उत्सव म्हणजे असते काय?
जनतेच्या पैशाचा चुराडा
उत्सव म्हणजे दारू पिऊन
घालायचा राडा॥ १॥
उत्सव म्हणजे रस्तोरस्ती
जाहिरातीच्या उभ्या कमानी
उत्सव म्हणजे वर्गणीसाठी
‘दादा’ लोकांची मनमानी॥ २॥
उत्सव म्हणजे श्रवण यंत्रावर
ध्वनीचा भडिमार
‘मुंगळा’ नृत्याचे
बीभत्स प्रकार॥ ३॥
उत्सव म्हणजे निरुद्योगांना
कमवायचे साधन
उत्सव म्हणजे मिरवणुकीत
हिडीस असभ्य वर्तन॥ ४॥
उत्सव म्हणजे असतो
राजकारणाचा धंदा
आपसातील भांडणाने वाढवायचा
स्वत:चा फायदा॥ ५॥
असे असूनही आपण सारे
उत्सवाची वाट पहातो
स्वत:च्याच हाताने
पायावर धोंडा पाडतो॥ ६॥
उत्सव साजरा करताना आपण काय करता? हे जर आपण आठवून पाहिले तर खालील करत असलेल्या अनेक विद्रूप गोष्टी टाळू शकतो.
ा अकरा दिवस मोठ-मोठय़ा आवाजात लाऊड स्पीकर्स लावणे.
ा मिरवणुकीत ट्रक भरून डीजेचे स्पीकर्स लावणे.
ा गणपतीसाठी गल्ल्या, रस्ते मांडव स्टेज घालून बंद ठेवणे.
ा वाहतुकीची कोंडी करत सायलेन्ट झोन न पाळणे.
ा रात्री १० नंतरही लाऊड स्पीकर्स वाजवणे.
ा गल्लीत/ रस्त्यावर उंचच उंच जाहिराती (बॅनर्स) उभे करणे.
ा रात्रभर रोषणाई चालू ठेवून विजेची उधळपट्टी करणे.
ा ज्यांचा संबंध नाही त्यांच्याकडून जबरदस्तीने वर्गणी गोळा करणे.
ा अनंत चतुदर्शीच्या दिवशी डोळ्यात जाईल इतका किलोभर गुलाल उधळत व लांबलचक फटाक्यांच्या माळा भर रस्त्यात लावून धूरच धूर करत पैसे कापरासारखे जाळणे.
ा पर्यावरणस्नेही मातीच्या मूर्ती न बनवता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या उंचच्या उंच मूर्ती तयार करणे, जेणेकरून गणपतीचे विसर्जन समुद्रात, खाडीत करणे कठीण होऊन बसणे. दुसऱ्या दिवशी याच मूर्ती समुद्र किनाऱ्यावर भग्न अवस्थेत विखुरलेल्या पाहायला मिळणे.
ा ११ दिवसांचे निर्माल्य विसर्जनादिवशी निर्माल्य कलशात न टाकता समुद्रात फेकणे. दुसऱ्या दिवशी भरतीच्या वेळी तेच निर्माल्य किनाऱ्यावर इतस्तत: पसरणे.
ा मुद्दाम उशिरा मिरवणुकीला सुरुवात करणे, दारू पिऊन बीभत्स धिंगाणा घालणे, मुलींची टिंगल करणे.
ा गणपतीला निरनिराळी रूपे देत, चलतचित्रे रेडिमेड विकत आणून महाभारत, रामायणमधील तथाकथित देखावे स्टेजवर पडद्याआड उभे करणे.
ा असंख्य जाहिराती गोळा करून दरवर्षी ‘स्मरणिका’ काढून पैशाची सोय करणे.
आगामी गणेशोत्सव साजरा करताना वरील गोष्टींचा विचार करून तो विद्रूप होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
गिरगाव, दादर, पार्ले वगैरे ठिकाणी अजून सभा, मंडळे ही संस्कृती शिस्त, नियम पाळून उत्सव करताना दिसतात. त्यांचा आदर्श ठेवून, स्थानिक मुला-मुलींचे स्टेज कार्यक्रम, नावीन्यपूर्ण चढाओढी, नाटक, किर्तन, व्याख्याने, जादूचे प्रयोग, ऑर्केस्टा, गाण्यांचा कार्यक्रम वगैरे कार्यक्रम ठेवावे, जेणेकरून वाडीतील, सोसायटीतील, रहिवासी एकत्र येतील, सहकार्य वाढेल. अनंत चतुदर्शीला टाळ-लेझिम, मृदंग यांच्या नादात मोरयाचे ‘पालखीतून’ विसर्जन करावे.
असा उत्सव साजरा केला तर आपण सगळे मनापासून म्हणू- गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!
मला सर्व गणेशोत्सव मंडळांना सूचना करावीशी वाटते ती म्हणजे त्यांनी गणेशमूर्तीसमोर एक मोठी पाटी ठेवावी व त्यावर लिहावे की, ‘देवापुढे कोणीही पैसे अगर वस्तू ठेवू नये’ तरच तो उत्सव होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा