हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वृषभ – तुमच्या कौशल्याला आणि प्रावीण्याला भरपूर वाव असेल. ज्या क्षेत्रामध्ये तुमची खरी आवड आहे त्यामध्ये काहीतरी आगळेवेगळे करण्याची तुमची इच्छा असेल. व्यापार उद्योगामध्ये एखादी अभिनव कल्पना कृतीमध्ये आणून त्याला भरपूर प्रसिद्धी द्याल. त्यामुळे गिऱ्हाईकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. नोकरीमध्ये जे काम तुम्हाला आवडते त्याला खऱ्या अर्थाने न्याय द्याल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये मित्रमंडळी आणि पाहुण्यांच्या आगमनामुळे सर्व गोष्टी आनंददायी वाटतील.
मिथुन – स्वप्न आणि सत्य यामध्ये फरक असतो हे आपल्याला माहीत असते. तरीही आपण स्वप्नमयी दुनियेत रमून जातो. व्यवसाय उद्योगामध्ये कोणतेही नवीन व्यवहार करताना स्वत:च्या खिशाला काय परवडेल याचा विचार करा. नोकरीमध्ये संस्थेकडून किंवा वरिष्ठांकडून एखादी मागणी पूर्ण करून घ्याल. तुमच्या कामातील कौशल्य तुम्ही वेगळ्या पद्धतीने इतरांना दाखवाल. घरामध्ये सर्वानुमते छानसा कार्यक्रम ठरेल. तरुणांचे विवाह जमतील. नवीन जागा किंवा वाहनसंबंधी विचार मनात येतील.
कर्क – तुम्ही जी गैरसोय आणि अडथळे सहन केले होते त्यांचे चांगले फळ आता तुम्हाला मिळणार आहे. व्यापार उद्योगात महत्त्वाची कामे मार्गी लागायला वातावरणाची आणि सुयोग्य व्यक्तींची साथ मिळाल्यामुळे तुमचा जीव भांडय़ात पडेल. एखाद्या नवीन कार्यपद्धतीचा प्रारंभ करावा असा विचार मनात डोकावेल. नोकरीत पगारवाढ, बढती किंवा परदेशगमनाचे योग संभवतात. बेकार व्यक्तींना काम मिळेल. सांसारिक आणि व्यक्तिगत जीवनातील दीर्घकाळची इच्छा-आकांक्षा साकार होईल. तरुणांचे विवाह जमतील.
सिंह – ज्या कामामध्ये अगदीच मरगळ आली होती त्यामध्ये धक्का स्टार्ट या नियमाने थोडे काम करता येईल. व्यापार उद्योगात काही कामांना चालना देण्यासाठी तुमच्या पूर्वीच्या कामांचा ओळखींचा उपयोग होईल. व्यापारी वर्गाला व्यावसायिक जागेचे सुशोभीकरण करावेसे वाटेल. मात्र असे करताना त्यांना शक्यतो कर्ज काढू नये. नोकरीमध्ये तुमचा भाव वधारण्यासाठी युक्ती लढवाल. वरिष्ठांची अवज्ञा होऊ देऊ नका. खोटय़ा प्रतिष्ठेपायी संस्थेकडून मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर टाळा.
कन्या – तुमच्या इच्छा-आकांक्षा वाढत असल्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपल्याकडे आहे त्यापेक्षा जास्त कसे मिळेल याचा ध्यास लागेल. परंतु त्याच्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या पाहिल्या की तुमचे मन बिथरून जाईल. सभोवतालच्या व्यक्तींचा चेहरा आणि मुखवटा यातील भेद लक्षात येईल. व्यापार उद्योगात गिऱ्हाईकांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी एखादी नवीन योजना कार्यान्वित कराविशी वाटेल. नोकरीमध्ये कामानिमित्त तुम्हाला खास सवलतींचा लाभ घेता येईल. घरामध्ये आनंदी आणि उत्साही वातावरण असेल.
तूळ – बऱ्याच कालावधीनंतर वातावरणातील तणाव कमी झाल्यामुळे तुमच्यामधील रसिकता खऱ्या अर्थाने जागृत होणार आहे. जे काम तुम्ही कराल ते रचनात्मक पद्धतीने कराल. व्यवसाय उद्योगात जादा भांडवल पाहिजे असेल तर त्याला सुयोग्य व्यक्ती आणि आर्थिक संस्थांकडून अनुकूल प्रतिसाद मिळेल. नोकरीमध्ये वरिष्ठांना आणि संस्थेला काय हवे आहे ते पाहून तुमचा मतलब साध्य करू शकाल. अपेक्षित टेबलावर बदली होऊ शकेल. घरामध्ये एखादे मंगलकार्य ठरेल. तरुणांना मनपसंत जोडीदार निवडता येईल.
वृश्चिक – तुमच्यामध्ये नवचैतन्य निर्माण होईल. स्वप्न आणि सत्य यामध्ये फरक असतो हे आपल्याला माहीत असते तरी आपण स्वप्न पाहायचे थांबत नाही. आता परिस्थिती फारशी उत्तम नसूनही तुम्ही आशावादी बनाल. व्यवसाय उद्योगात आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पन्नाचा एखादा नवीन मार्ग शोधत राहाल. नवीन हितसंबंध प्रस्थापित करताना योग्य ती सावधगिरी बाळगा. नोकरीमध्ये तुम्ही काही विशेष सवलती मागितल्या असतील तर वरिष्ठ अंशत: त्याची पूर्तता करतील.
धनू – तुमच्यातील निराशा कमी व्हायला लागेल. प्रकृतीसंबंधी काही तक्रार असेल तर त्यावर मार्ग निघेल. मंगळ आणि प्लूटोचा शुभयोग होणार आहे. हे ग्रहमान परस्परविरोधी असल्यामुळे प्रतिकूल वातावरणात तुम्हाला काम करावे लागेल. तरीही तुमची इच्छाशक्ती जागृत असल्यामुळे तुम्ही त्यातून मार्ग काढाल. कारखानदारांना आणि व्यापारी वर्गाला भविष्यात प्रगतीकरता मोठी गुंतवणूक करणे भाग पडेल. नोकरीमध्ये वरिष्ठ छोटीशी सवलत देतील आणि बरेच मोठे काम तुमच्यावर सोपवतील.
मकर – आराम करणे, विश्रांती घेणे या गोष्टी तुमच्या तत्त्वात बसत नाही आणि त्याच कारणामुळे कधी कधी प्रकृतीकडे दुर्लक्ष होते. स्वत:चे स्वास्थ्य सांभाळून इतर कार्यक्रम ठरवा. व्यापार उद्योगात कामाचे प्रमाण वाढत राहिल्यामुळे तुम्ही उत्तेजित व्हाल. तुम्हाला बरेच काम मिळेल. नोकरीमध्ये वरिष्ठ आणि सहकारी तुमची खुशामत करून किंवा तुम्हाला खूश ठेवून जादा काम गळ्यात मारतील. त्यामध्ये तुमचा फायदा असेल. घरामध्ये एखाद्या शुभकार्याची नांदी होईल. तरुणांना मनपसंत जोडीदार निवडता येईल.
कुंभ – जे काम तुम्ही करत आहात त्यामध्ये आशेचा किरण निर्माण होईल. त्यामुळे तुमच्या इच्छा-आकांक्षा पल्लवित होतील. व्यवसाय उद्योगात नजीकच्या भविष्यातील उलाढाल वाढविण्याकरिता मोठी गुंतवणूक करून स्पर्धेत टिकून राहावे लागेल. मात्र स्वत:ची लक्ष्मणरेषा ओलांडू नका. अनुभवी व्यक्तीचाही सल्ला तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुम्हाला मधाचे बोट चाटवून तुमच्याकडून नेहमीपेक्षा जास्त काम करून घेतील. तरुण मंडळी जोडीदाराच्या पसंतीविषयी साशंक असतील.
मीन – एखादी गोष्ट मिळणे कठीण आहे हे माहीत असूनही आपण त्याचा पिच्छा सोडत नाही. तशी तुमची स्थिती असल्यास आश्चर्य नाही. नवीन स्वप्नमयी कल्पनेत तुम्ही दंग व्हाल. त्याचा पाठपुरावा करण्यात बराच वेळ घालवाल. व्यवसाय उद्योगामध्ये बाजारातील वातावरण सुधारेल. नोकरीमध्ये थोडेसे स्वार्थी बना. घरामध्ये एखाद्या सदस्याच्या बाबतीत चांगली बातमी कळेल. तरुणांनी विवाहाचा निर्णय भावनेच्या भरात घेऊ नये.