मेष काहीतरी मिळविण्यासाठी काहीतरी गमवावे लागते याचा तुम्हाला अनुभव येईल. व्यवसाय उद्योगामध्ये प्राप्तीचे प्रमाण वाढविण्यासाठी सध्या चालू असलेले काम बंद करावेसे वाटेल. परंतु नवीन कामातून अपेक्षित पसे मिळण्याची खान्नी नसल्यामुळे तुमचे धाडस होणार नाही. त्यामुळे दोन्ही डगरींवर नाइलाजाने हात ठेवावा लागेल. नोकरीमध्ये हवी असलेली सवलत वरिष्ठ काही अटींसह द्यायला तयार होतील. घरामधल्या आवडत्या व्यक्तींच्या काळजीपोटी स्वतच्या सुखावर थोडीफार मुरड घालावी लागेल.

वृषभ दोन वेगवेगळे अनुभव देणारा आठवडा आहे. व्यापारी वर्गाला धनप्राप्ती वाढवण्याकरता एखादे मोठे धाडस करावेसे वाटेल, पण त्यांनी स्वतची मर्यादा विसरून चालणार नाही. उत्पन्न वाढवण्याकरता एखाद्या जोडधंद्याची कल्पना मनामध्ये येईल. ज्यांदा जोडधंदा आहे त्यांना नवीन संधी आकर्षति करेल. घरामधील व्यक्तींच्या कल्पना महाग असतील. पण त्यांना नाराज करायचे नाही म्हणून त्या पूर्ण करण्याचे आश्वासन द्याल. आवडत्या व्यक्तिच्या अनुपस्थितीमुळे मधूनच एकटेपणाची जाणीव अस्वस्थ करेल.

मिथुन तुमच्या स्वभावातील दोन वेगवेगळे कंगोरे या आठवडय़ात समोरच्या व्यक्तींना दिसून येतील. व्यापार उद्योगात ज्या व्यक्तींना तुमच्याकडून मतलब साध्य करून घ्यायचा आहे ते तुमची मखलाशी करण्याचा प्रयत्न करतील. पण त्याला भुलून जाऊ नका. पशाची आवक मनाप्रमाणे राहिल्यामुळे तुमच्या मनात अनेक तरंग उठतील. नोकरीमध्ये मिळणाऱ्या सुखसोयी आणि सवलतींचा तुम्ही थोडाफार गरफायदा उठवाल. घरामध्ये सर्व काही चांगले असेल, पण तुमचा आग्रही स्वभाव इतरांना आवडणार नाही.

कर्क ग्रहमान चांगले असल्यामुळे प्रगतीच्या नवनवीन संधी तुमच्या दृष्टिक्षेपात येईल. प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळवावीशी वाटेल. व्यापारउद्योगात छोटी छोटी कामे करत बसण्यापेक्षा मोठे काम मिळत असेल तर त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित कराल. पशाची आवक वाढेल. नोकरीमध्ये चांगले काम करून वरिष्ठांना खुष करण्याचा प्रयत्न कराल. त्या बदल्यात तुम्हाला एखादी तात्पुरती सवलतही मिळू शकेल. घरामध्ये सर्व काही चांगले असेल, पण एखाद्या आवडत्या व्यक्तीची अनुपस्थिती पोकळी निर्माण करेल.

सिंह ज्या व्यक्तींवर तुम्ही अवलंबून आहात त्यांचीच काहीतरी अडचण निघाल्यास एखादा दुसरा पर्याय निवडावा लागेल. वास्तविक पाहता त्याकरिता थोडेसे थांबणे तुमच्या दृष्टीने हितावह ठरेल. व्यापारउद्योगात एखाद्या गोष्टीचा फायदा मिळविण्याकरिता तुम्ही उत्सुक असाल. लाँगकर्ट घ्यावा लागेल. त्यासाठी थोडा वेळ आणि पसे जास्त खर्च होतील. नोकरीमध्ये वरिष्ठ त्यांच्या मतलबाकरिता तुमच्याकडून काम करून घेतील. घरामध्ये छोटय़ा मोठय़ा प्रश्नात तुम्ही तुमची प्रतिष्ठा पणाला लावाल त्याचा इतरांना राग येईल.

कन्या एका हाताने घ्यायचे आणि दुसऱ्या हाताने द्यायचे अशी तुमची परिस्थिती असेल. तुमच्या कर्तव्यात तुम्ही कमी पडणार नाही. व्यापार उद्योगात जे काम होईल. त्यातून पसे चांगले मिळतील. मात्र नवीन काम मिळविण्यासाठी जादा भांडवलाची गरज असेल, तर त्याकरिता थोडय़ा अवधीकरिता कर्ज काढावे लागेल. नोकरीत कोणावरही अवलंबून राहण्यापेक्षा स्वयंभू रहाणे चांगले. घरामध्ये सर्वजण मतलबापुरती तुमची स्तुती करतील, पण काम पूर्ण झाल्यावर तुम्हाला विसरून जातील याचे वाईट वाटेल.

तूळ एकाच वेळी घरातील आणि नोकरी व्यवसायातील जबाबदाऱ्या तुम्हाला हाताळाव्या लागतील. व्यापार उद्योगात उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने नवीन संधी उपलब्ध होतील. कदाचित त्याचा फायदा उठविण्यासाठी चालू असलेले काम बंद करण्याचा विचार मनात येईल. चांगल्या पगाराची नोकरी हवी असणाऱ्यांची इच्छा पूर्ण होईल. त्यासाठी कदाचित घरापासून लांब जावे लागेल. नोकरीत कामाचा ताणा वाढेल. घरामध्ये महत्त्वाच्या प्रश्नावर उलटसुलट चर्चा होईल. तुमचे विचार इतरांना न पटल्यामुळे तुम्हांला राग येईल.

वृश्चिक काहीतरी मिळविण्यासाठी काहीतरी गमवावे लागते असं सागंणारं हे ग्रहमान आहे. नोकरी-व्यवसायात यात प्रगती कशी होईल, याचा तुम्हाला ध्यास लागलेला असेल. व्यापारउद्योगात छोटी कामे करण्याचा कंटाळा येईल. त्याऐवजी एखादा मोठा हात मारावासा वाटेल. त्यापेक्षा ‘थेंबे थेंबे तळे साचे’ असा विचार करून कामाला लागा. नोकरीमध्ये मिळालेल्या कामाचा फायदाच आहे, असा विचार करून आळस टाळा. एखादी विशेष सवलत वरिष्ठ तुम्हाला देतील. घरामध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात तुमचा पुढाकार असेल.

धनु ‘मानलं तर समाधान’ अशी आता तुमची स्थिती असणार आहे. आवडीच्या कामांमध्ये थोडीफार गती आल्याने तुम्ही उत्साही बनाल. व्यापारउद्योगात उत्साहवर्धक वातावरण असेल त्याचा फायदा उठविण्याकरिता तुम्हाला धाडस करावेसे वाटेल. परंतु आवश्यक त्या पशाचे पाठबळ नसल्याने त्याची तरतूद करावी लागेल. नोकरीमध्ये तुम्ही वरिष्ठांना कल्पना सुचवाल, त्या ते शांतपणे ऐकून घेतील. मात्र ते लगेचच प्रतिसाद देणार नाही. घरामध्ये एखाद्या छोटय़ा प्रश्नामुळे माणूसबळाचे महत्त्व तुमच्या लक्षात येईल.

मकर सभोवतालच्या बदललेल्या वातावरणानुसार तुम्हाला तुमचे धोरण बदलणे भाग पडेल. व्यापारउद्योगात मोठे काम मिळविण्यासाठी पूर्वी धडपड केली असेल तर त्याला आता चांगला प्रतिसाद मिळेल. ही बाब मोठय़ा गुंतवणूकीची असल्यामुळे थोडेसे विचारात पडाल. नोकरीमध्ये अधिकारांचा जास्त वापर करण्याची खुमखुमी येईल. त्यातून जादा कमाई करून घेण्याचा तुमचा इरादा असेल. सांसारिक जीवनात किरकोळ कारणावरून तुमचा अहं दुखावला जाईल. एक प्रकारचा दुरावा निर्माण होईल.

कुंभ तुमच्या मार्मिकता आणि विनोदबुद्धीला वाव मिळाला की तुम्ही सभोवतालच्या व्यक्तींना खुश ठेवता. व्यवसायउद्योगात सध्या चालू असलेल्या कामात उलाढाल आणि फायद्याचे प्रमाण वाढविण्याकरिता काही विशेष प्रयत्न करावेसे वाटतील. त्यामध्ये मुख्यत्वे करून जाहिरात आणि प्रसिद्धीचा समावेश असेल. नोकरीमध्ये एखाद्या मिटींगमध्ये तुम्ही विषयाची मांडणी अत्यंत प्रभावीपणे कराल. त्यामुळे संस्थेचा फायदा होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर खुश होवून विशेष सवलत द्यायला तयार होतील.

मीन महत्त्वाचे काम करताना मानसिक आधार न मिळाल्याने तुम्ही स्वयंभू बनाल. व्यापारउद्योगात ‘दिसते तसे नसते..’ याची आठवण ठेवणे आवश्यक आहे. नेहमीचे काम व्यवस्थितपणे पूर्ण झाल्याशिवाय नवीन कामांकडे लक्ष देवू नका. नोकरीमध्ये वरिष्ठ एकामागून एक कामे तुमच्यावर सोपवत राहतील. त्यामुळे तुमच्या हातून चूक होईल. घरामध्ये तुमची इच्छा असो वा नसो सगळ्यांना समाधानी ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या आवडी-निवडीवर थोडीशी मुरड घालावी लागेल.
विजय केळकर

Story img Loader