कोलंबिया, पेरूवर विजय उरुग्वेकडून चिलीचा धक्कादायक पराभव
रशियात २०१८ मध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पध्रेच्या पात्रता फेरीत अर्जेटिना आणि ब्राझील हे दक्षिण अमेरिकेतील प्रमुख संघ विजयपथावर परतले आहेत. अर्जेटिनाने कोलंबियावर तर ब्राझीलने पेरूवर विजय साजरा केला. मात्र कोपा अमेरिका स्पध्रेचे जेतेपद नावावर करणाऱ्या चिलीला पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
दक्षिण अमेरिका गटासाठीच्या पात्रता फेरीत तीन सामन्यांत केवळ दोन गुणांवर समाधान मानावे लागलेल्या अर्जेटिनाने पहिल्या विजयाची नोंद केली. बॅरांक्युइला येथे मंगळवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत त्यांनी लुकास बिग्लीआच्या गोलमुळे कोलंबियाला १-० असे नमवले. ब्राझीलने पात्रता फेरीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद करताना साल्व्हाडोर येथील सामन्यात पेरूवर ३-० असा दणदणीत विजय साजरा केला. बायर्न म्युनिकचा प्रमुख खेळाडू डॉगलस कोस्टाने एक गोल केला आणि रेनाटो ऑगस्टो व फिलीप लुईस यांना गोल करण्यात मदत करून विजयात सिंहाचा वाटा उचलला.
मोंटेव्हिडीओ येथे झालेल्या सामन्यात उरुग्वेने कोपा अमेरिका स्पध्रेतील उपांत्यपूर्व फेरीत झालेल्या पराभवाचा वचपा काढला. उरुग्वेने गॉडीन, ए. परेरा व कॅसेरेस यांच्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर चिलीचा ३-० ने पराभव केला. या विजयामुळे उरुग्वेने चार सामन्यांत नऊ गुणांसह दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. १२ गुणांसह इक्वेडोरने अव्वल स्थान कायम राखले आहे. इक्वेडोरने ३-१ अशा फरकाने व्हेनेझुएलाचा पराभव करून सलग चौथ्या विजयाची नोंद केली.
ब्राझीलने (७ गुण) तिसऱ्या स्थानावर झेप घेत पेराग्वे आणि चिली यांना गोल फरकाने मागे टाकले. अर्जेटिनाने सहावे स्थान मिळवले आहे. मात्र, विश्वचषक पात्रता मिळवण्यासाठी अव्वल पाचमध्ये त्यांना स्थान निश्चित करावे लागणार आहे. विश्वचषक स्पध्रेसाठी संघ पात्र ठरेल, असा आत्मविश्वास अर्जेटिनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. कारण पुढील पात्रता फेरी मार्च २०१६ मध्ये होणार आहे. तोपर्यंत त्यांचे प्रमुख खेळाडू लिओनेल मेस्सी, सेर्गिओ अ‍ॅग्युएरो आणि कार्लोस तेवेझ हे दुखापतीतून पूर्णपणे सावरले असतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संक्षिप्त निकाल
कोलंबिया : ० पराभूत वि. अर्जेटिना : १ (लुकास बिग्लीआ १९ मि.).
व्हेनेझुएला : १ (जोसेफ मार्टिनेझ ८४ मि.) पराभूत वि. एक्वेडोर : ३ (फिडेल मार्टिनेझ १५ मि., जेफेर्सन माँटेरो २३ मि., फेलिप सैसेडो ६० मि.).
पेराग्वे : २ (डॅरिओ लेझकानो ६१ मि., लुकास बॅरीओस ६४ मि.) विजयी वि. बोलाव्हिआ : १ (यस्मानी डय़ूक ५९ मि.).
उरुग्वे : ३ (उरुग्वेने गॉडीन २३ मि., ए. परेरा ६१ मि., कॅसेरेस ६५ मि.) विजयी वि. चिली : ०.
ब्राझील : ३ (डॉगलस कोस्टा २२ मि., रेनाटो ऑगस्टो ५७ मि., फिलीप लुईस ७६ मि.) विजयी वि. पेरू ०.
ब्राझीलच्या डॉगलस कोस्टाने गोलकेल्यानंतर संघसहकारी नेयमारसह जल्लोश केला.