lp10…फक्त तिशीचा तर होता आणि हार्ट अ‍ॅटॅक? कसं शक्य आहे? अलीकडच्या काळात असं वाक्य सतत ऐकू यायला लागलं आहे. कर्ती सवरती तरुण पिढी हार्ट अ‍ॅटॅकच्या विळख्यात सापडते आहे. पण असं का होतं आहे, या प्रश्नावर हृदयरोगतज्ज्ञ सांगताहेत ते गंभीरपणे ऐकून घेण्याची गरज आहे.

‘अमुक अमुक कलाकाराचा हृदयविकाराच्या झटक्याने अकाली मृत्यू’

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “आमच्याकडे मान-अपमान मनात होतो अन् त्याचं संगीत…”, देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी!
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “मी शब्दांत शूर, पण सुरात असूर”, मुख्यमंत्र्यांच्या विधानाने हशा; म्हणाले, “लोकांचा गैरसमज होतो की…”

ही बातमी गेल्या काही महिन्यांत दोन-तीन वेळा तरी वाचायला मिळाली. साहजिकच त्याचं वलय आणि कामगिरीप्रमाणे दोन-चार दिवस माध्यमांत चर्चा होताना त्या चर्चेला जोड असते ती वयाची आणि हृदयविकाराच्या झटक्याची; पण सामान्यत: हृदयविकाराचा हा झटका या क्षेत्रातील बऱ्या वाईट घटकांचं फलित म्हणून पाहिला जातो आणि त्या क्षेत्रात असंच असतं म्हणून चार-आठ दिवसांत विषय बंद होतो.

पण खरं तर हा केवळ त्या क्षेत्रापुरता मर्यादित विषय नाही. त्याचं आजचं प्रमाण अतिशय व्यापक आहे हे लक्षातच घेतलं जात नाही, किंबहुना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्य़ाने मरण पावणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढते आहे आणि त्याला आता वयाचे परिमाणदेखील लागू होत नसल्याचं सिद्ध झालं आहे. हृदयरोगतज्ज्ञांनी रुग्णांचा अभ्यास केला असता पुढील उदाहरणांमध्ये हे वास्तव ठळकपणे अधोरेखित होताना दिसते.

बारावीतील मुलगा, परीक्षेच्या तणावात चार दिवस न झोपता अभ्यास करत होता, पाचव्या दिवशी त्याला हार्ट अटॅक आला.

इंजिनीअरिंगचा मुलगा परीक्षेच्या १५ दिवसांत कमीत कमी झोपत होता, परिणामी परीक्षा संपता संपता तीव्र हार्ट अटॅक आला.

आखाती देशात उच्चपदावर काम करणारा, आहार सांभाळणारा, घरीच खासगी जिमवर नियमित व्यायाम करणारा अधिकारी एके दिवशी सकाळी व्यायाम करतानाच ट्रेड मिलवर हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला.

सुट्टीसाठी परदेशात गेलेला डॉक्टर, मस्त भटकंती करताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला.

ही वानगीदाखल उदाहरणं निश्चितच गंभीरपणे विचार करायला लावतात. गेल्या काही वर्षांत वैद्यकशास्त्राने केलेल्या प्रगतीमुळे अनेक दुर्धर आजारांवर उपचार होत असतानादेखील या व्यक्ती एका सेकंदात मृत्यूच्या दारी पोहोचल्या आहेत, वैद्यकीय मदत उपलब्ध होण्याच्या आत. अर्थात प्रसिद्धी माध्यमातून कलाकारांच्या आणि राजकारण्यांबाबतीतच या आजाराची चर्चा ऐकायला मिळते; पण त्यापलीकडे हृदयविकाराने आपले हातपाय किती पसरवले आहेत हे फारसं चर्चेत येत नाही. त्याचं नेमकं काय कारण आहे आणि आपल्याला हा विळखा सोडवायचा असेल तर काय करावे लागेल हे तपासणे या पाश्र्वभूमीवर महत्त्वाचे वाटते.

हृदयरोगतज्ज्ञांनी मात्र हे वास्तव आज स्वीकारलं आहे. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी सांगतात, ‘‘एके काळी वयाच्या पन्नाशी-साठीनंतर येणारे हे आजार आज चाळिशीच्या आतच उद्भवताना lp14lp13दिसत आहेत. साधारण शंभर लोकांची तपासणी केली असता त्यापैकी चार-पाच लोकांना सिव्हीअर ब्लॉकेजेस आढळतात. हेच प्रमाण पूर्वी वयाच्या साठीनंतर दिसायचे. १९६०च्या आसपास आपल्याकडे असणाऱ्या हृदयरोगाच्या प्रमाणात आज शहरी भागात ८ ते १० टक्क्य़ाने, तर ग्रामीण भागात तिप्पट वाढ झाली आहे.’’ तरुण पिढीतील हृदयविकारांचा विशेष अभ्यास असणारे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अजय महाजन सांगतात, तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण तर सध्या हमखास जाणवतेच; पण २०-५० या वयोगटातील अनेक रुग्णांवर सध्या आम्हाला उपचार करावे लागत आहेत. एका सर्वेक्षणाच्या मते २०२० पर्यंत भारतात हृदयरोगाचे सर्वाधिक रुग्ण असण्याची शक्यता असून जागतिक हृदयरोग काँग्रेसच्या मते २०२० मध्ये ४० टक्के लोकांच्या मृत्यूचे ते कारण असण्याची शक्यता आहे, तर जागतिक आरोग्य संघटनेनं २०३० पर्यंत त्यामुळेच अपघात अथवा संसर्गजन्य रोग वगळता भविष्यात हृदयरोग हाच सर्वाधिक बळीचे कारण ठरण्याची शक्यता वर्तवली आहे.

lp11व्यसन, मांसाहार चार हात लांब ठेवावे
महाविद्यालयीन वयात व्यसनं करणं, मांसाहाराची सुरुवात करणं अशा गोष्टी काहीशा हिरोइझम म्हणून केल्या जातात. त्या वयातील बंडखोर स्वभावामुळे ते बऱ्याच वेळा स्वाभाविक असतं. पण व्यसनांचा आणि मांसाहाराचा नेमका काय परिणाम होतो? डॉ. अजय महाजन सांगतात, निकोटिनमुळे सिपॅटॅटिक अ‍ॅक्टिव्हिटी वाढतात. शरीरात ताणतणावाची पातळी वाढवणारी हीच सिपॅटॅटिक नव्‍‌र्हस सिस्टीम मग अ‍ॅड्रीनलीन, नॉन अ‍ॅड्रीनलीन घटक वाढवते. ते विषारी घटक वाढणं अंतिमत: तणावाला आणि पर्यायाने हृदयरोगाला आमंत्रण देणारं असतं. मांसाहारातदेखील बोकड अथवा कोंबडी मारली जाते तेव्हा त्यांच्या शरीरातील सिपॅटॅटिक नव्‍‌र्हस सिस्टीम सर्वात वरच्या पातळीवर असते. तेव्हा मांसाहार वाढला तर आपल्यातील ही सिपॅटॅटिक अ‍ॅक्टिव्हिटी वाढू शकते आणि त्याचे परिणाम वरील विषारी घटक वाढण्यात होते.

अर्थातच या रोगाने आपल्या सर्वाच्याच आयुष्यात नेमका कसा आणि केव्हा शिरकाव केला यावर थोडासा प्रकाश टाकावा लागेल. जागतिकीकरणानंतर आपल्याकडे औद्योगिकीकरण आणि शहरीकरणाचा वेग प्रचंड वाढला. त्यातूनच करीअरच्या अनेक संधी निर्माण होत गेल्या. जगातील अनेक प्रवाह आपल्या अंगावर आदळू लागले. या प्रवाहांना तोंड देताना आपण अनेक चांगल्या गोष्टी स्वीकारल्या तसेच काही वाईट गोष्टीदेखील आल्या. कामाचा वेग वाढला, स्पर्धेची तीव्रता वाढली, जीवनशैली बदलत गेली, आहार बदलत गेला, व्यसनं वाढली आणि ताणतणाव वाढले, परिणामी आज आपण हृदयरोगाच्या विळख्यात अडकलो आहोत.

जीवनशैलीच्या बदलामुळे निर्माण होणारे भावनिक, मानसिक, आर्थिक आणि शारीरिक तणाव हे हृदयरोगाच्या मुळाशी असल्याचे ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी ठामपणे सांगतात. उच्च lp12रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान यांचा तणावाशी थेट संबंध आहे. महत्त्वाचं म्हणजे हे तीनही प्रकार घरीदारी सर्वत्र तुमच्याबरोबर असतात. एखाद्या घटकाचे एखाद्या विशिष्ट ठिकाणी प्रमाण कमी असेल, तर दुसऱ्याचे अधिक, इतकाच काय तो फरक आहे. घरातील विसंवाद, प्रेमप्रकरणातील वाद, मित्रमैत्रिणीचे भावविश्व, सततची दगदग, शारीरिक कष्टाचे काम, आर्थिक ओढाताण ही या तणावांची कारणं आहेत, तर फिजिऑलॉजिकल तणाव हे अदृश्य स्वरूपात कार्यरत असतात. रोजचे काम करताना तुम्हाला त्या कामाची इतकी सवय झालेली असते, की त्यात लपलेला तणाव तुम्हाला जाणवत नाही; पण त्याचं अस्तित्व असतं आणि तो तुमच्या शरीरावर परिणाम करत असतो. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आज अनेक जण या तणावाला सामोरे जाताना दिसतात; पण तणाव दृश्य असो वा अदृश्य, त्याचे मात्र तुमच्या शरीरावर परिणाम होतच असतात. डॉ. गजानन रत्नपारखी सांगतात, ‘‘या तणावामुळे कॉर्टिसॉल हॉर्मोन्समार्फत अ‍ॅड्रिनॅलिन व नॉन-अ‍ॅड्रिनॅलिन हार्मोन्स तयार होतात. हे हार्मोन्स शरीरासाठी घातक असतात; पण तणाव वाढेल तसे हे हार्मोन्स तयार होणेदेखील वाढते आणि शरीरावर त्याचे विपरीत परिणाम दिसू लागतात, हेच हृदयरोगाला आमंत्रण असते.’’

स्त्रियांमधील वाढता हृदयविकार
एक काळ असा होता की, चूल आणि मूल हीच स्त्रीची भूमिका असायची. काळाच्या ओघात तिची भूमिका बदलत गेली. शिक्षणाची कवाडं खुली होत गेली आणि चार भिंतींच्या आत अडकलेली ती करिअरच्या lp15अवकाशात पुरुषांबरोबर वावरू लागली. परिणामी आजवर केवळ घरातील जबाबदाऱ्यांत अडकलेली ती कार्यालयीन जबाबदाऱ्यांतदेखील गुरफटलेली असते. अर्थातच आनुषंगिक ताणतणाव, धावपळ अपरिहार्य होतं. ही दुहेरी जबाबदारी पेलताना तिच्यावरील दुहेरी ताणतणाव मात्र वाढत गेला आहे. डॉ. रत्नपारखी सांगतात, ‘‘स्त्रियांमधील इस्ट्रोजन या नैसर्गिक हार्मोन्समुळे हृदयविकार टाळण्यास मदत होते. पण मासिक पाळी थांबते तेव्हा या हार्मोन्सचं प्रमाण कमी होतं. त्यानंतरच्या काळात मात्र स्त्रियांमधील हृदयविकाराचं प्रमाण वाढू शकतं. पण आज हाच धोका दुहेरी जबाबदारी पेलणाऱ्या स्त्रीच्या आयुष्यात अलीकडे आला आहे. घरातील भावनिक गुंतवणूक अधिक असल्याने तिच्या मूळच्याच हळव्या मनावर होणारे ताणतणावाचे परिणाम, घर आणि ऑफिस सांभाळताना फिटनेससाठी वेळ न मिळणं, परिणामी वजन वाढणं, पोटाचा घेर वाढणं, मधुमेह होणं अशा घटनांना आमंत्रणच मिळतं. त्यालाच आम्ही मेटॉबॉलिक सिंड्रोम म्हणतो. त्याचं भारतातील प्रमाणदेखील अधिक आहे. यात हृदयविकार आणि हार्ट अटॅक येण्याचा संभव अधिक आहे.’’ करिअर ओरिएंटेड महिलांसाठी ही धोक्याची घंटाच आहे. घरातील ताणतणाव कमी करण्यासाठी योग्य ती मदत घरातून कशी मिळेल आणि आजाराला दूर कसं राखता येईल, हे पाहणं महत्त्वाचं.
तर दुसरीकडे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरताना धूम्रपान, मद्यपान अशा वाईट सवयीदेखील काही महिलांनी काही प्रमाणात उचलल्या आहेत. परिणामी आजवर हृदयविकाराच्या जाळ्यात फारसा न अडकलेला महिला वर्गदेखील यामध्ये अलगद अडकत चालल्याचं दिसून येत आहे.
त्याचबरोबर आणखी दोन महत्त्वाच्या मुद्दय़ांकडे डॉ. रत्नपारखी आपलं लक्ष वेधतात. एक म्हणजे गर्भनिरोधक गोळ्यांच्या नियमित सेवनाच्या विपरीत परिणामामुळे हृदयविकाराची शक्यता वाढते. दुसरा मुद्दा आहे तो भारतीय स्त्रियांची उंची आणि आकारमान प्रमाण (बॉडी मास इंडेक्स). हे पाश्चिमात्य स्त्रियांपेक्षा कमी असतो. त्यामुळे तिच्या रक्तवाहिन्यांचा व्यास कमी असतो, रक्तवाहिन्या छोटय़ा असतात. परिणामी रक्तवाहिन्यांना होणारा कोणताही छोटासा अवरोध हा मोठय़ा प्रमाणात दुष्परिणाम करणारा ठरतो. व्यायाम आणि शारीरिक हालचालींच्या कमतरतेमुळे रक्तवाहिन्यांच ंजाळं कमी असतं. तिच्यातील हार्मोन्समुळे तिचं रक्षण होत असलं तरी इतर प्रतिकूल घटकांचा प्रभाव जसजसा वाढेल तसतशी हृदयविकाराची शक्यता वाढत जाणार हे निश्चित.’’

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अजय महाजनदेखील तणावच या सर्वाच्या मुळाशी असल्याचे नमूद करतात. ते सांगतात, ‘‘सध्या अर्धवट झोप, सततची घाई, चिंता, काळजी प्रचंड वाढली आहे आणि त्याचेच रूपांतर अखेरीस ताणतणाव वाढण्यात झाले आहे. आज अनेक तरुणांमध्ये थ्रंबोजनिसिटी म्हणजेच रक्तात गाठ होण्याचे lp18प्रमाण वाढले आहे. आम्ही ज्या ४०० तरुणांचे सर्वेक्षण केले त्यामध्ये अगदी महाविद्यालयीन तरुणांमध्येदेखील हे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. या ४०० पैकी बहुतांशांना कोरोनरी ब्लॉकजेस नाहीत; पण थ्रंबोजनिसिटी वाढण्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण अधिक आहे. यामागे आजचा स्पर्धेच्या युगातील तणाव आणि धूम्रपान कारणीभूत आहे. त्याला व्यसनांची जोड मिळाल्यावर त्याची तीव्रता कैक पटीने वाढते.’’ ते सांगतात की, ताणतणाव कमी करायचा म्हणून अनेक जण सिगारेट, तंबाखूच्या व्यसनांकडे वळताना दिसतात. आधीच आपलं वातावरण प्रदूषित झालेलं आहे. १०० वर्षांपूर्वी आपल्या वातावरणात असणारे प्राणवायू आणि कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण बदलले आहे. फॉसिल फ्यूअल जाळल्याने प्रदूषणात भर पडत आहे. या साऱ्या प्रदूषणाचा परिणाम आपल्यावर होतच असतो. आपलं शरीर हे या प्रकारच्या वातावरणासाठी टय़ून झालेलं नाही. त्यातच जर धूम्रपानाची सवय असेल तर हृदयरोगासाठी ती सर्वात स्फोटक परिस्थिती असल्याचं ते प्रतिपादन करतात.

म्हणजेच हृदयरोगाचा हा विळखा काही निसर्गाने घातलेला नाही. तो आपणच आपल्या बदलत्या जीवनशैलीने तयार केला आहे. डॉ. महाजन सांगतात, ‘‘आपलं शरीर हे ज्या प्रकारच्या आहारासाठी, जीवनशैलीसाठी पूरक आहे, नेमकं त्याच्या विरुद्ध आपण वागत आहोत. आपण माकडापासून उत्क्रांत होत गेलेले आहोत. माकडांचा आहार मुख्यत: शाकाहारी आहे. एखादा चिम्पांझीसारखा शिकार करायचा. तेच जेनेटिकली माणसात आले आहे. आपल्या आजा-पणजाचे जीन्सदेखील असेच आपल्यात आलेले असतात. त्यानुसार आपलं शरीर टय़ून झालेलं असतं. त्यामध्ये आजच्या आहारातील ब्रेड, बिस्किट, चीज बर्गर, पिझ्झा, तेलकट पदार्थ (वडापाव, समोसा वगैरे) यांचा समावेश होत नाही. तोच प्रकार आपल्या इतर आचारातदेखील आहे. आपण शरीराच्या संपूर्ण विपरीत अ‍ॅक्टिीव्हिटी करत आहोत तेच आज हृदयविकाराचं मूळ झालेलं आहे.’’

लाइफ स्टाइल डीसीज / जीवनशैलीशी निगडित आजार म्हटले की, त्याचा संबंध थेट फक्त हाय प्रोफाइल लोकांशी जोडला जातो; पण हे खरं नसल्याचं डॉ. महाजन नमूद करतात. ते लोकमान्य टिळक महापालिका वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यांच्याकडे सर्वच स्तरांतील रुग्ण मोठय़ा प्रमाणात येत असतात, त्यामुळे हा फक्त उच्चभ्रूंचा आजार असे म्हणता येणार नाही. डॉ. रत्नपारखी याचं lp19विश्लेषण करतात.. प्रत्येकाला काही ना काही काळजी, चिंता कायमच असते. अगदी रस्त्यावर काम करणाऱ्या व्यक्तीला आजचं जेवण मिळेल का, उद्या काम मिळेल का, याची चिंता भेडसावत असते. त्याला अजून चार पैसे मिळवून पुढे जायचे असते, तर नोकरदारदेखील जी धावपळ करतो त्यामागे त्याला नोकरीचं आणि कौटुंबिक उद्दिष्ट गाठण्याचा तणाव असतो. उद्योजकाला उद्योगाच्या चिंता भेडसावत असतात. परिणामी प्रत्येकाच्या आयुष्यात आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी ज्या ज्या घटकांची गरज असते त्यामध्ये काही ना काही कमतरता असते. कोणाचा आहार नीट नसतो, तर कोणाचं आयुष्य धावपळीचं असतं, तर कोणाला सारं काही व्यवस्थित, पण व्यायामासाठी वेळ नसतो, तर कोणी सारं असूनदेखील व्यवसायाच्या चिंतेने पछाडलेला असतो. या सर्वाचा अंतिम परिणाम हा ताणतणाव हृदयविकाराकडे खेचून नेण्याकडेच होतो. लाइफ स्टाइलसंबधित विकार म्हणताना त्यामध्ये हे घटक कारणीभूत ठरतात. त्यासाठी बाहय़ शक्ती म्हणजे अपघात अथवा संसर्गजन्य रोगाची मुळं नाहीत, तर तुमच्या स्वत:मध्येच ती दडली आहेत. म्हणूनच जीवनशैली कोणतीही असो, ती रस्त्यावरच्या कामगाराची असो, की प्रस्थापित उद्योगपतीची, त्या जीवनशैलीचं संतुलन साधलं नाही तर हमखास धोका असतोच.

डॉ. रत्नपारखी यासाठी समाजाला दोन प्रकारांत विभागतात. ए टाइप आणि बी टाइप. ए टाइपचे लोक हे अतिशय आक्रमक, सतत धावणारे, कमी काळात अधिक यश मिळविण्याची अपेक्षा करणारे, अतिमहत्त्वाकांक्षी असतात. अशा व्यक्तींना ताणतणाव खूप असतात. त्यांना हृदयविकाराची शक्यता अधिक असते. तर बी टाइपचे लोक ‘ठेविले अनंते तैसेची राहावे’ या वृत्तीचे असतात. त्यांना हृदयविकाराची शक्यता कमी असते. गरज आहे ती व्यक्तिमत्त्वात योग्य ते बदल करून दोन्ही प्रकारांचं संतुलन साधण्याची. त्यावरच आपण हृदयविकाराच्या शक्यतेच्या जवळ अथवा दूर जातो.

हे सारं दृश्य जरी एकीकडे असलं तरी सुबत्ता कोणाला नको आहे? करीअरच्या चार पायऱ्या चढाव्यात, चार पैसे गाठीला बांधावेत, सोयीसुविधायुक्त घर, गाडी असावी असे सर्वानाच वाटत असते. हे सारं हवं असेल तर स्पर्धा अटळ होते. परिणामी वयाच्या विशीतच उद्दिष्टाच्या मागे पळावे लागते. मग साहजिकच हे सारं अपरिहार्य झालं आहे का, हा प्रश्न पडतो. त्यावर डॉ. महाजन सांगतात, ‘‘टाळणं शक्य नाही हे काही अंशी खरं आहे; पण या जीवनशैलीत तिच्या आहारी न जाता स्वत:ला जुळवून घेताना कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जीवनशैली सोप्पी कशी राखता येईल हे पाहावं लागेल. ‘स्टिक टू द बेसिक’ हे तत्त्व अंगी बाणवावं लागेल.

धावपळीचं आयुष्य कमी होणार नाही; पण मग त्यातून मनाची, शरीराची जोपासना करण्यासाठी योग, ध्यानधारणा, विपश्यनासारखे पर्यायच कामी येतात.’’ डॉ. रत्नपारखीदेखील याच मुद्दय़ावर भर देतात. ते सांगतात, ‘‘ताणतणाव तर येणारच आहेत; पण आपण जर नियमित व्यायाम आणि योगसाधना करत असू, तर त्यामुळे तुमच्या आचारविचाराला एक आधार मिळतो, येणारे ताणतणाव कमी करण्याचा मार्ग, त्यातून मिळणारी ऊर्जा तुम्हाला दाखवू शकते.’’

lp16आचार विचार, आहार विहार
हृदयविकाराचा विळखा घालणारे अनेक घटक आज समाजात कार्यरत आहेत. त्यापासून चार हात दूर राहायचं असेल तर आचारविचार आहारविहार सुधारणं हाच योग्य पर्याय असल्याचं डॉ. गजानन रत्नपारखी सांगतात. या चार घटकांचं पालन कसं करता त्यावरच आपण हृदयरोगाच्या जवळ जाणार की दूर, हे ठरतं. शराब, शबाब आणि कबाब ही जी आजची संस्कृती होत आहे, ती टाळावी असं रत्नपारखी यांचं मत आहे. डॉ. अजय महाजन सांगतात, किमान ६-७ तास शांत झोप, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार आणि व्यसनांपासून चार हात दूर राहिला तरी हृदयविकाराला तुम्ही रोखू शकता. इतकंच नाही तर किमान झोप घेतली तरी खूप काही गोष्टी आपोआप टळतात यावर ते भर देतात.

lp17आहार काय असावा
संपूर्ण शाकाहार, कोलेस्टेरॉल आणि कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ टाळणं, सॅच्युरेटेड फॅट टाळणं, सामान्य तापमानाला घनरूपात असणाऱ्या (चीज, बटर वगैरे) गोष्टी खायच्या नाहीत. करडी, सोयाबीन तेलाचा वापर करा. पाम ऑइल, वनस्पती तूप टाळा. गायीचं तूप तेदेखील सामान्य तापमानाला वापरावं. साखर, मीठ कमी वापरा. मैद्याचे पदार्थ- ब्रेड, बटर, खारी, बिस्कीट टाळावे. पोळी-भाकरीसाठी कोंडय़ासहित पीठ वापरावं. भाज्या, फळं भरपूर खावीत, शक्यतो कोबी, कच्चे पदार्थ खावेत. थोडक्यात काय, तर साधे राहणीमान ठेवावे त्यामुळे समस्या कमी होतात, यावरच सर्व हृदयरोगतज्ज्ञ भर देतात.

बऱ्याच वेळा व्यायामाबाबत अनेकांचे अनेक समज-गैरसमज असतात. अनेकांना असे वाटते की मी रोजच ट्रेन पकडण्यासाठी धावपळ करतो, माझ्या कामाचं स्वरूप फिरतीचं आहे. पण ती दमछाक असते. डॉ. रत्नपारखी यासंदर्भात सांगतात की दमछाक तुमच्या शरीरात प्रतिकूल हार्मोन्स तयार करते. तर अनकूल हार्मोन्स तयार करण्यासाठी व्यायामाची गरज असते. व्यायामामुळे मिळणारी ऊर्जा तुम्हाला या सर्व ताणतणावातून सावरू शकते. थोडक्यात सांगायचं तर निरोगी शरीर हीच खरी संपत्ती हेच येथे महत्त्वाचं आहे. पण आपल्याकडे होतं असं की निरोगी आरोग्यामुळे पैसे कमावले जातात आणि ते पैसे कमावताना निरोगी आयुष्य रोगी होत जाते आणि परत तेच पैसे खर्च करून रोगी आयुष्याला निरोगी करण्याचे काम करतो. म्हणजे काही पैसे कमवायचेच नाहीत असा अर्थ नाही. डॉ. महाजन त्याबाबत सांगतात, की निरोगी राहण्यासाठी पैसे खर्च करायची गरज नाही, गरज आहे ती पैसे कमावताना निरोगी आयुष्याची जीवनशैली जोपासण्याची. नेमकं आज आपण तेथेच कच खात आहोत.

हृदयरोगाने आपल्याला घातलेल्या या विळख्यावर आज सर्वच स्तरावर चर्चा होत असली, तरी एका महत्त्वाच्या घटनेकडे तज्ज्ञ आपलं लक्ष वेधतात ते म्हणजे आजार अंगावर काढणे. डॉ. महाजनांनी सर्वेक्षण केलेल्या रुग्णांमध्ये डॉक्टरकडे न जाणं हे कारण प्रकर्षांनं जाणवलं आहे. ते सांगतात की अनेक वेळा लोकांना छातीत दुखण्यामागची कारणं कळतच नाहीत. अ‍ॅसिडिटी असेल म्हणून ते इनो अथवा कोक, पेप्सी घेण्याचे उपाय करतात. पण कधी तरी ही तीव्रता वाढते तेव्हा ते डॉक्टरकडे येतात. परिणामी लवकर आल्यानंतर केले जाणारे उपचार हे विलंबाने केल्यामुळे हृदय कमकुवत होते. डॉ. रत्नपारखी सांगतात की आपल्याकडे ३० टक्के लोक हे हृदयविकाराच्या पहिल्याच झटक्यात मरतात. त्यामागे हेच कारण आहे. ज्यांच्या जीवनशैलीत हृदयरोगाकडे नेणारे ताणतणावासारखे घटक आहेत त्यांनी तर नियमित तपासणी करणे गरजेचं आहे. याबाबत आपल्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जाते. त्यामध्ये डॉक्टरदेखील मागे नाहीत हे उदाहरणांवरून दिसून आल्याचे ते नमूद करतात.

अर्थात आज अनेकांची भूमिका अशी आहे, की सध्या काही झाले की डॉक्टर ढीगभर तपासण्या करायला सांगतात. उगाच एवढंसं छातीत दुखलं तर कशाला जायचं. त्यावर डॉ. महाजन सांगतात, तुम्हाला हा तपासण्यांचा भार झेपत नसेल तर महापालिका आणि इतर सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये कॉर्डिओग्रामची सोय आहे. छातीत दुखतंय म्हटल्यावर तेथे ईसीजी काढला जातो. त्यात काही दोष आढळल्यास सरकारी इस्पितळातच पुढील कार्यवाही वाजवी खर्चात होऊ शकते. ठरावीक उत्पन्न गटाला तर हे उपचार विनाशुल्क आहेत.

आज अनेक ठिकाणी असे दिसते की इच्छा असूनही जीवनशैलीत चांगले बदल होत नाहीत. एकाला बदलायचे तर इतर नऊ जण त्याला बदलू देत नाहीत. त्याचं कारण आपण पाश्चिमात्यांचे अनुकरण कायमच सोयीस्करपणे करतो. अमेरिकेत एकेकाळी धूम्रपानाचे प्रमाण प्रचंड होते आणि अर्थातच हृदयविकाराचेदेखील. पण त्यांनी धुम्रपानविरोधी मोहीम हाती घेतली. त्याचे चांगले परिणाम आज त्यांच्याकडे दिसत असल्याचे डॉ. रत्नपारखी नमूद करततात. जर्मनीतील त्यांच्या प्राध्यापकांचे उदाहरणही ते देतात. ते पाच दिवस भरपूर काम करायचे. संतुलित जीवनशैली सांभाळायचे, दोन दिवस पूर्ण बाहेर जायचे. रोजच्या धबडग्यापासून दूर. परिणामी पुन्हा नव्या आठवडय़ाची सुरुवात करताना ते संपूर्ण ताजेतवाने असायचे. आज आपण केवळ भरकटल्याप्रमाणे धावत आहोत. ना कसले वेळापत्रक ना कसले नियंत्रण. शरीराला हवी असणारी शारीरिक, मानसिक विश्रांती योग्य प्रमाणात न देणं हेच त्यामुळे घडताना दिसत आहे. अर्थात तीदेखील नियमित मिळणे गरजेचं असते. आठ दिवस लोळून मग पुढचे आठ दिवस चोवीस तास काम करतो हेदेखील योग्य नाही. म्हणूनच संतुलित जीवनशैली हाच यावरचा खरा उपाय आहे.

थोडक्यात काय तर गरज आहे ती हृदयविकाराचा हा विळखा ओळखून त्या विळख्यात न अडकण्यासाठी वेळीच आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची. विळख्यात अडकल्यावर औषधोपचार आहेतच पण न अडकण्यासाठी हवी ती इच्छाशक्तीच, त्याला पर्याय नाही.

Story img Loader