आपण कुठेकुठे फिरतो, प्रवास करतो, समुद्राकडे, जमिनीवर, वाळवंटात. त्यातलं काही वर पृष्ठभागावर येतं. काही चित्रात उमटतं. काही गळून पडतं, मागे राहतं. पण मनात खोलवर रुतून बसतं. काही प्रतिमा वर्षांनुवर्षे मनाच्या खोल तळाशी हेलकावे खातात. मनाच्या उत्खननात काही प्रतिमा हाती लागतात. त्यातल्या काही एकमेकींना जोडल्या जातात, परस्परांपासून कधी त्या तुटतात, तर कधी एकमेकांमध्ये मिसळून जातात, धूसर होतात. त्या प्रतिमांचे तयार होतात, प्रदेश. प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांचे ‘प्रदेश’ हे प्रदर्शन ३१ ऑगस्टपर्यंत जहांगीर कला दालनात पाहता येईल.

Story img Loader