रत्येकी ५०० डॉलर आगाऊ मिळणार होते.
आमचा हा प्रवास डिसेंबर १९७७ ते जानेवारी १९७८ दरम्यान झाला. प्रकल्प युएनआयडीओ व यूएनडीपी यांनी नक्की केलेला असल्यामुळे त्यांचे ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथील प्रमुख कार्यालयात जाणे आम्हाला आवश्यकच होते. ठरविलेल्या अटींनुसार माझी नेमणूक एक महिन्यासाठी होती व भारतात परत येण्यापूर्वी व्हिएन्नाच्या कार्यालयात रिपोर्ट देणे आवश्यक होते. घोघारींची नेमणूक दोन महिन्यांसाठी होती व त्यांना मोगादिशूहून सरळ भारतात परत यायचे होते. या प्रकल्पाचे व्यवस्थापन मोगादिशू येथील युनिसेफच्या कार्यालयातून होणार होते.
आफ्रिका खंडातील सोमालिया या देशाच्या पूर्वेस अरबी समुद्र, उत्तर व पश्चिमेच्या मोठय़ा भागास लागून इथिओपिया हा देश व दक्षिणेस केनिया आहे. सर्वसाधारण सोयीही तेथे उपलब्ध नाहीत व पायाभूत सुविधा जवळपास नव्हत्याच. मोगादिशू ही सोमालियाची राजधानी व किस्मायू हे दोन नंबरचे शहर.
आमच्या संस्थेस कुल्मीस येथे रोज पाच हजार लीटर पिण्याचे पाणी समुद्राच्या पाण्यापासून तयार होईल अशा सौर बाष्पीभवन प्रक्रियेवर आधारित प्लँट बांधण्यासाठी आवश्यक ते डिझाइन व ड्रॉइंग तयार करून सर्व बांधकाम कसे करायचे हे सांगण्यासाठी सूचना पत्रक तयार करून द्यायचे होते. प्लँटसाठी आवश्यक असलेले सर्व पाइप, फिटिंग व इतर सामान भारतातच खरेदी करून मोगादिशूस जहाजाने रवाना करायचे होते. ही कामे पूर्ण करून आम्ही सोमालियाला जाण्याच्या तारखेची वाट पाहत होतो. प्रवासासाठीचे प्रत्येकी ५०० डॉलरही मिळालेले नव्हते.
१५ डिसेंबर १९७७च्या आसपास संस्थेचे डायरेक्टर, डॉ. मेहता यांनी आम्हाला बोलावून आम्ही ताबडतोब सोमालियास गेले पाहिजे अशी ताकीद दिली. त्याच सुमारास संस्थेतील एक गुजराती वैज्ञानिक डॉ. कावा अमेरिकेहून परत आले होते. मला कसे सुचले कुणास ठाऊक, पण त्याच्याकडून आम्ही दोघांनी २०-२० डॉलर घेतले व एवढेच परकीय चलन खिशांत ठेवून मुंबईला विमानाने गेलो.
सोबत असलेल्या यूएनडीपी च्या मुंबईतील कार्यालयाच्या पत्त्यावर पोचलो व आम्हाला देऊ असलेल्या पैशाची चौकशी केली. तेथील अधिकाऱ्याने त्यांना काहीच माहिती नसल्याचे सांगितले. आफ्रिका खंडात प्रवास करायचा असल्यामुळे पीत ज्वरासाठी (ी’’६ोी५ी१) लसीकरण आवश्यक होते. त्यासाठी आम्ही मुंबई बंदरावर जाऊन लसीकरण केले. ऑस्ट्रियाचा व्हिसा घेतला. त्यानंतर आम्ही ट्रॅव्हल कंपनीत जाऊन आमची येण्या-जाण्याची तिकिटे घेतली.
व्हिएन्नाला पोचल्यावर आपल्याला घेण्यासाठी कुणीतरी विमानतळावर येईल व आपल्याला ताबडतोब पैसे मिळतील (माझ्या पहिल्या परदेश प्रवासाच्या अनुभवानुसार) अशी खात्री मी घोघारींना दिली. मुंबई विमानतळावर आम्ही प्रत्येकी १० डॉलरचे चलन विकत घेतले. त्यामुळे दोघांचे मिळून ६० डॉलर एवढे परकीय चलन खिशात ठेवून परदेश प्रवासास आम्ही निघालो.
मुंबई-रोमचा प्रवास एअर इंडियाच्या विमानाने झाला. रोमवरून व्हिएन्नाला जाणारे ऑस्ट्रियन एअरलाइन्सचे विमान सकाळी होते. त्या काळी विमानात भरपूर खायला दिले जात असे. त्यामुळे मुंबई-रोम प्रवासांत रात्रीचे जेवण व रोम-व्हिएन्ना प्रवासांत नाश्ता झाला होता. व्हिएन्ना विमानतळाच्या बाहेर आल्यावर आमच्या नावाच्या पाटय़ा दिसतात काय म्हणून मोठय़ा आशाळभूत नजरेने शोधले. पण पदरी निराशाच पडली. यूएनचे सल्लागार म्हणून आम्ही आलेलो असल्यामुळे व परकियांचे आपण करीत असलेले स्वागत डोळ्यासमोर आल्यामुळे आमच्याप्रति झालेले दुर्लक्ष मनास खुपले. आमचे चिंतातुर चेहरे पाहून विमानतळावरील एक ऑस्ट्रियन कर्मचारी आमच्याजवळ आला आणि अदबीने मे आय हेल्प यू, असे तो विचारता झाला. त्याला मी काय झाले ते सांगितले. तेव्हा त्याने यूएनआयडीओ कार्यालयातील संबंधित व्यक्ती वा खात्याचा फोन नंबर आहे काय म्हणून चौकशी केली. तो नंबर त्याने फोनवर जोडून दिला व मला बोलण्यास सांगितले. यूएनआयडीओतील संबंधित व्यक्तीस आम्हाला रिसीव्ह करण्यासाठी विमानतळावर कुणीच आले नाही म्हणून सांगितले. त्या व्यक्तीने आवश्यक ते वाहन व चालक उपलब्ध नसल्यामुळे विमानतळावरून टॅक्सी करून यूनआयडीआोच्या कार्यालयात येण्याचे सुचविले. आम्हाला मदत करणाऱ्या व्यक्तीने आम्हाला टॅक्सीने जाणे परवडणार नाही असे सांगून विमानतळ ते यूएनआयडीओ कार्यालय शटल सव्र्हीस उपलब्ध आहे व त्यानेच जाण्याचे सांगितले. जवळच्या ३० डॉलरचे ऑस्ट्रियन शिलिंग घेण्यास सांगून साधारणत: २० डॉलर वाहनासाठी लागतील, असे सांगितले व आम्हाला शटल सव्र्हिस जेथून जाते तेथे त्याने पोचविले. मारुती व्हॅनसारख्या दिसणाऱ्या छोटय़ा गाडीने आम्ही यूनआयडीओच्या कार्यालयात पोचलो. तेथील स्वागत कक्षांत थोडा वेळ वाट पाहिल्यावर आम्हाला भेटायला एक व्यक्ती आली. आमचे सामान स्वागत कक्षातच ठेवून त्याच्यासोबत माहिती कक्षाकडे कूच केले. चालत जात असताना बरेच भारतीय चेहरे दिसले. १९६२ साली पिंपरी येथील हिंदुस्तान अँटिबायोटिक्सच्या कारखान्यात ट्रेनिंग घेत असताना भेटलेले डॉ. चारी दिसले. सोबतच्या व्यक्तीने यूनआयडीओत तज्ज्ञ म्हणून काम करीत असलेल्या रामप्रसाद यांची ओळख करून दिली. माहिती विभागांत कॅसेटस् ऐकून व छापील कागदपत्रातून सोमालियाविषयी माहिती करून घेतली. सोबतच्या व्यक्तीने पैशाचा व्यवहार बाकी असतील तर ताबडतोब अकाऊंटस् खात्यात जाण्याची आम्हाला सूचना दिली. कारण त्या दिवशी कामकाज फक्त अर्धा दिवसच सुरू राहणार होते.
त्या खात्यात गेलो तर तेथील पूर्ण महिला वर्ग येणाऱ्या नाताळाचे स्वागत करण्याची तयारी करीत होत्या. संबंधित अधिकारी महिलेस आम्हाला प्रवासाचे पैसे न मिळाल्याचे सांगितले. माझ्या बोलण्यावर अविश्वास दाखवत त्यांच्याकडील रेकॉर्डप्रमाणे आम्हाला पैसे पाठविले होते व खिशात पैसे नसताना आम्ही प्रवासच कसा केला असे बोलून त्या काही मदत करण्यास असमर्थ आहेत असे सुचविले. यूनआयडीओच्या कार्यालयात कुणी भारतीय अधिकारी ओळखीचा आहे काय असे विचारले असता नुकत्याच भेटून आलेल्या रामप्रसाद यांचे नाव सांगितले. त्यांना फोन करून ते आम्हाला आर्थिक मदत करू शकतील काय असे त्या महिलेने विचारले असता अपेक्षेप्रमाणे पलीकडून नकार आला. एवढय़ात एक उंचशी जपानी तरुणी आमच्याकडे आली व आम्हाला दिलासा देत म्हणाली, ‘या सर्व महिलांचा तुमच्या बोलण्यावर विश्वास नसला तरी तुम्ही खरे बोलत आहात हे मला मान्य आहे. कारण मी काही काळ भारतात राहिलेले आहे व एक भारतीय माणूस एक सफरचंद खाऊन दिवस काढू शकतो हे मला माहिती आहे. तुम्ही काळजी करू नका. भावनगरहून निघालेल्या दिवसापासून मोगादिशूस पोचेपर्यंतच्या दिवसांचा तुम्हाला डी.ए. मिळालाच पाहिजे. तेवढय़ा पैशात तुम्ही तुमचा पुढील खर्च भागवू शकाल याची मला खात्री आहे. मी तुमचे पे-ऑर्डर तयार करते तोपर्यंत तुम्ही बाहेरील रीसेप्शन काऊंटरवर जा. तेथील रोम शहराची टेलीफोन डिरेक्टरी काढून तेथील मध्यवर्ती स्टेशनजवळच्या सिंगल स्टार हॉटेल्सची चार-पाच नावे व पत्ते लिहून आणा.’ त्यानुसार मी पत्ते घेऊन आलो तेव्हा तिने आम्हाला कॅशिअरकडे जाऊन पैसे घ्या अशी सूचना दिली. आमचे पेमेंट झाल्याशिवाय कॅश बुक बंद करू नका अशी सूचनाही तिने कॅशिअरला आधीच दिली होती. पैसे घेऊन त्या तरुणीचे आभार मानून यूएनआयडीओे निश्चित केलेल्या हॉटेलमध्ये पोचण्यास दुपारचे चार वाजले होते.
दुसऱ्या दिवशी रोम विमानतळाच्या बाहेर आल्यावर एका पोलीसास हॉटेलचे नाव व पत्ता दाखविला व त्याने केलेल्या मार्गदर्शनानुसार डिसेंबरच्या युरोपमधील थंडीत हातात सामान उचलून कसेबसे हॉटेलवर चालत
मोगादिशू विमानतळावर बरेच भारतीय चेहरे दिसले. एक दोघांशी हिंदीतही बोलणे झाले. विमानतळावर आम्हाला भेटण्यासाठी युनीसेफचा एक कर्मचारी आला होता. त्याने आम्हाला तेथील चांगल्या हॉटेलमध्ये नेले. स्थिरस्थावर झाल्यावर मोगादिशू येथील युनिसेफच्या कार्यालयात गेलो. आम्ही ज्या प्रकल्पासाठी आलो होतो त्याचे सोमालियातील व्यवस्थापन या कार्यालयातून होणार होते. तेथील प्रमुख केनेडी (ऑस्ट्रेलियन) यांना आम्ही भेटलो. दक्षिण सोमालियात भरपूर पाऊस झाल्यामुळे आम्ही उशिराच सोमालियास यावे असा संदेश त्यांनी पाठविल्याचे सांगून आम्ही तेथे का येऊन पोचलो असे विचारले. तो संदेश आम्हाला मिळालाच नव्हता असे त्यांना आम्ही सांगितले. तेव्हा कुल्मीस या खेडय़ास भेट देण्याचा कार्यक्रम निश्चित करून सांगतो असे त्यांनी सांगितले. सल्लागार म्हणून मला सौर बाष्पीभवन पद्धतीचा नि:क्षारीकरण (ऊी२ं’्रल्लं३्रल्ल) करण्यासाठी सोमालियात किती संभव अथवा शक्यता आहे याचा रिपोर्ट द्यावयाचा होता. तसेच तेथील अभियांत्रिकी महाविद्यालयात सौर बाष्पीभवनाचे प्रयोग करण्यासाठी आवश्यक त्या उपकरणांचे ड्राइंग व सूचनाही द्यावयाच्या होत्या. मला आवश्यक असलेली माहिती गोळा करण्यासाठी मी मोगादिशूतील संबंधित कार्यालयांमध्ये जात होतो. घोघारी यांना मुख्यत्वे बांधकामासाठी मार्गदर्शन व देखरेख ही कामे होती.
कुल्मीसचा प्रवास तीन टप्प्यांमध्ये करायचा होता. मोगादिशू ते किस्मायू या पहिल्या टप्प्याचा प्रवास विमानाने करायचा होता. त्यानुसार विमानतळावर आलो. बोर्डिग पासवर सीट नंबर नव्हता. त्यासंबंधी चौकशी करताच विमानात जी सीट रिकामी असेल तेथे बसायचे अशी सूचना मिळाली. किस्मायूला जाणारे विमान आले तेव्हा आपल्या एस.टी. स्टँडवर बस आली की प्रवाशांची जी धावाधाव सुरू होते तसाच प्रकार विमानतळावर दिसला. विमानातील प्रवासी बाहेर निघण्यापूर्वीच हातात सामान घेऊन धावणारे प्रवासी शिडीजवळ हजर. किस्मायूला एका लहानशा हॉटेलमध्ये एक-दोन तास विश्रांती घेऊन दुसऱ्या टप्प्याच्या प्रवासास लँड रोव्हर जीपने सुरुवात केली. जीप धावते म्हणून रस्ता म्हणायचा अशी अवस्था. त्यापेक्षा आपल्या खेडय़ामधील बैलगाडीचे रस्ते बरे अशी परिस्थिती. डाव्या बाजूला अरबी समुद्र व उजव्या बाजूस मधूनच जंगल तर मधूनच ओसाड वाळवंटी भाग असा प्रदेश होता. लोकवस्तीचे नाव नाही. कुठे कुठे उघडय़ा, हातापायाच्या काडय़ा असलेल्या व्यक्ती दिसल्या. जीप जेथे थांबली तेथे एक मोटर बोट तयार उभी होती. म्हणजे तिसऱ्या टप्प्याचा प्रवास समुद्रावरून झाला. कुल्मीस खेडय़ाजवळ बांधलेल्या एका लहान अतिथी गृहात रात्रीचा मुक्काम झाला. सकाळच्या नाश्त्यांत उंटिणीचे दूध ठेवलेले होते. थोडय़ा वेळाने युनिसेफसाठी काम करणारा तंत्रज्ञ आला. त्याच्याशी प्रकल्पासंबंधी व जागेसंबंधी चर्चा केली. भावनगरहून पाठविलेले ड्राइंग त्याने पाहिले होते. हे काम झाल्यावर आल्या वाटेने मोगादिशूस परत आलो. केनेडींशी चर्चा केली. मी माझे काम सुरू ठेवले व घोघारी मोगादिशूच्या एका वर्कशॉपमध्ये जाऊन पाहणी करून आले.
मोगादिशूत रस्त्याने फिरत असताना तेथील तरुण मंडळी आमच्याकडे बघत शम्मी कपूर स्टाइलने ‘सुक्कू-सुक्कू’ म्हणत ओरडत असत. त्यासंबंधी चौकशी केली असता सोमालियांत हिंदी सिनेमे लोकांना खूप आवडतात असे कळले. एखाद्या व्यक्तीस तेथे लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर त्याने ओपन-एअर थिएटर बांधून हिंदी सिनेमे दाखविले की काम होणारच असे सांगण्यात आले. मोगादिशूला भारतीय मंडळी होती. रामकृष्णन नावाचे कानडी गृहस्थ बँकेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आले होते. त्यांच्या सांगण्यानुसार तेथील कर्मचारी हातात सतत कॅल्क्युलेटर ठेवून फिरत असतात. (सध्या आपल्याकडे सेल फोन्स असतात त्याप्रमाणे) अगदी दोन अधिक दोन ही बेरीज करायलाही ते त्याचा वापर करतात. रामकृष्णन सोबत एके ठिकाणी आम्ही उभे असताना दोनतीन चिनी व्यक्ती आल्या व त्यांनी सरळ हिंदीत आमच्याशी संवाद साधला. आम्ही कोणत्या कामासाठी सोमालियात आलो हे बोलताना त्यांच्यापैकी एकाने ‘सौर बाष्पीभवन’ म्हणून आश्चर्याचा धक्काच दिला. रामकृष्णन संभाषणात भाग न घेताना बघून, ‘आप दक्षिण भारत के है क्या?’ असा एका चिनी व्यक्तीने प्रश्न विचारला. मेनन नावाचे मल्ल्याळी गृहस्थ एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीसाठी आले होते.
मला नवल वाटले, जेव्हा मुंबईकर गद्रे आम्हाला भेटले तेव्हा! ते एका शिपिंग कंपनीत नोकरी करीत होते. मोगादिशूत कच्छ भागातून आलेले गुजराती बऱ्या संख्येने आहेत. सोने-चांदी, किराणा, हार्डवेअर वगैरेची दुकाने सांभाळून आहेत. गद्रेंनी एका व्यापाऱ्याची ओळख करून दिली. मी त्यांना कच्छमध्ये भूजला जात असतो असे सांगितल्याबरोबर कच्छ जिल्हा पंचायत समितीचे अध्यक्ष त्यांचे मित्र असल्याचे त्यांनी उत्साहाने सांगितले व मोगादिशू सोडण्यापूर्वी मित्रासाठीची भेटवस्तू घेऊन त्यांना भूजला देण्याची विनंती केली. (त्यांची इच्छा मी पूर्ण केली) एका हार्डवेअरच्या दुकानदाराकडे जेवणासाठी पेइंग गेस्टची सोय असल्याचे कळले. घोघारी पूर्ण शाकाहारी असल्यामुळे ही व्यवस्था झाल्यावर ते खूप खूष झाले. मोगादिशूला असताना आम्ही भारतीय वकिलातीस भेट दिली. त्यांच्याकडे आमच्या येण्याविषयी तर सोडाच पण युनआयडीओसोबत झालेल्या करारासंबंधीही माहिती नव्हती. याबाबतीत चीनची वकिलात बरीच पुढे असल्याचे लक्षात आले. कुटीर उद्योग सोमालियांत चालविण्यासाठी बरेच चिनी तेथे दिसत होते.
माझे काम संपवून मी घोघारी व इतरांचा निरोप घेऊन रोममार्गे परत व्हिएन्नाला आलो. तेथे मी केलेल्या कामाची संबंधित व्यक्तीस माहिती दिली. यूएनआयडीओच्या नियमानुसार स्वदेशी परत जाण्यापूर्वी मेडिकल चेक-अप करून घेणे आवश्यक असते. ते त्यांच्या स्वास्थ्य विभागांत काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या परिचारिकेकडून झाले. हे सारे आटोपून एका दुकानात शिरून वजनदार पण किमतीने कमी असा स्लाइड प्रोजेक्टर विकत घेतला. ऑस्ट्रिया देशाची राजधानी असलेले व्हिएन्ना शहर इतिहास व कला क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे. पण हे शहर बघण्यासाठी मला वेळच मिळाला नाही. रात्र हॉटेलमध्ये काढून व्हिएन्ना विमानतळावर आलो. काऊंटरवर माझे व्हिएन्ना-रोम-मुंबई असे परतीचे तिकीट दाखवून व्हिएन्ना-रोम प्रवासासाठी बोर्डिग पास घेतला व सुरक्षा तपासणी करून प्रयाणासाठी ठरलेल्या कक्षांत जाऊन बसलो. बराच वेळ झाल्यावरही दुसरे कुणीही प्रवासी न आल्यामुळे थोडासा संभ्रमात पडलो. जाणारी मंडळी वेळेवर येतील (रोमला जाण्यासाठी) असा विचार करीत असताना माझ्या नावाचा वाकडा तिकडा उच्चार करीत पॅसेंजर ट्रॅव्हलिंग टू बॉम्बे फ्रॉम रोम बाय एअर इंडिया इज रिक्वेस्टेड टू कॉन्टॅक्ट तिकीट काऊंटर अशी घोषणा ऐकली. मी सुरक्षा-तपासणी केलेली असल्यामुळे सुरक्षा अधिकारी मला बाहेर जाऊ देण्यास तयार नव्हते. तेवढय़ात ज्या तरुणीने मला बोर्डिग पास दिला होता ती धावत येताना दिसली. आल्यावर त्या काळात व्हिएन्ना-रोम उड्डाण जात नाही व माझे तिकीट कन्फर्म करताना झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागितली. आता पुढे काय? हा माझा प्रश्न ऐकण्यापूर्वीच, मुंबईचे विमान रोमहून निघण्यापूर्वी मी रोमला पोचू शकेन अशी व्यवस्था करण्याचे आश्वासन मला देऊन ती परत गेली. एअर इंडियाची विमाने उशिराच येतात याची मला खात्री होतीच. पण बदललेल्या प्रवासानुसार तिकिटाचे पैसे भरावे लागले तर ते पैसे कुठून आणायचे हा प्रश्न मनात आला. त्यानंतर १५-२० मिनिटांत ती मुलगी परत आली व तिने मला व्हिएन्ना ते झ्युरीच व झ्युरीच ते रोम अशी तिकिटे देऊन झ्युरीचला जाण्यासाठी नवा बोर्डिग पास दिला. चूक विमान कंपनीची असल्यामुळे माझ्याकडून पैसे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे सांगत परत क्षमा मागून पुढील प्रवासासाठी तिने शुभेच्छा दिल्या. त्यानुसार मी रोमला पोचलो. झ्युरीचच्या विमानतळावर स्वीस चॉकोलेटची खरेदी केली. रोमला पोचल्यावर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याने एअर इंडियाचे विमान दोन तास लेट असल्याचे सांगितले. व्हिएन्ना विमानतळावरच माझ्या सामानाला लावलेली लेबल्स बदलल्याचे त्या तरुणीने मला सांगितले होतेच. उशिरा आलेल्या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईला पहाटे पोचलो. सामान कक्षांत माझे सामान दिसताच मनाला बरे वाटले.
मुंबई-भावनगर सकाळच्या विमानाने भावनगरकडे निघालो. बरेचदा हे विमान कमी उंचीवरून आमच्या कॉलनीवरून जात असे. त्यादिवशी मी विमानातून आमच्या क्वॉर्टरसमोरच्या मोकळया जागेतून हात हालवीत असलेले माझे कुटुंब बघितले. घरी आल्यावर तीन वर्षांच्या लहान मुलीने मी तिला विमानातून हात का दाखविला नाही म्हणून विचारले. संस्थेत गेल्यावर आमचे डायरेक्टर डॉ. मेहता यांना कामाचा व प्रवासाचा रिपोर्ट दिला व पैशाचा प्रश्न कसा सुटला हे सांगितले. ते ऐकल्यावर त्यांचा गुजराती बाणा दाखवीत ‘मी तुमच्या जागी असतो तर प्रवासासाठी निघालोच नसतो’ हे भाष्य केले!
मेगादिशू येथील वर्कशॉपमध्ये घोघारी यांच्या उपस्थितीत सुरू असलेले काम खूपच मंद गतीने होत होते. त्यामुळे घोघारी यांना त्यांचा पूर्ण काळ (दोन महिने) होईपर्यंत थांबविणे मिस्टर केनेडी यांना उचित वाटले नाही. त्यामुळे मी भावनगरला परत आल्यानंतर तीन आठवडय़ांच्या आतच घोघारी मोगादिशू नैरोबी (केनिया)- मुंबईमार्गे भावनगरला परत आले. १९८० साली युएनडीपीकडून प्रकल्प पूर्ण होऊन तयार झालेले पाणी वापरले जात असल्याचे आमच्या संस्थेस जानेवारीत कळविले होते.
सोमालियाहून परत आल्यावर व आत्ताही जर मी डॉ. कावाकडून ४० डॉलर घेतले नसते, जर व्हिएन्ना विमानतळावरील मे आय हेल्प यू म्हणत एका व्यक्तीने पूर्ण मार्गदर्शन केले नसते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे युनआयडीओच्या अकाऊंट खात्यातील त्या जपानी तरुणीने आपुलकीने मदतीचा हात दिला नसता तर आमचे कसे व काय झाले असते याची कल्पनाच करवत नाही.
श. द. गोमकाळे