दिग्दर्शक कबीर खानचा ‘बजरंगी भाईजान’ प्रदर्शित झाला आणि सिनेमागृहात सलमानच्या फॅन्सची गर्दी झाली. भव्यदिव्य सेट, लोकेशन्स, सामाजिक विषय अशा सगळ्या गोष्टींचा सिनेमात नेहमी समावेश करणारा कबीर सध्याचा बॉलीवूडचा सुपरहिट दिग्दर्शक आहे. डॉक्युमेंटरी, खरी लोकेशन्स, फोटोग्राफी अशा अनेक विषयांबाबत कबीर यांच्याशी केलेली बातचीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तुमचा ‘बजरंगी भाईजान’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. लगेच पुढच्याच महिन्यात ‘फँटम’ प्रदर्शित होतोय..
– हो, खरंय. ‘बजरंगी भाईजान’नंतर साधारण महिन्याभराच्या अंतराने ‘फँटम’ प्रदर्शित होतोय. पण, दोन्ही सिनेमे वेगवेगळ्या धाटणीचे आहेत. ‘बजरंगी भाईजान’ हा धर्मनिरपेक्षतेवर आधारित आहे. या सिनेमात एका पाकिस्तानी मुलीला पुन्हा तिच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा एका भारतीय माणसाचा प्रयत्न दाखवला आहे. ‘फँटम’ हा सिनेमा २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतरच्या घटना आणि जागतिक दहशतवाद यावर भाष्य करतो. सामाजिक पाश्र्वभूमी असणारे मुख्य प्रवाहातले विषय हाताळण्याचा मी नेहमी प्रयत्न करतो. या दोन्ही सिनेमांमध्येही तोच प्रयत्न दिसेल. ‘बजरंगी भाईजान’ची संकल्पना तेलुगु लेखक आणि दिग्दर्शक व्ही. विजयेंद्र प्रसाद यांची आहे. मी या सिनेमासाठी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. माझ्या सिनेमाचे संवाद आणि पटकथा मी लिहिले तरच तो सिनेमा मला माझा वाटतो.
पूर्वी अनेकदा परदेशी प्रवास करताना तुमच्या आडनावामुळे तुमच्यावर संकटं ओढवली आहेत. अशा घटनांमुळेच तुमच्या सिनेमांचे विषय ‘धर्मनिरपेक्षता’, ‘दहशतवाद’ असे असतात का?
– ‘धर्मनिरपेक्षता’ माझ्या विचारसरणीचाच एक भाग आहे आणि त्यातूनच ‘बजरंगी’सारखा सिनेमा निर्माण झाला आहे, पण आडनावांबाबत सांगायचं तर आडनावांवरून केला जाणारा वंशभेद मला खटकतो. एक सिनेमाकर्त्यांच्या नात्याने माझ्या मनातली या वंशभेदाच्या विरुद्ध असलेली चीड, वेदना ‘काबूल एक्स्प्रेस’ आणि ‘न्यूयॉर्क’ या सिनेमांमधून मांडली गेली आहे. असं असलं तरी, दिग्दर्शक म्हणून पडद्यावर प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी रोमांचकारी कथा दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो. पण, जेव्हा मी पटकथा लेखक असतो तेव्हा माझी विचारसरणी त्या कथेत डोकावते. त्यामुळे मी जे मांडलेलं असतं ते सूचक असलं तरी प्रेक्षकांपर्यंत अचूक पोहोचतं आणि तो सिनेमा बघणं त्यांच्यासाठी आनंददायी ठरतं.
तुम्ही ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘फँटम’ या दोन्ही सिनेमांचं शूटिंग काश्मीरमध्ये केलं आहे. त्या अनुभवाविषयी सांगा.
– जम्मू-काश्मीरमध्ये ‘बजरंगी’चं बऱ्याच दिवसांचं शूट झालं. तर ‘फँटम’चं शूट आम्ही गुलमर्गमध्ये केलं. पुन्हा तिकडे जाणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. जर सलमान खानसारखा सुपरस्टार काश्मीरमध्ये कोणत्याही सुरक्षेशिवाय शूट करू शकतो तर हा इतरही कलाकार, असं करू शकतात असं मी म्हणेन. जेव्हा आम्ही काश्मीरमध्ये पोहोचलो तेव्हा करीना खूप भावुक झाली होती. लहानपणी ती तिच्या कुटुंबीयांसोबत शूटसाठी तिथे जायची. काश्मीरमध्येच दूरच्या डोंगराळ भागात शूट करीत असलो तरी तिथे हजारो लोक मुख्य कलाकारांना बघायला गर्दी करायचे.
सलमान खान बॉलीवूडच्या मुख्य प्रवाहातला स्टार आहे. ‘काबूल एक्स्प्रेस’ हा सिनेमा करण्याआधी तुम्ही डॉक्युमेंटरी फिल्ममेकर होतास. तुम्हाला दोघांना एकत्र काम करताना काही अडचणी आल्या का?
– ‘एक था टायगर’ या सिनेमाच्या वेळी काही अडचणी आल्या. पण, त्या फारच किरकोळ होत्या. सिनेमाचं शूटिंग संपेपर्यंत आमची खूप चांगली मैत्री झाली. काश्मीर, राजस्थान, दिल्ली, मुंबई या ठिकाणी ‘बजरंगी’चं शूट करणं सोपं गेलं. कारण सलमानचा सिनेमावर खूप विश्वास होता.
विविध प्रोजेक्ट्ससाठी तुम्ही ठिकठिकाणी प्रवास करता. तुमच्यासाठी सिनेमांतली लोकेशन्स हा किती महत्त्वाचा मुद्दा असतो?
– डॉक्युमेंटरी फिल्ममेकर म्हणून मी अनेक र्वष भरपूर प्रवास केला आहे. त्यामुळे आता मला सेट उभारून तिथे शूटिंग करणं ही पारंपरिक पद्धत फारशी रुचत नाही. खरी लोकेशन्स सिनेमाच्या कथेला एक वेगळाच बाज देतात. त्यामुळेच ‘काबूल एक्स्प्रेस’ या माझ्या पहिल्या सिनेमात अफगणिस्तान हे एखाद्या व्यक्तिरेखेसारखंच अवतरलं आहे. ‘न्यूयॉर्क’ (२००९) या सिनेमाच्या बाबतीतही तसंच झालं आहे. माझ्यामध्ये असलेल्या भटक्याचा मला सिनेमाची लोकेशन्स शोधण्यासाठी चांगलाच उपयोग होतो. माझा कोणताही सिनेमा सुरू करण्यापूर्वीच्या कामांपैकी लोकेशन्स शोधणं एक अविभाज्य भाग झाला आहे. आजवर मी ७० देशांमध्ये फिरलोय. त्यामुळे या देशांचा डाटाबेस माझ्या डोक्यात एकदम पक्का आहे.
डॉक्युमेंटरीकडून सिनेमांकडे येण्यासाठी कोणती गोष्ट कारणीभूत ठरली?
– डॉक्युमेंटरी फिल्ममेकर्सना आपल्या देशात फारसं महत्त्व नाही. विविध विषयांवरील आंतरराष्ट्रीय मुद्दे, राजकीय घडामोडी यांवर मी डॉक्युमेंटरी करायचो. अशा डॉक्युमेंटरीसाठी विशिष्ट बजेटची आवश्यकता असते. त्यासाठी मला आंतरराष्ट्रीय संस्थांकडून निधी मिळत असला तरी मला असं वाटायचं की, या डॉक्युमेंटरीजमुळे मोठय़ा प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचायला मर्यादा येत आहेत. आपल्या देशात अशा पद्धतीने जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचं असेल तर मुख्य प्रवाहातील सिनेमा हाच एकमेव महत्त्वाचा पर्याय आहे. कारण हा सिनेमा जेवढय़ा प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो तेवढं इतर कोणतंही माध्यम पोहोचू शकत नाही. अर्थात, आज मला सिनेमा बनवण्यासाठी जे काही लागतं त्याचं मूळ मला डॉक्युमेंटरीमधूनच मिळालं आहे.
डॉक्युमेंटरीसाठी छोटय़ा सेट-अपमधून आता सिनेमासाठी मोठय़ा सेट-अपबरोबर काम करणं तुम्ही कसं जुळवून घेतलं?
– मी बराच काळ अगदी छोटय़ा म्हणजे दोन माणसांच्या क्रूबरोबरही काम केलं आहे. त्यामुळे आता सिनेमा करताना सुरुवातीच्या काळात मी सेटवर आल्यावर मला तिथे एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर लोक वावरताना बघून आश्चर्य वाटायचं आणि असा प्रश्न पडायचं की हे एवढे लोक इथे काय करताहेत. सुरुवातीच्या काळात अनेक गोष्टी मी स्वत:च करायचो आग्रह धरायचो. पण, आता मी इतरांवर काम सोपवणं शिकलो आहे. तरीही प्रत्येक विभागात काय चालू आहे याकडे माझं बारीक लक्ष असतं.
काही ठरावीक कलाकारांसोबतच तुम्ही काम करता असं दिसतं. ‘बजरंगी..’ हा सिनेमा सलमानसोबतचा दुसरा सिनेमा आहे तर ‘फँटम’ हा कतरिना कैफसोबतचा तुमचा तिसरा सिनेमा आहे.
– विशिष्ट कलाकारासोबत टय़ुनिंग जुळलं की, नव्या सिनेमासाठी तुम्ही सगळ्यात आधी त्याचाच विचार करता. मात्र, तो कलाकार त्या भूमिकेसाठी योग्य असणं, हेही तितकंच महत्त्वाचं असतं. ‘बजरंगी’मधल्या रसिका या व्यक्तिरेखेसाठी कतरिना शोभली नसती म्हणून तिच्याऐवजी करीनाला घेतलं. ‘न्यूयॉर्क’ हा सिनेमा नवाझुद्दीन सिद्दिकीचा मुख्य प्रवाहातला पहिला सिनेमा होता. त्याच्यासोबत काम करताना मी खूप एन्जॉय केलं होतं. पण, त्याच्यासोबत पुन्हा काम करण्यासाठी मला ‘बजरंगी’पर्यंत थांबावं लागलं. या सिनेमात त्याची खूप चांगली भूमिका आहे.
तुम्ही आजही कॅमेरा घेऊन घराबाहेर पडून वास्तववादी चित्रण करता का?
– अर्थातच. आजही मला फोटोग्राफीचं वेड आहे. एखाद्या चांगल्या ठिकाणी जाणं आणि त्या जागेचं सौंदर्य माझ्या कॅमेऱ्यात टिपणं हे मला आजही रिफ्रेशिंग वाटतं. ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘फँटम’ हे दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्यानंतर मी असाच कॅमेरा घेऊन फोटो काढण्यासाठी भटकणार आहे.
अनुवाद- चैताली जोशी
(इंडियन एक्स्प्रेस ‘आय’मधून)
अलका साहनी – response.lokprabha@expressindia.com