हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वृषभ नेहमीची कर्तव्ये तुमच्या दृष्टीने महत्त्वाची असतात. पण मनाच्या कोपऱ्यामध्ये जीवनाचा आस्वाद घेण्याचा विचारही डोकावत राहील. याचा समन्वय साधण्यासाठी तुम्ही कौशल्याने तुमच्या कार्यक्रमाचे नियोजन कराल. व्यापार धंद्यात उत्पन्न वाढवण्याकरता जाहिरात, प्रसिद्धी माध्यमांचा उपयोग कराल. नोकरीमध्ये कामाचे प्रमाण वाढण्याची लक्षणे दिसू लागतील. घरामध्ये समारंभाच्या निमित्ताने तुम्ही तुमची हौसमौज भागवून घ्याल. तरुणांचे विवाह जमतील अथवा पार पडतील.
मिथुन ज्या घरगुती प्रश्नांनी गेल्या काही महिन्यांत तुम्हाला बेचैन केले होते, त्यातून नेमके काय निष्पन्न होणार याचा अंदाज तुम्हाला यायला हळूहळू सुरुवात होईल. व्यवसाय-उद्योगात महत्त्वाचे बदल किंवा धोरण स्वीकारावे लागेल. नोकरीमध्ये बदल हवा असेल तर कदाचित कुटुंबीयांपासून लांब राहावे लागेल. घरामधील माहोल आनंदाचा असेल. तरुणांचे विवाह जमतील. त्यानिमित्त खरेदीचे बेत आखाल. लांबच्या नातेवाइकांना/ आप्तेष्टांना भेटण्याची इच्छा पूर्ण होईल. पूर्वी बुकिंग केलेल्या जागेचा ताबा मिळेल.
कर्क काही प्रश्नांत आपल्याला उत्तर माहीत असते, परंतु विशिष्ट वेळ आल्याशिवाय त्यावर कृती होत नाही. आता तुम्ही थांबण्यापेक्षा कृतीकरता सिद्ध व्हाल. त्याचे जे परिणाम असतील ते स्वीकारण्याची तुमची तयारी असेल. व्यापार-उद्योगात एखादी योजना अमलात आणण्याचे तुमच्या मनात असेल. त्याला अनुसरून योग्य व्यक्ती आणि वातावरणाची साथ मिळेल. नोकरीमध्ये मानेवर जू ठेवून काम करण्याचा कंटाळा येईल. तरुण मंडळींना एखाद्या व्यक्तीशी ओळख करून घ्यावीशी वाटेल.
सिंह ग्रहमान अनुकूल होत असल्यामुळे तुमच्यातील जोम आणि उत्साह वाढणार आहे. ‘नाही’ हा शब्द आता तुम्हाला खपणार नाही. पण कर्तृत्वाच्या जोरावर बरेच काही साध्य करू शकाल. व्यवसाय-उद्योगातील मोठे प्रकल्प हाती घ्याल. कारखानदार नवीन शाखा उघडतील. नोकरीमध्ये बढती किंवा पगारवाढ मिळण्याची आशा निर्माण होईल. घरामध्ये लांबलेले मंगलकार्य निश्चित होईल. नवीन गुंतवणूक जागा किंवा वाहन खरेदीचे बेत ठरतील. छोटा प्रवास करून ताजेतवाने बनाल.
कन्या एखादा संकल्प तुम्ही मनाशी केला असेल, परंतु त्यावर ठोस निर्णय घ्यायचे धारिष्टय़ तुम्हाला होत नव्हते. आता तुम्ही निश्चयी बनाल. तुमची जी नाकेबंदी झाली होती त्यामध्ये सुयोग्य मार्ग निघेल. कारखानदार नवीन योजना अमलात आणतील. नोकरीमध्ये ज्या कामाविषयी चिंता होती ते काम सोपे होईल. बदलीकरता प्रयत्न करा. घरामध्ये आवडत्या व्यक्तीच्या जीवनातील सुखद प्रसंग साजरा होईल. पण एखाद्या व्यक्तीची अनुपस्थिती जाणवेल. वृद्ध व्यक्तींच्या प्रकृतीकडे लक्ष पुरवावे लागेल.
तूळ तुमच्याकडून तुम्ही प्रत्येक प्रश्न आटोक्यात आणण्याचा प्रयत्न कराल. पण आयत्या वेळी ज्या घडामोडी घडतील त्यामुळे तुमच्या नियोजनाला फारसा अर्थ राहणार नाही. काही ना काही कारणाने तुमच्या इच्छाआकांक्षांना मुरड घालावी लागेल. या दरम्यान खरे हितचिंतक कोण आणि दिखाऊ कोण याचा तुम्हाला अंदाज येईल. व्यवसाय-उद्योगात पैशाच्या कमतरतेमुळे काही बेत लांबवावे लागतील. नोकरीमध्ये केवळ आपल्या कामामध्ये लक्ष द्या. प्रकृतीच्या तक्रारी हळूहळू जाणवतील.
वृश्चिक ग्रहमान तुमच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. ज्या कामाविषयी तुम्हाला खूप उत्सुकता होती, पण ज्यांनी तुम्हाला बराच काळ हुलकावणी दिली होती ते पैसे हातात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही आशावादी बनाल. व्यवसाय-उद्योगाच्या कामामध्ये पैशामुळे किंवा इतर कामामुळे पूर्वीच्या हितसंबंधात फरक पडेल. नोकरीमध्ये सहकाऱ्यांकडून मिळणारी मदत अवश्य घ्या. पण त्यावर सर्वस्वी अवलंबून राहू नका. घरामध्ये ठरलेल्या विविध कार्यक्रमांमुळे तुमचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे.
धनू दशमस्थानातील मंगळ मार्गी होणार आहे. या मंगळाने तुमचे जीवन ढवळून टाकले होते. आता त्याचे खरे स्वरूप कळेल. अनेक वेळेला आपल्या व्यावसायिक जीवनात इतके गर्क असतो की आपल्याकडून इतरांच्या काय अपेक्षा आहेत याची आपल्याला जाणीव राहत नाही. आणि एक दिवस असा येतो की परिस्थिती स्फोटक बनेल. व्यवसाय-उद्योगात सर्व गोष्टींचा आढावा घ्याल. नोकरीमध्ये तुम्ही स्वत:च्या गरजांच्या बाबतीत स्वार्थी बनाल. घरातल्या व्यक्तींना खूश करण्याकरता एखादा खर्चीक बेत ठरवाल.
मकर आपल्या कामापासून थोडा काळ जरी लांब गेलात तरी तुम्हाला अस्वस्थ होते. सभोवतालच्या व्यक्तींच्या आग्रहामुळे तुम्हाला तुमच्या दैनंदिनीमध्ये फेरफार करावे लागतील. व्यापार-उद्योगातील उलाढाल आणि फायद्याचे प्रमाण वाढवण्याकरता प्रसिद्धी माध्यमांचा उपयोग कराल. ज्यांचा जोडधंदा आहे त्यांना त्यातून फायदा होईल. नोकरीमध्ये काम करण्यापेक्षा कामाचा पसाराच जास्त असेल. घरामध्ये एखाद्या समारंभाच्या निमित्ताने पाहुण्यांची हजेरी लागेल. खरेदी आणि करमणुकीचे कार्यक्रम ठरतील.
कुंभ नेहमीचा ताणतणाव घालविण्यासाठी वेगळ्या जीवनाविषयी ओढ निर्माण होईल. तुम्ही तुमच्या पद्धतीने जीवन जगायचे ठरवाल. व्यवसाय-उद्योगात छोटा प्रवास करून काही कामे नियंत्रणात आणाल. बराच काळ लांबलेले पैसे मिळण्याची चिन्हे दिसू लागतील. नोकरीमध्ये फक्त तातडीचे काम सोडून इतर गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष कराल. घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने घराची सजावट, आवडत्या वस्तूची खरेदी असे बेत ठरतील. तरुण मंडळींनी प्रेमप्रकरणात भावनावश होऊन चालणार नाही.
मीन या वर्षांच्या सुरुवातीपासून तुम्ही मनाशी काही बेत ठरविले असतील, पण त्यानंतर त्यामध्ये काही फाटे फुटले असतील तर आता वेगळ्या स्वरूपात त्याचा फेरविचार केला जाईल. व्यापार -उद्योगात थोडेसे कमी दर्जाचे काम स्वीकारून तडजोड करावी लागेल. नोकरीमध्ये अवघड कामे हातावेगळी कराल. सांसारिक आणि व्यक्तिगत जीवनातील तुमच्यातील कल्पकता आणि रसिकता याचा सुरेख संगम दिसून येईल. प्रवासाचे बेत ठरतील.