आपल्याबरोबर असताना ते मध्येच एका विमानात बसतात. आपल्याला पूर्वसूचनाही न देता. ते विमान. एका वेगळ्या जगात नेणारं. जिथे भुतंही गोड मित्र असतात. देवही जाता येता भेटतात. हॅलो म्हणतात. मला त्यांच्याबरोबर त्यांच्या या जगात जाणं फार फार आवडतं..

त्यांची माझी पहिली भेट शब्दांमधून झाली. ‘तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा नहीं’पासून ‘कतरा कतरा मिलती है’पर्यंत कशा कशातनं ते मला भेटत होते. ‘मेरा कुछ सामान’ ऐकलं तेव्हा वाटलं ही मी आहे. मी असं प्रेम करते. या माणसाला माझ्या आतली ही मी कुठून कळली..? रोमँटिकला काय म्हणायचं नक्की? स्वप्नाळू? स्वप्नाळू माणसं काही माणसांना वेडी वाटतात. हवेत चालणारी. पण त्यांना तेही सहज वाटतं. ‘आजकल पाँव जमींपर नहीं पडते मेरे’.. मी उडते आहे. माझ्यातली ‘रुमानी’ मी त्यांना जितकी कळली आहे तितकी कुणालाच नाही कळली जगात. म्हणजे प्रत्येक माणसाच्या आत असतेच की ही रुमानीयत. समोर दिसत असलेल्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात कितीतरी गोष्टी मनासारख्या नसतात घडत. पण या रुमानी स्वप्नांच्या राज्यात काहीही घडतं. उडतंसुद्धा! सतत खरं बघत बघत जगू पाहताना खऱ्याचे लालभडक, काळे कुट्ट रंग डोळे दिपवत असताना या स्वप्नाळू जगातले मंद, सुखावणारे रंग.. माझ्या आयुष्यात शब्दांतून हे दोन्ही प्रकारचे रंग दाखवणारी माणसं मला भेटली. खऱ्याचे भडक रंग मला विजय तेंडुलकरांनी दाखवले. त्यांच्या असण्यातून. त्यांच्या नाटकातून. चित्राच्या भाषेत बोलायचं तर त्यांनी मला दाखवलेलं अनुभवविश्व व्हॅनगॉगच्या चित्रांसारखं होतं. स्टार्क. गुलजारांनी मला त्याच आयुष्याचे तरल, मंद रंग दाखवले. त्यांनी दाखवलेलं अनुभवविश्व मोनेच्या इंप्रेशनीस्टिक चित्रासारखं. हे दोन्ही माझ्यात आहे. भडक, उघडंवाघडं आणि तरल हळुवार. माझ्यात काय, प्रत्येकाच्यातच ते आहे. गुलजारांचं या प्रत्येकाच्या आतल्या तरल हळुवाराशी नातं आहे. म्हणून आज वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी त्यांच्यावर वेडय़ासारखं भरभरून प्रेम करणारी शेकडो माणसं त्यांच्या आसपास असणं हा केवळ योगायोग नाही. त्यांचं आणि माझं हे शब्दांचं नातं आहे तसंच त्यांचं आणि आणखी कितीतरी जणांचं आहे. माझ्यातल्या किती वेडय़ा स्वप्नांना शब्दांत मांडणारे ते मला वाटतात तितकेच किती कितीजणांना जवळचे वाटतात. त्या किती किती जणांपैकी कितीतरी जण त्यांना प्रत्यक्ष भेटलेसुद्धा नाहीयेत. माझा एक मित्र त्याला खूप एकटं वाटलं की त्यांच्या पाली हिलवरच्या ‘बोस्कीयाना’ नावाच्या बंगल्यासमोरच्या झाडापाशी जातो. अगदी मध्यरात्रीसुद्धा. आणि त्या झाडाला घट्ट मिठी मारतो. मग त्याला अगदी शांत वाटतं.
हे मी त्यांना सांगताना म्हणाले, ‘‘वो आपसे पागलों की तरह प्यार करता है.’’ यावर ते शांतपणे माझ्या डोळ्यात पहात म्हणाले, ‘‘प्यार पागलों की तरह ही किया जाता है बेटा.’’

In Khambhadi Koturli village Bhandara district sighting of tiger in broad daylight has created excitement among the villagers
भंडारा : वाघाला चक्क गावकऱ्यांनीच घेरले अन…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
drone spray services for farmers drone spraying pesticides for agriculture
कृषी ड्रोन : अर्थार्जनाचा नवीन मार्ग
Kandalvan, drone filming, flamingos, Mumbai,
मुंबई : फ्लेमिंगोच्या ड्रोन चित्रिकरणाच्या प्रकरणाची कांदळवन कक्षाची चौकशी सुरू
Tourists can now taste sweet honey along with tiger sighting at Tipeshwar Sanctuary
टीपेश्वर अभयारण्य: व्याघ्रदर्शनासोबतच मधाची चवही चाखता येणार,अंधारवाडीत साकारले पहिले ‘मधाचे गाव’
deadly fight going on between two highly venomous snakes Everyone shuddered to see this scene
व्हिडिओ: अत्यंत विषारी मण्यार सापांची थरकाप उडवणारी झुंज
snake entered tiger cage in British era Maharajbagh Zoo staff noticed it immediately and pulled snake out
वाघिणीच्या पिंजऱ्यात शिरला साप आणि आता मोराच्याही…
Loksatta explained What will be achieved by purchasing Rafale M fighter jets
विश्लेषण: ‘राफेल एम’ लढाऊ विमाने खरेदी करण्याने काय साध्य होणार ?

रात्र पडत चालली होती. समोर एक शांत जलाशय. त्यात पडलेली झाडांची प्रतिबिंब. चित्रांसारखी निस्तब्ध. आम्ही सगळे जेवायच्या दिशेने चाललो होतो. अनेक किडय़ांचे वेगवेगळे किर्र्र आवाज ऐकू येत होते. अचानक ते मला म्हणाले,
‘‘वो देखो टुंटा’’

त्यांची माझी पहिली भेट पण वेडेपणानं पुरेपूर भरलेली. ते प्रेमचंदाच्या काही गोष्टी दूरदर्शनसाठी शूट करत होते. मी राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात असताना आम्हाला शिकवायला आलेले सलीम अरीफ हे त्यांना या कामात मोलाची मदत करत होते. सलीम सर प्रेमचंदांच्या एका गोष्टीसाठी कास्टिंग करत असताना त्यांना एका भूमिकेसाठी एकदम माझी आठवण झाली. त्यासाठी मी त्यांची आयुष्यभर ऋणी राहीन. त्यांच्यामुळे माझे जिवाभावाचे गुलजार माझ्या आयुष्यात प्रत्यक्ष आले. जितेजागते! त्या गोष्टीसाठी माझी निवड चाचणी घेण्यासाठी मला गुलजारांच्या पाली हिलवरच्या बंगल्याचा पत्ता देण्यात आला. त्या दिवशी त्यांच्या शब्दांत ‘बोलो देखा है मुझे उडते हुए’ असं विचारावं अशा स्थितीत मी तरंगतच पाली हिलला पोहोचले. घराखालीच त्यांचं ऑफिस आहे. तिथे सलीम सर भेटले. म्हणाले, ‘‘भाई बस पहुँचही रहे है.’’ त्यांना जवळचे लोक भाई म्हणतात हे तिथंच लक्षात आलं. थोडय़ा वेळाने तो दैवी धीरगंभीर आवाज आला आणि त्यापाठोपाठ नेहमीच्या पांढऱ्याशुभ्र कपडय़ातले तेजस्वी गुलजारसाब साक्षात माझ्यासमोर! सलीम सर म्हणाले, ‘‘सर यही है अम्रिता. बहोत अच्छा काम करती है.’’ ‘‘अच्छा?’’ असं म्हणून त्यांनी त्यांच्या बदामी डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं. मग वेळ घेऊन दैवी आवाजात म्हणाले, ‘‘गाना गाती हो?’’ मी म्हटलं, ‘‘हां!’’ ‘‘कोई लोरी सुनाओ..’’ मग मी ‘माझ्या गं अंगणात’ नावाचं आई मला लहानपणी म्हणायची ते गाणं ऐकवलं. गाणं संपताच ते म्हणाले, ‘‘बहोत अच्छा बेटा.. अच्छा, उस कहानी में वो लडकी बहोत पान खाती है, तुम पान खाती हो?’’ मला खरं तर पान आवडत नाही, पण मी जोशात म्हटलं, ‘‘हाँ, मुझे अच्छा लगता है’’ ‘‘बस बेटा, फिर बात खतम.. यही करेगी वो रोल’’ आणि ते ऑफिसच्या आतल्या खोलीत दुसऱ्या कामाला गेलेसुद्धा. मला भोवळ येईल असं वाटलं. मी जवळ जवळ सलीम सरांच्या पायावर लोटांगणच घालणार होते.
चित्रीकरणाच्या दिवशी आम्ही सगळे कलाकार पहाटे सहा वाजता गुलजारसाहेबांच्या बंगल्यावरून एकाच गाडीने निघालो. त्यांच्याबरोबरच. मुंबईपासून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर मनोर नावाच्या ठिकाणी पोहोचायचं होतं. पहाटे आम्ही गाडीत बसताच ते मला म्हणाले, ‘‘कुछ जंगारेज महसूस कर रहाँ हू. आज टेनिस नही खेला नं, इस लिए..’’
माझं वय लहान होतं खूपच तेव्हा. त्यामुळे मी नीडर होते.
बेधडक त्यांना म्हटलं, ‘‘जंगारेज? मतलब?’’
त्यांनी वेळ घेऊन माझ्याकडे पाहिलं. ‘‘बेटा जंग लगता है नं चीजों को.. वैसे अगर शरीर को लगे तो.. कैसे महसूस होगा.. जंगारेज’’ ‘‘आप टेनिस खेलते है?’’
मी सरबत्तीच सुरू केली.
‘‘हां, हररोज पांच बजे.’’ आत्ता त्यांच्या भराभर चालण्याचं रहस्य कळलं. त्यांच्याबरोबर चालायचं तर चालावं नाही, पळावं लागतं. इतके चुस्त असतात ते! त्यानंतर मनोरमध्ये पोहोचल्या पोहोचल्या आम्हा सर्व कलाकारांसाठी त्यांनी आम्ही चित्रित करत असलेल्या संहितेच्या संवादाचं संपूर्ण वाचन केलं. त्यांच्याकडून ती संहिता ऐकणं हा अविस्मरणीय अनुभव होता. मनोरजवळच्या एका खेडय़ात शेणानं सारवलेल्या जमिनीवर आम्ही सगळे बसलेलो. सूर्य नुकता उगवत होता. पक्षी.. मंद वारा.. केशरी आकाश आणि गुलजारसाहेबांचा आवाज. त्या गोष्टीसाठी मी फक्त दोनच दिवस त्यांच्याबरोबर शूटिंग केलं. त्यानंतर आम्ही परत आल्यावर पुन्हा त्यांच्या ऑफिसमधून फोन आला. ते प्रेमचंदांच्या ‘निर्मला’ नावाच्या कांदबरीवर छोटा चित्रपट बनवणार होते. त्यात निर्मलाच्या भूमिकेसाठी त्यांनी मला निवडलं होतं..
पुन्हा एकदा मनोरच्या रस्त्यांवर त्यांच्यासोबत गाडीतनं निघाले. मनोरमध्ये ‘सायलेंट रिसॉर्ट’ नावाच्या हॉटेलात आमची सोय होती. त्यांच्याबरोबर केलेलं ते चित्रीकरण हे दैवी दिवस होते. पहिल्या दिवसाचं काम संपवून आम्ही हॉटेलवर आलो. खूप मनोरम परिसर होता. रात्र पडत चालली होती. समोर एक शांत जलाशय. त्यात पडलेली झाडांची प्रतिबिंब. चित्रांसारखी निस्तब्ध. आम्ही सगळे जेवायच्या दिशेने चाललो होतो. अनेक किडय़ांचे वेगवेगळे किर्र्र आवाज ऐकू येत होते. अचानक ते मला म्हणाले, ‘‘वो देखो टुंटा’’ मी हवेत पाहिलं. ‘‘टुंटा?’’ ‘‘हां, वो मेरा दोस्त है. एक भूत है वो जिसे एक हाथ नही है- इस लिए उसका नाम टुंटा.. वो देखो.’’ मी म्हटलं, ‘‘हां.. टुंटा तो बहोत प्यारा है’ ते म्हणाले, ‘हां बहोत. मुझे काफी बार मिलता रहता है.. रात को अगर तुम्हारे रूम में आ जाए तो घबराना मत!’’ त्यानंतरचे सगळे दिवस टुंटा त्यांच्या माझ्यासाठी आमचा बच्चा दोस्त होता, अजूनही आहे. अजूनही आम्ही भेटलो की ते आणि मी एखाद्या खऱ्याखुऱ्या माणसाविषयी बोलावं तसं टुंटाविषयी बोलतो. ‘‘टुंटा मिला था?’’ ‘‘हां, तुम्हारे बारे में पूछ रहा था, तुम्हे याद करता है’’ ‘‘कहाँ मिला था?’’ ‘‘अरे वो तो कही भी मिलता है. मेरे गाडी की खिडकी पर लटकते पूछ रहा था अम्रिता कैसी है.’’ ते आपल्याबरोबर असताना मध्येच एका विमानात बसतात. आपल्याला पूर्वसूचनाही न देता. ते विमान. एका वेगळ्या जगात नेणारं. जिथे भुतंही गोड मित्र असतात. देवही जाता येता भेटतात. हॅलो म्हणतात. मला त्यांच्याबरोबर त्यांच्या जगात जाणं फार फार आवडतं.
जेव्हा ते जमिनीवर तुमच्या माझ्यात येतात तेव्हा एकदम वेगळेच कुणी होतात. दिग्दर्शक म्हणून त्यांनी मला इतकं इतकं शिकवलं. माझ्या फार बालवयात मी त्यांच्या समोर काम करत होते. मला वाटायचे डोळय़ातनं भारंभार पाणी काढून रडता येणं म्हणजे भारी अभिनय! ‘निर्मला’च्या कुठल्याशा प्रसंगात मी तसं पाणी काढून हमसून रडले. ते शांतपणे म्हणाले, ‘‘बेटा, सटल करो. इतना नही. कम करो बच्चा!’’ मी तोच प्रसंग शांतपणे केल्यावर म्हणाले ‘‘अब ओके!’’ मला मनातल्या मनात वाटले, ‘‘मी तर काहीच केलं नाही, यांना हे ओके कसं वाटलं?!’’ एके दिवशी माझी केशरचना न करता माझी हेअरड्रेसर कुठेतरी गायब होती. उशीर होईल या भीतीने घाबरून मी तिच्या नावानं मोठय़ांदा ओरडायला लागले. अचानक गुलजार साब आले. शांत, हळू आवाजात म्हणाले, ‘‘क्या चाहीये बेटा?’’ त्यांच्या शांत आवाजाने माझा आवाज पण खाली आला, मी हळूच त्यांना म्हणाले, ‘‘हेअरड्रेसर..’’ ‘‘आ जायेगी.. बेटी’’ ते शांत आवाजात म्हणाले. त्यानंतर मी काही तरी काम करत संवाद म्हणतेय असं होतं. पोळय़ा लाटता लाटता करायच्या एका प्रसंगात त्यांनी शिकवलं, ‘तू कुठल्या अॅक्शननंतर संवाद म्हणतेस, केव्हा अॅक्शन थांबवतेस, केव्हा परत सुरू करतेस इस सबसे माहौल बनेगा बेटा. तू जर रागावली असशील तर कदाचित तू भराभरा लाटशील यापेक्षा पोळय़ा. आनंदी असशील तर वेगळय़ा लाटशील टायमिंग करलो बच्चा.’ टायमिंग.. अॅक्शन.. संवाद.. ताळमेळ. तेव्हापासून प्रत्येक सिनेमातल्या प्रत्येक शॉटआधी त्यांचा शांत आवाज कानात येतो. ‘‘टायमिंग कर लिया बेटा?’’ मग मी जी कुठली कृती त्या प्रसंगात करत असेन तिचा आणि संवादाचा ताळमेळ मनात आखते. ही खूप मोठी गोष्ट त्यांनी शिकवली. ते चांगला शॉट दिला की चॉकलेट देतात. कलाकारालाच नाही तर ज्याचं काम आवडेल त्याला. राजन कोठारीसारखे मोठे कॅमेरामन ‘निर्मला’ चित्रित करत होते. त्यांच्यापासून ते माझ्यासारख्या नवख्या कलाकारापर्यंत प्रत्येकजण त्या चॉकलेटसाठी झटायचा. ते रोज नाही मिळायचं. कधी एखाद्या ट्रॉली चालवणाऱ्याला मिळायचं. कधी एखाद्या लाईटबॉयला कधी वेशभूषाकाराला. आम्हा सर्वासाठी त्यांचं ते चॉकलेट म्हणजे ऑस्कर होतं. ते देताना त्यांना नेमकं आमच्यातलं काय आवडलं ते सांगायचे आणि मग द्यायचे. खरंच ऑस्करचा आनंद व्हायचा! ‘निर्मला’चं चित्रीकरण संपलं त्या दिवशी आम्ही ‘सायलेंट रिसोर्ट’ ला परतलो तेव्हा मन जड झालं होतं माझं. उद्यापासून या स्वप्नाच्या राज्यातून परत धकाधकीकडे जायचं. ती रात्र पौर्णिमेची होती. आम्ही गाडीतून उतरून जेवायच्या हॉलच्या दिशेने निघालो तेव्हा मी न राहवून आकाशातल्या वाटोळय़ा चंद्राकडे बघत म्हटलं, ‘‘आप जो कह दो तो आज की रात चांद डुबेगा नही.. रात को रोकलो..’’

चांगला शॉट दिला की ते चॉकलेट देतात. कलाकारालाच नाही तर ज्याचं काम आवडेल त्याला. ते कधी एखाद्या ट्रॉली चालवणाऱ्याला मिळायचं. कधी एखाद्या लाईटबॉयला कधी वेशभूषाकाराला. आम्हा सर्वासाठी त्यांचं ते चॉकलेट म्हणजे ऑस्कर होतं.

त्याने माझं हे म्हणणं शब्दश: खरं केलं. ‘निर्मला’चं चित्रीकरण संपलं त्यानंतर काहीच दिवसांत त्यांचा फोन आला. ते कुसुमाग्रजांच्या कवितांचं उर्दू भाषांतर करणार आहेत, त्यासाठी मला त्यांच्याबरोबर काम करायला आवडेल का..? म्हणजे त्यांच्या माझ्यातलं ते स्वप्नाचं राज्य, ती चंद्राची रात्र पुन्हा सुरू होत होती. पुन्हा एकदा ते जादूई दिवस. त्या काळात मी काय काय शिकले हे शब्दातीत आहे. मला उर्दू येत नाही. कित्येकदा कवितेतल्या एखाद्या शब्दाला हिंदी शब्दच आठवायचा नाही. मग मी खुर्चीवरून उठून हातवारे करत, वेगवेगळय़ा पोझेज् घेत जवळजवळ नाच करत त्यांना त्या शब्दाचे वेगवेगळे कंगोरे समजावण्याचा प्रयत्न करायचे. ते त्यांच्या बदामी डोळय़ांनी शांत बघत असायचे, एका क्षणी माझ्यावरून दृष्टी काढून समोरच्या शुभ्र कागदावर काळय़ाभोर अक्षरात चित्रं उमटायला लागायची. उर्दू म्हणजे माझ्यासाठी चित्रंच की.. त्यांची तंद्री लागायची. खोलीभर एक गंभीर शांतता पसरायची. मी माझे हातवारे, नाच थांबवून अलगद खुर्चीवर येऊन बसायची. त्यांचं काळं सुंदर शाईपेन झरझर चालायचं. एका क्षणी ते म्हणायचे, ‘‘सुनो,’’ आणि मी केलेल्या हातवाऱ्यांचं, नाचाचं एक सुंदर उर्दू रूप माझ्या समोर यायचं.. चपखल. माझ्या त्या नाचातनं त्यांना इतके चपखल कुसुमाग्रज कसे पोहोचायचे ते त्यांच्या बदामी डोळय़ांनाच माहीत!
परवा खूप वर्षांनी भेट झाली त्यांची. त्यानंतर त्यांच्या घरच्या सूपचा, चण्याच्या सँडवीचचा, वाळय़ाच्या, खसच्या सरबताचा आस्वाद घेताना मी घाबरत म्हटलं, ‘‘अभी भी सुबह में जाते हो नं टेनीस खेलने?’’
तर म्हणाले, ‘‘क्या मतलब, अभी भी जाते होनं? आज दो मॅच खेला मैं. पहला मॅच बराबरी तक पहूँचा, टायब्रेक मैं हारा! फिर मुझे चीढ आयी. दुसरा भी खेला.’’
या वयात ते हे म्हणू शकतात, मी चिडलो आणि दुसरी पण मॅच खेळलो!
त्यानंतर मला म्हणाले, ‘‘पिछले इतके सालोंसे तुम्हें देख रहा हँू, तुम्हारी उमर तो बढती ही नहीं, तुम तो वैसी की वैसी हों।’’
मी म्हटलं, ‘‘आप भी तो.. कौन कहता है समय चलता ही रहता है, आप और मेरे लिए वो थम चुका हैं.. आप ने कह जो दिया हैं, अब चाँद डुबेगा नही.. आप ने रात को रोक लिया हैं!’’
आत्ता लेख संपताच त्यांना फोन लावून विचारलं, ‘‘सुनिए, मै आप के उपर एक लेख लिख रही हँू.’’
ते म्हणाले, ‘‘मेरे उपर? मतलब मेरे सर पे चढके लिखोगी क्या?’’
मी हसत सुटले, म्हटलं, ‘‘सॉरी फॉर मेरी हिंदी.. तो सुनिए, आपके बारे में कुछ लिख रही हँू, उसमें वो टूंटे भूत वाली बात लिखँूगी तो चलेगा? वो हमारे आपस की बात है ना?’’ ते क्षणात म्हणाले, ‘‘लिखो ना बेटा, लाइफ को इतना सिरियसली क्यों लेना है? जो चाहे लिख दो, और टुंटा कितना मजेदार है.. देखो बेटा, ुमर लाइफ का व्हेंटिलेशन है.. रोशनदान होता है नं.. उसके बीना कुछ भी नही.’’
मला त्यांचा ‘अंगूर’ आठवला. मी म्हटलं, ‘‘बिल्कुल.. और सुनिए, आप दादासाहेब फाळके अॅवॉर्ड लेने रंगमंच पर जाओगे तब टूंटे को भी जरुर लेते हुअे जाना, मैं उसकी भी ड्रेस डिझाइन कर रही हूं.’’
यावर ते म्हणाले, ‘‘बिल्कुल, और टूंटे के बारे में लिखना है या नही ये तुम मुझे क्यों पुछती हो? उसे ही पुछो, अब उसे भी एक मोबाइल लेकर देना पडेगा लगता है’’
मग आम्ही, एक हात नसलेलं टूंटा भूत राष्ट्रीय पुरस्काराला कुठला वेश घालेल यावर चर्चा सुरू केली. विमानानं टेक ऑफ घेतला होता, ते हवेत निघालं होतं. उंच, उंच, उंच!

Story img Loader