अ‍ॅक्सेसरीज म्हटलं की पर्स, शूज, गॉगल, मोबाइल हेच डोळ्यासमोर येतं. पण बेल्ट हासुद्धा त्यातला एक महत्त्वाचा घटक आहे. थोडा विचार केला वेगवेगळे बेल्ट वापरून आपण लूकमध्ये केवढी तरी व्हरायटी आणू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अ‍ॅक्सेसरीज्च नाव घेतलं तर तुमच्या डोळ्यासमोर सर्वात पहिल्यांदा येणाऱ्या गोष्टींची यादी काढू शकाल का? त्याची सुरुवात होईल, बॅग्स, ज्वेलरी, शूजपासून आणि कुठेतरी मोबाइल, सनग्लासेसवर येऊन थांबेल. पण या सगळ्या यादीमध्ये एका गोष्टीकडे आपण नेहमीच कानाडोळा करतो. ती कोणती आठवा पाहू? काय झालं, लक्षात नाही येत आहे? चला एक क्लू देते. सकाळी ऑफिसला जायला तुम्ही निघता आहात. प्रचंड गडबड गोंधळ चाललाय, त्यात लक्षात आलं, अरेच्चा इस्त्रीवाल्याने कपडे इस्त्री करून दिलेच नाहीत. मग आता डेनिम कोणती घालायची? म्हणून वॉडरोबमधली जुनी डेनिम रागाने काढून पटकन घातलीत आणि तयार झालात. घरातून निघाल्यावर, अचानक जाणवतं डेनिम थोडी सैल आहे ना.. आणि तेवढय़ात डोक्यात टय़ूब पेटते आणि लक्षात येतं, बेल्ट लावायचा विसरूनच गेलो. नाही का..

काय झालं, मगाशी तुमच्या डोळ्यासमोर आलेल्या यादीमधून हे नाव राहून गेलेलं हे आठवलं ना.. बेल्ट ही अशी अ‍ॅक्सेसरी आहे जी केवळ ‘शो’साठी उपयोगात येत नाही, तर तिचा प्रत्यक्षात उपयोगसुद्धा असतो. पण त्याच वेळी रोजच्या घाईमध्ये याच बेल्टकडे फार कमी लक्ष दिलं जातं. कित्येकदा एकच काळा नाहीतर ब्राऊन बेल्ट आणून, आयुष्यभर रगडूयात असा विचार केला जातो, तर कधी एकदा भाऊबीज येतेय आणि बहीण आपल्याला बेल्ट गिफ्ट करतेय (जेणेकरून आपला बेल्ट विकत घ्यायचा त्रास वाचेल) याची एखादा वाट पाहत असतो. पण हाच बेल्ट आपल्या लूकमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, हे मात्र आपल्याला कित्येकदा ठाऊक नसते. त्यामुळे चला आज आपण या बहुपयोगी बेल्टबद्दल बोलूयात.

मुलांना बेल्ट्समध्ये फारसे ऑप्शन्स नसतात. पण फॉर्मल अटायरवर शक्यतो लेदर बेल्ट्स वापरणे योग्य. लेदरचे बेल्ट्स काळ्या, ब्राऊन आणि र्बगडी शेडमध्ये मिळतात. नेहमीचे काळे बेल्ट सूटवर उत्तम मॅच होतात, तर ब्राऊन आणि र्बगडी बेल्ट डेनिम पँटवर घालता येऊ शकतात. पण त्यातही तुमच्या बेल्टची शेड शूजसोबत मॅच होईल याची काळजी नक्की घ्या. नाहीतर हा फरक पटकन नजरेत भरतो. काळ्या सूटसोबत ट्विस्ट म्हणून ब्राऊन बेल्ट आणि शूज नक्कीच ट्राय करू शकता. पण कॉलेजला जाताना कॅज्युअल लूकसाठी सध्या रेग्झीनचे किंवा ब्रेडेड (वेणीसारखा गुंफलेला) कलरफुल बेल्ट्स बाजारात मिळतात. ते नक्कीच ट्राय करू शकता. फंकी कॅन्व्हास शूजसोबत हे बेल्ट्स मस्त दिसतात.

मुलींसाठी तर बेल्ट्सच्या बाबतीत भरपूर पर्याय आहेत. सुरुवात करूयात फॅब्रिक बेल्टपासून. जॉर्जेटचे प्रिंटेड स्कार्फ तुम्ही केप्रीज किंवा डेनिमवर बेल्ट म्हणून वापरू शकता. या बेल्ट्सचा वापर फॅन्सी अ‍ॅक्सेसरी म्हणून करू शकता. पण हे बेल्ट्स वापरताना टी-शर्ट किंवा गंजी शॉर्ट असू द्यात आणि प्रिंटेड टी-शर्ट्सऐवजी प्लेन सटल किंवा बोल्ड रंगाचे असावे. जेणेकरून हा बेल्ट तुमच्या लूकचा हायलाइट ठरू शकेल.

याशिवाय डेनिमवर वापरण्यासाठी नेहमीच्या बेल्ट्सऐवजी ब्रेडेड, शेप्ड, प्रिंटेड अशा कित्येक फॅन्सीचा पर्याय तुमच्यासमोर आहेच. पण जर तुम्ही बेल्ट फॅन्सी वापरत असाल तर, टय़ुनिक सटल शेडमध्ये असू द्यात. याच्या अगदी विरुद्ध प्रिंटेड टय़ुनिक्स वापरणार असाल तर मात्र बोल्ड शेडचे बेल्ट वापरा. पण छोटासा बेल्ट केवळ गरज म्हणून वापरण्यापेक्षा छान मोठा बेल्ट घालून पाहा. स्वत:चं एक स्टाइल स्टेटमेंट तयार करू शकता.

वन पीस ड्रेस घालायला सर्वाना आवडतं. बेल्ट्स वापरून त्यातही तुम्ही छान व्हेरिएशन आणू शकता. प्लेन वन पीस ड्रेसवर कॉन्ट्रास फॅब्रिक बेल्ट किमोनो स्टाईलने बो बांधू शकता. किंवा प्रिंटेड ड्रेसवर मोठे बेल्ट वापरून वेगळेच स्टाइल स्टेटमेंट तयार करू शकता. सध्या क्रिस्टल किंवा ब्रेडेड बेल्ट्ससुद्धा बाजारात पाहायला मिळतात. त्यांचा वापरसुद्धा या ड्रेससवर घालायला करू शकता. एखाद्या लूज फिटिंग ड्रेसवर घट्ट बेल्ट बांधण्यापेक्षा लूझ बेल्टसुद्धा सुंदर दिसतो.

सध्या साडीसोबत बेल्ट बांधण्याचा ट्रेंड समोर येत आहे. सिल्क किंवा जॉर्जेटच्या प्रिंटेड साडीसोबत ओवरसाईझ ब्रेडेड बेल्ट मस्त दिसतो. तसेच नेटच्या साडीसोबत कमरबंद बांधण्यापेक्षा क्रिस्टल किंवा स्टोनचा बेल्ट वापरल्यास साडीचा लूक बदलतो. हिऱ्यांचे बेल्टसुद्धा यावेळी वापरता येतात. खडय़ांच्या बारीक २-३ कमरबंदचा वापर पदराच्या वर बेल्टसारखा वापर करायला काहीच हरकत नाही. बेल्टचा असाच वापर अनारकलीसोबत करून नेहमीच्या त्याच त्याच अनारकलीचा लूक बदलता येतो. बेल्ट आणि दुपट्टय़ासोबत खेळून वेगवेगळ्या प्रकारे ड्रेपिंग करता येते.

बहुतेकदा बेल्ट लपवण्याचा आपल्याकडून प्रयत्न होताना दिसतो. पण असे करण्यापेक्षा याच बेल्टचा वापर छान अ‍ॅक्सेसरी म्हणून केला तर तुम्हाला स्वत:ची स्टाइल तयार करायला इतर कशाचीही गरज नाही. त्यामुळे आतापासून डोण्ट अंडरएस्टीमेट पॉवर ऑफ बेल्ट…