लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीला नवविवाहित जोडप्याला हलव्याचे दागिने घालण्याची प्रथा आहे. लहान मुलांनाही हलव्याचे दागिने घातले जातात. हल्ली तर हे दागिने खऱ्या दागिन्यांसारखेच तयार केले जातात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मकरसंक्रांत हा वर्षांच्या सुरुवातीलाच येणारा सण. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात साजरा होणारा हा सण आहे. प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या नावांनी, वेगवेगळ्या प्रथांनी संक्रांत प्रचलित आहे. तामिळनाडूमध्ये पोंगल, गुजरातमध्ये उत्तरायण, हरियाणामध्ये माघी, पंजाबमध्ये लोधी, आसाममध्ये बिहू अशा नावांनी हा सण ओळखला जातो. साधारण १४-१५ जानेवारीच्या आसपासच सगळीकडे हा सण साजरा होतो. सूर्याचं मकर राशीतील संक्रमण किंवा सूर्याचे उत्तरायण यासाठी मकरसंक्रांतीचे महत्त्व मानले जाते. या सुमारास सुगीचा काळ असतो. सगळीकडे धनधान्याची रेलचेल असते. या गोष्टीदेखील या सणाच्या
संक्रांतीचे हलव्याचे दागिने म्हटलं की डोळ्यापुढे येतात ते पाटणकर खाऊवाले. गेले जवळजवळ ५० वर्षे अव्याहतपणे हलव्याच्या दागिन्यांमध्ये काळानुसार त्यांनी नावीन्य आणले आणि परंपरा टिकवण्यासाठी हातभार लावला. लफ्फा, चिंचपेटी, तन्मणी, वाकी, मेखल्यापासून ते कपाळावरची बिंदी, पायातले फक्त पैंजणच नव्हे तर जोडवीसुद्धा हलव्याच्या दागिन्यांमध्ये त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. स्त्रियांच्या दागिन्यांमध्येच नाही तर पुरुषांच्या आभूषणांमध्येदेखील खूप विविधता आहे. महाराजा सेटमधील सजवलेला फेटा असो किंवा पुणेरी पोशाखामधील पुणेरी पगडी, उपरणं आणि भिकबाळीचा तोरा असो या सर्व गोष्टी दागिन्यांमध्ये असतात. ‘एअर इंडियात काम करणाऱ्या जावयासाठी एका हौशी सासूबाईंनी आमच्याकडून हलव्याचे विमान बनवून घेतले होते. त्याबरोबरच डिझायनर ज्वेलरी, हलव्याची साडी, हलव्याची पर्स अशा गोष्टी तरुण मुलींना, सुनांना आकर्षित करतात तर हलव्याचा मोबाइल, हलव्याचे पेन, हलव्याची टाय पिन अशा गोष्टी अनेक सासूबाई आग्रहाने आपल्या जावयांसाठी घेतात.’ अशी माहिती खाऊवाले पाटणकर यांनी दिली. या वर्षी हलव्याच्या दागिन्यांमध्ये त्यांनी पेशवाई पद्धतीचे दागिने पेश केले आहेत. या दागिन्यांमध्ये रमा-माधव श्रेणी लोकांच्या पसंतीस उतरली आहे.
या बरोबर सुकामेव्याचा हलवा खवय्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. काजू, बदाम, पिस्त्यापासून ते मगज, दाणे, डाळ, बडीशेप अशा गोष्टींवरचा हलवा जावयाला देण्याची प्रथा आहे. हळदी-कुंकवासाठी लुटण्यासाठी अनेक गोष्टी इथे बघायला मिळतात.
सोनिया पाटणकर