दगडाचे चित्र, त्यात काय गंमत असा प्रश्न एखाद्याच्या मनात येऊ शकतो. असा प्रश्न आलाच तर पेन्सिल उचलून दगडाचे स्केच करण्याचा किंवा ब्रश उचलून दगड चितारण्याचा प्रयत्न एकदा करून पाहा. मग दगड चितारणे ही सोपी गोष्ट नाही हे लक्षात येईल. अनेकदा साध्या वाटणाऱ्या गोष्टी जिंवत करण्यामध्येच चित्रकाराचे कसब पणाला लागते. जितेंद्र पाटील या तरुण चित्रकाराच्या प्रस्तुतच्या चित्रामध्ये ओबडधोबड दगडाची त्याच्याच असमान पातळ्यांमध्ये पडलेली कमीअधिक सावली आणि सावलीमध्ये असलेला प्रकाशाचा कमीअधिक भास, कुठे प्रकाशाचे झालेले थोडेसे परावर्तन या सर्वामधून दगडांची ही रचना प्रत्ययकारीपणे जिवंत होऊन आपल्यासमोर येते. हे करताना चित्रकाराची दृश्यनिरीक्षणशक्ती पराकोटीची असावी लागते. जितेंद्र पाटील याचे यश त्यामध्येच आहे.
जितेंद्र पाटील – response.lokprabha@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा