01vbपास्ता विथ कॉरीयांडर पेस्टो

साहित्य:
–  १०० ग्राम पेने पास्ता
–  १ चमचा मीठ
–   व्हाइट सॉससाठी:
–   १ चमचा बटर
–    १ चमचा भरून मैदा
–   १ ते दीड वाटी गरम दूध
–   चिमूटभर मिरपूड
–   २-३ चिमटी मीठ
भाज्या:
–   ५-६ बटण मशरूम्स, स्लाइस करून
–    १ मध्यम कांदा, स्लाइस करून
–   २ चमचे ऑलिव्ह ऑइल
–  १/४ चमचा मीठ
–    १/२ चमचा इटालियन पास्ता स्पाइस मिक्स (स्पाइस ब्लेंड)
पेस्टोसाठी:
–  २ वाटय़ा चिरलेली कोथिंबीर
– १/२ वाटी ऑलिव्ह ऑइल
– १०-१२ बदाम
– ३-४ लसूण पाकळ्या
– २ चमचे लिंबाचा रस
–  चिमूटभर मिरपूड
– चवीपुरते मीठ
इतर साहित्य:
–  किसलेले चीज
– चिली फ्लेक्स

lp48कृती:
१)     मोठय़ा पातेल्यात पाणी तापवून त्यात पास्ता आणि मीठ घालावे. पास्ता शिजवून घ्यावा. पास्ता शिजला की पाणी काढून टाकावे.
२)     पेस्टो बनवण्यासाठी त्याखाली दिलेले साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. खूप घट्ट वाटले तर १-२ चमचे पाणी घालावे.
३)     कढई घेऊन त्यात २ चमचे ऑलिव्ह ऑइल गरम करावे. त्यात कांदा परतावा. नंतर मशरूम आणि मीठ घालून परतावे. मशरूम मऊ  झाले की स्पाइस मिक्स घालून मिक्स करावे. बाजूला काढून ठेवावे.
४)     कढईत बटर गरम करून त्यात मंद आचेवर मैदा परतावा. काही सेकंद परतून दूध घालावे. भरभर मिक्स करून, गुठळ्या होऊ न देता सॉस बनवावा. सॉसमध्ये मीठ आणि मिरपूड घालावी. पास्ता घालून मिक्स करावे.
५)     व्हाइट सॉस आणि पास्ताच्या मिश्रणातच पेस्टो आणि भाज्या घालून मिक्स करता येईल. त्यावर चीज आणि चिली फ्लेक्स घालावे.
    किंवा ओव्हनप्रूफ डिशमध्ये व्हाइट सॉस पास्ताचे मिश्रण आधी घालावे. त्यावर भाज्या आणि पेस्टो पसरावा. वरून चीज आणि चिली फ्लेक्स घालून ४-५ मिनिटे बेक (ब्रॉइल) करावे.
    गरमागरम पास्ता सव्‍‌र्ह करावा.

lp49रेड पास्ता सॉस

साहित्य:
–  ६ टोमॅटो
– २ चमचे रेडीमेड टोमॅटो पेस्ट
– ४ चमचे ऑलिव ऑइल
– ४ मोठय़ा लसूण पाकळ्या, पातळ चकत्या
– १/२ वाटी कांदा, उभा पातळ चिरून
– १/४ चमचा लाल तिखट (ऐच्छिक)
–  १ लहान चमचा ड्राय ओरेगानो
– २ चिमटी मिरपूड
–  मीठ

कृती:
१)     प्रत्येक टोमॅटोचे दोन तुकडे करा. मोठय़ा बेकिंग ट्रेमध्ये १ चमचा ऑलिव ऑइल घालून हाताने पसरवून घ्या. टोमॅटोची चिरलेली बाजू प्लेटला लागेल अशा रीतीने ठेवा त्याच भांडय़ात लसूण पेरा.
२)     दुसऱ्या छोटय़ा बेकिंग भांडय़ात कांदा आणि थोडे तेल असे मिक्स करा. ओव्हन ४०० च्यावर प्रीहीट करून टोमॅटो आणि कांदा-लसूण १५ मिनिटे बेक करा.
३)     बेक झाल्यावर टोमॅटोला पाणी सुटलेले असेल. कांदा लसणीचा रंग किंचित बदलला असेल. सर्व गार झाले की कांदा बारीक चिरून बाजूला ठेवावा. टोमॅटो आणि लसूण मिक्सरमधून बारीक करून घ्यावे.
४)     पॅनमध्ये ऑलिव ऑइल किंचित गरम करावे त्यात लाल तिखट, कांदा घालून परतावे. नंतर टोमॅटोचे मिश्रण घालावे, ढवळावे. टोमॅटोची पेस्ट घालावी. नीट मिक्स करावे आणि मंद आचेवर १०-१५ मिनिटे शिजू द्यावे.
५)     सॉस थोडा दाट झाला की त्यात ओरेगानो, मिरपूड आणि मीठ घालावे. २ मिनिटे मंद आचेवर उकळू द्यावे. काचेच्या बरणीत काढून ठेवावा.
    हा सॉस साधारण ५ ते ६ जणांच्या      सवर्ि्हगसाठी उपयोगी पडेल.

टीप:
ा     टोमॅटो पेस्टमुळे रंग छान येतो. जर टोमॅटो पेस्ट मिळत नसेल तर थोडा टोमॅटो केचप जो फार गोड नसेल असा वापरू शकतो. पण यामुळे चवीत किंचित फरक पडेल.
ा     बेक केल्याने फ्लेवर जास्त चांगला येतो. पण जर ओव्हन नसेल तर गॅसवर पॅनमध्येसुद्धा करू शकतो. त्यासाठी तेलात लसूण कांदा आधी फोडणीस घालावा. थोडा परतून टॉमेटो घालावा. हे सर्व मोठय़ा आचेवर केल्यास चव चांगली येते.

lp50पास्ता इन रेड  सॉस
साहित्य:
– दीड वाटी पेने पास्ता
–   १/२ वाटी लाल भोपळी मिरची, छोटे चौकोनी तुकडे
–    १/२ वाटी हिरवी भोपळी मिरची, छोटे चौकोनी तुकडे
–  ३ चमचे ऑलिव ऑइल
–  १ चमचा पार्मिजान चिझ, किसलेले
–  २ चिमूट ओरेगानो
–  आवडीप्रमाणे रेड चिली फ्लेक्स
–  पास्ता शिजवण्यासाठी मीठ
–   रेड पास्ता सॉस, गरजेनुसार (वर दिलेली रेसिपी)

कृती:
१)     एका मोठय़ा खोल पातेल्यात ५ ते ६ कप पाणी उकळवावे. त्यात मीठ घालून ढवळावे. पाणी उकळायला लागले की त्यात पास्ता घालून १५ ते २० मिनिटे किंवा पाकिटावर दिलेल्या वेळेनुसार शिजवून घ्यावा. शिजवताना झाकण ठेवू नये तसेच मोठय़ा आचेवर शिजवावा. त्यामुळे पाणी उतू जाण्याची शक्यता असते म्हणून एकदम खोलगट आणि मोठे पातेले घ्या. तळाला चिकटू नये म्हणून मधेमधे तळापासून ढवळावे.
२)     पास्ता शिजला की एका चाळणीत काढून घ्यावा आणि त्यावर थंड पाणी घालावे. सर्व पाणी निघून जाऊ  द्यावे.
३)     पॅनमध्ये १ चमचा तेल गरम करावे, त्यात भोपळी मिरची घालून १/२ ते १ मिनिट परतावे. चिमूटभर ओरेगानो आणि मीठ घालावे. पास्ता सॉस घालून लगेच शिजलेला पास्ता घालावा. गॅस मंद ठेवून १/२ ते १ मिनीट नीट मिक्स करावे. वाटल्यास पास्ता सॉस वाढवावा. लगेच सवर्ि्हग बोलमध्ये काढावे.
सव्‍‌र्ह करताना १ चिमूटभर ड्राय ओरेगानो चुरून भुरभुरावा. तसेच पार्मिजान चिझ घालावे आणि पास्ता सव्‍‌र्ह करावा.
टीप: रेड चिली फ्लेक्स गरज वाटल्यास तिखटपणासाठी आवडीप्रमाणे घ्यावे.

– वैदेही भावे

Story img Loader