आलामांडा ही बहुगुणी वनस्पती अशी आहे की, तिला वेलीसारखे किंवा झुडपासारखेही वाढवता येते. साधारण बोगनवेलीसारखी वाढ असणारी ही वनस्पती आहे. अशा वनस्पतींना इंग्रजीत रँब्लर (rambler) अशी संज्ञा आहे. रँब्लर ही संज्ञा साधारणपणे वेल-गुलाबांना वापरली जाते. आलामांडाला सर्वसंमत असे मराठी भाषेतील नाव नाही; परंतु काही ठिकाणी आलामांडाला मराठीत कर्णफूल असे संबोधले जाते. आलामांडाचे इंग्रजीतील साधारण नाव आहे ‘Golden Trumpet’. आलामांडा आता भारतातील बागांत सर्वत्र सापडत असला तरीही ह्य़ा वनस्पतीचे मूळ स्थान भारत नाही; तिचे मूळ स्थान दक्षिण अमेरिकेतील ब्राझिल, मेक्सिको आणि अर्जेटिना येथे आहे. आलामांडाचे कूळ आहे Apocynaceae. खूरचाफा किंवा देवचाफाही ह्य़ाच कुळातील आहे. परंतु खुरचाफ्याच्या काही जातींची फुले सुगंधी असली तरीही आलामांडाच्या कुठल्याही जातीतील फुलांना सुगंध नसतो. आलामांडाच्या पानांना, बुंध्याला किंवा इतर कोणत्याही भागाला इजा झाली तर जखमेतून दुधासारखा पांढरा चीक निघतो. ज्या लोकांची त्वचा संवेदनशील असते त्यांना हा चीक त्वचेवर लागल्यास थोडा फार त्रास सहन करावा लागतो; परंतु त्वचा लालसर होऊन खाज येणे इतपतच हा त्रास असतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा