वृषभ तुमच्या कल्पक बुद्धीला आता उधाण येईल. अनेक आघाडय़ांवर काहीतरी चांगले काम करण्याकरिता तुम्ही अधीर असाल. व्यवसाय-उद्योगात गिऱ्हाईकांना आकर्षति करण्याकरिता एखादी विशेष योजना कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात तुम्ही राहाल. नोकरीमध्ये तुमच्या चांगल्या कामामुळे वरिष्ठांच्या अपेक्षा वाढतच राहतील, पण या गोष्टीचा तुम्हाला मनस्वी कंटाळा येईल. घरातील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात तुमचा पुढाकार असेल. नवीन जागा किंवा वाहन खरेदीचे विचार डोकावतील.
मिथुन ग्रहमान तुमच्या आनंदी राहण्याच्या स्वभावाला खतपाणी घालणारे आहेत. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेल्या कामातून पसे मिळतील. जे काम चालू आहे त्यामध्ये विस्तार करावासा वाटेल. कर्म-धर्म-संयोगाने अपेक्षित व्यक्तींकडून साथ मिळाल्याने सोने पे सुहागा असे तुम्हाला वाटेल. नोकरीमध्ये तुम्हाला हवे असलेले वातावरण मिळाल्यामुळे भरपूर काम करावेसे वाटेल. जादा काम करून जादा पसेही मिळवावेसे वाटेल. घरामध्ये नातेवाईक, मित्रमंडळी यांची एखाद्या निमित्ताने हजेरी लागेल.
कर्क कधीही स्वस्थ आणि शांत बसणारी तुमची रास नाही. त्यामुळे ‘चररास’ असे तुमच्या राशीचे वर्णन केले जाते. व्यापारउद्योगात कामाला तोटा नसेल. पूर्वी पूर्ण केलेल्या कामाचे पसे मिळण्याची शक्यता आहे. कारखानदारांना नवीन काम मिळेल. बेकार व्यक्तींनी ताबडतोब निर्णय घेतला तर त्यांचे नोकरीचे काम होईल. चालू नोकरीमध्ये देशात किंवा परदेशातल्या एखाद्या कामाकरिता तुमची निवड होईल. घरामध्ये जुनी प्रॉपर्टी विकून नवीन प्रॉपर्टी घ्यायचे ठरेल. वडिलोपार्जति किंवा जुन्या प्रश्नावर चर्चा होईल.
सिंह स्वभावत: तुमची रास प्रयत्नांवर विश्वास ठेवणारी आहे. त्यातून आता नशिबाचा वाटा थोडय़ाफार प्रमाणात वाढल्यामुळे तुम्ही काहीतरी चांगले काम करायला प्रवृत्त व्हाल. व्यवसाय-उद्योगात काही नवीन योजनेबाबत निर्णय निश्चित करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. नोकरीमध्ये एखाद्या जबाबदारीच्या कामाकरिता तुमची निवड होईल. परंतु फायद्याबाबत तुमच्या मनात संदिग्धता राहील. घरामध्ये थोडेफार वादविवाद होतील. ते सर्व विसरून मोठय़ा मनाने इतरांना सक्रिय मदत करायला तयार व्हाल.
कन्या ज्या वेळेला पसे हातात असतात त्या वेळेला आपल्याला एक प्रकारचे मानसिक स्वास्थ्य असते आणि कामामध्येही लक्ष केंद्रित करता येते. व्यवसाय-उद्योगात बऱ्याच कष्टानंतर अपेक्षित पसे हाती पडतील, पण त्याच वेळेला अनपेक्षित खर्च उद्भवल्यामुळे तुमच्या हातात फारशी रोख रक्कम शिल्लक राहणार नाही. नोकरीच्या ठिकाणी तुमचा कामाचा वेग चांगला राहील. विशेषत: जे काम लांबलेले आहे ते गती घेऊ लागल्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. घरामध्ये जोडीदाराची मागणी तुम्हाला पूर्ण करावी लागेल. तूळ काहीतरी मिळविण्याकरिता काहीतरी गमवावे लागते याचा अनुभव देणारा हा आठवडा आहे. व्यापार-उद्योगात काम मिळविण्याकरिता तुम्ही पूर्वी बरेच प्रयत्न केले असतील किंवा मेहनत घेतली असेल तर ते मिळण्याची तुम्हाला खात्री वाटेल. नोकरीच्या कामानिमित्त एखाद्या मोठय़ा व्यक्तीशी भेटण्याचा योगायोग चालून येईल. त्या व्यक्तीकडून तुम्हाला स्फूर्ती मिळेल. घरामध्ये मुलांच्या प्रगतीविषयी एखादी चांगली बातमी कळेल. लांबच्या नातेवाईकांकडून तुमचे कौतुक तुम्हाला ऐकायला मिळेल.
वृश्चिक ‘प्रयत्नांती परमेश्वर’ याची जाणीव करून देणारे ग्रहमान आहे. पूर्वी केलेल्या कष्टांचे आपल्याला काही फळ मिळेल का याची तुमच्या मनात शंका असेल तर ती आता दूर व्हायला लागेल. व्यापार-उद्योगामध्ये जे काम चालू आहे ते तसेच चालू ठेवून त्याव्यतिरिक्त एखादे नवीन काम मिळणार असेल तर तुम्ही प्रयत्न करा. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना एखाद्या ठिकाणाहून सकारात्मक उत्तर मिळेल. प्रकृती-संबंधी काही तक्रार असेल तर त्यावर योग्य निदान होऊन उपाय मिळेल.
धनू ग्रहमान तुमच्या आनंदी आणि उत्साही स्वभावाला पूरक आहे. एखादे काम जेव्हा तुम्हाला पूर्ण करायचे असते, त्या वेळी तुम्ही विचार करत बसण्यापेक्षा कृती करण्याची घाई करता. व्यवसाय-उद्योगात चालू असलेल्या कामा-व्यतिरिक्त एखादे नवीन काम हातात घेण्याचा तुमचा मानस असेल. मात्र काम होण्यापूर्वी त्यासंबंधी घोषणा करू नका. नोकरीमध्ये तुम्ही पूर्वी केलेल्या चांगल्या कामाची वरिष्ठ दखल घेतील. घरामध्ये कोणाच्याही मदतीशिवाय एखादे अवघड काम मार्गी लावू शकाल.
मकर सद्य:स्थिती आणि ग्रहमान असे दर्शविते की तुम्हाला जिद्दीने उभे राहावे लागेल. व्यापार-उद्योगात बाजारातील चढ-उतारांकडे बारकाईने लक्ष द्याल. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी निष्णात व्यक्तीचा सल्ला घ्या. नोकरीमध्ये वरिष्ठ एखाद्या अवघड कामानिमित्त तुमची वेगळ्या जागी बदली करण्याची शक्यता आहे. या कामात थोडीशी गुंतागुंत असण्याची शक्यता आहे. घरामध्ये मुलांच्या गरजांना प्राधान्य द्यावे लागेल. जोडीदाराने दिलेला सल्ला चांगला असेल. पण काही काळाने तुम्हाला तो पटणार नाही.
कुंभ कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार न करीत बसता जी संधी तुमच्यापुढे आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा उठवा. व्यापारउद्योगात तुमच्याच कामाशी निगडित दुसरी एखादी व्यक्ती किंवा संस्था काम करीत असेल तर त्यांच्याशी हात मिळवणी करण्यापूर्वी अटी आणि नियम नीट समजून घ्या. नोकरीमध्ये अवघड प्रश्नात तुम्ही मुसंडी माराल आणि स्वत:चे महत्त्व वाढवून घ्याल. त्यामुळे सहकाऱ्यांच्या मनात असूया निर्माण होईल. घरामध्ये एखाद्या कार्यक्रमात नियोजन करण्याची जबाबदारी तुमच्यावर येईल.
मीन ज्या व्यक्तींवर तुम्ही अवलंबून असाल, त्यांचीच काहीतरी अडचण असल्यामुळे अखेर सर्व जबाबदारी तुमच्यावर येऊन पडेल. कामगार वर्गाला खूश ठेवण्यासाठी जादा पसे किंवा सवलती द्याव्या लागतील. त्यामुळे व्यापारउद्योगात जरी पसे मिळाले तरी त्याचे समाधान कमी असेल. नोकरीमध्ये जादा काम करावे लागेल. पण त्याचा तुम्हाला योग्य उपयोग होईल की नाही याची मनात शंका असेल. घरामधल्या व्यक्तींना खूश ठेवण्यासाठी हात सल सोडावा लागेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com