’ लग्नाचे पॅकेज : लग्नासाठी हॉल, पार्टीसाठी प्रशस्त पटांगण, दोन्हीकडले गरुजी, अंतरपाट, हार, तुरे, वेण्या व इतर साहित्य, १०० लोकांचे जेवण, चहा-नाश्ता वगैरेसकट. खास सोय फक्त आमचेकडेच, ऐन वेळी वर किंवा वधूने लग्नास नकार दिल्यास त्याच मुहूर्तावर, वधू किंवा वराची आम्ही व्यवस्था करून देतो (चार्ज वेगळा) सर्व गोष्टींचा खुलासा आमच्या व्यवस्थापकाकडून समजून घेणे (अटी लागू)
’ प्रेमविवाह, रजिस्टर्ड लग्नाचे पॅकेज, घरच्यांची संमती नसलेल्यांना आम्ही नातेवाईक, साक्षीदार, भटजींची सोय करून देतो. पळून लग्न करणाऱ्यांना राहण्यासाठी खोल्या व इतर साहित्याची विशेष व्यवस्था (चार्ज वेगळा).
’ मधुचंद्र पॅकेज- चांगल्या हॉटेल किंवा रिसोर्टमध्ये व्यवस्था, पौष्टिक आहार, सजवलेली शेज, संपूर्ण एकांत, कोणतेही व्यवधान नाही. वि.सू.- उत्तेजक पेय, गोळ्या किंवा इतर साहित्यासाठी व्यवस्थापकांशी संपर्क करावा. लग्नानंतर लगेच एकांत हवा असल्यास घरातील नको असलेल्या व्यक्तींसाठी समदु:ख सहनिवास (वृद्धाश्रम)ची खास सोय त्याचे पॅकेज पाहावे.
’ मंगळागौर पॅकेज- ५-१० किंवा कितीही नवविवाहित तरुणी (संख्येप्रमाणे चार्ज आकारला जाईल). पूजेचे साहित्य, वेगवेगळ्या नवीन व पारंपरिक खेळांची माहिती, जागरणासाठी खास आमचे पेय (चार्ज वेगळा).
’ लग्नानंतरचे मेगा पॅकेज- गर्भधारणेपासून पुढे होणाऱ्या मुलगा/मुलीच्या शाळेत प्रवेशापर्यंतची खास सोय. मुला/मुलीचे जन्मप्रमाणपत्र शाळेच्या आवश्यकते-प्रमाणे करून देऊ (चार्ज वेगळा).
’ गर्भारपणी आहारतज्ज्ञांनी सुचवलेला ‘आहार’, नियमित तपासण्या, सोनोग्रॉफी, हॉस्पिटलला जाण्या-येण्याची व्यवस्था (शस्त्रक्रिया करावी लागल्यास वेगळा आकार आकारला जाईल).
’ बारसे पॅकेज- सजवलेला पाळणा, वरंवटय़ासकट हॉल, मुला मुलींच्या १००० नावांची यादी, नाश्ता, कार्यक्रमाच्या वेळेस नटण्यासाठी सौंदर्यतज्ज्ञ, खोटे दागिने, भरजरी साडय़ा (चार्ज वेगळा).
’ दत्तक पॅकेज- मुलगा किंवा मुलगी दत्तक हवे असल्यास आमच्याकडे देखणी गोरीपान मुले/मुली, अगदी एक दिवसापासूनची, सर्व पॅथॉलॉजिकल चाचण्या केलेली ऌकश् फ्री, सदैव उपलब्ध. कोणतेही वेटिंग नाही. कायदेशीर प्रमाणपत्र मिळेल.
’ आरोग्य पॅकेज- दर वर्षी सर्व तपासण्या एक्स-रे, सोनोग्रॉफी, टी.एम.टी.सह, अॅजियोग्रॉफी, बायपासची विशेष व्यवस्था. वि.सू.- काही कारणाने रोगी दगावल्यास अंत्ययात्रेचे सामान मोफत. सवलतीचा फायदा घ्या.
’ घटस्फोट पॅकेज- घटस्फोट त्वरित मिळवून देऊ. तीन वर्षे वेगळे राहण्याची अट नाही. आमचे कायदेतज्ज्ञ, अॅडव्होकेट घ. र. विस्कटे या विषयातील तज्ज्ञ आहेत. त्वरा करा व सुखी व्हा.
’ समदु:ख सहनिवास (वृद्धाश्रम) स्वतंत्र खोली. ळ.श्., टेलिफोन, डबलबेड ‘पलंग’. एकटे असणाऱ्यास सहचर किंवा सहचरणीची आवश्यकता वाटत असल्यास दोघांच्या संमतीने विशेष सोय करून देऊ. (चार्ज वेगळा) घरच्यापेक्षा चांगले वातावरण (घरच्यासारख्या कटकटी, वादावादी नाही). नातवांची आठवण येत असल्यास, त्यांना खेळवावेसे वाटत असल्यास आश्रमाशेजारीच आमचे पाळणाघर आहे, तेथून आम्ही मुले/मुली उपलब्ध करून देऊ. (तासाप्रमाणे चार्ज वेगळा.)
’ अंत्ययात्रा पॅकेज- घरापासून घरापर्यंत वाहनाची सोय, मृतकास आंघोळ घालण्यापासून दहनापर्यंतची चोख व्यवस्था, गुरुजी, दक्षिणा सर्व समाविष्ट, कोणतेही छुपे खर्च नाहीत. दहनास चंदनाचे लाकूड हवे असल्यास आगाऊ सूचना द्यावी. वनखात्याचे प्रमाणपत्र आमच्याकडे आहे. वि.सू.- पिंडाला कावळा शिवण्याची खात्री, खोळंबून बसावे लागणार नाही. आम्ही प्रशिक्षित कावळे पाळले आहेत. एन.आर.आय. लोकांसाठी परदेशी कावळ्यांची विशेष सोय (चार्ज वेगळा). तेराव्यापर्यंतचे सर्व विधी एकाच दिवशी करता येतात, पॅकेजमध्ये ५ स्त्रिया व ५ पुरुष रडणारे समाविष्ट, जास्त हवे असल्यास वेगळा चार्ज पडेल. टीव्ही मालिकांत दाखवतात तसे पांढरे कपडे हवे असल्यास आगाऊ सूचना द्यावी (चार्ज वेगळा). हातोहात मृत्यू प्रमाणपत्र. स्मशानातून परत येण्याआधीच मृतकाचा एनलार्ज केलेला, हार घातलेला फोटो आम्ही घरी पाठवतो हेच आमचे वैशिष्टय़.
’ मृतकाच्या संपत्तीची योग्य वाटणी वारसांमध्ये करण्यासाठी आमचे येथे कायदेतज्ज्ञ असतात. संपर्क करावा. मोबाइल- ध. न. वाटलावे ४२०४२०४२००.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा