पुस्तकाच्या सुरुवातीस शुभेच्छा संदेशांमध्ये वेगळे ठरते ते मंदिराचे मुख्य अर्चक असलेल्या गजानन नारायण मोडक यांचे मनोगत. दोन अतिशय महत्त्वपूर्ण अशा लेखांपासून पुस्तकाची सुरुवात होते आणि मग त्याच वेळेस आपल्याला हे अकॅडमिक अंगाने लेखन केलेले पुस्तक आहे, याची खात्री पटते आणि नंतरच्या पानांमध्ये काय दडलेले असेल याविषयीची उत्सुकता चाळवली जाते.
यातील पहिला लेख आहे तो प्रसिद्ध पुरातत्त्वतज्ज्ञ आणि राज्याचे माजी पुरातत्त्व संचालक डॉ. अरिवद जामखेडकर यांचा. गणपती असा विषय आला की, वेदकालापासून अस्तित्वात असलेला किंवा वेदपूर्व काळापासून अस्तित्वात असलेला असाच उल्लेख केला जातो. या लेखात डॉ. जामखेडकर यांनी पुरातत्त्वीय पुराव्यांचा उल्लेख ख्रिस्तोत्तर दुसऱ्या शतकाच्या अलीकडे येत नाही, असे स्पष्टपणे लिहिले आहे. अर्थात
नंतर सुरू होणारा भाग गणेशभक्तांसाठी खास आकर्षण ठरणारा आहे. गणेशभक्तांनी त्यांच्या या लाडक्या देवतेसाठी सुवर्ण कमळ, सुवर्ण उदरकवच, सुवर्ण मुकुट, हिरेजडित गोफ, फेटेदार सुवर्ण मुकुट अशी अनेक आभूषणे करून घेतली आहेत. ही आभूषणे परिधान केलेली मूर्ती पाहणे म्हणजे एक वेगळाच सोहळा आहे. या सर्व दागिन्यांचे क्लोजअप्स तर आहेतच. पण शिवाय यातील सर्व दागिने घातलेला सिद्धिविनायक विविध छायाचित्रांमध्ये आहे. सिद्धिविनायकाच्या बाजूची फुलांची आरासही दररोज बदलली जाते. ती फुलांची, फुलमाळांची आणि विविध वस्त्रांची बदलती आरास असलेली छायाचित्रे विशेष वेधक आहेत. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तर प्रत्येक दिवशी एक असे करत नऊ रंगांमध्ये आरास केली जाते, त्याची छायाचित्रेही यात आहेत. केवळ छायाचित्र न देता त्यासोबत गणेशाविषयीची अकॅडमिक माहितीही सोबत प्रसिद्ध करून बोधे यांनी या पुस्तकाचे संग्राह्य़ मूल्य वाढविले आहे. दुर्दैवाने मात्र बोधे यांचे त्यांच्या हयातीत प्रसिद्ध झालेले हे अखेरचे पुस्तक ठरले (त्यांचे अंदमानचे पुस्तक आता प्रसिद्धीच्या वाटेवर आहे), याशिवाय सिद्धिविनायक न्यासाची माहिती, न्यासाचे कल्याणकारी उपक्रम यांची माहितीही पुस्तकात आहे. शिवाय मंदिरातील सोहळे, धार्मिक कार्यक्रम, अथर्वशीर्ष आदी सारे काही यात आहे. थोडक्यात काय, तर या १३२ पानांमध्ये सिद्धिविनायक पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुस्तकाच्या छपाईत बोधे यांनी कोणतीही तडजोड केलेली नाही. विभव मांजरेकर व बिभास आमोणकर यांच्या सजावटीमुळे पुस्तक देखणे ठरले आहे.
सिद्धिविनायक मंदिर- अनन्यसाधारण ऊर्जा
संकल्पना व छायाचित्रे : गोपाळ बोधे
सहलेखिका : डॉ. ज्ञानेश्वरी तळपदे
प्रकाशक : सिद्धिशक्ती पब्लिकेशन
पृष्ठसंख्या : १३२
मूल्य : रु. १६५०/-.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा