आपण घर मारे सुंदर सजवलं पण भिंतींच्या सजावटीचा विचारच केला नाही आणि त्या ओक्याबोक्या दिसायला लागल्या तर सगळंच व्यर्थ आहे. म्हणून भिंतींच्या सजावटीचा विचार करणं आवश्यक आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
तुम्हाला असे कधी झाले आहे का की, मनासारखे पाहिजे त्या जागी व पाहिजे त्या किमतीला घर मिळूनसुद्धा, आवडता रंग, महागाचे फíनचर व पडदे लावूनही, किमती शोभेच्या वस्तू घरात ठेवूनही सजावटीत काही तरी कमी वाटते? सगळी सजावट झाली तरी तो जो एक ‘वॉव’ फॅक्टर म्हणतात ना, त्याच्या अभावाची सतत जाणीव होत राहते? काय कारण असावे असे वाटण्याच्या मागे? अनेक कारणांपकी एक मुख्य कारण म्हणजे वेगवेगळ्या जागांना विभागणाऱ्या िभतींकडे केलेले दुर्लक्ष. जमिनीपासून छतापर्यंत पसरलेल्या, साधारण जागेच्या तीन पट क्षेत्रफळ असणाऱ्या या िभती फक्त रंग लावून आपण सोडू नाही शकत. त्यांना सजवण्याचे, त्यांच्याकडे लक्ष वेधून घेण्याचे बरेच उपाय आहेत. त्यातील एक प्रमुख उपाय म्हणजे पेंटिंग्ज लावणे. आज आपण या लेखामध्ये फ्रेम्स व पेंटिंग्जची सजावट कशी करता येईल ते बघू या.
वरकरणी अगदी सोपी वाटणारी गोष्ट कधी कधी आपल्या नाकात दम आणते. मोठय़ा आवडीने, चोखंदळपणे व भरपूर पसे खर्च करून आणलेले पेंटिंग आपल्या दिवाणखान्यात मात्र अगदीच विसंगत दिसते. परिणामी एवढा पाण्यासारखा पसा खर्च करूनसुद्धा सजावट अगदीच बेढब दिसू लागते. त्यातच कुठल्याशा मासिकात किंवा गुगलवर बघून आपण त्याप्रमाणे फ्रेम्सची रचना करतो आणि सजावटीचा सगळा विचकाच होऊन जातो. त्यामुळे आपला गोंधळ अजूनच वाढतो. आपल्याला कळत नाही की का एखादी फ्रेम समतोल साधल्याने का चांगली दिसते तर एखादी तिच्या असमतोलपणामुळे का लक्ष आकर्षति करते! आपली एकच फ्रेम असूनसुद्धा बोजड का दिसते तर मासिकातील पाच वेगवेगळ्या आकाराच्या फ्रेम्ससुद्धा एकमेकींशी सुसंगत दिसतात. हे असे का होते? त्यासाठी खालील काही गोष्टी लक्षात घेणे जरुरीचे आहे-
पेंटिंग खरेदी करताना ज्या खोलीत ते लावणार आहोत त्या खोलीचे आकारमान विचारात घेऊनच पेंटिंग छोटे किंवा मोठ्ठे खरेदी करावे. मोठ्ठे पेंटिंग नीट कळायला थोडे दूर जावे लागते जेणेकरून पूर्ण पेंटिंग डोळ्यात भरेल. छोटय़ा खोलीत असे मोठ्ठे पेंटिंग कितीही चांगले असले तरी आजूबाजूच्या सामानात बोजड दिसायला लागते. एखाद्या व्यक्तिचित्रणातील जाडजूड मिशा जवळून भीतिदायक वाटतात. त्या व्यक्तीचा भारदस्तपणा जाणवण्यासाठी थोडे मागे / दूर जाऊन पेंटिंगचे रसग्रहण करणे जरुरीचे असते. पण अपुऱ्या जागेमुळे भारदस्तपणा जाणवण्याऐवजी लहान मुलांना तो बघ ‘बुवा’ म्हणून भीती घातली जाण्याची जास्त शक्यता आहे. अशा वेळी त्या सुंदर पेंटिंगचा पूर्ण अर्थच बदलून जातो. त्यामुळे अशा छोटय़ा जागी बारीक फ्रेम्स, नाजूक कलाकुसरीचे काम, तपशीलवार (ऊी३ं्र’्रल्लॠ) केलेली पेंटिंग्स िभतीवर लावावीत, ज्याचा आनंद जवळ जाऊन घेता येईल.
त्याच प्रमाणे प्रशस्त खोलीत (जिथे दुरून चित्र पाहू शकतो) किंवा मोठय़ा िभतीवर भव्य निसर्गाचे चित्र, सूर्यास्त, अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग लावल्यास त्या चित्राचे रसग्रहण करणे सोपे जाते. जवळजवळ ठिपके देऊन किंवा ब्रशने छोटे छोटे फटकारे मारून केलेल्या चित्रांचे सौंदर्य दुरूनच उमजते. त्यातील आकारांचे आकलन लांब उभे राहूनच होते. त्यामुळे अशी पेंटिंग्ज दुरून नजरेस पडतील अशी ठेवावीत. त्याचबरोबर लांबलचक िभतीवर कितीही महागाचे, प्रसिद्ध चित्रकाराचे, पण छोटे पेंटिंग लावले तर ते एखाद्या हरवलेल्या कोकरासारखेच दिसेल व सजावटीवर त्याचा शून्य परिणाम होईल. अशा वेळी तीन-चार त्याच आकाराच्या चित्रांचा ग्रूप करून लावल्यास समतोल साधण्यास मदत होईल व सजावटीला उठाव येईल.
खोलीच्या आकारमानाबरोबरच सजावटीच्या संकल्पनेला अनुसरून पेंटिंग्ज घ्यावीत. त्यामुळे सुसंगती व समतोल साधण्यास मदत होते. एखाद्या पारंपरिक सजावटीत अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग जसे विजोड दिसेल तसेच एखाद्या आधुनिक घरात राजस्थानातील गावचा देखावादेखील विजोड दिसेल. त्याचप्रमाणे जर का तीन-चार पेंटिंग्ज एकत्र लावणार असाल तर संकल्पनेला धरून लावणे श्रेयस्कर. नाहीतर पुलंच्या पानवाल्याच्या ठेल्यासारखी हनुमान, त्याच्या शेजारी ट्रेन व त्याच्यावरती राजेश खन्ना अशी चित्रांची सरमिसळ होऊन सगळ्या सजावटीचाच विचका होईल.
िभतीवर लावलेल्या पेंटिंग्जमधील काही रंग, डिझाईन बाकीच्या सजावटीत वापरल्यास सुसंगती, एकसंधपणा येऊन सजावट अजूनच खुलून दिसते.
खूप साऱ्या फोटोफ्रेम्स / पेंटिंग्जची एकत्रित रचना करणे हे कौशल्याचे काम आहे. त्यासाठी िभतीवर खिळे ठोकण्यापूर्वी त्या आकारात पुठ्ठे कापून वेगवेगळ्या रचनांचा अंदाज घ्यावा. मांजर जसे कसेही पडले तरी पायावर उभे राहते त्याचप्रमाणे एखाद्या निष्णात डिझायनरला कुठल्याही आकाराच्या, छोटय़ा मोठय़ा फ्रेम्स दिल्या तरी तो त्यातून अशी रचना करतो की समतोल, सुसंगती, प्रमाणबद्धता आपोआप साधली जाते. पण आपल्या बाबतीत जर कोणाची मदत नसल्यास एकाच आकाराच्या दोन इकडे दोन तिकडे अशा संतुलित रचनेपासून सुरुवात करावी. ही सर्वात सुरक्षित, न चुकणारी रचना. जसजसा आपला आत्मविश्वास वाढेल तसा वेगवेगळ्या आकारांच्या फ्रेम्स घेऊन रचना केल्याचा वेगळाच आनंद मिळतो.
पेंटिंग एखादेच असो किंवा चार-पाच एकत्रितपणे मांडलेली असोत, त्याची िभतीवर व्यापलेली जागा आजूबाजूच्या फíनचरवर खूप अवलंबून असते. बहुतेक वेळा रचना चुकीची भासते कारण पेंटिंग्जची मांडणी व त्याच्या खालील सोफा किंवा पलंग यांचा संबंधच नसतो. दोघेही स्वतंत्र उमेदवारासारखे उभे असतात आणि इथेच सजावटीचा तोल ढळतो. पेंटिंग्जची मांडणी सोफ्याच्या बरोबर मध्यातून दोन्ही बाजूला समान करावी. त्याचप्रमाणे पेंटिंग्जची लांबी/ मांडणी सोफ्याच्या दोन-तृतीयांश तरी पाहिजे. म्हणजे सात फूट लांबीच्या सोफ्यामागे अंदाजे सव्वाचार-साडे चार फूट लांबीचे पेंटिंग चांगले दिसते. ही लांबी मग तुम्ही एकाच पेंटिंगने भरू शकता किंवा तीन-चार एकाच संकल्पनेच्या फ्रेम्स लावूनही भरू शकता. त्याचप्रमाणे माणसाच्या डोळ्याची पातळी ही सरासरी ६०-६२ इंचांवर येते. तेव्हा पेंटिंगची सुरुवात त्यापासून थोडी खाली म्हणजे जमिनीपासून ५०-५२ इंचांवर येईल अशी ठेवावी. यापेक्षा उंचावर किंवा खाली ठेवल्यास पेंटिंग नीट बघता येत नाही.
शेवटी इतर सजावटीसारखीच पेंटिंग्ज / फ्रेम्सची मांडणी करणे ही एक कला आहे. ज्याचा नंबर सजावटीच्या अगदी शेवटी येतो. त्या वेळेपर्यंत आपला उत्साह टिकवून धरणे गरजेचे आहे. तरच आपण घेतलेल्या श्रमाचे व खर्च केलेल्या पशाचे चीज होईल. बऱ्याच लोकांना काही ना काही जमवायचा शौक असतो. त्याची मांडणी कशी करावी त्याचबरोबर पेंटिंग्जसाठीही अजून काही कलात्मक रचना कशा कराव्यात हे पुढील लेखात बघू.
वैशाली आर्चिक – response.lokprabha@expressindia.com