0kedare‘गेली तीन वर्षे मी दारूला स्पर्श केलेला नाही.’ २६ जूनच्या जागतिक व्यसनमुक्ती दिवसाच्या कार्यक्रमात अरविंद बोलत होता. आपल्या व्यसनाधीनतेची आणि व्यसनमुक्तीची कहाणी सांगत होता.
अरविंदचे वय ३५. सोळाव्या वर्षी मित्रांनी आग्रह केला म्हणून त्याने पहिल्यांदा दारूचा घोट घेतला. हळूहळू मित्र, पार्टी, दारू असे सगळेच त्याला आवडू लागले. वडीलही रोज दारू पिऊन घरी यायचे. आई रोज त्यांच्याशी भांडायची. तीच नोकरी करायची, घर चालवायची. मग अरविंदला कोण विचारणार? तो नापास झाल्याचे आईला समजेपर्यंत तो रोज प्यायला लागला होता. धड शिक्षण नाही, नोकरी नाही, त्यामुळे मनात निराशा आणि चिडचिड. दारूचे प्रमाण वाढतच होते. तो सुधारावा म्हणून लग्न करून दिले. पितो म्हणून भांडणे आणि भांडणे म्हणून पुन्हा पिणे अशा दुष्टचक्रात तो अडकला. जवळजवळ १५ वर्षे पीत राहिल्यावर बायकोने प्रयत्न करून इलाज करण्यासाठी आणले. आपला प्रवास अरिवदने सांगितला.
एखाद्याला दारुडय़ा, गर्दुल्ला, व्यसनी अशी लेबले सहज चिकटवली जातात. प्रसंगांना दारू पिणारे कित्येक असतात, पण सगळेच व्यसनी होत नाहीत. असे का? व्यसन असणे हा एक मानसिक, शारीरिक आजार आहे हे त्यासाठी जाणून घेतले पाहिजे. मादक पदार्थाची नशा चढते. मेंदूत घडणाऱ्या रासायनिक बदलांमुळे आणि आपल्या मेंदूतील आनंद (reward centre) देणाऱ्या केंद्रामुळे ती नशा पुन्हा करून बघावी असे वाटते आणि हळूहळू मादक पदार्थ घेण्याची सवय लागते. पुरेशी नशा मिळवण्यासाठी आता पूर्वीचे प्रमाण पुरत नाही. मादक पदार्थाचे प्रमाण यातून वाढत जाते. आता अशी स्थिती निर्माण होते की मादक पदार्थ घेतला नाही, तर अनेक शारीरिक आणि मानसिक लक्षणे (withdrawal symptoms) निर्माण होतात. ही लक्षणे टाळण्यासाठी पुन्हा नशेकडे पाय वळतात. दिवसभर मनात नशेसाठी पैसे मिळवणे, नशीला पदार्थ काहीही करून मिळवणे हाच ध्यास राहतो. अशी स्थिती आली की समजावे ‘व्यसन’ जडले. आपल्याला व्यसनाचे दुष्परिणाम शरीरासह संपूर्ण आयुष्यावर होताहेत हे समजूनही नशेपासून दूर राहण्याची इच्छा संपते. अशा अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते.
ज्याच्या घराण्यात व्यसनाधीनता आहे अशी व्यक्ती आनुवंशिकतेमुळे सहजी व्यसनाला बळी पडते. त्याबरोबरच वातावरणातील अनेक घटक एखद्या व्यक्तीला व्यसनाच्या अधीन व्हायला प्रवृत्त करतात. माणसाचा स्वभाव काही प्रमाणात त्याला व्यसनाकडे खेचून नेतो. नावीन्याचे आकर्षण असणारा, पटकन धोका पत्करणारा माणूस नवीन नवीन नशेचे पदार्थ चाखून पाहायला केव्हाही तयार असतो. लहानपणापासून नियमांचे उल्लंघन करणे, शाळा बुडवून इतरत्र भटकणे, प्राणिमात्रांना त्रास देणे अशा वर्तणुकीच्या समस्या असलेल्या मुलांना व्यसन पटकन लागते. घरात वातावरण चांगले नसले की माणूस व्यसनाकडे वळतो. आज समाजात सिगरेट पिणे, दारू पिणे याला प्रतिष्ठा आहे, त्यामुळे तरुण मुले आणि मुलीसुद्धा सहजपणे दारूचा ग्लास हातात घेताना आणि सिगरेट ओढताना दिसतात. अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांमुळेही तरुणांना आपल्या समवयस्कांमध्ये सामावून जायचे, आपलेसे व्हायचे तर हे सगळे करणे गरजेचे आहे असे वाटते. हाती खेळणारा पैसा, कौटुंबिक जबाबदाऱ्या नसणे आणि हाताशी रिकामा वेळ असणे यातून तरुणाई व्यसनांच्या आहारी जाताना दिसते.
दैनंदिन संघर्षांचा, ताण-तणावाचा, मनातल्या निराशेचा सामना करण्याचा एक उपाय म्हणजे नशा अशी पळवाट शोधली जाते. परंतु कधीकधी उदासीनता, अतिचिंता आणि स्किझोफ्रेनिआसारखा गंभीर मानसिक आजार असलेले रुग्ण आपल्या लक्षणांपासून सुटका म्हणून व्यसनांचा आधार घेतात.
समोर बसलेला अठरा वर्षांचा मनोज एक संपूर्ण दिवस ‘गर्द’ म्हणजे ब्राऊन शुगर म्हणजे ओपीऑइड न घेतल्यामुळे हैराण झाला होता. नाकाडोळ्यांतून पाणी वाहत होते, हातपाय दुखत होते, पोटात कळा येत होत्या, सकाळपासून जुलाब सुरू झाले होते. त्याला हुडहुडी भरली होती. Withdrawal ची सारी लक्षणे होती. पंधरा वर्षांचा असताना तो पहिल्यांदा सिगरेट प्यायला. होस्टेलवर दोस्तांच्या आग्रहाखातर चरस घेऊ लागला. हळूहळू त्यात मजा येईनाशी झाली आणि त्याची ओळख गर्दशी झाली.
अनेक किशोरवयीन मुले असाच प्रवास करतात. सिगरेट, हुंगून नशा करण्याचे व्हाइटनर, भांग, चरस, गांजा यांना गेटवे ड्रग्ज म्हणतात. हे मादक पदार्थ व्यसनाचे महाद्वारच उघडतात. ब्राऊन शुगर, श्रीमंतांचे समजले जाणारे कोकेन, एलएसडीचे व्यसन इत्यादी यातून सुरू होते. सहजपणे उपलब्ध असणाऱ्या मेथ आणि मेफ्रेडोन यांच्या वाढत्या व्यसनाची चर्चा सुरू आहे. १५-१६ वर्षांच्या मुलांपासून कुणालाही याचे व्यसन असते. मनात आनंद, उत्साह निर्माण करणे, झोप न येणे, भूक न लागणे अशी लक्षणे यात दिसून येतात.
व्यसनाचा उपचार करताना सर्वात प्रथम नशेचा पदार्थ न घेतल्यामुळे निर्माण होणाऱ्या लक्षणांवर परिणामकारक उपाय केले जातात. त्याबरोबर मानसोपचाराचा उपयोग रुग्णाची इच्छाशक्ती वाढवण्यासाठी, त्याचे नातेसंबंध सुधारण्यासाठी केला जातो. त्या रुग्णाच्या आवश्यकतेनुसार पुनर्वसनाची योजना बनवली जाते. कुटुंबातील सदस्यांचेही समुपदेशन करणे आवश्यक असते. त्यांच्या भावनिक आधाराची रुग्णाला गरज असते. रुग्णाची पत्नी किंवा पती, मुले यांच्यावरही व्यसनाचा दुष्परिणाम होतो. कधी कधी निराशा, अतिचिंता निर्माण होते. त्यांवरही उपाय केले तर कुटुंबातील वातावरण सुधारते. व्यसनाधीन व्यक्तीला व्यसनमुक्तीकडे नेणे हे जितके महत्त्वाचे, तितकेच व्यसनाधीनता निर्माण होऊ नये म्हणून प्रयत्न करणेही महत्त्वाचे. वेगवेगळे आदर्श मुला-मुलींसमोर ठेवणे, घरातील वातावरण निरोगी राखणे, नातेसंबंध दृढ करणे, विविध छंद जोपासणे, सामूहिक कार्य, सामाजिक कामे, खेळ, व्यायाम, आध्यात्मिक शिकवण, धार्मिक प्रवचने यातून व्यसनांचा प्रतिबंध होऊ शकतो.
दारूच्या अतिसेवनाने अपघात घडला किंवा मादक पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीला पकडले अशा बातम्या वाचल्या की व्यसनमुक्तीसाठी अधिकाधिक जागृती आणि प्रयत्न केले पाहिजेत, असं जाणवते.
डॉ. जान्हवी केदारे – response.lokprabha@expressindia.com

painkillers, addiction, Pune, Young woman arrested,
पुणे : वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर, तरुणी अटकेत; औषधांच्या १६० बाटल्या जप्त
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
salman rushdi the satanic verses in india
The Satanic Verses: बंदीच्या चार दशकांनंतर सलमान रश्दींचं ‘दी सटॅनिक व्हर्सेस’ भारतात परतलं; १९८८ मध्ये जारी केले होते आदेश!
Sanjay Raut
Ladki Bahin Yojana : “१५०० रुपयांच्या बदल्यात बहि‍णींच्या घरात दारूडे…”; लाडकी बहीण योजनेवरून राऊतांची अजित पवारांवर टीका
Story img Loader