मे सर्व ग्रहमान तुमच्यातील कल्पकतेला वाव देणारे आहे. व्यवसाय उद्योगामध्ये नवीन कल्पना कृतीत उतरविण्याचा तुमचा विचार असेल. कदाचित त्याकरता धाडस करावे लागेल. त्यातून नेमका काय फायदा होईल याविषयी मात्र साशंकता असेल. नोकरीमधे जर तुम्हाला कामाच्या स्वरूपामध्ये बदल करून हवा असेल तर वरिष्ठांचा मूड बघून त्यांच्यासमोर तुमची मागणी ठेवा. नवीन नोकरी मिळविण्याकरता तडजोड करावी लागेल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडेल.

वृषभ ग्रहमान तुमच्यातील रसिकतेला आणि कृतिशीलतेला भरपूर वाव देणारे आहे. व्यापार उद्योगातील पूर्वीचे हितसंबंध काही कारणाने कमी झाल्यामुळे नवीन हितसंबंध प्रस्थापित कराल. परदेश व्यवहार असणाऱ्यांना नवीन बाजारपेठ मिळेल. नोकरीमध्ये तुमच्या कामाचे महत्त्व वाढेल. त्यानिमित्ताने परदेशी जाण्याची संधी उपलब्ध होईल. घरामध्ये तुमचा सल्ला आणि सक्रीय मदत याचा इतर सदस्यांना उपयोग होईल. सर्वासोबत लांबच्या प्रवासाचे बेत निश्चित होतील. तरुणांना नवीन व्यक्तीशी मैत्री कराविशी वाटेल.

मिथुन आर्थिक स्थिती बळकट होण्याची चिन्हे दिसू लागतील. काही बदल होताना मनामध्ये एक प्रकारची धाकधूक असते की त्यातून अपेक्षित यश मिळू शकेल की नाही. पण या आठवडय़ाचे ग्रहमान चांगले असल्यामुळे सर्वकाही मनाप्रमाणे पार पडेल. व्यापार उद्योगातील भांडवल वाढवण्याकरता कर्ज उपलब्ध होईल. परदेश व्यवहारांना गती येईल. नोकरीमधील कामानिमित्त संस्थेतर्फे तुमची बडदास्त ठेवली जाईल. घरामध्ये शुभकार्य पार पडेल. नवीन जागेचे अथवा वाहनाचे बुकिंग कराल.

कर्क प्रगतीचा मार्ग समोर दिसत असल्यामुळे तुम्ही आता आशावादी बनाल. परंतु हा मार्ग म्हणजे काटय़ाकुटय़ांनी भरलेला रस्ताच आहे असे समजा. ज्या व्यक्तींनी तुम्हाला साथ द्यायची असे कबूल केले होते त्या आयत्या वेळी त्यांचे शब्द मागे घेतील. व्यवसाय उद्योगामध्ये अपेक्षित मोठी ऑर्डर मिळण्याची चिन्हे दिसू लागतील. पण त्याच्या अटी व नियमात फरक झालेला असेल. नोकरीमध्ये जादा अधिकार प्रदान केले जातील. नवीन कामाकरता निवड होईल. घरामध्ये एखाद्या व्यक्तीच्या अनुपस्थितीची प्रकर्षांने जाणीव होईल.

सिंह काही माणसे एखाद्या निमित्ताने आपल्या सहवासात येतात आणि विशिष्ट कालावधी लोटल्यानंतर त्यांच्याशी असणारे हितसंबंध संपून जातात. असा अनुभव येण्याची शक्यता आहे. व्यापार उद्योगामध्ये नवीन काम मिळाल्यामुळे वेगळ्या व्यक्तींशी संपर्क साधला जाईल. त्यांच्याशी कोणतेही करार करण्यापूर्वी स्वत:च्या आर्थिक आणि इतर मर्यादांचा विचार करा. जास्त धोका पत्करू नका. नोकरीमध्ये नवीन कामाकरता तुमची निवड होईल. घरामध्ये वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला इतरांना पटणार नाही.

कन्या प्रगती म्हटली की बदल आलेच. त्याचाच एक भाग म्हणून सभोवतालची माणसे आणि कार्यपद्धतीतही हळूहळू फरक पडत जातो. या सगळ्याची चुणूक आता तुम्हाला दिसू लागेल. व्यापार उद्योगामध्ये पैशाचा ध्यास तुम्हाला लागल्यामुळे इतर कोणत्याच गोष्टीत तुमचे मन रमणार नाही. नोकरीमध्ये संस्थेतर्फे मिळणाऱ्या सर्व सवलतींचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा उठवाल. बेकार व्यक्तींची कमाई चालू होईल. घरामध्ये आनंदी वातावरण असेल. सर्वाच्या दृष्टीने एखादी आनंददायी बातमी कळेल.

तूळ मनातील संभ्रम दूर झाल्यामुळे प्रगतीचा मार्ग खुला झाल्याप्रमाणे वाटेल. ज्या ग्रहांनी तुमची कोंडी केली होती ते तुम्हाला अनुकूल होणार आहेत. ज्या व्यक्तींकडून तुम्हाला नकारघंटा ऐकायला लागली होती त्यांच्याशी संबंध तोडून आपले नवीन अस्तित्व सिद्ध करायला लागेल. व्यापार उद्योगामध्ये स्पर्धकांच्या पुढे जाण्यासाठी एखादा खास बेत मनात ठरवाल. नोकरीमध्ये तुमचे वर्तुळ बदलण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या कामात यश मिळेल. घरामध्ये नेहमीच्या कर्तव्याबरोबर जीवनाचा आस्वाद घ्याल.

वृश्विक जे काम तुम्ही पूर्वी वाया गेले असे समजले होता त्यातूनच काहीतरी चांगले निष्पन्न झाल्याने तुम्हाला बरे वाटेल. व्यापार धंद्यात ज्यांनी तुम्हाला पूर्वी आश्वासन दिले होते त्यांच्याकडून आता योग्य ती साथ मिळण्याची आशा निर्माण होईल. जरी पैसे कमी असले तरी ओळखींच्या जोरावर काही कामे मार्गी लावू शकाल. नोकरीमध्ये वरिष्ठ विश्वासाने महत्त्वाचे काम तुमच्यावर सोपवतील. पण श्रेय मिळणार नाही. घरामध्ये वडीलधाऱ्या व्यक्तींकडून तुम्हाला कौतुक ऐकायला मिळेल.

धनु तुमच्या दृष्टीने मध्यस्थ किंवा ओळखींवर जी कामे अवलंबून आहेत अशा कामांना ताबडतोब गती द्या. ग्रहमान बदलले की सभोवतालचे वातावरण आणि माणसांशी असलेली समीकरणे बदलायला वेळ लागणार नाही. ज्या व्यक्तींना एके काळी तुम्ही मदत केली होती त्यांच्याकडून परतफेडीची अपेक्षा केली तर वेगळाच अनुभव येईल. व्यवसाय उद्योगातील जुने हितसंबंध अचानक संपुष्टात येतील. नोकरीमध्ये सभोवतालचे वर्तुळ बदलेल. घरामध्ये आवडत्या व्यक्तीशी सुसंवाद साधणे कठीण होईल.

मकर तुमच्यातील जिद्द आणि महत्त्वाकांक्षा वाढायला लागेल. दोन वेगवेगळ्या आघाडय़ांवर तुमची वेगवेगळी रूपे सभोवतालच्या व्यक्तींना दिसतील. कामाच्या वेळी तुम्ही तत्पर असाल. पण ज्यावेळेला विरंगुळा मिळेल त्यावेळी त्याचा तुम्ही पूर्णपणे आस्वाद घ्याल. व्यवसाय उद्योगात प्रगतीच्या दृष्टीने चांगल्या संधी उपलब्ध होतील. कारखानदार नवीन करारमदार करतील. नोकरीमध्ये पूर्वी केलेल्या कामाचे महत्त्व वरिष्ठांना कळल्यामुळे त्यांच्याकडून स्तुती ऐकायला मिळेल. घरामध्ये एखादा शुभसमारंभ ठरेल.

कुंभ प्रत्येक गोष्ट आखीव-रेखीव आणि शिस्तबद्ध पद्धतीने करायला तुम्हाला आवडते. थोडीशी वाट वाकडी करूनच तुम्हाला यश मिळणार आहे. म्हणून त्यामध्ये कमीपणा मानू नका. व्यवसाय उद्योगामध्ये मोठय़ा व्यक्तींशी असणाऱ्या ओळखी नवीन कामे मिळविण्यासाठी उपयोगी पडतील. नोकरीमध्ये काही छोटय़ा मोठय़ा सवलती तुम्हाला मिळतील. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींचा सल्ला आणि सक्रिय मदत याचा उपयोग होईल. नोकरीनिमित्त किंवा उच्चशिक्षणाकरता घरापासून लांब जावे लागेल.

मीन प्रत्येक माणूस भविष्यामध्ये चांगले घडेल या आशेवर प्रगती करत असतो. तुम्हीही त्याला अपवाद नाही. एखादी चांगली घटना घडल्यामुळे तुमच्या इच्छा आकांक्षा पल्लवित होतील. व्यापार उद्योगात आर्थिक स्थिती जरी चांगली नसली तरी हितचिंतकांकडून मदत मिळाल्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. नोकरीमध्ये तुमच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन वरिष्ठ देतील. घरामध्ये बुजुर्गानी सुचविलेले मार्ग तुम्ही अमलात आणलेत तर त्याचा उपयोग होईल.

Story img Loader