माणसाच्या आयुष्यात या छंदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येकाचा छंद हा वेगळा असतो. कुणाला जमवण्याचा, कुणाला गमवण्याचा, कुणाला बोलण्याचा, कुणाला ऐकण्याचा, कुणाला हसण्याचा तर कुणाला रडण्याचाही. पण प्रत्येकाला छंद हा असतोच. काही वेळा ‘हाच आपला छंद आहे’ हे त्या ‘छंदी’ व्यक्तीला माहीतही नसतं (व्यसन नव्हे..!) या धकाधकीच्या जीवनात निव्वळ निर्भेळ आनंद मिळवायचा असेल, तर छंद हवाच. ज्या लोकांचा छंदच त्याचे करिअर आहे, उनकी तो बात ही कुछ और है! छंद ही अशी गोष्ट आहे, जी प्रत्येकाकडे हवीच.
मलाही छंद आहे, माणसं ऐकण्याचा, बस्स माझी पद्धत थोडीशी (?) वेगळी आहे. या छंदाला मी माझ्या प्रवासाच्या आवडीचीही जोड दिलीए. छंद हा जरा हटके..!
‘लिफ्ट’.. शब्द ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येते ती इमारतीतली ‘लिफ्ट’; पण मी म्हणतोय ‘ती’ ती नव्हे. गाडीची लिफ्ट. (रस्त्यावर, उभं राहून मागण्याची).
बस्स रस्त्यावरचा असा स्पॉट निवडायचा जिथे गाडय़ांचा वेग कमी होतो. (स्पीडब्रेकर सर्वोत्तम) त्याच स्पॉटला थांबायचे. मनात येईल त्या गाडीला हात दाखवून ईप्सित ठिकाणाचा पुकारा करायचा. गाडी थांबली तर ठीक नाही तर अजून गाडय़ा येतच असतात. या प्रवासाला शक्यतो उत्तम टु-व्हीलर असते.
एकदा गाडी मिळाली की प्रवास करायला काय धमाल येते सांगू. गाडीवाला जर गप्पिष्ट असेल दुग्धशर्करा योगच.
मी आजवर २०७२ कि.मी. प्रवास लिफ्ट मागून केलाय. यानिमित्ताने (उपयोजित निमित्ताने) मला माझा माणसं ऐकण्याचा छंदही करता येतो. यामुळे माझं अनुभवविश्व खूप समृद्ध होत चाललंय. (पैसे वाचतात हा भाग गौण आहे.)
मी आजवर खूप वेगवेगळ्या लोकांना भेटलो. अगदी गरीब नोकरदार मंडळींपासून एफ-15 घेऊन फिरणाऱ्या उच्च मध्यमवर्गीयांपर्यंत. भेटलेला प्रत्येक माणूस वेगळा होता. कुणी चिकित्सक, कुणी घुमा, कुणी खूप उत्साही तर कुणी खूपच गप्पिष्ट.
गाडीवाल्यांबरोबर होणाऱ्या गप्पांना काही सुमारच नसतो त्यात अगदी सरकार, रस्ता, भाजीवाले, क्रिकेटर्स (पर्यायाने अभिनेत्रीही) सगळ्यांचे वाभाडे निघत असतात. काही जण या सगळ्यांना चोर ठरवून त्यांच्या कुळाचा उद्धारही करतात. या संवादात नवनवीन माहितीही मिळत जाते (अगदी जागतिक राजकारणापासून मच्छर मारण्यापर्यंत). मोजके काही लोक प्रचंड थापाडे असतात. त्यांच्या थापा ऐकणे हाही एक विरळाच आनंद. त्यांच्या थापांवर होय का? अच्छा! बरं! मला माहीतच नव्हतं! अशा कमेंट मारणे म्हणजे कळसच. मी हेही करतो. काही लोक मात्र त्यांच्या आयुष्यातल्या भावनिक कोंडमाऱ्यामुळे अस्वस्थ असतात. त्यांची कैफियत ऐकताना रडू कोसळल्याशिवाय राहत नाही. (मी खरोखर रडलो होतो.) अगदी तुरळक लोकमात्र प्रचंड हिंमतवाले असतात. लांबलांबच्या गावातून भन्नाट वेगात येणारे असतात.
मी लिफ्टिंग करताना सांगण्यासाठी स्वत:ची एक नवीन ओळखच तयार केली आहे. जेणेकरून पुढल्याने आपल्याजवळ अधिकाधिक व्यक्त व्हावं. मनमुराद गप्पा माराव्यात. (ओळख निघण्याची भानगडच नको). विशेष म्हणजे एक-दोन लोकांनी मला त्यांची श्.उ. ही दिली आहेत. मोबाइल नंबर दिले आहेत. एकाने तर घरी जेवायला ये म्हणूनही सांगितलं. मनातून त्यांना सांगावंसं वाटलं की, बाबांनो! कुठल्या नावानं मी तुम्हाला पुन्हा भेटू? अशा वेळी वाटणाऱ्या अपराधीपणाला तोड नाही. आपल्याला मदत करणाऱ्या माणसाशी आपण खोटं बोलतो, पण मी तेही मनावर घेत नाही, कारण त्यात त्यांचं काहीच नुकसान नसतं.
या छंदातून भेटलेल्या लोकांनी मला खूप काही दिलं. त्यांची नावं मला लक्षात राहत नसली तरी त्यांचे शब्द, त्यांचा आवाज, त्यांचे अनुभव अथपासून इतिपर्यंत इत्थंभूत लक्षात राहिलेत. एक-दोघांच्या मन हेलावून टाकणाऱ्या कहाण्या तर मी आजन्म विसरू शकणार नाही.
या जगावेगळ्या छंदामुळे मला हेही कळलं की जगात अजून बरीच माणुसकी शिल्लक आहे. तिथे जाती-धर्म अशा गोष्टींना पायधुळी इतकीही किंमत नाही.
माझ्या या ‘माणसं ऐकण्याच्या’ छंद जोपासण्याची पद्धत जरी विक्षिप्त असली तरीही ती मला खूप प्रिय आहे. It is like a meditation for me. म्हणूनच मी लिफ्ट घेतो आणि उतरताना मनात म्हणतो;
हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते!
निरंजन भिडे response.lokprabha@expressindia.com