मेष ज्या गोष्टींविषयी तुमच्या मनामध्ये धास्ती होती. ती व्यवस्थितरीत्या पार पडेल. व्यवसाय-उद्योगामध्ये भविष्याविषयी जास्त विचार न करता एखादा निर्णय रामभरोसे घ्यावासा वाटेल. नोकरीमध्ये तुमच्या हातून एखादी चूक झाली असेल तर वरिष्ठ तोंडसुख घेतील, पण नंतर तेवढय़ाच विश्वासाने एखादी अवघड जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. नवीन नोकरीबाबतचा निर्णय सावधतेने घ्या. घरामध्ये एखाद्या छोटय़ाशा प्रश्नावर उलटसुलट चर्चा होईल. त्यामध्ये बुजुर्ग व्यक्तींचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वृषभ ज्या कामाविषयी तुमच्या मनामध्ये थोडीशी धास्ती होती त्या कामाला तुम्ही जिद्दीच्या जोरावर वेग देऊ शकाल. व्यवसाय-उद्योगातील नवीन हितसंबंधे जोडताना ज्यांच्याशी तुम्ही व्यवहार करणार आहात त्यांचा उद्देश व माहिती मिळवा. नोकरीमध्ये वरिष्ठ कधी चुचकारतील तर कधी फटकारतील. यामुळे तुमच्या कामाच्या पद्धतीत सुसूत्रता राहणार नाही. घरामधल्या माणसांच्या बाबतीत ‘धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं’ असा प्रकार असेल. वयोवृद्ध व्यक्तींच्या वागण्यामुळे किंवा स्वास्थ्यामुळे थोडी चिंता राहील.

मिथुन एकीकडे तुमच्या इच्छा-आकांक्षा वाढत राहिल्यामुळे तुम्हाला काय करू आणि काय नको असे वाटेल. तर दुसरीकडे आपुलकीच्या व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यामुळे तुम्ही कोडय़ात पडाल. व्यापार-उद्योगात भागीदारी किंवा मत्रीकराराचे नवीन प्रस्ताव पुढे येतील, पण त्यातील कायदेशीर बाजू समजल्याशिवाय पुढे पाऊल टाकू नका. नोकरीमध्ये वरिष्ठांना एखादी गोष्ट सुचवा, परंतु ती अमलात आणण्याकरिता हट्ट धरू नका. नवीन नोकरीच्या कामात ओळखींचा उपयोग होईल. घरामध्ये बुजुर्गाचा सल्ला तुम्हाला पटणार नाही.

कर्क दोन वेगवेगळ्या स्तरांवरील व्यक्तीविषयी वेगवेगळे अनुभव देणारा आठवडा आहे. व्यवसाय-उद्योगात तुमच्याकडून काही मतलब साध्य करायचा आहे, अशा व्यक्ती तुमची मखलाशी करण्याचा प्रयत्न करतील; पण त्यांच्या खोटय़ा वागण्याला अथवा बोलण्याला भुलून जाऊ नका. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमची बडदास्त ठेवतील, कारण त्यांना एखादे महत्त्वाचे काम तुमच्याकडून करून घ्यायचे असेल. तातडीच्या कामाकरिता छोटा प्रवास संभवतो. घरामध्ये मोठय़ा व्यक्तीच्या स्वास्थ्याविषयी तुम्ही विशेष जागरूक बनाल.

सिंह ग्रहमान तुम्हाला ‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’ याची आठवण करून देणारे आहे. जी गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे ती तुम्हाला अत्यंत सोपी वाटेल, पण त्या वेळी त्यामध्ये गुंतागुंत झाल्यामुळे तुमची चिडचिड होईल. अशा वेळी तुमचे खरे हितचिंतक उपयोगी पडतील. व्यापार-उद्योगात ज्या योजना आखाल त्यासंबंधी कायदे व्यवहाराची नीट चौकशी करा. नोकरीमध्ये कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना वरिष्ठांची संमती घ्या. घरामध्ये तुम्ही तुमचा मोठेपणा सिद्ध करण्याकरिता चाकोरीबाहेर जाऊन मदत कराल.

कन्या सध्या तुमची स्थिती ‘कळतं, पण वळत नाही’ अशी असणार आहे. व्यापार-उद्योगाच्या काही योजनांना धक्का स्टार्ट या पद्धतीने गती देणे भाग पडेल. ही गोष्ट खर्चीक असल्यामुळे त्याकरिता पशाची सोय करावी लागेल. नोकरीमध्ये तुमचे प्रश्न वरिष्ठांसमोर मांडले तर त्यावर ते एखादा तोडगा शोधून काढतील, पण तो तुम्हाला पटायला वेळ लागेल. सहकाऱ्यांच्या दुटप्पी धोरणाचा राग येईल. घरामध्ये केलेल्या कामाचे महत्त्व इतर सदस्यांना समजणार नाही. यामुळे तुम्ही अलिप्ततेची भूमिका घ्याल.

तूळ लक्ष्मी चंचल असते. हातामध्ये चार पसे पडले या आनंदामध्ये तुम्ही असाल. अनेक मनोरथेही कराल. व्यवसाय धंद्यात एखादे मोठे काम मिळाल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर भांडवलाची गरज भासेल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुम्हाला विशेष सवलत द्यायला तयार होतील, पण त्याच्या बदल्यात थोडय़ाशा जाचक अटी ठेवतील आणि कामाचा तणावही वाढवतील. घरामध्ये एखाद्या प्रश्नावरून बुजुर्गाशी वाद-विवाद होतील. पण अखेर तुम्हाला माघार घ्यावी लागेल. वडिलोपार्जति प्रॉपर्टीकडे लक्ष द्यावे लागेल.

वृश्चिक ग्रहमान तुमच्या इच्छा-आकांक्षा वाढवायला उपयोगी पडेल. त्या पूर्ण करण्याकरिता तुमची काहीही करण्याची तयारी असेल. व्यवसाय-उद्योगात पूर्वीच्या कामातून काही कोर्ट प्रकरणे किंवा सरकारी प्रश्न निर्माण झाले असतील तर त्याकडे लक्ष देणे भाग पडेल. एखादे नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये तुमच्या अधिकारांचा आवश्यक तेवढाच वापर करा. घरामध्ये बुजुर्ग व्यक्तीचे तंत्र सांभाळण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागेल. एखादा जुना प्रश्न नव्याने डोके वर काढेल.

धनू ग्रहमान खट्टा-मीठा अनुभव देणारे आहे, पण त्याच्याच बरोबर प्रयत्नांती परमेश्वर असा चांगला अनुभव तुम्हाला येईल. व्यवसाय-उद्योगात पूर्वी जे काम मिळविण्याकरिता तुम्ही अधिक मेहनत घेतली होती, त्यातून काही तरी चांगले निष्पन्न होईल. ज्यांचा परदेशात व्यवहार आहे त्यांना तेथून चांगले संकेत मिळतील. नोकरीमध्ये वरिष्ठांचे मूड सांभाळणे तुम्हाला कठीण होईल. काहींना परदेशात जायची संधी मिळेल. घरामधल्या वयोवृद्ध व्यक्तींचे तंत्र सांभाळणे कठीण होईल.

मकर ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ या म्हणीची आठवण ठेवा, म्हणजे तुमची महत्त्वाची कामे पुढे सरकतील. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात काही उलटसुलट बातम्या कळतील किंवा घटना घडतील. कायदे व्यवहार आणि तुमच्या क्षेत्रातल्या प्रतिष्ठित व्यक्तींना डावलून चालणार नाही. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या आज्ञा आणि त्यांचे विचार तुमच्या सारासार विचारबुद्धीला पटणार नाही, पण ते ऐकण्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नसेल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींचे हट्ट थोडेसे महाग असतील, पण तुम्हाला ते पुरवावे लागतील. प्रकृती सांभाळा.

कुंभ तुम्हाला एखाद्या विशिष्ट पद्धतीने काम केलेले आवडते. त्यामध्ये कोणीही ढवळाढवळ केलेली चालत नाही. या आठवडय़ात याच कारणामुळे तुमचा मूड थोडासा बदलण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योगात तुम्ही तुमचे सर्व लक्ष नवीन कामावर केंद्रित करा. नोकरीमध्ये वरिष्ठांचे मूड सांभाळा. मिळणाऱ्या सवलतींचा गरफायदा घेऊ नका. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींचा सल्ला जुनाट पद्धतीचा असल्याने इतरांना तो पटणार नाही, पण अखेर त्याचाच उपयोग झाला असे मान्य करावे लागेल.

मीन ‘मानलं तर समाधान’ असे दर्शविणारी ही ग्रहस्थिती आहे. व्यापार-उद्योगात नजीकच्या भविष्यात प्रतिष्ठा वाढविणारे चांगले काम होईल. कायद्याविरुद्ध जाऊन कोणतेही काम हाताळू नका. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या दुटप्पी वागण्याचा अनुभव येईल, पण त्याचा विचार न करता तुम्ही चांगले काम करून स्वत:चाही स्वार्थ साधून घ्याल. घरामध्ये दोन पिढय़ांतील विचारातील तफावत प्रकर्षांने जाणवेल, पण बुजुर्ग व्यक्ती त्यांच्या मुद्दय़ांवर अडून बसतील.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com