जागेच्या अभावामुळे स्वयंपाकघरे जशी आकाराने लहान व्हायला लागली तशीच घर आणि ऑफिसच्या तालावर नाचणाऱ्या आजच्या स्त्रीसाठी ती सुटसुटीत देखील व्हायला लागली. त्याचाच एक भाग म्हणजे आज लोकप्रिय असलेली मोडय़ुलर किचन्स.

आमच्या व्यवसायात डिझायनर व घरमालक/ मालकीण यांच्यामधील वाद हा नेहमीचाच. तो जास्त मनावर घ्यायचा नसतो. बरेच वेळा वादाचे मुख्य कारण असते कॉन्ट्रॅक्टर्स वेळेवर न येणे किंवा नाहीच येणे, आवाज व कचरा खूप होणे, काम वेळेवर न होणे व सर्वात महत्त्वाचे, झालेले काम मनासारखे (ग्राहकाच्या) न होणे. या प्रकरणात सर्वात वेळखाऊ व किचकट काम कुठले असेल तर स्वयंपाकघराचे. असे म्हणतात की संसारात भांडय़ाला भांडे लागणारच. पण आमच्या या संसारात, न झालेल्या स्वयंपाकघरातील भांडीही एकमेकांना लागून आवाज येत असतो. इथे भातवाढणीपासून सासूच्या सासूने दिलेल्या ठोक्याच्या पातेल्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी जागा करावी लागते. या जागा कधी कागदावर ड्रॉईंग काढून, कधी िभतीवर रेघोटय़ा मारून तर कधी हवेत हातवारे करून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जातो. पण बरेच वेळेला त्यांनी कल्पना केलेले स्वयंपाकघर व प्रत्यक्षातील स्वयंपाकघर यांचा मेळ बसत नाही. अशा वेळी निराशा, चिडचीड, पसे फुकट गेल्याची भावना निर्माण होते. खरे तर यामध्ये आमच्या दोघांचाही दोष नसतो. प्रत्येक गोष्ट ‘लाईनी’तच बोलायची आमची सवय, तर त्या रेघा पाहून भंजाळलेले आमचे क्लायंट्स! ‘आम्ही आधीच सर्व सविस्तर सांगितले होते’ या भ्रमाखाली आम्ही, तर ‘आपल्याला सर्व कळले आहे’ या भ्रमात क्लायंट्स. या भ्रमाचा फुगा सर्व काम झाल्यानंतर फुटतो. अशा वेळी वाटते की फायनल प्रॉडक्ट कसे दिसणार आहे याची सोय असली असती तर चांगले झाले असते. अशाने वेळ, पसा यांचा अपव्यय तरी टाळता आला असता. उशिरा का होईना  देवाने आमचे गाऱ्हाणे ऐकले आणि ‘मॉडय़ुलर किचन’नामक जादुई दुनिया अस्तित्वात आली.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
salesman customer conversation shirt piece joke
हास्यतरंग : कापडाच्या दुकानात…
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू

पूर्वीपासूनच आपली मानसिकता अशी आहे की आपल्या समोर तयार झालेली गोष्ट ही जास्त विश्वासार्ह व चांगली असते. त्यामुळे पूर्वी स्वत: जाऊन चांगल्या प्रतीचा तांदूळ निवडल्यासारखे लाकूड निवडून सुताराकडून लोक कामे करवून घेत. बाकीच्या देशांच्या तुलनेत आपल्याकडे  मनुष्यबळ व मजुरी स्वस्त व सहज उपलब्ध होत असल्याने लोकांचासुद्धा या पारंपरिक सुतारकाम पद्धतीकडेच जास्त कल होता. पण ते दिवस आता संपले. आधुनिकीकरण, वेळेची कमतरता, कुशल व प्रशिक्षित कारागिरांची चणचण, आकाशाला भिडलेले मजुरीचे भाव या गोष्टींमुळे हळूहळू लोकांच्या मानसिकतेत फरक पडत चालला आहे. त्याचबरोबर वर सांगितल्याप्रमाणे एवढे कष्ट घेऊन काम आपल्या मनासारखेच होईल याची शाश्वती नसते. अशा वेळी ‘सीइंग इज बिलीिव्हग’ या तत्त्वानुसार आपले स्वयंपाकघर भविष्यात कसे दिसेल, काय काय सोई मिळतील, दर्जा कसा असेल, किती पसे खर्च होतील ह्य सर्वाची आधीच कल्पना आल्याने मॉडय़ुलर किचनला पसंतीची पावती मिळत आहे. यामध्ये नंतर होणाऱ्या निराशेला, गरसमजाला पूर्ण आळा बसतो. त्याचबरोबर घरात आवाज, धूळ, कचरा होत नाही. सांगितलेल्या दिवशी बाहेरून आणून दोन दिवसांत तुमचे स्वयंपाकघर वापरायला सज्जपण होते ! उत्तम फिनििशग, उत्तम दर्जा, जागेचा इंच न् इंच केलेला वापर, आधुनिक उपकरणांची सोय, ‘ये आवाज ही नहीं करता’ असे म्हणावेसे वाटावे अशा चांगल्या प्रतीची हार्डवेअर्स या सगळ्या गोष्टी निष्णात सुतारालासुद्धा जमणे शक्य नाही. त्यामुळे थोडे जास्तीचे पसे गेले तरी हरकत नाही पण मॉडय़ुलर किचन पाहिजे याकडे आजकाल सगळ्यांचा कल असतो.

खरं तर या प्रकारच्या स्वयंपाकघराची सुरुवात पर्यावरणाचा विचार करून अस्तित्वात आली. सामानाचा कमीतकमी अपव्यय होऊन पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उदात्त हेतूने तयार केलेली ही ‘मॉडय़ुल्स’ म्हणजे मॉडय़ुलर किचन किंवा फíनचर. तुम्ही घरी कधी सुतारकाम करून घेतले असेल तर लक्षात येईल की संपूर्ण काम झाल्यावर बरंच प्लायवूड आणि लाकडाच्या फळ्या/तुकडे अक्षरश: कचऱ्यात फेकून द्यावे लागतात. किती सामान वाया जाते याचा हिशोबच नसतो. उदाहरणच द्यायचे झाले तर, चार फूट बाय आठ फुटांचा आपला नेहमीचा प्लायवूडचा आकार असतो. आपल्या पारंपरिक स्वयंपाकघरात आपण आपल्या गरजेनुसार तीन बाय दोन प्लायवूड वापरून बाकीचा उरलेला तुकडा कुठे फिट होत नाही म्हणून टाकून देतो. पण मॉडय़ुलर किचनमध्ये ही चन आपल्याला परवडत नाही. तिथे प्लायवूडच्या मापावर आधारितच दोनच्या पटीत कपाटाची दारे, रुंदी, उंची बनवली जाते, जेणेकरून कमीतकमी सामानाचा अपव्यय होईल. काही कारणाने तुकडे उरलेच तर त्यांचा वापर एखादी खाच भरायला, स्कìटगसाठी वगरे केला जातो. अर्थात विदेशात या सर्व नियमांची, पर्यावरणाविषयी असलेल्या कर्तव्याची अंमलबजावणी काटेकोरपणे पाळली जाते. आपल्याकडील मॉडय़ुलर किचनमध्ये ग्राहकाच्या सोयीनुसार थोडाफार फेरफार केला जातो. त्याचप्रमाणे आपल्या भारतीय पद्धतीच्या स्वयंपाकघरात सर्व कपाटे एमडीएफ ऐवजी मरीनप्लायमध्ये करून घेणे केव्हाही श्रेयस्कर. ती जास्त टिकतात.

या प्रकारच्या स्वयंपाकघराचे मुख्य आकर्षण म्हणजे ओटय़ाखालच्या व उभ्या कपाटातील ट्रॉलीज. हलकासा धक्का मारून आवाज न करता बाहेर येणाऱ्या या ट्रॉलीज बघून मीठ मोहरीने दृष्ट काढावीशी वाटते. ताट-वाटय़ांपासून उभ्या काचेच्या बाटल्यांपर्यंत स्वयंपाकघरातील प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून जागेचे प्लॅिनग केल्यामुळे आपला डोक्यावरील भार खूप कमी होतो. मग आपला यातील सहभाग राहतो तो म्हणजे, फक्त आपल्या गरजेनुसार किचन निवडणे. माझ्या आणि बऱ्याच लोकांच्या पसंतीला पडलेली एक गोष्ट म्हणजे एल आकाराच्या ओटय़ाखालची कोपऱ्यातील कपाटे. हात पोहोचू न शकल्याने, पूर्वापार अडगळीची जागा म्हणून दुर्लक्षित झालेला हा कोपरा आता फिरत्या ट्रॉलीमुळे आकर्षणाचा भाग झाला आहे. त्याचप्रमाणे मायक्रोवेव्ह, ओव्हनसारखी उपकरणे कपाटातच एका खाली एक रचून दिल्याने स्वयंपाकघर व्यवस्थित दिसते. आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे स्वयंपाकघरातील रेंगाळणारा वास हा तुमचे इम्प्रेशन घालवायला पुरेसा आहे. त्यासाठी आधुनिक चिमणीचा वापर मॉडय़ुलर किचनमध्ये केला जातोच जातो. जिथे शक्य असेल तिथे डिडक्टेबल चिमणी वापरणे केव्हाही श्रेयस्कर. ती जास्त चांगले काम करते. याचा एकच तोटा म्हणजे आपली सामानाची जागा चिमणीच्या पाइपसाठी वाया जाते. दुसऱ्या प्रकारात विनापाइपच्या चिमणीत त्याचा फिल्टर नियमित साफ करावा लागतो. पहिल्या प्रकारापेक्षा दुसऱ्याची कार्यक्षमता जरा कमी असते.

मॉडय़ुलर किचनमध्ये फक्त सुतारकामच नाही तर ओटा घालण्याचे गवंडीकामही करून घेता येते. या  प्रकारात पूर्वापार चालत आलेला काळ्या ग्रॅनाइटऐवजी वेगवेगळ्या रंगातील कोरियन नावाचा कृत्रिम ओटा जास्त वापरला जातो. माणूस विरुद्ध निसर्ग असा तुलनात्मक विचार करायचा झाल्यास माणसाने तयार केलेल्या या ओटय़ाला सध्या जास्त पसंती मिळत आहे. ग्रॅनाइट इतकाच मजबूत, साफ करायला सोप्पा, दिसायला आकर्षक अशा या कोरिअनने प्रवेशद्वारापासून बाथरूमपर्यंत सगळीकडे जागा पटकावली आहे. या मॉडय़ुलर किचनचा अजून एक फायदा म्हणजे किचनचे भाग सुट्टे करून परत दुसऱ्या ठिकाणी तसेच्या तसे जोडता येतात. पारंपरिक स्वयंपाकघराचे तसे होत नाही. ते काढायला गेल्यास तुटूनच हातात येतात. त्यामुळे कपाटे तशीच सोडून दुसरीकडे जावे लागते. त्यात परत दुसरीकडे सुरुवातीपासून स्वयंपाकघराचे काम करावे लागते. ज्यात वेळ व पसा दोन्ही वाया जातो.

फक्त मॉडय़ुलर किचनच नाही तर कुठलेही मॉडय़ुलर फíनचर हे अशा तऱ्हेने बनवले जाते की ते जोडताना चुकीला वावच मिळू नये. या विषयातील प्रशिक्षित टीम ही कधी काही अडचण आली तर त्याचे निवारण करण्यासाठी हजर होते.

तर असे हे मॉडय़ुलर किचन! विनात्रासदायक, सर्व सोयींनी उपलब्ध व आधुनिक. घरातील बाकीच्या खोल्यांच्या सजावटीत उन्नीस-बीस झाले तर फार फरक पडत नाही. पण स्वयंपाकघर व बाथरूम या अशा दोन जागा आहेत की तिथे शंभर टक्के काम चांगले झाले तरच परीकथेतील गोष्टीसारखे शेवटी सगळे सुखाने नांदू लागतात!
वैशाली आर्चिक – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader