lp21मुंबईच्या छत्रपची शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात अलीकडेच इटलीहून एक लेझर मशीन आणले असून त्यामुळे दुर्मीळ वस्तूंच्या जतनीकरणाची प्रक्रिया सोपी झाली आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने अलीकडेच २६ लाख किमतीच्या इटलीहून आयात केलेल्या लेझर मशीन (Laser cleaning Unit)चा वापर नुकताच चालू केला आहे. त्यामुळे येथील वस्तूंच्या स्वच्छतेबरोबरच जतन व संवर्धनाचे कार्य खूपच सोपे झाले आहे.

Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या
PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात
Unauthorized parking lots, dhabas, Dronagiri,
उरण : द्रोणागिरी, पुष्पकनगरमध्ये अनधिकृत वाहनतळ, ढाबे
Ramtekadi dumper and JCB burnt
पुणे: रामटेकडीत डंपर, जेसीबी यंत्र पेटवून देण्याची घटना; ठेकेदाराकडून पोलिसांकडे तक्रार
Dog Viral Video
बापरे! श्वानाने चक्क पेटवलेलं रॉकेट तोंडात पकडलं… पुढे जे घडलं; VIDEO पाहून नेटकरी संतापले
Dilip Prabhavalkar Drama News
Dilip Prabhavalkar : अभिनेते दिलीप प्रभावळकर करिअरमध्ये पहिल्यांदा करणार अनोखा प्रयोग

यामध्ये लेझर किरणांचा मारा वस्तूच्या पृष्ठभागावर करून तिला स्वच्छ केले जाते. अशा प्रकारच्या लेझर किरणांना संशोधक फ्लॅट टॉप लेझरअसे म्हणतात. युरोप-अमेरिकेत या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्रास केला जातो. भारतात मात्र सर्वप्रथम आमच्याच म्युझियममध्ये याचा वापर सुरू झालेला आहे. ही माहिती दिली मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील जतन व संवर्धन विभागाचे प्रमुख अनुपम साह यांनी. ते म्हणाले, अगदी अलीकडच्या काळापर्यंत आमच्या म्युझियममधील वस्तूंच्या जतनासाठी सौम्य आम्ल, पोटॅशियम परमँगनेट, आदी रसायनांचा सर्रास वापर होत असे. यात वस्तूंच्या पृष्ठभागाची काही प्रमाणात का होईना झीज व्हायची. अपुऱ्या आर्थिक तरतुदीमुळे या विभागाचे अत्याधुनिकीकरण करणे शक्य नव्हते. अशा वेळी ‘सर दोराबजी टाटा ट्रस्ट’ने आर्थिक मदतीचा हात दिला आणि या विभागाचे कार्य आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोहोचविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू झाले. याच प्रयत्नांतर्गत आम्ही हे मशीन आणले आहे.

या लेझर उपकरणाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले की रसायने व द्रावणे यांचा वापर वस्तूंच्या सफाईसाठी व संवर्धनासाठी आपल्या देशातील म्युझियममधून सर्रास केला जातो; परंतु या प्रक्रियेमुळे वस्तूच्या पृष्ठभागाची हानी होऊन कालांतराने या प्रक्रियेचे दुष्परिणाम दिसू लागतात. हा धोका लक्षात घेऊनच आम्ही लेझर तंत्रज्ञानाचा वापर याकामी करून घेण्याच्या उद्देशानेच हे मशीन आयात करण्याचा निर्णय घेतला. उदाहरणच द्यावयाचे झाले तर, हस्तिदंतांच्या वस्तूंची सफाई व संवर्धन करण्याचे काम अतिशय काळजीपूर्वक व नजाकतीने करावे लागते. परंतु या मशीनच्या वापरामुळे हे काम आता खूपच सोपे होणार आहे. मात्र या उपकरणावर काम करताना एक विशिष्ट प्रकारचा, हिरव्या काचा असलेला चष्मा वापरावा लागतो. अन्यथा ‘फायबर ऑप्टिक’च्या माध्यमातून उत्सर्जित होणारे लेझर किरण डोळय़ांना कायमस्वरूपी हानी पोहोचवून आंधळे होण्याचा धोका आहे, असेही साह यांनी नमूद केले.

पुढचा प्रश्न असा होता की देशभरातील म्युझियम्ससाठी येणाऱ्या भविष्यकाळात जणू वरदानच ठरणाऱ्या या लेझर उपकरणाचा डाटा बेस कसा तयार करणार?

यावर ते म्हणाले की हे मशीन येऊन जेमतेम दोनच महिने झाले आहेत. त्यामुळे आमचेही काम आज प्राथमिक स्तरावरच चालू आहे. त्यामुळे १०६४ नॅनोमीटर इतकी तरंगलांबी (wave length)ची लेझर किरणे उत्सर्जित करणाऱ्या या उपकरणाचा वापर संग्रहालयातील विविध वस्तूंसाठी नेमका कसा करून घ्यायचा याचीही निरीक्षणे घेत आहोत. कोणत्याही संग्रहालयात तर उल्लेखित वस्तूंव्यतिरिक्त शेकडो वर्षांपूर्वी राजे-महाराजांनी वापरलेली वस्त्रे, दागिने, तत्कालीन हस्तलिखिते, धातूची भांडीसुद्धा मोठय़ा प्रमाणावर जतन केलेली असतात. या विविध वस्तूंच्या सफाईची प्रक्रिया मात्र वेगवेगळय़ा पद्धतीने करावी लागते. या लेझर मशीनच्या साहाय्याने हे क्लिष्ट काम खूपच सोपे होणार आहे. असे असले तरीही या विविध वस्तूंच्या सफाईसाठी त्यावर मारा होणाऱ्या किरणांना वेगवेगळय़ा मात्रेत ऊर्जा (Energy in Jules) द्यावी लागते. ती नेमकी किती प्रमाणात व किती काळासाठी व किती वारंवारता देऊन हे काम करायचे, हेही ठरवावे लागते. अन्यथा यातील एकाही घटकाचे प्रमाण जास्त झाले तर याच लेझर किरणांमुळे वस्तूंची हानीसुद्धा होऊ शकते, हा धोका लक्षात घेऊनच मी, माझे सहकारी ओमकार कडू व अन्य साहाय्यक काम करीत आहोत.’’

या कामाचा भविष्यकाळात नेमका कसा उपयोग होणार आहे, याबद्दल बोलताना ते म्हणाले की आजच्या आमच्या या प्राथमिक कामामुळेच कोणत्या वस्तूंची सफाई व संवर्धन करताना नेमक्या किती ऊर्जेची, वारंवारतेची लेझर किरणे वापरायची याचा डाटा बेस तयार होणार आहे व तो आमच्याशी संलग्न असलेल्या देशभरातील वस्तुसंग्रहालयांसाठी एक अत्यंत उपयुक्त असा संदर्भ दस्तावेज म्हणून उपलब्ध करून देण्याचा आमच्या संग्रहालयाचे महासंचालक सब्यासाची मुखर्जी यांचा मानस आहे.

ज्येष्ठ पुरातत्त्व संशोधक व पुण्यातील प्रख्यात डेक्कन कॉलेजमधील प्राध्यापक डॉ. अभिजित दांडेकर यांच्याशी या लेझर उपकरणाच्या उपयुक्ततेविषयी मत जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी भारतातील त्याच्या आगमनाबद्दल आनंद व्यक्त करून म्हणाले की, ‘‘कोणत्याही उत्खननाच्या ठिकाणी सापडलेल्या विविध वस्तूंमध्ये सुमारे ९० टक्के इतक्या मोठय़ा प्रमाणावर मातीच्या भाजक्या भांडय़ांचाच समावेश असतो. या भांडय़ांवर हजारो वर्षांपासून मातीची पुटे जमलेली असतात. अनेकदा या भांडय़ांवर चित्रे, विशिष्ट चिन्हे किंवा क्वचितच एखाद्या लिपीत काही तरी कोरलेले आढळते; परंतु शेकडो वर्षे जमिनीखाली गाडलेल्या अवस्थेत ही मातीची भांडी राहिल्यामुळे त्यांची दुरवस्था होऊन त्यांचा अभ्यास करणे जिकिरीचे होते. पण या लेझर मशीनचा वापर करून अल्प काळात कोणतीही हानी पोहोचू न देता या भांडय़ांची स्वच्छता होणार असल्याने आम्हा संशोधकांसाठी हे वरदानच म्हणावे लागेल!

उत्खननादरम्यान सापडलेली ही मातीची भांडी, वरवर पाहता अत्यंत क्षुल्लक वाटली तरी त्यांच्यावर केलेल्या खोलवर संशोधनातून हजारो वर्षांपूर्वीचे मानवी जीवन, समाजरचना, आर्थिक स्थिती, धार्मिक समजुती, तत्कालीन प्रथा, परंपरा व तंत्रज्ञान आदी महत्त्वाच्या बाबींवर स्वच्छ प्रकाश पडतो. त्यामुळेच या भांडय़ांवर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. या उपकरणामुळे नवीन पिढीतील संशोधकांचे काम सोपे होईल, यात शंका नाही.

मुंबई विद्यापीठातील ज्येष्ठ नाणकतज्ज्ञ (Numismatist) डॉ. महेश कालरा यांच्याकडे या नव्या लेझर तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेबद्दल विचारणा केली असता, त्यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया (CSMVC)चे अभिनंदन करून उत्खननादरम्यान सापडलेल्या विविध धातूंच्या प्राचीन नाण्यांचा अभ्यास करणे आता सोपे होईल, असा विश्वास व्यक्त केला. डॉ. कालरा म्हणाले की, ‘‘मातीच्या भांडय़ांबरोबरच प्राचीन नाण्यांवरही सखोल संशोधन झाले तर इतिहासातील अनेक गोष्टी नव्याने लिहाव्या लागतील. कारण उत्खननामध्ये सापडलेल्या नाण्यांवरही विविध चित्रे, चिन्हे, विविध भाषांमधील लेख लिहिलेले सापडतात. यात ही नाणी पाडलेल्या राजाचे, त्याच्या पूर्वज व वारसाचेही नाव कोरलेले असते. उदा. पश्चिमी क्षात्रप, सातवाहन या राजांची नाणी. त्यांच्या पदव्याही लिहिलेल्या आढळून येतात. परंतु शेकडो वर्षे जमिनीखाली राहिल्यामुळे नाणी खराब होऊन त्यावरील लिपी/ भाषा वाचणे जिकिरीचे होऊन बसते. रसायनांचा वापर करून नाणी स्वच्छ करण्याची पारंपरिक पद्धत आहेच, पण त्यामध्ये त्यांची झीजही होत असते, हे नाकारता येणार नाही. विशेषत: गुप्तकालीन, मोगलकालीन, विजयनगर, कुषाण आदी राजांनी पाडलेल्या मौल्यवान सोन्याच्या धातूतील नाण्यांच्या बाबतीत तर हा धोका पत्करणे मोठे कठीण होऊन बसते. अशा वेळी नाण्यांची कोणतीही हानी न होता स्वच्छता केली गेल्यास नाणकशास्त्राच्या (Numismatics) पुढील प्रगतीसाठी एक नवे प्रवेशद्वारच ठरू शकते!

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे महासंचालक सब्यासाची मुखर्जी म्हणाले की, ‘‘या संग्रहालयातील वस्तूंच्या जतन व संवर्धनाची संपूर्ण पद्धतीच कालानुरूप बदलून आता आंतरराष्ट्रीय दर्जाची बनविण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करीत आहोत. कारण संवर्धनाचे हे कार्य रुग्णालय जसे प्रत्येक रुग्णाची काळजी घेते, त्याच धर्तीवर अविरतपणे चालणारे असते. अशा या अत्यंत महत्त्वाच्या कामी आम्हाला टाटा ट्रस्टकडून अत्यंत मोलाचे असे आर्थिक साहाय्य मिळत असल्यामुळेच आम्हाला हे बहुपयोगी लेझर तंत्रज्ञान आयात करणे शक्य झाले आहे. या लेझर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सफाई करून जतन व संवर्धन केलेल्या वस्तुसंग्रहालयातील काही दुर्मीळ वस्तूंचे खास प्रदर्शनही भरविण्यात येणार असल्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

दृष्टिक्षेपात लेझर-तंत्रज्ञान
* उपकरणाचे नाव -लेझर क्लिनिंग युनिट
* लेझरचा प्रकार – Andi YAAG/ फ्लॅट टॉप लेझर
* लेझरची तरंगलांबी – १६४ नॅनोमीटर
* उत्पादन करणारा देश – इटली
* किंमत – २६ लाख रु.
* उपयोग- ऐतिहासिक महत्त्व असलेल्या विविध वस्तूंवर लेझर किरणांचा विशिष्ट प्रमाणात मारा करून त्यांची स्वच्छता करणे व त्यांचे संवर्धन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त.
* भारतात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई येथे उपलब्ध.