डोळ्यावरची झोप आवरत चिन्मयने पांघरूण बाजूला सारलं. तारवटलेल्या डोळ्यांच्या, केस अस्ताव्यस्त झालेल्या चिन्मयचे ते ध्यान पाहण्यासारखंच होतं. सकाळ सकाळी काय डोक्याला शॉट देतात राव, असं खिडकीच्या दिशेने हात करत चिन्मयने म्हटलं. खिडकीपलीकडे बिल्डिंगचं कंपाऊंड होतं आणि त्यापलीकडे महानगरपालिकेचा बगिच्यासाठी राखीव भूखंड होता. विशेष म्हणजे तिथे अजून तरी बगिचाच होता- झाडं, पानं, वेलीफुलांचा. चिन्मयचा निसर्गाशी पंगा नव्हता. बागेत गेल्यावर किती सुकून वाटतं हे तो अभिमानाने गँगला सांगायचा; पण भल्या पहाटे बागेत चालणारा लाफ्टर क्लब मात्र चिन्मयच्या झोपेचं खोबरं करणारा होता. रात्री पावणेदोनच्या मुहूर्तावर चिन्मय घरी पोहोचत असे. आल्यावर फ्रेश होणं, फ्रिजमधलं थंड दूध पिणं आणि जीएन, स्वीड्री आणि स्माइलींची देवाणघेवाण झाल्यावर व्हॉट्सअॅपचं दुकान बंद करणं यात किमान अर्धा तास तरी जात असे. दिवाणावर पाठ टेकल्याला जेमतेम चार तास होत नाहीत तोच हास्यकल्लोळाने चिन्मय दचकत असे. बरं हसण्यातही एकजिनसीपणा नाही. काही जणांचं रेहमानसारखं अनवट, तर काहींचं उषा उत्थपसारखं गगनभेदी. हसणं तब्येतीला चांगलं बरोबर, पण घरी खिदळा की वाट्टेल तेवढं. घरच्या रडारडीचा इकडे येऊन गडगडाटी हसून सूड घ्यायचं ठिकाण, ही लाफ्टर क्लबची चिन्मयने केलेली व्याख्या. आता दोन तास तरी यांचं आटपत नाही म्हणून चिन्मयनं लोळण्याचं धोरण स्वीकारलं. घडय़ाळात राष्ट्रवादी वाजलेले. बेल वाजली आणि दामले आजोबा डोकावले. ‘चिन्मय, तू भेटलास ते बरं झालं. तुझ्याशीच बोलायचं होतं. मगाशी आमचे हास्यप्रयोग सुरू असताना गॅलरीत तुला बघितलं. नाराज आहेस.. मित्रा, मी २२ र्वष शिफ्ट डय़ुटी केली. झोपमोड होणं किती त्रासदायक ते मी अनुभवलंय. आता वयानुसार पहाटेच जाग येते. फिरणं आणि हसण्याच्या निमित्ताने समवयस्क भेटतात. तेवढंच सोशल आऊटिंग आमचं आता. वयाचा आदर ठेवून तू बोलला नाहीस काही, पण मी समजू शकतो. आमच्याकडे वेळ आहे म्हणून आम्ही भल्या सकाळीच सुरू व्हायला नको आणि रात्री उशिरा येतो म्हणून तुझं एकला उजाडायला नको. चलो, येतो..’ ‘थँक्स आजोबा.’ दार लावता लावता चिन्मय एफबीवर स्टेटस टाकतो- ऑसम मॉर्निग, फीलिंग अचंबित.
७ ७ ७
घामाळलेले केशवराव धावत धावत येऊन लोकलमध्ये चढले. हुश्श.. ही ट्रेन मिळाली बरं झालं, नाही तर ऑफिसला लेट झाला असता. नेहमीचा डबा चुकला, पण वेळेत जाऊ हे महत्त्वाचं. सकाळच्या वेळेला बसायला जागा मिळणं शक्य नाही, पण किमान नीट उभं राहता येतंय हेच समाधान. बहीण आणि भाचेकंपनी घरी आली असल्याने रात्री गप्पाटप्पा, कॅरमचा पट रंगला. उठायला उशीर झाला. घोडा उभ्या उभ्या झोपतो म्हणतात, अगदी तेवढं नाही तरी डोळे मिटून उभे राहू हा केशवरावांच्या मनातला विचार मनातच राहिला, कारण स्टेशन सुटता सुटता भक्तिभावी मंडळांनी टाळ हातात घेतले, एका उत्साहीनं एवढय़ा गर्दीत मृदंग आणला होता. आपापल्या धर्म-पंथाप्रमाणे आदरणीय देवांना वंदन झालं आणि सुरू झाली कवनं. ‘हरि मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी’ ही रचना तर मंडळींनी विविध चालींत आळवली. लोकल आणि आजूबाजूने जाणाऱ्या ट्रेन्सचा आवाज, हे भजनी स्वर, अन्य लोकांच्या गप्पा- शेवटपर्यंत या ध्वनिप्रदूषणातून सुटका नाही हे केशवरावांनी ताडलं. बरं या मंडळींना सांगायची सोय नाही. धर्म, भक्तीविरुद्ध काही बोलूही शकत नाही, नाही तर त्यांच्यातला दानव जागा व्हायचा. तेवढय़ात ऑफिसमधल्या सहकाऱ्याचा फोन आला. दोघांना काहीच ऐकू येईना. तो पलीकडून म्हणाला- सर, देवळात आहात का? नाही रे ट्रेनमधल्या देवळात आहे. मी तुला टेक्स्ट करतो म्हणून केशवरावांनी फोन कट केला. व्हॉट्सअॅपवर कळवून टाकलं. त्याच वेळी आज भेटू न शकलेल्या ट्रेनसोबतींच्या ग्रुपवर टाकलं- मी देव मानतो. रोज सकाळी पूजा करतो. वर्षांतून दोनदा गोंदवले आणि शेगावला जातो; पण आपल्या भक्तीसाठी सात-आठशे माणसांना दावणीला बांधत नाही मी. चिरंजीव लिहितात तसं फीलिंग इरिटेटेड वगैरे तसंच काहीसं झालंय माझं. उद्या आपल्या डब्यात भेटू या.
परवाची गोष्ट. टीशर्ट-जीन्स, पाठीला सॅक आणि कानात हेडफोन हा साज लेवून सायली बाहेर पडली. मोबाइल सुरू होताच. आर्किटेक्चरच्या कोर्सला असलेल्या सायलीला एक असाइनमेंट देण्यात आली होती आणि डेडलाइन एक दिवसाची फक्त. म्हणूनच सगळी धावपळ उडालेली. कन्टेन्ट जनरेट करणं, प्रिंटआऊट्स, पेनड्राइव्ह, फोनाफोनी हा सगळा व्याप होता. चौकातल्या एका झेरॉक्स सेंटरवाल्याकडे बल्कमध्ये प्रिंटआऊट्स असतील तर ५० पैशांत होतं काम, अशी माहिती सायलीला मिळाली. ग्रुपला इन्फॉर्म केलं तिने, मग काय आठशे पानं भरत होती- सगळ्यांचे पैसे वाचणार होते. चालता चालता विचारांच्या तंद्रीत सायली अचानक वळली. मागून भरधाव वेगाने गाडी येत होती. काही समजायच्या आत सायलीला कोणी तरी बाजूला खेचलं. आपण एका भयंकर अपघातातून वाचलोय याची जाणीव तिला झाली. हा देवदूत कोण पाहायला ती मागे वळली. ती देवीदूत होती. ‘मघापासून बघतेय तुला, नशीब बलवत्तर नाही तर हॉस्पिटलमध्ये असतीस.’ सायलीच्या तोंडून सात-आठ वेळा थँक्स निघालं. ‘आमच्या वेळी असं होतं, तुमची पिढीच वाया गेलेय असं म्हणणार नाही. मोबाइल तुमच्या कामाचा भाग आहे. घरच्यांशी कम्युनिकेट करण्यासाठी आवश्यकही आहे. पण जरा जपून. मोबाइल तुमच्यासाठी आहे, तुम्ही मोबाइलसाठी नाही. एका हेडफोनपायी जीव गेला असता हकनाक. स्वातंत्र्य मिळालंय तुमच्या पिढीला, ते हाताळायचं कसं याचे कोर्सेस अजून निघालेले नाहीत. सो हॅण्डल इट विथ केअर..’ सायली सगळा पसारा गुंडाळून काही बोलणार तोपर्यंत त्या काकू निघूनही गेल्या होत्या. हेडफोन सॅकमध्ये ठेवून सायलीने कॉल घेतला. ‘डिव्हाइन शक्तीमुळे वाचलेय, आल्यावर सांगते सगळं बाय.’
७ ७ ७
शहरातलं पॉश मंगलकार्य. लग्न लागलंय. बॅकग्राऊंडला सनईचे मंजूळ स्वर कानी पडत आहेत. उपस्थितांना पेढे आणि पन्हं देऊन झालंय. वधूवर स्टेजवर बसण्यासाठी तयार होत आहेत आणि दुसरीकडे बुफे ओपन झाल्याची घोषणा होते. वधू-वर यायला वेळ असल्याने तिकडे गर्दी उसळते. अध्र्या-पाऊण तासानंतर माधवराव बुफे सेंटरकडे गेले. पण जेवण्याआधी जेवण झाल्यावर ताट ठेवायच्या ठिकाणी ते गेले. तेवढय़ात भरलेलं ताट घेऊन एक गृहस्थ आले. रोटय़ांचा ढीग, ताटभर पसरलेलं दालफ्राय, कटलेटचे तुकडे, जिलेबीची कडी, व्हेज हंडी हे सगळं असलेलं ताट त्यांनी सहजतेनं सिंकमध्ये ढकललं. टिश्यूला हात पुसून ते जाणार तेवढय़ात मागून आवाज आला- ‘एक्स्क्यूज मी. आपण एकमेकांना ओळखत नाही. खरं तर जेवण हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण अन्नाने भरलेलं ताट टाकून देताना पाहिलं आणि राहावलं नाही. आपल्याला हवं तेवढं आणि हवं ते खाता येण्याची व्यवस्था म्हणजे बुफे. पण तरी तुम्ही अन्नाची नासाडी केलीत. तुम्ही म्हणाल, कोण हा उपटसुंभ मला बोलणारा. लहानपणी अन्नान्नदशा भोगलीय. रिकामं पोट किती यातना देतं ते अनुभवलंय. याच हॉलपासून पुढे दहा मिनिटं गेलात तर एक खानावळ लागेल, हॉटेल वगैरे नाही. साधंच आहे. बेसिक जेवण मिळतं, आणि ताट स्वच्छ केलंत तर दहा रुपये मिळतात.. आदर म्हणून. ती खानावळ मी चालवतो. आमची जाहिरात करण्यासाठी तुम्हाला बोललो नाही. दीडशे वर्षांच्या पारतंत्र्यात अनेक पिढय़ांनी भोगलं. आता स्वातंत्र्य आहे, पण आपण ते गमावण्याचं उद्दिष्ट दिल्यासारखे वागतोय. तुम्ही एकटेच नाही, खूप आहेत. प्रतिताट २३० रुपये आहे. किमान त्या पैशाला तरी जागा.’ माधवरावांच्या बोलण्याने असे अनेक ताटफेकू अवाक झाले. मूळ भरलेला ताट टाकणारा अचंबावस्थेतून बाहेर आला. चारचौघांत अपमानित झाल्याने थोडा वरमला होता, पण थोडं अवसान जमा करून म्हणाला, ‘आधी तुमचा रागच आलेला पण तुमच्या बोलण्यात पॉइंट आहे. उत्साहाच्या भरात घेतलं पण नंतर जाईना. आजचा अपमान विसरणं कठीण आहे, नेक्स्ट वीक तुमच्याकडे येतो आणि ताट स्वच्छ केल्याचं बक्षीस घेतल्यावर आत्मा तृप्त होईल.’
स्वातंत्र्याची ऐशीतैशी करणारे असे अनेक प्रसंग आपल्या रोजच्या आयुष्यात सतत घडत असतात. शाळेत नागरिकशास्त्राच्या पुस्तकात अधिकार आणि कर्तव्ये असा एक प्रकार असतो. अधिकारातून स्वातंत्र्य मिळते. पण स्वातंत्र्याला कर्तव्यांची, जबाबदारींची चौकट असते. आपला आनंद, मजा, आवड बाकीच्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारं ठरत असतं. कधी आपण स्वातंत्र्याचे पाईक असतो, कधी स्वातंत्र्यातिरेकाचे बळी. मैलभर लांब ऐकायला जाईल असे िरगटोन्स, रस्ता अडवून उभारलेले मंडप ही त्याची प्रातिनिधिक उदाहरणं. कोणतंही स्वातंत्र्य आपल्याला मुक्त करतं, सत्ता हाती येते. काय खावं आपल्या हाती. लोक गुटखा, मावा, तंबाखू खातात. अपायकारक पदार्थ खाऊन ते शरीराचं नुकसान करतात हा वैयक्तिक भाग. लाल रंगाच्या पिचकाऱ्यांनी ते सभोवताल रंगवतात-बरं ते स्वच्छ करण्याची जबाबदारी त्यांची नसते. अपघात झाल्यावर धाय मोकलण्यासाठी खूप जण येतात, पण सीटबेल्ट लावणं आणि हेल्मेट परिधान करणं या मूलभूत गोष्टी आपण करत नाही. आपल्याला प्रगतिपथावर नेण्यासाठी मिळालेली संधी म्हणजे स्वातंत्र्य. पण स्वातंत्र्याचं स्वैराचारात रूपांतर करून आपण अधोगतीचा मार्ग पत्करतो. सोशल मीडियामुळे व्यक्त होण्यासाठी आपल्याला व्यासपीठ मिळालंय. पण काहीही कारण नसताना अनेक जण स्वत:ची गोपनीय माहिती आणि वैयक्तिक स्वरूपाचे फोटो त्यावर शेअर करतात. आपण कितीही चांगले असलो तरी जग तसं नसतं. स्वातंत्र्याने शिरजोर झालेली विकृत मंडळी या माहितीचा गैरवापर करतात. असं फुकट मिळालं की किंमत राहत नाही. केवळ या भूमीत जन्माला आलोय या आधारावर आपल्याला स्वातंत्र्य मिळतं. ते मिळवण्यासाठी काहीच कष्ट करावे लागत नाहीत. कदाचित, म्हणूनच त्याचं मूल्य समजून घेण्यात आपण कमी पडतो. लोकशाहीचा धिक्कार करणाऱ्यांना एकदा तालिबानी अफगाणिस्तानमध्ये, कम्युनिस्टांच्या चीनमध्ये, अनागोंदी माजलेल्या पाकिस्तानमध्ये ठेवलं तर स्वातंत्र्याची महती कळेल. दुर्दैवाने बहुतांना व्यवस्थेपेक्षा मीच मोठा हे दाखवण्यात मर्दुमकी वाटते. बरेचसे गुन्हेही स्वैराचारी स्वातंत्र्यातूनच होतात. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येकाला आपण वंदन करतो. पण आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. ते आपण जपलं पाहिजे आणि आपल्या स्वातंत्र्याने दुसऱ्या कोणाचं तरी स्वातंत्र्य धोक्यात येतंय हे ध्यानात ठेवून वागणं हीच स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली ठरेल.
पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com