हॉलंड (नेदरलँड) हा एक अजब आणि तरीही नितांतसुंदर देश आहे. अजब अशासाठी की, या देशात बराचसा भूभाग समुद्रसपाटीच्या खाली असूनही कल्पक डचांनी मोठय़ा हिकमतीने ठायी ठायी ‘डाइक्स’ (बांध) बांधून समुद्र अडविला आहे आणि समुद्राच्या भरती-ओहोटीमुळे येणाऱ्या जादा पाण्याचे नियमन करण्यासाठी देशभर कालव्यांचे जाळे विणले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हॉलंडला भेट देणारे भारतीय पर्यटक अॅमस्टरडॅम, हेगचा ‘मदूरोडॅम मिनी पार्क’ आणि कुकेनहॉफ टय़ुलिप गार्डन यापलीकडे सहसा जात नाहीत; पण हॉलंडमधील इतर अनेक शहरे व गावे तितकीच प्रेक्षणीय आहेत. ख्रॉनिंगन त्यापैकीच.
ख्रॉनिंगन (ॅ१ल्ल्रल्लॠील्ल) हे या देशाच्या उत्तर सीमेलगतचे शहर. अॅमस्टरडॅमहून ट्रेनने तीन-साडेतीन तासांचा डोळे सुखविणारा प्रवास. रेल्वेच्या दोन्ही बाजूंना क्षितिजापर्यंत लहरत गेलेली हिरवीगार कुरणे व शेते, पुष्ट गायी-मेंढय़ांचे चरणारे कळप, चिमुकली, रंगीबेरंगी छते मिरवणारी मोजकीच घरे असलेली गावे, असंख्य आडवे-उभे झुळझुळणारे कालवे आणि मधूनच आपल्याला हात हलवीत ‘वेलकम’ म्हणणाऱ्या ‘विंडमिल्स’! हिरव्या रंगाच्या अगणित छटा. डोळे दमतात; पण नजर हटत नाही.
ख्रॉनिंगन स्टेशनच्या बाहेर आल्यावर पहिली गोष्ट जाणवली- हे सायकलींचे शहर आहे. स्टेशनबाहेरच्या भल्या मोठय़ा पटांगणांत एकावर एक अशा दोन सायकली लावता येतील अशा सायकल स्टँडमध्ये हजारो सायकली होत्या. आमच्या ट्रेनमधून आलेले बहुसंख्य प्रवासी पटापटा सायकली काढून स्वार होत होते, तर परतीचे पॅसेंजरही सायकलने तुरुतुरु येऊन, स्टँडमधील रिकामे स्लॉट हेरून, सायकली पार्क करून ट्रेनसाठी पळत होते. मेजॉरिटी तरुणाईची, मुलीसुद्धा दोन्ही हातांनी सायकल सहजपणे उचलून वरच्या स्टँडवर लावीत होत्या.
आजूबाजूला तरुणाईच तरुणाई पाहून या शहरातले लोक म्हातारे होतच नाहीत की काय, अशी शंका आली; पण त्याचे खरे कारण लगेच कळले. ख्रॉनिंगन हे हॉलंडमधील ‘युनिव्हर्सिटी सिटी’ म्हणूनदेखील ओळखले
टॅक्सीला इशारा केला आणि काय सरप्राइज! चक्क मर्सिडीज टॅक्सी! वा! सुरुवात तर एकदम सुरेख झाली.
प्रथमदर्शनीच प्रेमात पडावे असे हे छोटे, पण सुंदर शहर आहे. हॉलंडच्या प्राचीन शहरांपैकी एक. बहुतेक सार्वजनिक व सरकारी इमारती ‘हेरिटेज’ लेबल असलेल्या. रेल्वे स्टेशनची इमारतही आपल्या मुंबईच्या सीएसटी सारखी खूप जुनी; पण वेगळय़ाच स्थापत्यशैलीची.
हॉलंडमधल्या प्रत्येक शहराचे काही तरी खास वेगळेपण जाणवते. ख्रॉनिंगनची नगररचना अशीच वैशिष्टय़पूर्ण. शहराच्या बरोबर मध्ये असलेला गोलाकार सेंट्रल एरिया हा त्याचा गाभा. हा सर्व बाजूंनी वर्तुळाकार कालव्यांनी वेढलेला. बहुधा हा एरिया म्हणजे मूळ छोटेसे गाव प्राचीन काळी असणार आणि त्याच्या संरक्षणासाठी या गोलाकार कालव्यांची व तटबंदीची योजना असावी, कारण दोन-चार ठिकाणी कॅनॉलला लागूनच पडक्या किल्ल्याच्या तटवजा भिंतीसारखे दिसणारे भग्नावशेष दिसले. असा बंदिस्त असल्याने सेंट्रल एरियाला ‘िरग ख्रॉनिंगन’ असेही नाव आहे.
िरग कॅनॉल बऱ्यापैकी रुंद व खोल, सतत छोटय़ा बोटींची वर्दळ असलेला आहे. त्याच्यावर जागोजागी डच खासियत दाखविणारे पूल -बहुतांश लंडनच्या टॉवरब्रिजची मिनी आवृत्ती असलेले – मधून उचलले जाऊन
एकदा रमतगमत िरग कॅनॉलच्या शहराबाहेर जाणाऱ्या फाटय़ालगतचा रस्ता पकडला आणि काय मज्जा, चक्क अॅमस्टरडॅममध्येच प्रवेश केल्यासारखे वाटले. हा कालवा चांगलाच रुंद व खोल झालेला आहे. दोन्ही काठ छान बांधून काढलेले आणि दोन्ही बाजूंना पात्राच्या गळय़ात गळा घालून धावणारे रस्ते. रस्त्यांच्या दुसऱ्या कडेला उतरत्या त्रिकोणी छपरांच्या एकमेकांना खेटलेल्या रंगीबेरंगी इमारती. डिट्टो अॅमस्टरडॅम!
कालव्याच्या या मोठय़ा पात्रांत गोव्याच्या मांडवी नदीत दिसतात तसे अनेक मालवाहतुकीचे बार्जेस व टीव्हीपासून किचनपर्यंत सर्व सोयी असलेल्या खासगी ऐटदार लहान-मोठय़ा बोटींची दाटी. एका बार्जमध्ये क्रेनने कार लोड करीत होते. हिंमत करून चौकशी केल्यावर कळले की, हा कालवा थेट ‘रॉडरडॅम’ या हॉलंडच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय बंदरापर्यंत जातो आणि येथून आयात-निर्यात मालाची नियमित वाहतूक होते.
खरे म्हणजे हॉलंडमध्ये अशा मोठय़ा कालव्यांचा मूळ उद्देश ‘नको असलेले जादा पाणी नियंत्रित करणे’ हा; पण उद्यमशील डचांनी या नैसर्गिक अडचणींवर मात करताना त्या अडचणींचाच असा कल्पक उपयोग करून घेतला आहे.
बोटींत राहणे हादेखील येथील मंडळींचा आगळावेगळा छंद. आपण पैसे जमवून हौसेने मोठा फ्लॅट घेतो तशी येथे ‘कधी तरी स्वत:ची बोट घेईन’ अशी महत्त्वाकांक्षा असते. आताही एका बोटीत एक रुपेरी दाढीवाले भाऊसाहेब टीव्ही पाहात, बहुधा स्वत:च पकविलेल्या आमलेटसारख्या पदार्थाचा आस्वाद घेत मस्त विसावले होते.
सेंट्रल एरिया म्हणजेच िरंग ख्रॉनिंगन हा शहराचा सर्वात देखणा भाग. मुख्य रस्ते भरपूर रुंद आहेतच; पण मधले डिव्हायडरदेखील वीसेक फूट रुंदीचे व हिरवळ, फुलांच्या ताटव्यांनी नटलेले. सर्व लहान-मोठय़ा रस्त्यांवर सायकलींसाठी पिवळय़ा रंगाचा खास राखीव पट्टा- ‘बाइक पाथ!’ युरोपमधील बहुतेक शहरांत आपण हे पाहतोच; पण येथील वैशिष्टय़ म्हणजे या मोठय़ा रस्त्यांना काटकोनात छेदणारे काही छोटे रस्ते
िरग ख्रॉनिंगनच्या मुख्य चौकाच्या दोन्ही बाजूंना तसेच भव्य चौक आणि दोन देखणी चर्चेस. त्यातल्या मार्टिनी टॉवर चर्चचा पाचशे वर्षे जुना दगडी बेल टॉवर खूपच उंच आणि घंटेचा आवाज तर कमालीचा नादमधुर! दर तासाला दोन्ही चर्चेसचा वेगवेगळय़ा रिंगटोनमधला घंटानाद कानांना सुखवितो.
मार्टिनी टॉवरसमोरचा प्रशस्त चौक आणि त्याच्या लगतचे भलेमोठे पटांगण, ही ख्रॉनिंगनवासीयांची अतिशय आवडती जागा. हे आहे ग्रोटे मार्केट. चौकात चर्चच्या समोरची भव्य हेरिटेज इमारत आहे सिटी हॉलची. चौक व पटांगणाच्या चारी बाजूंनी धावणाऱ्या रस्त्यांलगत भलेमोठे सुपर मॉल, झगमगती शॉप्स, टर्किश मेक्झिकनपासून अनेक प्रकारची रेस्टॉरंट्स व पब्ज. दिवसभर शांत वाटणारा हा चौक संध्याकाळी गजबजतो.
चौकात उघडय़ावर टेबल-खुच्र्या मांडल्या जातात. तेथे सर्व वयोगटांचे अनेक ग्रुप्स बीयर आणि खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत जीवाचे ख्रॉनिंगन करताना पाहणे हा एक जिवंत व आनंददायक अनुभव आहे.
पण खरी गंमत दिसली शुक्रवारी संध्याकाळी. पॉवरफुल होज पाइप्सने चौक व पटांगण चकाचक धुतले गेले आणि रात्री उशिरापर्यंत तेथे ‘हाऊस ऑन व्हील्स’ म्हणतात तसे अनेक कॅरॅव्हॅन दाखल होऊन पटांगणात शिस्तीत चार ओळींत उभे राहिल्या. सकाळी पाहतो तर त्यांचे एकदम हाय-फाय दुकानांत रूपांतर झालेले. हा आहे इथला आठवडय़ाचा बाजार.
सगळी दुकाने सुंदर डिस्प्ले काऊंटरने सुसज्ज आणि खचाखच माल भरलेली. मटन-चिकन-पोर्क, मासे, चीज, फळे, भाज्या, फुले असे विभाग केलेले. चीज-मीट-फिशसारख्या वस्तू अतिशय आकर्षक तऱ्हेने काचेच्या काऊंटर्समध्ये मांडल्या होत्या, तर फळे आणि भाज्या कॅरॅव्हॅनसमोर पायरी-पायरीच्या फोल्डिंग स्टँडवर. सर्वच माल इतका ताजा व स्वच्छ की, दिसेल ते घेण्याचा मोह व्हावा. चीजचे इतके प्रकार असू शकतात हे प्रथमच कळले. फुले, कुंडय़ा व डेकोरेटिव्ह स्टँडस्ची अगणित व्हरायटी. पूर्ण शनिवार शेकडो कुटुंबे येऊन खरेदीचा आनंद लुटीत होती. आश्चर्य म्हणजे एक छोटा स्टॉल चक्क भारतीय उदबत्त्यांचा होता आणि त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत होता.
रात्री उशिरा सर्व कॅरॅव्हॅननी गाशा गुंडाळायला सुरुवात केली आणि रविवारी सकाळी पुन्हा एकदा चौक व पटांगण स्वच्छ धुतले गेले. मी मुद्दाम जेथे फिशचे स्टॉल होते तेथे जाऊन पाहिले. जरासुद्धा मत्स्यगंध दरवळत नव्हता. आपल्याकडेदेखील अनेक ठिकाणी आठवडय़ाचे बाजार भरतात व तेथील वातावरणदेखील असेच असते. उत्साही व रंगीबेरंगी असते. पण स्वच्छता? भर रस्त्यावर धुळीत दुकानदार-गिऱ्हाईकांची जुगलबंदी चालते आणि बाजा
ख्रॉनिंगची खरेदीची आणखी एक आवडती जागा म्हणजे ‘आयकिया मॉल.’ सुपरमॉल ही अमेरिका-युरोप सोडा, आपल्याकडेदेखील आता नवलाईची चीज राहिलेली नाही. पण फक्त एकाच म्हणजे ‘आयकिया’ ब्रँडच्या सर्व वस्तू हे या मॉलचे वैशिष्टय़. घर वसविण्यासाठी वा सजविण्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट जेथे मिळते. अगदी चार-सहा लाख किमतीच्या राजेशाही बेडपासून काही फुटकळ युरोंचा फोल्िंडग बेड अशी प्रत्येक वस्तूमध्ये व्हरायटी. एका युरोच्या स्क्रू-टाचण्यांपासून गाद्या, उशा, किचनवेअर, इलेक्ट्रिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स सर्व काही एका ‘आयकिया’ ब्रँडचे. नुसते विंडो शॉपिंग केले तरी तीन-एक तास कसे गेले कळले नाही.
मात्र या डचांचे मूड जरा अनाकलनीयच. इथल्या वास्तव्यातल्या पहिल्या रविवारची गोष्ट. माझी कल्पना येथील रामभाऊ, ठमाकाकू वगैरे मंडळ सकाळी मार्केटिंगच्या निमित्ताने बाहेर पडून आपल्यासारखीच नाक्यानाक्यावर एकमेकांची खबरबात घेत असतील. सकाळी चार-पाचपासून उजाडलेले पण वातावरण ढगाळ आणि दुपार झाली तरी रस्त्यावर चिटपाखरू नाही. अरे, येथे कर्फ्यू पुकारला आहे की सर्व शहरवासीय काल रात्रीच गाव सोडून गेले? माझा काळजीने काळवंडलेला चेहरा पाहून आमचा येथील यजमान अमीतने खुलासा केला- इथली बहुतेक मार्केट रविवारी बंदच असतात. त्यात हे ढगाळ वातावरण. ही डच मंडळी अशा वेळेस बाहेर पडण्याऐवजी घराची ऊब पसंत करतात.
संध्याकाळी चार-पाचच्या सुमाराला जादूची कांडी फिरावी तसे वातावरण बदलले. ढग गायब होऊन लख्ख ऊन पडले आणि काय चमत्कार- प्रत्येक घरासमोरच्या फुटपाथवर टेबल-खुच्र्या मांडल्या गेल्या. अगदी सत्तरी-ऐंशीतल्या रामभाऊ-ठमाकाकूंपासून तरुणाईपर्यंत सर्वानी फेसाळत्या पेयांचा व उन्हाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. हास्यविनोद व गाण्यांच्या सुरांनी वातावरण भरून गेले. सोनेरी ऊन ही येथे किती दुर्मीळ गोष्ट आहे आणि त्याची या मंडळींना किती अपूर्वाई आहे हे ध्यानी आले.
ख्रॉनिंगनमध्ये मन चाहेल तसे हिंडणे अगदी सोप्पी गोष्ट आहे. सार्वजनिक वाहतूक लाजवाब. बिनआवाजी मर्सिडीज बसेस शहराच्या कानाकोपऱ्यांत पोचवितात. प्रत्येक स्टॉपवर प्रत्येक रूटचे त्या त्या स्टॉपचे वेळापत्रक फ्रेम केलेले असते आणि ते काटेकोर पाळले जाते. उदा. ८.१७ ची बस बहुधा ८.१५ लाच येऊन बरोबर वेळेवर टाऽऽटा करते. अनेक वेळा प्रवास केला, पण एकदाही बस उशिरा आली नाही. दोन-चारदा आम्हीच केवळ मिनीटभर लेट पोचल्याने बस चुकली. यामुळे व सायकलींच्या प्राबल्यामुळे येथे खासगी गाडय़ांचे प्रमाण खूपच कमी.
ख्रॉनिंगनचे नैसर्गिक सौंदर्य खुलविण्यात तलावाचा सिंहाचा वाटा आहे. तलाव भलामोठा चांगला पाच-सहा कि.मी. परिघाचा. शहरालगतच्या बाजूला सुंदर बाग आणि बाकी तीन बाजू दाट नैसर्गिक जंगलाने वेढलेल्या. त्यातून पायी किंवा सायकलीने फिरण्यासाठी छान नागमोडी वाटा. तलावाचा काठपण नागमोडी व त्याला समांतर रुंद डांबरी रस्ता सगळ्या तलावाची प्रदक्षिणा घडवितो. तीन एक कि.मी. चालल्यावर एका अगदी काठालगतच्या बेटावर जुनी विंडमिल आतून पाहायला मिळाली.
छान ऊन व सुटी असा दुग्धशर्करा योग आलेल्या अशाच एकेदिवशी पाय आपोआपाच तलावाकडे वळले. पाहतो तो काय, सगळा परिसर कुटुंबे, तरुणाईची लहान-मोठी टोळकी, प्रेमी युगुले यांनी फुललेला. तलावाकाठी कुणी बार्बेक्यूचा पसारा मांडलेला, कुणाचे पत्त्याचे वा बुद्धिबळाचे डाव रंगलेले, पोरे-सोरे दंगामस्ती करताहेत तर आजूबाजूच्या गर्दीची जराही दखल न घेता प्रेमी युगुलांचे कुजन चाललेले. रात्री दहापर्यंत छान उजेड असल्याने उशिरापर्यंत मौज-मजा चालू होती. मात्र परतताना प्रत्येक जण साधा कागदाचा कपटाही मागे राहणार नाही याची दक्षता घेत होता.
शहरांत लहान-मोठय़ा अनेक बागा, पण नॉर्दन बाग एकदम खास! (केवळ शहराच्या उत्तरेला आहे म्हणून काय असे गद्य नाव या सुंदरतम बागेला द्यायचं?) पाऊण एक कि.मी. लांब व तशीच रुंद असलेली ही बाग चारही बाजूंनी घरांनी वेढलेली असूनही तिला कुंपणच नाही. मूळ जंगली झाडे नीट राखलेली, हिरव्यागार हिरवळीचे गालीचे, फुलांचे ताटवे, मधून झुळुझुळु वाहणारा ओढा, त्यालाच खुबीने एका कोपऱ्यात तळ्याचा साज आणलेला व त्यात छोटेसे पण कलात्मक कारंजे!
प्राचीन असूनही आधुनिकतेकडे झुकलेले हे शहर तर मला आवडलेच, पण त्याहून आवडली येथील माणसे. आपला एक (गैर)समज असतो की, ही गोरी माणसे आशियायींना कमी लेखतात. पण प्रत्यक्षात अतिशय चांगला अनुभव आला. रेल्वेस्टेशन व एअरपोर्टला आम्हाला मोठय़ा बॅगा उचलायला जड जाताहेत हे लक्षात आल्यावर स्वत:हून मदत करायला मंडळी पुढे सरसावली. शहरात भटकताना आस्थेने दिशा व रस्त्यांचे मार्गदर्शन करणार. एकदा पब्लिक फोनची चौकशी ज्याच्याकडे केली त्या सद्गृहस्थाने हसत हसत स्वत:चा मोबाइलच पुढे केला. ‘इंडिया’बद्दल कुतूहलाने प्रश्न विचारले गेले. अशा अनेक बारीक-सारीक गोष्टींमुळेच डच मंडळी खरोखरच गुणी आहेत असे वाटले.
ख्रॉनिंगनसारखे शहर भारतात असेल तर तेथे कुणालाही कायमचे राहायला आवडेल.
नरेंद्र चित्रे