कुठेही जाताना सोबत घ्यायची पर्स हा प्रत्येक स्त्रीच्या दृष्टीने फारच संवेदनशील मुद्दा असतो. तुमच्याकडेही इतरजणींसारखीच परफेक्ट पर्स असली पाहिजे असं तुम्हालाही वाटतं ना.. मग हा लेख वाचाच-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चला परत एकदा अ‍ॅक्सेसरीजकडे वळायला तयार आहात ना.. मागच्या भागात आपण शूजबद्दल बोललो, आज आपण हॅण्डबॅग्सबद्दल बोलणार आहोत. ‘जिंदगी मिले ना दोबारा’ हा सिनेमा तुम्ही पाहिलाच असेल ना. त्यात अभय देओल आपल्या गर्लफ्रेंडसाठी काही लाखांची एक हॅण्डबॅग घेतो. त्या हॅण्डबॅगची किंमत ऐकताच फरहान अख्तर हॅण्डबॅगेला गाडीमध्ये छान स्कार्फ आणि सनग्लासेस लावून विराजमान करतो आणि तिचे बॅगमती असे नामकरणसुद्धा करतो.

थोडक्यात फरहानला एका हॅण्डबॅगवर इतके पैसे खर्च करायची गरज काय हा मुद्दा सिद्ध करायचा असतो. सिनेमा पाहताना तुमच्यापैकी कित्येक जणांच्या मनामध्ये हाच प्रश्न आला असेल आणि कदाचित फरहानच्या जागी असतो, तर कमी-अधिक फरकाने हेच केले असते, असेही वाटले असते. पण खरे पाहता या ‘बॅगमती’चेसुद्धा शूजइतकेच नखरे असतात आणि ते पाळणे गरजेचे असते. म्हणजे बघा हां, एखाद्या दिवशी पार्टीला जायचे असते त्यासाठी तुम्ही मस्त तयार होता, तेवढय़ात खाली गाडीचा हॉर्न वाजतो. घरातले सगळे गाडीमध्ये वाट बघत असतात आणि इथे तुमचं अजून लिपस्टिकच्या शेडवर कन्फुजन असतं. शेवटी सगळ्या लिपस्टिक्स हॅण्डबॅगमध्ये भरून तुम्ही खाली धावता. ‘आता काय ते गाडीत ठरवेन’ असं मनाशी पक्क केलेलं असतं. त्यानुसार पार्टीला पोहोचेपर्यंत तुमच्या मनातील हा गोंधळ संपून तुम्हाला तुमची योग्य शेड मिळालेली असते. त्या खुशीत गाडीतून उतरताना लक्षात येतं, या गडबडीमध्ये रोज ऑफिसला नेतो, तिचं हॅण्डबॅग घेऊन आलोय. ही हॅण्डबॅग दिसायला जरी चांगली असली तरी, साईजनी मोठी असते, त्यामुळे संपूर्ण पार्टीमध्ये हे वजन घेऊन फिरावं लागणार.

असे प्रसंग आपल्यासोबत कित्येकदा घडतात. कधी इंटरव्हूला जाताना हॅण्डबॅगमध्ये टाकलेले पेपर्स चुरगळले, कधी लग्नाला जाताना मोठी हॅण्डबॅग नको म्हणून बॅग न घेता जावं लागतं, तर कधी ऑफिसच्या हॅण्डबॅगला इतकं रगडवलं जातं की, तुमच्यापेक्षा ती हॅण्डबॅगच तुम्हाला जास्त कंटाळते. त्यामुळे प्रत्येक ऑकेजनला कोणती हॅण्डबॅग कॅरी केली पाहिजे हे माहीत असणं फार महत्त्वाचं आहे, नाहीतर असे गोंधळ सतत उडण्याची शक्यता आहे.

रोजच्या वापरासाठी हॅण्डबॅग निवडताना आपण हॅण्डबॅगच्या आकारापेक्षा त्यात आपल्या गरजेनुसार सामान जाईल की नाही याचा विचार जास्त करतो. पण ज्याप्रमाणे शूजबद्दल बोलताना आपण वेळेचा विचार केलेला त्याप्रमाणे हॅण्डबॅगसाठी आपल्याला आधी आपल्या बॉडी टाइपकडे पाहणं महत्त्वाचं आहे. जर तुमची अपर बॉडी हेवी असेल म्हणजेच तुम्ही अ‍ॅपल शेपचे असाल, तर लाँग बेल्टच्या मॅसेंजर हॅण्डबॅग्स वापरल्या पाहिजेत, तेच जर तुम्ही पेअर शेपच्या असाल तर शोल्डर हॅण्डबॅग तुमच्यासाठी उत्तम. तुमच्या बॉडीशेपनुसार हॅण्डबॅग वापरल्याने शरीरातील शरीराचा आकार आणि हॅण्डबॅगचा आकार यांच्यामध्ये समतोल सांभाळता येतो. त्यामुळे ओव्हरव्हेट किंवा तुम्ही अवघडलेले आहात असं दिसत नाही. त्यामुळे रोजच्या वापरातील हॅण्डबॅग निवडताना ही काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तुमचा बॉडीशेप क्युकंबर असेल तर ओव्हरसाइज हॅण्डबॅग वापरणं कधीही चांगलं. तर सडपातळ शरीरयष्टीचे असाल तर िस्लज हॅण्डबॅग वापरा.

हे तर झालं तुमच्या रोजच्या वापरातील हॅण्डबॅग्सबद्दल. पण इतर वेळीसुद्धा वेगवेगळ्या ऑकेजननुसार हॅण्डबॅग कोणती घ्यायची याचा विचार करणं महत्त्वाचं असतं. इंटरव्हूला जाताना नेहमीची ओव्हरसाइज हॅण्डबॅग नेण्याऐवजी लॅपटॉप बॅग नेल्यास त्यातले पेपर्ससुद्धा नीट राहतात आणि गरजेचं असेल तर तुम्ही लॅपटॉपसुद्धा तुमच्यासोबत कॅरी करू शकता. पण या लॅपटॉप बॅग्स मोठय़ा आणि बॅगी नसाव्यात. सध्या बाजारामध्ये सुंदर प्रिंट्सच्या छोटय़ा आटोपशीर लॅपटॉप बॅग्स पाहायला मिळतात, त्या तुम्ही नक्कीच वापरू शकता.

कधीही अचानक पार्टी ठरली तर कपडे, शूज निवडण्यामध्येच आधी आपला गोंधळ होतो. त्यात पार्टीसाठी योग्य हॅण्डबॅग नसेल तर मात्र अजूनच पंचाईत होते. त्यामुळे अशा अडीअडचणीच्या वेळेसाठी ब्लॅक क्रीम किंवा गोल्ड रंगाची एक क्लच तुमच्याकडे असलीच पाहिजे. या रंगाच्या क्लच कुठल्याही आउटफिटसोबत सहज मॅच होतात. पण क्लच निवडताना शक्यतो सिम्पल आणि एलिगंट क्लच निवडा. नाहीतर त्यांच्या वापरामध्येसुद्धा मर्यादा येतात. गोल्ड क्लच पार्टीसोबतच लग्नाला जाताना किंवा एखाद्या सणसमारंभासाठीसुद्धा वापरता येते. त्यामुळे अशी एक क्लच तुमच्या वॉडरोबमध्ये असणं गरजेचं आहे.

दुपारच्या वेळी एखाद्या कॅज्युअल मीटिंगला किंवा किटी पार्टीला जाताना ओव्हरसाइज हॅण्डबॅग किंवा शोल्डर हॅण्डबॅग घेऊ शकता. पण ऑफिसला जाताना किंवा एखाद्या फॉर्मल ओकेजनला जाताना हॅण्डबॅगचा आकार छोटा आणि सुटसुटीत असणं गरजेचं आहे. पण म्हणून िस्लज नेऊ नका. िस्लज हा प्रकार इनफॉर्मल आहे. त्यामुळे अशा ओकेजन्समध्ये िस्लज वापरणं टाळावं. शॉपिंगला जाताना आधीच तुम्ही भरपूर सामानाच्या पिशव्या घेऊन ठिकठिकाणी फिरत असता. अशा वेळी अजून एका हॅण्डबॅगचं वजन सोबत बाळगण्याऐवजी छोटीशी िस्लज वापरणं चांगलं.

हॅण्डबॅगच्या रंगाचा विचार करणंसुद्धा महत्त्वाचं असतं. आपल्याकडे काळी हॅण्डबॅग म्हणजे सगळ्या ड्रेसेस्वर परफेक्ट मॅच असा गैरसमज आहे. पण प्रत्यक्षात तसं नाही. कित्येक ड्रेसेस्वर काळी हॅण्डबॅग अजिबात सूट होत नाही. त्याऐवजी बेज, ब्राऊन, मरून, ग्रे हॅण्डबॅग वापरू शकता. जर तुम्ही रंगांचे शौकीन असाल, तर मात्र मेहंदी ग्रीन, सटल ब्ल्यू, यलो रंगाची हॅण्डबॅग वापरायलासुद्धा हरकत नाही. रोजच्या वापरातील हॅण्डबॅगचा पटकन कोणाच्या तरी नजरेत भरेल असा शक्यतो नसावा. तो रंग जितका सटल असेल तितका उत्तम.

पार्टी किंवा डिस्कोला जाताना वापरायच्या कल्चमध्ये मात्र तुम्ही ही कसर भरून काढू शकता. बोल्ड शेड्स, सिक्वेन्स किंवा स्टड्सचा वापर, भन्नाट आकार असे प्रयोग तुम्ही नक्कीच करू शकता.

चला आता या बॅगमतीच्या विविध रूपांकडे एकदा बारकाईने लक्ष द्या आणि त्यातली तुम्हाला नक्की कुठली आवडतेय ती निवडून तिच्यासोबत मिरवायला बाहेर पडा..