हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आपल्या दृष्टीने गणपतीची मूर्ती, शाडूची की प्लास्टर ऑफ पॅरिसची, उजव्या सोंडेची की डाव्या सोंडेची एवढेच दोन चार मुद्दे असतात. पण सिकंदराबादमधल्या शेखर पबसेत्ती यांच्याकडचा गणेशमूर्तीचा संग्रह बघून कुणीही अवाक हाईल. त्यांच्याकडचा वेगवेगळ्या धातूंमधील तसेच लाकूड, टेराकोटामधील हजारो गणेशमूर्तींचा संग्रह बघून थक्क व्हायला होतं.
शेखर यांचा जन्म सोलापूरचा. गाव पंढरपूर. व्यवसायाने ते स्टेट बँकेत स्पेशल असिस्टंट आहेत. ७० वर्षांपूर्वी त्यांचं कुटुंब आंध्र प्रदेशमध्ये सिकंदराबादला स्थायिक झालं. इतर मुलांप्रमाणेच त्यांनाही लहानपणापासूनच गणपतीचं आकर्षण होतं. ‘मी पाच वर्षांचा असल्यापासून माझ्या बाबांसोबत गणपती आणायला आणि विसर्जनाला जायचो. घरी पूजेसाठी जमेल तशी मदतही करायचो. तेव्हापासूनच या सगळ्याची आवड होती. जसा मोठा होत गेलो तसं गणपतीच्या मूर्ती जमवायला लागलो. सुरुवातीला मिळतील तशा जमवू लागलो. १९७३ ते १९९७ पर्यंत जवळपास तीनशेहून अधिक मूर्ती जमल्या होत्या. त्या
जिथे जातील तिथे एखादी मूर्ती, फोटो, पोस्टर किंवा गणपतीचं इतर काहीही त्यांना चांगलं वाटलं, भावलं की शेखर लगेच ते घेतात. त्यातूनच वेगवेगळ्या सुंदर गणेशमूर्तीचा संग्रह त्यांच्याकडे आहे. एखादी मूर्ती आवडली, पण खिशात तितके पैसे नाहीत असं त्यांच्याबाबतीत कधी झालं नसल्याचं ते सांगतात. शेखर यांच्याकडे सगळ्यात महागडी मूर्ती आहे ती ८० हजारांची. सिंहासनावर बसलेल्या त्या मूर्तीचा थाट काही
शेखर अनेकदा शेअर्समध्ये पैसे गुंतवत असतात. शेअर्समध्ये फायदा झाल्यावर त्याचा उपभोग घेण्याऐवजी ते गणेशमूर्तीच घेतात. ते म्हणतात, ‘मला शेअर्समध्ये फायदा झाला की, त्यातली अर्धी रक्कम घरच्यांसाठी तर अर्धी गणपतीसाठी मी राखून ठेवतो. त्या पैशांतून गणपतीच्या वेगवेगळ्या मूर्ती, फोटो, पुस्तकं विकत घेणं, त्यांना ठेवण्याची चांगली सोय करणं अशा अनेक गोष्टी करतो. एकदा दिवाळीत मला दोन लाख रु पये मिळाले होते. त्याचं विभाजन मी असंच केलं होतं.’
शेखर यांनी चार किलो वजनाच्या पंचमुखी पंचधातूंच्या चार हजार मूर्तीची विक्री केली. ही मूर्ती आठ इंच उंच आणि सहा इंच रुंद आहे. तिच्या विक्रीतून आलेला सगळा पैसा त्यांनी आश्रमांमध्ये दिला. हे करण्यामागचं कारण ते सांगतात की, ‘गणपतीचं वास्तव्य सगळ्यांकडे असावं आणि त्यांची भरभराट व्हावी. बाप्पा सर्वाकडेच लक्ष देत असतो. तरी त्याच्या आजूबाजूला ‘असण्या’ने खूप फरक पडतो. म्हणून मी या मूर्तीची विक्री केली. ही मूर्ती ज्या ज्या लोकांकडे गेली त्यांची भरभराटच झाली आहे.’
शेखर यांच्याकडील मूर्तीच्या विविधतेसोबतच धातूंमध्येही वेगळेपण आहे. ५० किलो वजनाची पंचधातूतील
शेखर ‘विश्वविनायक’ हे पुस्तक लिहिताहेत. यासाठीचा अभ्यास आणि योग्य माहिती मिळवणं यावर सध्या त्यांचं काम सुरू आहे. गेली १४-१५ वर्षे ते याबाबत संशोधन करताहेत. जगभरातल्या गणपतींच्या देवळांविषयीची माहिती यात असेल. ‘गेल्या काही वर्षांची मेहनत सफल होतेय असं म्हणता येईल. ‘विश्वविनायक’ या पुस्तकासाठी मी अनेक देवळांची माहिती गोळा करतोय. आतापर्यंत १५०० देवळांची माहिती गोळा झाली आहे. हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर यातून मिळणारा पैसा मी आश्रमांना देणार आहे’, असं ते सांगतात. ते भारतात कुठेही फिरायला गेले की एक दिवस तिथल्या गणपतीच्या देवळांना भेट
देण्यासाठी राखून ठेवतात. गणेशोत्सवात तर ते १०-१५ दिवस सुट्टी घेतात. या दिवसांमध्ये त्यांच्या घरी अनेक लोक भेटायला येतात. त्या वेळी त्यांच्याकडे असलेल्या वेगवेगळ्या गणपतींविषयी ते माहिती देत असतात.
शेखर यांच्या राहत्या घरी वरच्या मजल्यावर त्यांच्या संग्रहातील मूर्तीचे संग्रहालय करण्याचा त्यांचा मानस आहे. या संग्रहालयासाठी प्रवेश फी दहा रुपये ठेवून यातून येणाऱ्या पैशाचा दानधर्म करणार असल्याचं ते
त्यांना आवडलेल्या मूर्ती, फोटो त्यांच्या घरी बरोबर पोहोचतात याचा आणखी एक अनुभव त्यांनी सांगितला. ‘एका लॅमिनेशनच्या दुकानात गणपतीचा एक मोठा फोटो लॅमिनेट करायला आला होता. मी काही कामानिमित्त त्या दुकानात गेलो होतो. तिथे त्या फोटोने माझं लक्ष वेधून घेतलं. एवढा मोठा, देखणा फोटो होता तो की इतर कोणीही त्या फोटोच्या प्रेमात पडलं असतं. मी विचारलं ‘हा फोटो कोणाचा आहे?’ ‘कोणीतरी लॅमिनेशनसाठी दिलाय. येईल उद्या-परवा घ्यायला’, असं दुकानदाराने उत्तर दिलं. त्यानंतर काही महिने लोटले. तो फोटो त्या दुकानात तसाच होता. मी त्या दुकानदाराकडे त्या फोटोविषयी पुन्हा चौकशी केली. फोटो घ्यायला कोणी आलंच नाही. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घेऊन जा, असं तो म्हणला. मला आनंद झाला. तो फोटो घेऊन मी घरी आलो खरा, पण त्या दुकानदाराला मी माझा नंबर दिला. त्याला सांगितलं की, हा फोटो ज्याचा आहे तो जर परत आला तर मला फोन कर. मी हा फोटो त्याला परत देईन. पण आज पाच वर्षे झाली, पण अजून कोणी हा फोटो न्यायला आलं नाही.’
मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर, टिटवाळ्याचे गणपती मंदिर, पुण्याचे दगडूशेट गणपती मंडळ यांनी शेखर यांचा सन्मान केला आहे. याशिवाय लिमका बुक ऑफ इंडियन रेकॉर्डसमध्ये २०१० ते २०१४ अशी सलग पाच वर्षे प्रवेश मिळाला असून वर्ल्ड रेकॉर्ड (२०१०, २०११, २०१२), इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स (२०१२, २०१३), युनिक वर्ल्ड रेकॉर्ड्स (२०१२, २०१३, २०१४), एव्हरेस्ट वर्ल्ड रेकॉर्ड्स (२०१२), असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड्स (२०१२), गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड्स (२०१३), वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स (२०१३), मिरॅकल वर्ल्ड रेकॉर्ड (२०१३), तेलुगू बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स (२०१३) हे पुरस्कार मिळाले आहेत.