जीवनांत करिअर करण्यासाठी उद्योग-व्यवसायाचे मार्गदर्शन, नोकरी, कुठल्या क्षेत्रांत करावी याविषयी योग्य सल्ला मिळणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण हे सर्व कशासाठी करायचे? प्रत्येक व्यक्ती जीवनांत नोकरी व्यवसाय हा अर्थजनासाठी करत असून आपली सांपत्तिक स्थिती सुधरवण्याकडे त्याचा कल असतो. कुणी चांगल्या तर कुणी वाईट मार्गाने पैसा मिळवितांना दिसतो. परंतु कुणालाही काहीतरी उद्योग केल्याशिवाय पैसा मिळत नाही. उद्यमेनहि सिन्ध्यन्ति कार्याणि, न मनोरथै ।
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविश्यन्ति मुखे मृगा: ॥
या संस्कृत श्लोकात सुभाषितकाराने उद्योग करूनच कार्यसिद्धी होते, नुसत्या मनोरथाने नाही, असे म्हटले आहे. सिंह जर हरणाचा विचार करीत झोपून राहिला, तर हरणे आपोआप त्याच्या तोंडात शिरत नाहीत. थोडक्यात माणसाला जीवनात नोकरी/ व्यवसाय करण्याशिवाय पर्याय नाही. समाजाचे आपण सूक्ष्म दृष्टीने अवलोकन केल्यास असे लक्षात येते की मूठभर व्यक्तींची उद्योग-व्यवसायात सांपत्तिक स्थिती शिखरावर पोहोचलेली असते. मग त्यांचा व्यवसाय-धंदा कोठलाही असला तरी चालतो. किंबहुना उलटपक्षी ज्यांचेकडे बुद्धिमत्ता, विद्वत्ता आहे अशा व्यक्ती पैशासाठी काबाडकष्ट नोकरी करताना दिसतात. या व्यवहारी जगात चाचपडत असतात. त्यांची सांपत्तिक स्थिती हलाखीची असते. व्यवहारात असे का घडते? या मागची कारण मीमांसा काय? ज्योतिषशास्त्राद्वारे आपण याची तर्कसंगती शोधू शकतो. जातकाला व्यवस्थित मार्गदर्शन करून त्याची गाडी रुळावर आणण्यासाठी सहाय्यक ठरू शकतो. उद्योग – व्यवसायांत दूरदृष्टी, हातगुण, वाचासिद्धी या जन्मसिद्ध गोष्टी उपलब्ध असतील तरच त्या व्यक्ती नोकरी/ उद्योग/ व्यवसायांतून मिळणाऱ्या पैशांचा उपभोग घेऊ शकतात. उद्योग व्यवसायाची निवड करताना मिळणाऱ्या सांपत्तिक उच्च योगात आपल्याला अनेक पर्याय विचारांत घ्यावे लागतात.
कुंडलीत एकूण ४ त्रिकोण महत्त्वाचे मानले जातात.
धर्म त्रिकोण : १, ५, ९ ही स्थाने
अर्थ त्रिकोण : २, ६, १० ही स्थाने
काम तथा उद्योग त्रिकोण : ३, ७, ११ ही स्थाने
मोक्ष त्रिकोण : ४, ८
उद्योग-व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी मुख्यत: दोन त्रिकोणांचा विचार करावयाचा आहे.
अर्थ त्रिकोण : अर्थ त्रिकोणाचे म्हणजेच द्वितीय,षष्ठ व दशमस्थानाचे मालक सुस्थितीत किंवा त्या स्थानीच म्हणजेच २, ६, १० या स्थानी अथवा किमान चतुर्थ, अष्टम, व्दादश या स्थानी असावयास पाहिजेत. तरच तो माणूस उद्योगी होऊ शकतो. उदा. मकर लग्न असल्यास धनेश शनि धनात किंवा षष्ठात किंवा दशमात तरी असावा. तसेच षष्ठेश बुध किंवा दशमेश शुक्र द्वितीय, षष्ठ किंवा दशमस्थानी असावेत.
काम अथवा उद्योग त्रिकोण : तृतीय, सप्तम किंवा लाभस्थानातील राशींच्या स्वामींपैकी एक जरी ग्रह काम त्रिकोणांत असेल किंवा काम त्रिकोणाशी दृष्टीसंबंध असेल तर जातक भरपूर उद्योग करू शकतो. परंतु वर दर्शविल्याप्रमाणे अर्थ त्रिकोणाची स्थिती त्या कुंडलीत नसेल तर काम भरपूर पण पैशाच्या मानाने शून्य. कित्येक वेळा व्यावहारिक अपयशी ठरतो. म्हणून अर्थ व काम त्रिकोण दोन्हीही चांगल्या स्थितीत असतील तरच उद्योग व्यवसाय अथवा नोकरी उत्तम चालेल व पैसाही मिळेल आणि कर्तबगार व्यक्ती म्हणून समाजात पुढे येईल.
समाजात आपण असे पाहतो की बहुतांशी व्यक्ती साधारणपणे ४० टक्के व्यवसायांत वा नोकरीत असतात व मनाविरुद्ध उपजीविकेसाठी उद्योगात स्वत:ला रेटत राहतात. माणसाच्या मनाचा मानसिक कल पाहण्यासाठी विज्ञान सध्या अधिक्षमता चाचणी घेत असतात. परंतु वृत्तपत्रांतील काही लोकांनी केलेल्या टिपणीवरून अधिक्षमता चाचणीचे निर्णय काहीवेळा पूर्ण चुकीचे ठरलेले आढळतात. काही वेळेस मनाचा कल अधिक्षमता चाचणीला समजू शकत नाही. त्याठिकाणी ज्योतिष शास्त्र एक मार्गदर्शक म्हणून उपयोगी पडू शकते.
नोकरी, व्यवसाय कसा शोधावा ?
या दृष्टीने विचार करता कुंडलीमध्ये दशम स्थान हे क्रमांक एकचे केंद्रस्थान असून कर्म या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या स्थानांतील ग्रह तिथे स्थित असणारी राशी उद्योग धंदा अथवा नोकरी ठरवण्यास कारणीभूत ठरतात. त्या खालोखाल लग्नस्थान हे जातकाचा जन्मिबदू आहे. महत्त्वाकांक्षा, इच्छाशक्ती व विचारांची दिशा तथा प्रकृती दर्शवितो. आत्माकारक ग्रह रवी व मनाचा कारक चंद्र यांची स्थिती महत्त्वाची आहे. कुंडलीतील अकरावे स्थान हे लाभस्थान असल्याने त्याचाही विचार सयुक्तिक ठरेल.
निसर्ग कुंडली
दशमातील राशी व ग्रहांची विचार करता उद्योग-व्यवसायाबाबत खालील अनुमाने ठरवता येतील.
राशीेंचे महत्त्व : दशमांतील राशी किंवा दशमेश ज्या राशीत असेल –
१. मेष, सिंह, धनू ह्य राशी, अथवा या राशींच्या शुभस्थानातील ग्रहयोग हे पहिल्या दर्जाचे व उच्चतत्त्वदर्शक असतात. तर कर्क, वृश्चिक, मीन हे दुसऱ्या क्रमांकावर, वृषभ, कन्या, मकर हे तिसऱ्या क्रमांकावर, मिथुन, तूळ, कुंभ हे शेवटच्या क्रमांकावर समजावे.
२. मेष, कर्क, तूळ व मकर ह्य राशी दशमांत किंवा दशमेशाशी संबंधित असतील तर फिरते व्यवसाय अनुकूल ठरतात,
३. वृषभ, सिंह, वृश्चिक व कुंभ ह्य राशी असतील तर नोकरीस अनुकूल असून स्थिर जागी अर्थात एकाच ठिकाणी बसून असणाऱ्या व्यवसायास पूरक ठरतात.
४. मिथुन, कन्या, धनू, मीन या द्विस्वभाव राशी या ठिकाणी आढळल्यास असा जातक नोकरी सांभाळून उपजीविकेसाठी अर्धवेळ व्यवसाय करतांना आढळतो.
ग्रहांचा विचार : रवी, गुरू, शुक्र, चंद्र या ग्रहांच्या कारकत्वामुळे वरच्या दर्जाची फळे मिळतात. त्या मानाने बुध, शनी, मंगळ कमी प्रभावाचे ठरतात. परस्परांशी सहाय्यक किंवा विरोधी योग होतात, तेव्हा जो ग्रह प्रबळ असेल त्याचेप्रमाणे शुभाशुभ फळे मिळतात.
भाग्योदय कुठल्या दिशेला यासाठी राशी व ग्रहांच्या दिशांचा अभ्यास तारतम्याने करावा. वराहमिहीराने आपल्या बृहत्जातक ग्रंथात कर्मजीवाध्याय असा स्वतंत्र विभाग लिहिलेला आहे. राशी व ग्रहांच्या कारकत्वावरून त्यांनी केलेले मार्गदर्शन सध्याच्या काळातही मार्गदर्शक ठरते.
भाग्योदय कधी याचा विचार गोचर ग्रह दशा काल यांचे बरोबरीने १० पॉईंट सिस्टिममधील ज्या कारणासाठी हे ग्रह आहेत त्यांचा भाग्यवर्षांवरूनही ठरवता येतो. जुनी, नवी मते व आमचा अनुभव जमेस धरून ग्रहांची भाग्य वर्षे पुढीलप्रमाणे धरण्यात आली आहेत. बुध – ३२, गुरु – १६/२४, शनी – ३६/४२, शुक्र २५/२७, चंद्र २४, मंगळ २८/३३.
आपण मागे दशमस्थानी असणाऱ्या राशी व ग्रह यांचे महत्त्व बघितले आहे. आणखी खोलात जाऊन आपल्याला जातकाच्या करिअरमध्ये उद्योगधंदा वा नोकरीतील क्षेत्राची अटकळ बांधण्यासाठी पुढील पद्धत मार्गदर्शनासाठी उपयोगी पडू शकेल.
लग्नस्थान, चंद्र व रवी यांपासून दशमस्थानी जी राशी असेल, त्याचा स्वामी ज्या नवांशी असेल, त्या नवमांश स्वामीचे संबंधित पदार्थापासून उपजीविका, मग तो व्यवसाय असो वा नोकरी सुयोग्य होऊ शकते. (कोष्टक पहा)
ज्योतिषशास्त्रात ‘कालनिर्णय’ हा अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक ज्योतिषी आपल्या अनुभवाचे सार ओतून ज्योतिषशास्त्राच्या विविध पद्धतीचा अवलंब करीत कालनिर्णय करीत असतो. व्यावसायिक ज्योतिषांचा एक अनुभव असा आहे की, जातक जेव्हा काही प्रश्न विचारतो तेव्हा त्याच्या मनांत संभ्रम निर्माण झालेला असतो. कारण मनुष्य प्रवृत्तीनुसार त्याने निरनिराळ्या ज्योतिषांकडून जाऊन सल्ला घेतलेला असतो आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका मिळाल्यामुळे आणखीनच गोंधळलेला असतो. विद्यार्थ्यांला १० वी, १२ वी नंतर शिक्षण शाखा कुठली निवडावी, करिअर कोणते करावे, यासाठी वैज्ञानिक पद्धतीने अधिक्षमता चाचणीनंतरही मतमतांतरे व मतभेदामुळे जातक द्विधा मन:स्थितीत असतो.
अशा या परिस्थितीतून जात असताना एक विचार मनांत आला की, किमान चाळीस टक्क्यांपर्यंत तरी प्रत्येक अभ्यासक व ज्योतिषी एक निर्णयाप्रत येऊ शकेल काय, व त्यानंतर स्वत:चा अनुभव व शास्त्राचे नियम यातून एकच उत्तर येण्याकडे, मग ज्योतिषी अभ्यासक कुणीही असो, आपल्या पारंपरिक पद्धतीत कांही सुधारणा करता येईल का? त्यादृष्टीने विचार केल्यानंतर एक पॉईंट सिस्टीम (प्रणाली) तयार केली. या प्रणालीच्या माध्यमातून किमान दुसऱ्या पायरीपर्यंत तरी सर्व लोकांचे उत्तर एकच यावे ही किमान अपेक्षा ठेवली आहे. ही पद्धत संशोधन अवस्थेत असली तरी गेली १५ वर्षे अनेक कुंडल्यांवर अभ्यास करून तयार केली आहे. सुमारे १५ हजार कुंडल्यांवर ७५ ते ८० टक्के यशस्वीता मिळाल्यावरच आपल्यापुढे ठेवत आहे.
अभ्यास करताना असे बरेच वेळा लक्षात आले की, प्रत्येक जातकाला आपल्या करिअरच्या एखाद्या विशिष्ट काळात साडेसातीच्या बॅडपॅचमध्ये काहींना हा ग्रहांचा अशुभ काळ फारच परिणामकारकजातो तर काहींना विशेष परिणामकारक आढळत नाही. मग असे का होते? या ठिकाणी माझ्या दृष्टीने कुंडलीचा मूळ दर्जा हा महत्त्वाचा ठरतो. उदा. एखादी आरसीसीची पक्की बिल्डिंग व मातीची बिल्िंडग बाजूबाजूला असतील, आणि एकाच क्षमतेचा एकाच वेळी भूकंप झाला तर चांगले फाऊंडेशन दर्जा असलेल्या इमारतीला जास्तीत जास्त तडे जातील व मातीची इमारत मात्र कोसळून जाईल. त्यामुळे एखाद्या जातकाचा ज्योतिषशास्त्रदृष्टय़ा अभ्यास करताना त्याला करिअरचे मार्गदर्शन करताना त्याच्या कुंडलीचा प्रथम दर्जा बघणे आवश्यक आहे. मग हा दर्जा कसा काढायचा.
कुठल्याही लग्नाला १, ५, ९ ही दैवस्थाने व ४, ७, १० ही कर्मस्थाने होत.
१ : महत्वाकांक्षा – प्रवृत्ती, जीवनशक्ती.
५ : विद्या, बुद्धी, स्मरणशक्ती, अकस्मात मिळणारे धन.
९ : यश, भाग्य, दैव, नशीब, पूर्वसुकृत, सूचक स्वप्ने.
या स्थानातील ३ ग्रहांच्या तथा भावेशाच्या स्थितीवर व त्यांच्याशी होणाऱ्या योगांवर नशिबाची अनुकूलता राहील. हे ग्रह शुभस्थितीत, शुभक्षेत्री असले तर त्यास दैव अनुकूल असेल.
कुंडलीतील कर्मस्थाने अर्थात ४, ७, १० ही केंद्रस्थाने – या स्थानावर सर्व व्यवसाय, नोकरी, उद्योग, उद्योगाची स्थिती पाहिली जाते.
४ : मालमत्ता, घर, गाडय़ा, शेतीअंतर्गत उद्योग, केंद्र, ऐहिक.
७ : व्यापार उद्योग, कौशल्य, व्यवहार स्पर्धा, भागीदारी, चतुर्थाचे चतुर्थ, दशमाचे दशम,यश
१०: उद्योग, व्यवसाय, मान प्रतिष्ठा, कीर्ती, इ. मुख्य कर्म.
कुंडलीतील ही उद्योगस्थाने अर्थात कर्मस्थाने माणसाच्या प्रयत्नाला किती यश येईल, हे दाखवतात.
आता कुंडलीचा दर्जा ठरविण्यासाठी आपण पॉईंट सिस्टीमचा विचार करणार आहोत.
पॉईंट सिस्टीममध्ये क्लिष्टता टाळण्यासाठी व अनुभवाअंती भावस्थ ग्रहापेक्षा भावेशाला जास्त महत्त्व देण्यात आले आहे. त्या घराचा स्वामी हा म्हणजेच भावेश व त्या घरात राहणारा पाहुणा हा भावस्थ. भावेश ज्या भावात पडतो त्या भावेशाच्या भावाधिष्ठित फल देतो हेच तत्त्व खरे आहे. भावस्थित ग्रहांपेक्षा ग्रह कोणाच्या माध्यमातून वा कशा प्रकारे फल देतो हे पाहण्यासाठी भावाधिपती महत्वाचा असतो. केवळ भावांत पडलेल्या आणि भावांतून झालेल्या ग्रहयोगांचे फळ वर्तविण्याची आणि भावेशाला कमी लेखण्याची पाश्चिमात्य विचार पद्धतीवर विचार करण्याची गरज आहे, असे मला वाटते.
भावेश पद्धतीने आपण जी प्रणाली या लेखात अभ्यासणार आहोत, त्यात भावेश शत्रुगृही, मित्रगृही अथवा सममित्रगृही आहे याचा फक्त मार्क देताना विचार करतो व तो ग्रह स्वगृही, उच्च, नीच व कुठल्या योगात आहे व गोचरीची स्थिती, दशा-विदशा यांचा विचार स्वानुभवावरून त्याचे प्रश्नाचा निर्णय घेताना करतो हे लक्षात ठेवावे. जन्मस्थळाच्या अक्षांश भिन्नतेप्रमाणे भावचलित कुंडलीमध्ये कित्येक वेळा एकच राशी (जवळजवळच्याच) अनेक भावामध्ये असू शकते व एकाच भावात (जवळजवळच्याच) अनेक राशी पण असू शकतात. यास्तव भावचलित जन्मलग्न कुंडलीप्रमाणे स्वीकारावयाची भावमध्यस्थित राशी आणि भावमध्यस्थित राशीच्या अनुषंगाने स्वीकारला जाणारा त्या भावाचा अधिपती ग्रह याचा स्वीकार दशाविचारात असंगत आहे. असा भावमध्यस्थित राशीप्रमाणे ठरणारा भावेश ग्रह दशा विचारात मान्य नाही. हेच सूत्र संशोधनाचे दृष्टिकोनातून वापरले आहे हे अभ्यासकांनी लक्षांत ठेवावे.
ही संकल्पना आधारभूत धरून आपण पॉईंट सिस्टीममध्ये वेगवेगळ्या विषयांसाठी तर्कशास्त्रीय पद्धतीने विचार करून निर्णय करणार आहोत.
मग कुंडलीचा दर्जा म्हणजे काय ?
आपण जन्माला येताना काय घेऊन आलो आहोत, ते आपले – दैव.
आपण ह्य जन्मात प्रयत्नांनी जे साध्य करणार आहोत, ते आपले – कर्म.
मग दैव आणि कर्म या दोघांची सांगड ही त्या कुंडलीचा, त्या जातकाचा बेसिक दर्जा ठरविते.
भावेश पद्धतीचा अवलंब करतांना काही गृहितके मान्य करून आपल्याला पुढे जावयाचे आहे.
सुरुवातीला (Primary Stage) त्या स्थानाचा भावेश हा शत्रूग्रही, मित्रगृही अथवा सममित्र ग्रही आहे याचा फक्त मार्क देताना विचार करावा. योगांचा वा उच्चादी स्थितीचा विचार निर्णयाचे वेळेस करावा.
शत्रूगृही असल्यास ह्र खूण : 0 गुण
मित्रगृही असल्यास ढ खूण : १ गुण
व सममित्रगृही असल्यास ½ खूण : अर्धा गुण
याप्रमाणे गणिती पद्धतीने आपण दर्जा काढणार आहोत.
त्याचप्रमाणे आपण आता करिअर कसे बघायचे हे पाहू या, म्हणजे या पॉईंट सिस्टिमद्वारे करिअरचा दर्जा काढण्यास सुलभ होईल. प्रथम आवश्यक गोष्ट व पुढे कोठल्या स्थानावरून विचार करावा हे मांडले आहे.
स्थाने :
कर्म – १०
यश – ७
प्रयत्न – ३
भाग्य स्वत:चे – ९
महत्त्वाकांक्षा – १
इच्छाशक्ती – ५
मानसिक स्थिती – चंद्र (जोडीला लग्न राशी व रवी राशीचा विचार इष्ट ठरतो)
पैसा – २ (कोषागार)
लाभ (कर्मातून पैसा) – ११
नशीब (कर्माचे) – ६
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा