अभिनव कला महाविद्यालयातून कला शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्नेहल पागे यांनी अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील स्टुडिओ इन्कामिनाटी येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आजवर अनेक स्पर्धा आणि प्रदर्शनांतून सहभाग घेणाऱ्या स्नेहल यांना ‘पोटर्र्ेट सोसायटी ऑफ अमेरिका’चा सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स आणि ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’चा आउटस्टँडिंग रिअ‍ॅलिस्टिक पेंटिंग आदी प्रतिष्ठेचे पुरस्कारही मिळाले आहेत. व्यक्तिचित्रण हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय आहे. वरळीच्या नेहरू सेंटर कला दालनामध्ये स्नेहल पागे यांचे चित्रप्रदर्शन ३१ ऑगस्टपर्यंत पाहता येईल. आपल्या आवडत्या कलेत, कामात किंवा विचारांमध्ये मग्न असलेल्यांच्या व्यक्तिरेखा या प्रदर्शनात पाहायला मिळतील.
स्नेहल पागे

Story img Loader