‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या तिसऱ्या टप्प्याचा प्रवास मान्सूनबरोबर सुरू आहे. या वेळी सरस्वती नदीच्या टापूमध्ये फिरून सगळ्या मध्य भारतातल्या पावसाचा, त्यातून विकसित झालेल्या संस्कृतीचा, त्यातून निर्माण झालेल्या वैविध्याचा शोध घेण्याचे काम सुरू झाले आहे.
या वर्षी जून महिन्यापासून या ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. या तिसऱ्या टप्प्यातला पहिला भाग अगुम्बे ते म्हसवड असा होता. अगुम्बे हा कर्नाटक राज्यामधला प्रदेश. पश्चिम घाटातला सर्वात अधिक पाऊस इथे पडतो. तिकडून महाराष्ट्रातला दुष्काळी भाग म्हणजे माण तालुका असा पहिल्या टप्प्यातला प्रवास या गटाने पूर्ण केला. यामध्ये घाट, कोकण आणि काही दुष्काळी प्रदेशांतला मान्सून या गटाने अनुभवला होता. या पहिल्या भागामध्ये पंधरा जण सहभागी झाले होते. या पंधरा
गेल्याच आठवडय़ात या गटातल्या मयूरेश प्रभुणे आणि मंदार मोरवणे यांनी तिसऱ्या टप्प्यातल्या दुसऱ्या भागाची सुरुवात केली. हा प्रवास पुण्यापासून परत पुण्याला येईपर्यंत असा पाच हजार किलोमीटरचा असणार आहे. मार्ग साधारणत: पुण्याहून दिल्ली- हरियाणा- आदिबद्री- तेथून उलटा प्रवास पश्चिमेकडे आहे. हा प्रवास कुरुक्षेत्रवरून राचीगढी जे प्राचीन संस्कृतींचे अवशेष असलेले मोहंजोदडोपेक्षाही पुरातन आणि अजून उत्खनन न झालेले ठिकाण असा आहे. त्यानंतर शिरसाह हे ठिकाण जिथे सरस्वतीच्या सात उपनद्या एकत्र येतात ते ठिकाण, या ठिकाणाचा उल्लेख महाभारतामध्येही सापडतो. त्यानंतर राजस्थानमधले कालीबंग नावाचे ठिकाण. त्यानंतर मग जैसलमेरला जिथे अत्यंत कमी पावसाचे प्रमाण असते तिथे ते येणार आहेत. मग दक्षिणेला येऊन गुजरातमधल्या धोलविराज, मग कच्छच्या भागात ते येणार आहेत. तिथून नारायण सरोवर. इथे येईपर्यंत या गटाने सरस्वती नदीचा संपूर्ण मार्ग पाहिला असेल आणि त्यामुळेच पुरातन काळात मान्सून कसा होता हेही समजायला मदत होईल अशी या गटाची अपेक्षा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा