वृषभ सभोवतालच्या व्यक्तींना कसे खूश ठेवायचे हा एक प्रश्नच असेल. कारण त्यांच्याशी प्रेमाने वागले तर ते गरफायदा करून घेतील. सद्य: परिस्थितीत तुमचे धोरण तटस्थ ठेवणे चांगले. व्यापार उद्योगात स्पर्धक तुमच्यापुढे मृगजळ निर्माण करण्याची शक्यता आहे. त्याला प्रत्युत्तर देऊ नका. नोकरीत वरिष्ठ आणि सहकारी यांच्या वागण्या-बोलण्यामुळे तुम्हाला कोडे पडेल. पण तुम्ही ‘हाथी चले अपनी चाल’ या धोरणाचा अवलंब करा. घरामधल्या लहान-मोठय़ा व्यक्तींच्या समस्या सोडवताना तुमची त्रेधातिरपीट उडेल.
मिथुन तुमची परिस्थिती ‘धरलं तर चावतं सोडलं तर पळतंय’, अशी होईल. ज्या कामाच्या मागे तुम्ही लागलेले असाल ते तुमच्यापासून लांब पळेल. याउलट एखाद्या नको असलेल्या जबाबदारीत जखडून जाल. व्यापार उद्योगामध्ये कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी त्यातील कायद्याची बाजू तपासून पाहा. नशिबापेक्षा प्रयत्नांवर जास्त विश्वास ठेवा. नोकरीमध्ये एखाद्या नेहमीच्या सहकाऱ्याची अनुपस्थिती जाणवेल. घरामधे भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व द्याल. वृद्ध व्यक्तींच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.
कर्क शांत आणि स्वस्थ बसणे तुम्हाला आवडत नाही आणि जेव्हा अशी वेळ येते त्या वेळी तुमची चिडचिड होते. नोकरी, व्यवसाय आणि घर या आघाडय़ांवर तुम्हाला इतरांशी तडजोड करून काम करायचे आहे. व्यापार उद्योगात जी कामे मध्यस्थांवर सोपवली होती त्यात प्रगती न झाल्यामुळे तुम्ही स्वयंभू बनाल. नोकरीमध्ये वरिष्ठांनी काही आश्वासन दिले असेल तर ते त्यांच्याकडून पाळले न गेल्याने तुम्हाला कामामध्ये रस वाटणार नाही. घरामधील व्यक्ती तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा ठेवतील.
सिंह कोणतेही हितसंबंध घडवायला वर्षांनुवर्ष लागतात; परंतु ते तुटायला एखादे निमित्त पुरते असा अनुभव तुम्हाला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्यांशी मिळून मिसळून राहा. वेळप्रसंगी तुमचे धोरण नमते ठेवा. व्यापार उद्योगात पूर्वीचे काम बंद ठेवून त्याऐवजी एखादे नवीन काम सुरू होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या दुटप्पी धोरणाचा तुम्हाला राग येईल. पण तुमची प्रतिक्रिया व्यक्त करू नका. घरामधे वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी आणि जुने वादविवाद याला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
कन्या ज्या गोष्टींवषयी तुम्हाला खात्री असेल त्यामधे अनपेक्षित अडथळे निर्माण होतील. याउलट जे काम अर्धवट स्थितीत होते त्यात तुमची युक्ती उपयोगी पडेल. व्यापार उद्योगामधे विस्तार करावासा वाटेल. पण त्यानिमित्ताने ज्या व्यक्ती संपर्कात येतील त्यांची विश्वासार्हता पडताळून पाहा. नोकरीमध्ये घाईघडबडीत वरिष्ठांच्या सूचनांचा विसर पडला तर त्यांना राग येईल. घरामधल्या व्यक्ती आणि शेजारीपाजारी यांच्याशी सौजन्याने वागा. खेळाडूंनी दुखापतीपासून सांभाळावे.
तूळ ग्रहमान काही वेगळाच अनुभव देणारे आहे. ज्या व्यक्तींशी तुमचे आíथक किंवा इतर कारणांमुळे काही हितसंबंध निर्माण झाले होते ते काही कारणाने संपुष्टात येतील. व्यावसायिक आणि कारखानदारांना नवीन पद्धतीचे काम करावेसे वाटेल. जोडधंदा असणाऱ्यांनी उधारीचे व्यवहार करू नयेत. नोकरीमध्ये बदल करताना त्यातील धोके समजून घ्या. चालू नोकरीमध्ये संस्थेत घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवा. जुनी वडिलोपार्जति प्रॉपर्टी किंवा काही घरगुती जुने प्रश्न लोंबकळत असतील तर ते डोके वर काढतील.
वृश्चिक ग्रहमान बदलले की सभोवतालचे वातावरण बदलायला वेळ लागत नाही आणि अर्थातच त्यामुळे माणसांशी असणारी समीकरणे बदलायला सुरुवात होते. त्यामुळे सर्वाशी सावधपणे वागा. व्यवसाय-उद्योगामध्ये पूर्वीच्या पद्धतीचे काम संपल्यामुळे काही हितसंबंध दुरावण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये संस्थेने कामाच्या स्वरूपात बदल केल्यामुळे एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावरती तुमची रवानगी होईल. घरातील व्यक्तींच्या, स्वत:च्या स्वास्थ्याकडे लक्ष द्या. सरकारी नियमांचा भंग करू नये.
धनू ग्रहस्थिती तुम्हाला कोडय़ात टाकणारी आहे. अष्टमस्थानातील गुरू, व्ययस्थानातील रवी, शुक्र आणि शनी तुम्हाला अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. तर बुध आणि मंगळ हे ग्रह त्यातून सुटका करायला मार्ग दाखवतील. सद्य परिस्थितीत माझे तेच खरे असा हट्ट न धरता वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. व्यवसाय उद्योगात बाजारातील चढउतार याकडे लक्ष द्या. नोकरीमध्ये वरिष्ठांशी वादविवाद न करता त्यांची आज्ञा शिरसावंद्य माना. घरामधील वयोवृद्ध व्यक्तींच्या स्वास्थ्याविषयी चिंता वाटेल.
मकर सर्व ग्रहमान संमिश्र आहे. ‘जया अंगी मोठेपण तया यातना कठीण’ याचा अनुभव तुम्हाला येईल. व्यवसाय-उद्योगात तुमचे इरादे बुलंद असतील. ते कृतीत उतरवण्यासाठी तुम्ही सर्वोतोपरी प्रयत्न कराल. नोकरीमध्ये आपल्या मागण्या पूर्ण करण्याकरता तुम्ही थोडेसे बंडखोर बनाल. पण वरिष्ठांना डावलून चालणार नाही हे लक्षात असू द्या. एखाद्या तात्त्विक प्रश्नामध्ये दोन पिढय़ातील विचारांची तफावत जाणवेल. प्रिय व्यक्तींच्या लांब जाण्यामुळे तुमच्या मनाला एकप्रकारची हुरहुर जाणवेल.
कुंभ ग्रहमान तुम्हाला एखाद्या मोहात टाकणारे आहे. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे व्हायला पाहिजे असा तुमचा अट्टहास असेल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करा. तुमच्या कामात चूक झाली तर त्यांना ती सहन होणार नाही. व्यापार-उद्योगामध्ये विस्ताराची आणि प्रगतीची तुम्हाला खूप घाई असेल. घरामध्ये जोडीदाराशी वाद निर्माण होतील. थोडे नमते धोरण ठेवणे चांगले. वृद्ध व्यक्तींनी तब्येतीकडे आणि विशेषत: जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. घरातील व्यक्तींचे विचार वेगवेगळे असतील.
मीन प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही माणसे एखाद्या विशिष्ठ कारणाने येतात आणि ते कारण संपल्यानंतर त्यांच्याशी ताटातूट होते. तशाच प्रकारच्या घटनांची नांदी होण्याची शक्यता आहे. व्यवसाय-उद्योगात नवीन करार करण्यापूर्वी तुमचे धोरण सावध ठेवा. नोकरीमध्ये वरिष्ठांचे विचार आणि सूचना तुम्हाला पटणार नाहीत. नवीन नोकरीच्या कामात विलंब होईल. घरामधील व्यक्तींच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. तुमच्याही आजारांवर वेळीच उपाय योजा.