चित्रकार चित्रविषय कोणता निवडतो यावरही त्याचे कौशल्य लक्षात येते. सर्वसाधारणपणे सामान्य विषय चित्रकारांकडून अधिक हाताळले जातात. मग त्यात ठोकळेबाज पद्धतीने व्यक्तिचित्रण किंवा प्रसंगचित्रण पाहायला मिळते. चांगले चित्र हे ठोकळेबाज नसते. चित्रकार संजय शेलार यांनी चितारलेले प्रस्तुतचे चित्र हे त्या ठोकळेबाजपणाला छेद देणारे व म्हणूनच चांगले आहे. शेलार यांची चित्रणशैली तर उत्तम आहेच पण त्याचबरोबर त्यांनी चित्रणासाठी निवडलेला क्षणदेखील तेवढाच जिवंत आहे. मुलांची उत्फुल्लता विषय जिवंत करते. शेलार यांचे हे प्रदर्शन वरळीच्या नेहरू सेंटरमधील कलादालनात   १४ डिसेंबपर्यंत पाहता येईल.

Story img Loader