हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
किशोरवयातील मुलांच्या वर्तनापायी बरेचदा त्यांच्या घरातील पालक त्रस्त होतात. आपल्या गुणी लेका/लेकीऐवजी कुणी एखादी त्रयस्थ, अनोळखी व्यक्तीच अवतीभवती वावरते आहेसं त्यांना वाटतं. या अपरिचितपणापायी मुलांचे आईबाबा हबकून जातात. ते गडबडून गेल्यामुळे प्रश्न बिकट होत जातात. हे झालं वास्तव.
या वास्तवाला सामोरं जाताना आईबाबांपाशी एक सोपा मार्ग उपलब्ध असतो, तो म्हणजे आपल्या मुलांबरोबरचा संवाद खुला ठेवण्याचा. प्रेमाचं आश्वासन देत त्यांना क्षमाशील वृत्तीनं समजून घेण्याचा. या मुलांशी संवाद साधताना पालकांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी ध्यानात घ्यायला हव्या. पहिली गोष्ट म्हणजे या वयातील मुलांची मानसिकता, आणि त्यानुसार चाललेले त्यांचे मनोव्यापार समजून घेणं. दुसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलं आणि पालक यांच्यामधला संवाद कमी व्हायला किंवा भांडणापुरता, वादावादीपुरताच सुरू राहण्याला बरेचदा मुलांपेक्षा त्यांचे पालकच कारणीभूत असतात ही.
मुलांच्या वागण्याचा आपल्याला असह्य़ त्रास होत असतो हे जितकं खरं, तितकंच या किशोरवयात झपाटय़ानं बदलत असलेल्या स्वत:च्या शरीराशी आणि मनोव्यापारांशी जमवून घेताना मुलांनाही खूप त्रास होत असतो. त्यामुळे ती बेचैन असतात. भांबावलेली असतात. हे वास्तव एकदा ध्यानात घेतलं, की पालकांना हरघडी त्यांचा राग येणार नाही. मुलांच्या या सतत बदलत्या स्वभावाचं तात्पुरतेपण किशोरवयापुरतंच मर्यादित असतं हे ध्यानात आल्यावर पालक हवालदिल होणार नाहीत. मग त्यांच्यातील संवाद आपोआपच प्रवाही, खुला राहील.
आपण एखादं रोप लावतो तेव्हा त्याला किती पाणी लागतं किती ऊन, किती खत केव्हा लागतं, हे त्या रोपाची जात ठरवते. तिथं आपली मनमानी चालत नाही. त्याचप्रमाणे मुलांचं संगोपन करताना त्यांच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावरच्या गरजा त्यांच्या पिंडधर्मानुसार आणि त्याच्या बाह्य परिस्थितीनुसार ठरत असतात, हे पालकांनी स्वस्थचित्तानं विचारपूर्वक समजून घेतलं पाहिजे.
एकदा आपल्या मुलांचा पिंडधर्म ध्यानात आला, की त्यांना कधी काय हवं नको ते त्यांच्या पालकांना आपोआप समजू लागतं. पालक म्हणून आपण जेव्हा आंब्याच्या झाडाकडून बारमाही फळं देणाऱ्या नारळाच्या झाडाची अपेक्षा करतो किंवा आंब्याच्या झाडाकडून आंब्याचीच, पण ते ताबडतोब फळाला येण्याची अपेक्षा करतो, तेव्हा आपल्याच मुलांवर आपण कठोर अन्याय करत असतो. पालकांच्या अशा अपेक्षांपायी मुलं वैफल्यग्रस्त होतात.
आता इथं एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी. आयर्नच्या गोळ्या खाल्ल्या की रक्तातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं, तसं अमुक तऱ्हेने वागलं की मुलांतील अमुकच गुण वाढीला लागतो असं गणित मांडता येत नाही. मुलांचा मनोविकास हा अनेक घटनांचा परिपाक असतो. त्यातल्या बऱ्याच घटना आपल्या हातात नसतात. पण तरीदेखील सातत्यानं प्रेमानं केलेलं संगोपन मनोविकासाच्या बाबतीत सर्वाधिक प्रभावी ठरतं. किशोरवय हा टप्पाच असा आहे, की त्या वयात मुलांचं कुठलंच वागणं आईबाबांना पटत नाही आणि आईबाबांनी हरघडी रागावण्यासारखं आपण काय करतो आहोत, हे मुलांच्या ध्यानात येत नाही. या वयाची स्वाभाविक वागणूक हीच आहे, असं मानसशास्त्र सांगतं. ते आपण मान्यही करतो, पण त्यातली तात्कालिकता आपण ध्यानात घेत नाही. उलट वडीलकीच्या अनुभवातून मुलांच्या वर्तनाकडे थोडा कानाडोळा आता करायला आजीआजोबांनी सुचवलं, तर ‘तुम्हीच त्याला बिघडवता आहात’ असं म्हणून आपण त्यांच्यावरच डाफरतो.
स्वत:च्या ‘स्व’तंत्र अस्तित्वाच्या जाणिवेबरोबरच या वयात काही मुलांना अगदी भलतेच प्रश्न सतावू लागतात. एकाएकी मृत्यूची अटळता, कुणाचा तरी घटस्फोट किंवा जीवघेणा आजार त्यांना घाबरवून टाकतो. एका नववीतल्या मुलीनं लिहिलेला हा कल्पनाविस्तार पाहा.
‘मरणात खरोखर जग जगते’
‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ असे कवींनी कितीही सांगितले, तरी जीवनाची सांगता अखेर मरणातच होते. आपण कितीही श्रीमंत, यशस्वी बनू शकलो, तरी ते इथंच टाकून आपल्याला मात्र हे जग सोडून जावं लागतं. ख्रिस्त, राम, कृष्ण यांच्यासारख्या जगाच्या उद्धारकांनाही इथं कायम राहता आलं नाही. आपलं सत्कर्म, कीर्ती आपण मागे ठेवू शकतो, पण आपलं अस्तित्व मात्र मागे उरू शकत नाही. कितीही नकोसं वाटलं, तरी मरण हे अटळच असतं.
मात्र असं मरण अटळ आहे म्हणूनच नव्याने जन्मलेल्यांना इथं स्थान मिळत आहे आणि त्यामुळे जगरहाटी सुरू राहिली आहे.
या कल्पनाविस्तारात ‘जग जगते’ यापेक्षा मरणावरच या मुलीनं अधिक भर दिलेला दिसतो. खून, बलात्कार अशा घटनांची अवास्तव भीती या वयात मुलांना वाटू शकते. स्वत:च्या शरीरात होत असलेले वेगवेगळे बदल आणि मनात उमटणाऱ्या नवनवीन भावनांचा कल्लोळ त्यांना खूप अस्वस्थ करत राहतो. ते बदल, त्या जाणिवा प्रत्येकातच या किशोरवयात होत असतात हे ठाऊक नसल्यानं ती बिचारी गोंधळून जातात. जे घडतंय ते जगरहाटीनुसार घडतंय हे उमगायला त्यांना खूप वेळ लागतो. आपली ही सुखदु:खं, भीती, काळज्या ही अवघ्या मानवजातीची सुखदु:खं भीती, काळज्या आहेत हे ठाऊक नसल्यानं त्यांच्यापायी या मुलांना खूप एकाकी वाटतं. समवयस्क मित्रमैत्रिणींच्या सहवासात तसं एकाकीपण जाणवत नसल्यामुळे मुलांना मित्रांशिवाय, मुलींना मैत्रिणींशिवाय करमेनासं होतं. त्यामुळेच मित्रमैत्रिणींशी फोनवरच्या गप्पा तासन् तास सुरू राहतात.
कोऽहम्चा शोध त्याचं अवघं जीवन व्यापून टाकतो. आपण कोण व्हावंसं आपल्याला वाटतंय, आपल्याला नेमकं कसं दिसायचंय, आपल्याला काय आवडतं आणि काय खटकतं हे अनेकदा त्यांचं त्यांना पुरतं उलगडत नसतं. त्यातून हे नको, ते कशाला करायचं, अशी नकारघंटा सुरू होते. आईवडिलांच्या मतांनुसार त्यांना वागायचं नसतं कारण त्यामुळे आपल्या स्वतंत्र अस्तित्त्वावर गदा येईलशी भीती त्यांना वाटत असते. बालवयात सतत काटेकोर शिस्तीत मुलांना कोंबणारे, त्यांच्यावर सतत अधिकार गाजवणारे पालक असले, तर हा विरोध खूपच उमटत राहतो. प्रत्येक बाबतीत आपण इतरांहून वेगळे आहोत, हे त्यांना प्रस्थापित करायचं असतं.
सोनाली आईच्या मैत्रिणीनं तयार केलेल्या कपडय़ांच्या प्रदर्शनाला गेली. तिनं एक छानसा सलवार खमीस स्वत:साठी निवडला. ते पाहताच तिच्या आईची मैत्रीण म्हणाली, ‘‘सोनाली तुझी आवडनिवड अगदी आईसारखीच आहे हं.’’ सोनालीनं लगेच तिला विचारलं, ‘‘आईला खूप आवडला तर बदलून देशील नं मला हा ड्रेस?’’
या साऱ्या घडामोडी फार भराभर घडत असतात. त्यामुळे स्वत:ला जोखायला, सावरायला या मुलांना अवसरच मिळत नसतो. त्या बावरलेपणापायी मुलं नसते उद्योग करत बसतात. एकाएकी मुलीला घरभर पसारा जाणवू लागतो. सारखी तिची आवराआवर सुरू होते आणि ती करताना कुठं ग्लास फुटतो, तर कुठे महत्त्वाचे कागद रद्दीत टाकले जातात. मग त्या वेंधळेपणापायी तिला बोलणी ऐकावी लागतात.
या गडबडगोंधळात टी.व्ही. मोबाइलसारखी माध्यमं आपापली कामगिरी चलाखीनं पार पाडत असतात. आपल्या क्रीमची जाहिरात करताना मुलामुलींच्या चेहऱ्यावरच्या एखाद दुसऱ्या मुरुमाचा ती प्रचंड बागुलबुवा करतात. चेहऱ्याची स्वच्छता, नेमकी काळजी घेणं मुलांवर बिंबवण्याऐवजी नितळ, गोरीपान कांती हेच व्यक्तिमत्त्वाचं एकमेव निदर्शक असतं, असं त्याच्या मनात ती ठसवतात. टूथपेस्टची जाहिरात करताना दातांचं आरोग्य कसं सांभाळावं यावर भर देण्याऐवजी मोत्यासारखे दात डोळ्यात भरवले जातात. खरं तर जाहिरातीतून दाखवली जाते तेवढी नितळ कांती आणि तसे मोत्यासारखे दात फार क्वचितच एखादीला लाभलेले असतात. या जाहिराती म्हणजे तंत्रज्ञानाची किमया असते. पण त्या पाहून मुलामुलींच्या मनात नाही नाही ते न्यूनगंड तयार होतात. कधी कधी याचे परिणाम फार गंभीर होतात. मिनूचे आईवडील उंचनिच आहेत. मिनू खूप उंच आहे. तिची उंची खरंतर तिच्या नीटसपणात, रेखीवपणात भरच घालते. पण मित्रमैत्रिणी तिला लंबूजी म्हणून सतावतात. घाबरून ती स्वत:ची उंची रोज मोजते. परवा ते पाहून आई सहज म्हणाली, ‘‘उंची काही अशी रोज वाढत नाही.’’ ते ऐकून मिनू रडायलाच लागली. आईला म्हणाली, ‘‘आता अर्धा इंच उंची जरी वाढली, तरी मी जीव देणार.’’ आई घाबरून गेली.
स्वत:तलं किरकोळ वैगुण्य किंवा मिनूच्या उंचीसारखं अभिमानास्पद असलेलं एखादं दुर्मीळ शरीरसौष्ठवही त्यांना या वयात अकारण हादरवून टाकतं.
या मुलांशी संवाद साधत आपलं नातं अबाधित राखणं ही एक तारेवरची कसरत असते, कारण एकीकडे ही मुलं गगनाला गवसणी घालू पाहतात, तर दुसरीकडे त्यांचा जीव गुंतागुंतीच्या मनोव्यापारात आणि हळव्या जाणिवात पार हरवून गेलेला असतो. क्षणात सामाजिक बांधीलकीच्या गोष्टी करणारी ही मुलं दुसऱ्याच क्षणी पराकोटीचा आत्मकेंद्रित विचार करताना दिसतात. या परस्परविरोधी जाणिवांमुळे ती बेपर्वा, बेदरकार वाटतात. त्यापायी दररोज उमटणाऱ्या खटक्यांनी त्यांचे आईबाबा कावून जातात. आपलं स्वतंत्र स्थान शोधताना त्यांचा स्वत:शीच जणू लपंडाव सुरू असतो. त्यामुळे रोज नवं खूळ त्यांच्यात संचारत असतं. अशा वेळी त्यांच्या नवनवीन खुळांचा विक्षिप्त वागण्याचा खुलासा त्यांना विचारूच नये. त्याऐवजी
वीणाच्या आईनं बँकॉकहून तिच्यासाठी कपडे आणले. वीणानं आणायला सांगितलेल्या जीन्स महाग म्हणून तिनं आणल्या नाहीत. वीणानं मुकाटय़ानं सर्व कपडे आपल्या कपाटात नेऊन ठेवले, पण ते अंगाला मात्र कधीच लावले नाहीत. आईनं एवढी खरेदी करण्याऐवजी फक्त तिच्या आवडीची एक जीन्सच आणली असती, तरी वीणा खूश झाली असती. फाटक्या, विटक्या दिसणाऱ्या कपडय़ांवर इतके पैसे खर्च करणं आईला वेडेपणाचं वाटत असलं, तरी तिने इथं वीणाच्या अपेक्षा दुय्यम मानल्या ते चकुलं. एक जीन्स आणली असती, तरी वीणानं आईच्या चॉइसचे इतर सर्व कपडे हौसेने घातले असते.
अविनाशच्या फाटक्या सँडल्स पाहून बाबा वैतागले. अविनाशला ‘रीबॉक’चे शूज हवे होते. बाबांना त्यानं तसं सांगितलंही होतं. पण बाबा सरळ बाटाच्या दुकानातून त्याच्यासाठी फॉर्मल शूजच्या दोन जोडय़ा घेऊन आले. संध्याकाळी लग्नाला जाताना अविनाशनं ते बूट घालणं नाकारलं. त्याच्या मते ते बूट म्हाताऱ्यांसाठी होते. एवढा खर्च करून आणलेले बूट नाकारून अविनाश लग्नाला फाटके सँडल्स घालून निघाला, तेव्हा त्याची आणि बाबांची खूपच वादावादी झाली. रागाच्या भरात बाबा त्याला नाही नाही ते बोलले. रुसलेला अविनाश लग्नाला न जाता घरीच उपाशीपोटी झोपून गेला.
इथं वीणाच्या आणि अविनाशच्या आईबाबांनी मुलांच्या आवडीनिवडीला आज प्राधान्य द्यायला हवं होतं. आईवडिलांना चिडवायचं, त्यांचा अनादर करायचा म्हणून ही मुलं अशी वागत नव्हती, तर एक व्यक्ती म्हणून ती स्वत:चं कुटुंबातलं स्थान हुडकत होती. प्रत्येक गोष्टीत आईबाबांच्या निवडीपेक्षा स्वत:ची त्यांना जाणवलेली वेगळी निवड ती दाखवत होती. आपलं स्वत:चं असं एक स्वतंत्र स्थान आहे ही जाणीव मुलांना या वयात होऊ लागलेली असते, पण ती नेमकी जागा मात्र त्यांना सापडत नसते. आपल्या हे लक्षात न आपल्यामुळे आपण त्यांना लहान मुलांसारखे वागवत राहतो. त्यातून त्यांचा रुसवा, बेफिकिरी उद्भवते. आपण आता मोठे झालो, हे दाखवण्यासाठी ती आईवडिलांशी, मोठय़ा भावंडांशी बरोबरीच्या नात्यानं वागू जातात. याची पाहिली पायरी म्हणजे आपला वडीलकीचा अधिकारच ती नाकारू जातात. ‘‘मला कुणाची पडलेली नाही,’’ ‘‘मी मला काय वाट्टेल ते करेन, मी का म्हणून नेहमी पडतं घ्यायचं? दादानं केलेलं चालतं मग मी केलेलं का नाही चालत? ’’ अशी बेदरकार आणि घरातील प्रस्थापित रूढी उलथून टाकणारी बंडखोरी ही या वयातील स्वाभविक गोष्ट असते. आपण अशा वर्तणुकीकडे थोडा काणाडोळा करत एक सुजाण पालक म्हणून आपली स्वत:ची वर्तनशैली बदलणं या टप्प्यावर फायदेशीर ठरतं. आपण त्यांच्या अपेक्षा समजून घेत वागत गेलो, तर मुलांना स्वत:च्या नवनवीन जाणिवांना समजून घेण्यासाठी आवश्यक असलेलं स्वास्थ्य मिळतं. विसंगती हा त्यांच्या वागण्याचा स्थायीभाव बनण्याचा आणि अभ्यासातून त्याचं लक्ष उडण्याचा हा टप्पा आहे, हे नीट ओळखून पालकांनी सजग राहून आपली संवादभाषा बदलण्याची आता गरज असते.
या टप्प्यावर अचानक मुलामुलींच्या बोलण्यात शिव्या येतात. अचकट विचकट बोलणं तोंडी खेळू लागतं. आणि एकीकडे तर बाबांच्या देखत कपडे बदलायचीही मुलांना लाज वाटते. दिवसभर प्यार मुहब्बतची गाणी म्हणत आईकडून नाना हट्ट पुरवून घेताना तिनं गालाला हात लावलेला मात्र मुलांना चालत नाही. त्यांना घरी मित्रपुराण ऐकायला आई हवी असते, पण मित्रमैत्रिणी घरी आल्यावर मात्र तिनं त्या गाण्यात भाग घेतलेला त्यांना आवडत नाही.
या परस्परविरोधी वर्तणुकीसकट आपल्या लेकरांना आपण स्वीकारायचं असतं. आपल्या त्यांच्यावरच्या प्रेमाबाबत त्यांना खात्री वाटेल अशी आपली वर्तणूक ठेवणं ही आईबाबा म्हणून या टप्प्यावरची आपली जबाबदारी असते.