घराची सजावट करण्यासाठी खूप पैसे खर्च करण्याची, खूप आटापिटा करण्याची काहीच गरज नसते. अगदी साध्या साध्या उपायांनी, छोटय़ाछोटय़ा गोष्टींमध्ये बदल करून आपण घराचा लुक बदलून टाकू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आजकाल ‘सुखी आयुष्यासाठी काय काय बदल करावेत’ याबद्दल मोठमोठ्ठी सेमिनार्स घेतली जातात. खरं तर सेमिनार्सला जायचीही गरज नाही. हे बदल सुचवणारी बरीच मंडळी आपल्या आजूबाजूलाच असतात. प्रकृतीच्या तक्रारी संदर्भात डॉक्टरांना भेटले तर त्यांनी सांगितले खाण्याच्या सवयी बदल, नवरा म्हणतो स्वभाव बदल, मुलगी म्हणते स्वतची स्टाइल बदल, गर्दी टाळण्यासाठी रस्ते बदल! एक ना दोन. प्रत्येकजण दुसऱ्याला बदल सुचवत असतो. बदल करायचे मुख्य कारण असते, स्वतच्या व दुसऱ्याच्या आयुष्यातील त्रास कमी करून नावीन्य व चतन्य आणणे. असते लहान गोष्ट, पण बरेच वेळेला याकडे दुर्लक्ष केले जाते. आपल्या सवयींप्रमाणेच अजून एका ठिकाणी बदल करणे आपल्या व कुटुंबाच्या दृष्टीने आवश्यक आहे, ती गोष्ट म्हणजे गृहसजावटीतील बदल. वर्षांनुवष्रे तीच सजावट, तोच िभतीवरचा रंग, तोच पिवळा पडलेला ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट फोटो, मुलीला मुलगा झाल्यावरही घरातल्या भिंतीवर तिने सातवीत असताना केलेली तीच ती भरतकामाची फ्रेम.. अशा कितीतरी गोष्टी आपल्या आजूबाजूला तशाच असतात. आपली छोटीशी सवय बदलून आपल्या आयुष्यात हवा तो परिणाम साधता येतो, तर तुम्हाला असे नाही वाटत की गृहसजावटीत थोडे बदल केल्यास त्याचा आपल्यावर सकारात्मक परिणाम होईल? आपण आपल्या नेहमीच्याच घराच्या नव्याने प्रेमात पडू? या लेखात गृहसजावटीत असे सोप्पे, पटकन करता येणारे कोणते बदल आहेत हे पाहू.

नुकतीच दिवाळी येऊन गेली. त्यानिमित्ताने वर्षभर एकाच जागी उभी असलेली कपाटे, सोफे, पलंग पुढे ओढून साफसफाई केली गेली असेलच. पण फक्त साफसफाईपेक्षा त्यांच्या रचनेत, जागेत बदल केले तर आहे तीच जागा किती वेगळी भासते याचा प्रत्यक्ष अनुभव कधी घेतला आहे? आपल्या नेहमीच्या एकसुरी, कंटाळवाण्या आयुष्यात हा बदल किती नावीन्य आणतो हे असे नुस्ते सांगून कळणार नाही. जसे कोणा माणसाला गृहीत धरू नये, तसेच फíनचरलाही त्याच जागी गृहीत धरणे सोडले पाहिजे. माझ्या बाबांना एक सवय होती. ते फíनचरची सतत हलवा हलवी करायचे. कित्येकदा मी मागे खुर्ची आहे म्हणून बसायला जाऊन खाली आदळले आहे. खुर्चीची जागा कॉफी टेबलाने, सोफ्याची जागा दिवाणाने, छोटय़ा कपाटाची जागा पितळेच्या मूर्तीने, काहीच नाही तर ही कुंडी तिथे-तिकडची इथे असे बदल व्हायचेच व्हायचे. कधी कधी आमची फार चिडचिड व्हायची. पण एकमात्र आहे, या अशा बदलामुळे दर तीन-चार दिवसांनी आमचे घर आम्हाला नव्याने भेटायचे. आज घरी काय नवीन बघायला मिळेल याचा उत्साह असायचा. फíनचरची जागा काही कारणाने बदलणे शक्य नसेल तर शोपीस, फुलदाणी, उशा व लोडांची जागा किंवा त्यांची रचना बदलली तरी छान वाटते. काहीच नाही तर फुलदाणीत रोज वेगवेगळी फुलेसुद्धा वातावरणात बदल घडवून आणतात. माणसाला सतत नावीन्याचा ध्यास असतो. रोजच्या त्याच त्या रुटिनला कंटाळलेल्या मनाला हा छोटा बदलपण तरतरी आणतो.

फíनचरच्या मांडणीबरोबर िभतीवर लावलेली पेंटिंग्जसुद्धा बदलणे जरुरीचे आहे. कुठलेही पेंटिंग लक्ष वेधून घेते. आपला मूड बदलण्याचे काम एखादे पेंटिंग परिणामकारक रीतीने करते. वर्षभर िभतीवर असलेली जुनी पेंटिग्ज काढून त्याजागी नवीन पेंटिग लावा किंवा एका खोलीतील पेंटिंग दुसऱ्या खोलीत लावा. मग खोलीचे रूप व आपला मूड दोन्हीही बदलून जाते.

िभतीवरील गुळगुळीत रंग घराला शोभा आणतो. पण दरवर्षी घरात रंगकाम काढणे शक्य नसते. पण रंगीत वातावरण काय फक्त भिंतींना रंग देऊनच निर्माण होते का? त्यासाठी अनेक मार्ग आहेत. जशा वेगवेगळ्या रंगाच्या सोफ्यावारच्या उश्या, पडदे, एव्हढेच नव्हे तर टेबलक्लॉथ वापरून सजावट आकर्षक होऊ शकते. यासाठी फार खर्च करायची आवश्यकता नसते. त्याच प्रमाणे रंग द्यायचाच झाला तर पूर्ण घरालाच रंग द्यायला पाहिजे असे कुठे आहे? केशरी, निळा, पिवळा वगरे आकर्षक रंग फक्त उघडय़ा शेल्फ्सना, दारांच्या चौकटीला देऊनही आपण इच्छित परिणाम साधू शकतो. मग बघा कशा या साध्या, दुर्लक्षिलेल्या गोष्टी चच्रेचा विषय होऊन बसतात ते.

एकदा काय झाले, देवाने बघितले की घरात सजावटीचे काम काढल्यावर लोकांना खूप त्रास होतो. धूळ, आवाज, कचरा यांनी त्रस्त झालेल्या लोकांची त्याला मनोमन दया आली आणि त्याने समस्त मानव जातीला या त्रासापासून मुक्त होण्यासाठी दोन वर दिले. एक म्हणजे वॉलपेपर व दुसरा म्हणजे व्हिनाइल टाइल्स. राहत्या घरात रंगकाम काढल्यावर पुढचे दहा दिवस माणूस हैराण होऊन जातो. अशा वेळी एका दिवसात सजावटीला उठाव आणणारा वॉलपेपर म्हणजे थंडगार पावसाची सरच जणू. आजकाल पाहिजे त्या रंगात, पाहिजे त्या डिझाइनमध्ये वॉलपेपर मिळतो. काही खास प्रसंगासाठी ऐनवेळी सजावटीत काही बदल करायचे  झाल्यास वॉलपेपर अवश्य वापरा. एखादी िभत, उघडय़ा खणात, आरशाच्या मागे, प्रवेशद्वारासमोर कुठेही वॉलपेपर लावून सजावट आकर्षक करता येते. एवढेच कशाला वॉलपेपर फक्त िभतीलाच लावला पाहिजे असे नाही. एखाद्या नजरेत भरणाऱ्या डिझाइनचा वॉलपेपर छताला लावून लोकांकडून वाहव्वा मिळवू शकता.

रंगकामासारखेच अजून एक किचकट काम म्हणजे जमिनीच्या टाइल्स बदलण्याचे. इथेसुद्धा वॉलपेपरसारखा झटपट उपाय म्हणजे व्हिनाइल टाइल्स. दीड आणि दोन मिलिमीटर जाडीमध्ये उपलब्ध असलेल्या या टाइल्स, काहीही तोडफोड न करता एका दिवसात लावून होतात. धूळ नाही, आवाज नाही की कचरा नाही. एकदम स्वस्त आणि मस्त.

अजून काही झटपट व परिणामकारक बदल म्हणजे जुने दिवे बदलून शोभेचे आकर्षक दिवे (झुंबर) लावणे, नवीन झाडांच्या कुंडय़ा/बोन्साय ठेवणे, पडदे/कुशन्स/शोभेच्या वस्तूंद्वारे खोलीत रंग भरणे, वेगळ्या आकाराचा आरसा लावणे, खोलीच्या केंद्रस्थानी पारंपरिक शोभेची वस्तू ठेवणे वगरे कितीतरी गोष्टी करू शकतो. बदल छोटा असुदे किंवा मोठा, घर छान दिसणारच.

दिवाळी आली आणि गेलीसुद्धा. दरवर्षी प्रमाणे ही दिवाळी सगळ्यांना सुख आणि बोनस घेऊन आली असणार. या आनंदासाठी आता पुढील वर्षभर वाट बघावी लागणार. पण जर तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे अधूनमधून गृहसजावटीत बदल करत राहिलात तर येत्या वर्षभरात कितीतरी वेळा अपेक्षेपेक्षा जास्त बोनस मिळाल्यासारखा आनंद होईल हे मी खात्रीने सांगते.
वैशाली आर्चिक – response.lokprabha@expressindia.com