मथितार्थ, दिवाळी २०१३
अमिताभसमोर हॉटसीटवर बसलेल्या मोरूच्या मनात आत्मविश्वास तर ठासून भरलेला होता. संपूर्ण देशाचे लक्ष मोरूवर खिळलेले होते, या शेवटच्या प्रश्नाचे यशस्वी उत्तर दिल्यानंतर तो रिअ‍ॅलिटी शो जिंकणारा या भारतभूवरचा पहिला अब्जोपती ठरणार होता! प्रश्न ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटली आणि त्यानंतरच्या क्षणी तो अब्जोपती झालाही होता! खरे तर ते यश त्याने त्याच्या बुद्धिमत्तेच्याच बळावर मिळवले होते.. तरीही आपण स्वप्नात नाही ना, याची त्याने स्वत:लाच चिमटा काढून एकदा खात्री करून घेतली. त्यानंतरचे आयुष्य म्हणजे केवळ सेलिब्रेशनच होते! दररोज दिवाळीच! काही महिने असेच गेले आणि मग खरीखुरी दिवाळी आली. काही महिन्यांच्या त्या रोजच्या सेलिब्रेशनच्या दिवाळीनंतर मोरूला या दिवाळीचे फारसे आकर्षण राहिले नव्हते.
उर्वरित लेख वाचण्यासाठी आजच खरेदी करा लोकप्रभा दिवाळी अंक २०१३
दीपावलीच्या अनंत शुभेच्छा!

Story img Loader