किमी,
आपला mail वाचून आनंदी आनंद असल्याचे ध्यानात आले. मूर्ख मुली, (यापेक्षा mild शब्द आहे काय?) कधी मला philosopher म्हणतेस कधी serious बोलणारा. माझ्या नादाला लागून तू why you are becoming serious म्हणे. प्रॉब्लेम काय आहे तू कधी नीट माझ्या नादालाच लागली नाहीस. माझ्या नादाला लागली असतीस तर तुला केव्हाच कळालं असतं मी काय म्हणतो ते. तू ना किमे नादीच लागत नाही माझ्या. (सदर वाक्यातून flirt करण्याचा कोणताही purpose नाही. तसे वाटल्यास तो योगायोग समजावा.)
माझ्यावर स्टॅम्प पेपरने सतत कोणता तरी शिक्का मारणारे मुली,
मी काहीही लिहिलं तरी स्वत:ला जे वाटतं तेच लिहिणाऱ्या मुली,
असंबद्ध बोलण्याची monopolly निर्माण करणाऱ्या मुली,
हे कन्ये,
हे किमी
ओह girl
listen to me
I am not anything
nither philosopher
nor serious
am just human being!
counseller madam, my friend, philosopher, guide,
किमी mam तुमच्या advice नुसार केरळमध्ये njoyच करतो आहे. इथले osumm beach बीच पाहताना तुझी पुन्हा पुन्हा आठवण येत होती. तू इथं असतीस तर मजा आली असती. भरती आली की किती मस्त वाटतं! लाटेवर लाट! बरं झालं लाटेवरून आठवलं अगं तिकडं मुंबईत कुठली लाट आहे का गं? नमो लाट? मी इथं अनेकांना विचारत होतो की बाबांनो देशात एक लाट आहे माहिती आहे का? नरेंद्र मोदी नावाचे एक सद्गृहस्थ आपले भविष्य तारण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर you know they were silent. त्यांना माहितीच नव्हतं या tremendous लाटेबद्दल. मग मी आम आदमीबद्दल विचारलं त्यांना तर they were hopeful about AAP. मला तर ते हिंदी गाणंच आठवलं-
आप की आंखो में
महके हुये से राज है
आप से भी खूबसूरत
आप के अंदाज है!
बाय द वे तुम्ही चक्क टीव्हीवर झळकलात म्हणजे जबरदस्तच की. चॅनलवाल्यांची तब्येत बरी नाही हे वेगळं सांगायची गरज नाही. असो. कॉन्गो, पण तिथं जाऊन काय बोललीस तू तेही election वर? मी येतोय मुंबईत नेक्स्ट वीकमध्ये. वोटिंग तो करना है ना बॉस. and you know my constituancy? नॉर्थ ईस्ट मुंबई. मेधा पाटकर उभ्या आहेत आमच्याकडे. am so happy की यावेळी एक खूप चांगला option आहे. मेधाताईंच्या मी प्रेमातच आहे. ( मी लगेच प्रेमात पडतो हे तुला माहितीच आहे! 😉 ) पण खरंच. तू ऐकलंस का कधी मेधाताईंना? फार भारी आहेत त्या. इव्हन योगेंद्र यादव. काय माणूस आहे हा! मला ना या माणसासारखं बोलता यायला पाहिजे असं नेहमी वाटतं. किती humble असावं एखाद्यानं! तू काहीही म्हण, पण आपचे बरेचसे candidates चांगले आहेत अगदी त्या पुण्यातून सुभाष वारे नावाचा माणूस अगदी सामान्य घरातून आलेला आहे म्हणे. नाहीतर यूपीत बघ. बीजेपीनं मुझ्झफर रायट्समधल्या दोन दोषी लोकांना तिकीट दिलं आहे. किती horrible आहे हे! and yes one more point तू ते पुन्हा काय सुरू केलंस की leaders सगळे असे आणि तसे. राणी, people get the government, they deserve! मुळात असं काही नाही. काही leaders खूप commited आहेत. इलेक्शन स्पेशल सत्यमेव जयतेमध्ये अजित सरकारबद्दल ऐकलं नाहीस का तू? चांगली माणसं आहेत जरा डोळे उघडून पाहिलं तर पाहिजे. तू काहीही म्हण चांगली माणसं आहेत म्हणून हे जग थोडफार सुरळीत सुरू आहे असं मला वाटतं. जादूची कांडी आपल्याकडे नाही. पण आपण हे बदलू शकतो हे निश्चित. आशावादी असण्याची माझी सवय काही सुटत नाही आणि मला वाटतं ही सवय सुटूच नये.
मिस यू किमे!
– विक्की