मेष सर्व ग्रहमान तुमच्या इच्छा-आकांक्षा वाढवणारे आहे. त्यामुळे प्रत्येक बाबतीत पुढाकार घ्यावासा वाटेल; परंतु यावरसुद्धा काही मर्यादा असतात हे लक्षात घ्या. या आठवडय़ात शनी राशीबदल करून अष्टमस्थानात प्रवेश करणार आहे. तेथे आता त्याचे वास्तव्य पुढील अडीच वर्षे असेल. यादरम्यान अपेक्षित आणि अनपेक्षित प्रश्नांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. व्यापार-उद्योगात तुम्ही केलेल्या चुकीला शनी माफी देणार नाही. सांसारिक जीवनात काही न सुटणारी कोडी निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रकृतीकडे लक्ष द्या.
वृषभ काम करण्याची तुम्हाला इच्छा असेल; आपण परावलंबी आहोत, ही भावना तुम्हाला मधूनच त्रास देईल. व्यापार-उद्योग आणि नोकरीमध्ये काम संथ गतीने पुढे जाईल. या सप्ताहात शनी राशीबदल करून सप्तम स्थानात प्रवेश करेल. तेथे त्याचे भ्रमण पुढील अडीच वष्रे असेल. या दरम्यान व्यापार-व्यवसाय, नोकरी आणि करियर या सर्व आघाडय़ांवर तुमची प्रगती वाढेल. नवीन योजना आणि इच्छा-आकांक्षा तुम्हाला सतत कार्यरत ठेवतील. आíथक आणि इतर प्रगती वाढेल.
मिथुन दैनंदिन समस्या सोडविणे म्हणजे बुद्धिबळ खेळण्याचा एक प्रकार असतो याची जाणीव करून देणारा हा आठवडा आहे. व्यापार-उद्योगामध्ये गिऱ्हाइकांना जी आश्वासने दिली असतील ती पूर्ण करावी लागतील. घरामध्ये तुमची रसिकता आणि कर्तव्यदक्षता याचा सुरेख समन्वय दिसून येईल. या आठवडय़ात शनी राशीबदल करून षष्ठ स्थानात प्रवेश करणार आहे. तेथे त्याचे वास्तव्य आता पुढील अडीच वर्षे असेल. या दरम्यान तुम्हाला शारीरिक व्याधी आणि गुप्त शत्रुत्व यापासून त्रास संभवतो.
कर्क ग्रहमान तुमच्या उत्साही स्वभावावर र्निबध घालणारे आहे. कदाचित त्यांच्या व्यवधानांमुळे मदत करता येणार नाही. तरीसुद्धा तुम्ही तुमचे काम चालू ठेवा. या सप्ताहात शनी राशीबदल करून पंचम स्थानात प्रवेश करणार आहे. त्याचे वास्तव्य आता तेथे पुढील अडीच वष्रे असेल. तुमच्या नतिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढवल्या. काहींच्या जीवनामध्ये मोठे संक्रमण आले. आता राशीबदल केलेला शनी या सर्वातून काही प्रमाणामध्ये सुटका करेल. मुलांच्या बाबतीतील जबाबदाऱ्या वाढतील.
सिंह ग्रहमान तुमच्या उत्साहात भर टाकणारे आहे. नेहमीचे काम करीत राहण्यापेक्षा जीवनाचा आनंद उपभोगण्याकडे तुमचा कल राहील. या आठवडय़ात राशिबदल करून शनिमहाराज चतुर्थ स्थानात प्रवेश करणार आहे. तेथे त्याचे वास्तव्य आता पुढील अडीच वष्रे असेल. शनीचा हा राशिबदल तुमच्या जीवनाला एक नवीन कलाटणी देईल. आधी कर्तव्य आणि मग मौजमजा असे करणे भाग पडेल. व्यवसाय आणि नोकरीच्या ठिकाणी मोठे संक्रमण आणि स्थलांतर संभवते. घरामधील जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे.
कन्या ग्रहयोग तुमच्यामध्ये जिद्द आणि महत्त्वाकांक्षा निर्माण करणारे आहे. घरामध्ये तुमच्या शब्दाला मान मिळेल. या आठवडय़ात शनी राशिबदल करून तृतीय स्थानात प्रवेश करणार आहे. याचाच अर्थ तुमची साडेसाती आता संपली. या साडेसातीबरोबर आलेल्या अनेक चिंता हळूहळू कमी होतील. शनीचे हे भ्रमण पुढील अडीच वष्रे राहील. यादरम्यान व्यवसाय-उद्योगात प्रगतीकारक वाटचाल सुरू होतील. नोकरीमध्ये नवीन आणि चांगल्या संधीकरिता तुमची निवड होईल. तरुण आणि विद्यार्थी जोशाने काम करतील.
तूळ ग्रहमान संमिश्र आहे. मनाच्या एका कोपऱ्यामध्ये कर्तव्याची भावना जागृत असेल; परंतु दुसरीकडे मौजमजा करण्याचा मोह तुम्हाला अनिवार्य होईल. व्यापार-उद्योगात कमाई समाधानकारक असेल. घरामध्ये वाढते खर्च सोडता बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे होईल. या आठवडय़ात शनी राशिबदल करून धनस्थानात प्रवेश करेल. तेथे त्याचे वास्तव्य पुढील अडीच वष्रे असेल. हा साडेसातीचा शेवटचा टप्पा आहे. ज्या प्रश्नांनी तुम्हाला बेजार करून निराश केले होते त्यातून सुटका होण्याची आशा दिसू लागेल.
वृश्चिक तुमचा मूड मस्त असेल. चार पसे खिशात असतील. व्यापार-उद्योगात पशाची कमतरता नसेल. नोकरीमध्ये सहजगत्या जमेल तेवढीच कामे कराल. घरातील व्यक्तींसमवेत करमणुकीचे कार्यक्रम ठरतील. या आठवडय़ात शनी राशिबदल करून तुमच्याच राशीत येणार आहे. तेथे त्याचे वास्तव्य आता पुढील अडीच वष्रे असेल. साडेसातीचा मधला भाग आता सुरू झाल्यामुळे तुम्हाला सर्व आघाडय़ांवर सीमेवरील जवानांप्रमाणे सतर्क राहायचे आहे. सांसारिक जीवनामध्ये ‘कर्तव्य हीच काशी’ असे धोरण ठेवा.
धनू सभोवतालच्या व्यक्तींशी तुम्ही कसे हितसंबंध ठेवता यावर सुखसौख्य अवलंबून असेल. मत्री आणि पसा याची गल्लत करू नका. व्यापारी वर्गाने कामगारांशी आणि नोकरदार वर्गाने सहकाऱ्यांशी हितसंबंध जपणे आवश्यक आहे. शनी राशिबदल करून व्ययस्थानात प्रवेश करेल. तेथे त्याचे वास्तव्य आता पुढील अडीच वष्रे असेल. साडेसातीची ही सुरुवात आहे. त्यामुळे काही तरी वाईट घडेल, या शंकेने चिंतेत पडू नका; पण हे लक्षात ठेवा की, शनी हा कर्मकारक ग्रह असल्यामुळे चुकीच्या कर्माना तो माफी देत नाही.
मकर ग्रहमान नवीन विचारांची जागृती निर्माण करणारे आहे. व्यापार-उद्योगात विस्तार करावासा वाटेल. नोकरीत आíथकदृष्टय़ा लाभदायक बदलाकरिता प्रयत्न कराल. घरामध्ये इतरांना स्फूर्ती द्याल. राश्याधिपती शनी राशिबदल करून लाभस्थानात प्रवेश करणार आहे. तेथे त्याचे वास्तव्य आता पुढील अडीच वष्रे असेल. हा संपूर्ण कालावधी तुम्हाला खऱ्या अर्थाने लाभदायक ठरणार आहे. पूर्वी तुम्ही जे कष्ट केले होते त्याचे चांगले फळ मिळेल. व्यापार-उद्योगातील उत्पन्नात भरघोस वाढ होईल.
कुंभ ग्रहमान सुधारल्याने ज्या कामात पूर्वी निराशा आली होती ते हाती घेऊन फत्ते करण्याची तुमची उमेद असेल. व्यवसाय-उद्योगात आणि नोकरीत नावीन्यपूर्ण काम करण्याचा निश्चय कराल. व्यापारातील वसुली झाल्यामुळे चार पसे हातात असतील. राश्याधिपती शनी राशिबदल करून दशम स्थानात प्रवेश करेल. तेथील त्याचे भ्रमण आता पुढील अडीच वष्रे असेल. शनीचे या स्थानातील आगमन तुम्हाला विशेष फलदायी ठरेल. तुम्हाला तुमच्या व्यवसाय-नोकरीत आणि जोडधंद्यात चांगले यश मिळेल.
मीन ग्रहमान तुम्हाला उसने अवसान आणून काम करायला लावणार आहे. मात्र स्वत:च्या तब्येतीचा अंदाज घेतल्याशिवाय कोणतेही कार्यक्रम ठरवू नका. घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ राहील. शनी राशिबदल करून भाग्यस्थानात प्रवेश करेल. तेथे त्याचे वास्तव्य अडीच वष्रे असेल. शनिबदलामुळे तुमची अनेक प्रश्नांमधून सुटका होणार आहे. व्यापार, नोकरी यामधील अडसर दूर होतील. सांसारिक जीवनातील समस्यांवर उपाय मिळेल.