भविष्यकथनामध्ये कुंडली, हस्तरेषा, चेहरा, नाडीपरीक्षा यांच्या इतकंच महत्त्वाचं असतं ते संख्याशास्त्रानुसार सांगितलं जाणारं भविष्य. त्यात जन्मतारखेनुसार ठरवला जाणारा तुमचा मूलांक म्हणजे तुमचं व्यक्तिमत्वच असतं. या मुलांकावरून जसा तुमचा स्वभाव सांगता येतो, तसंच तुमच्या जोडीदाराविषयीही आडाखे बांधता येतात. त्यासंदर्भातील मार्गदर्शन-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

        पुरुष – मूलांक १ चा पती तसंच मूलांक १ ची पत्नी यांचं एकमेकांशी साधारण जमतं. एक हा सूर्याचा मूलांक असल्यामुळे या दोघांचेही स्वभाव उग्र असतात. त्यामुळे त्यांच्यात प्रेम, आकर्षण असूनही त्यांच्यातील अहंकारामुळे सतत वादविवाद होत राहतील. यांचे व्यक्तिगत संबंध कधी चांगले, कधी वाईट असेच असतील.
   मूलांक १ च्या पतीचं मूलांक २ च्या पत्नीबरोबर फारसं जमणार नाही. यांचे व्यक्तिगत संबंध कधी चांगले, कधी वाईट, कधी परत चांगले असेच असतील.
मूलांक १ च्या पतीचं मूलांक ३ च्या पत्नीशी चांगलं जमेल. यांचं नातं प्रेमाचं असेल. हे एकमेकांना सहकार्य करत चांगले जगतील.
मूलांक १ चा पती आणि मूलांक ४ ची पत्नी यांचं एकमेकांशी फारसं जमणार नाही. मूलांक ४ च्या पत्नीचा भावनात्मक तसंच मूडी स्वभावामुळे यांचं नातं नकारात्मक बनण्याची शक्यता आहे.
मूलांक १ चा पती आणि मूलांक ५ ची पत्नी यांचं एकमेकांशी चांगलंच जमेल. मूलांक १ चा स्वामी सूर्य आणि मूलांक ५ चा स्वामी बुध यांचं एकमेकांशी चांगलं जमतं. सूर्य आणि बुध यांच्या एकत्र येण्याला बुद्धादित्य योग असंही म्हटलं जातं. हे दोघं एकत्र आल्यामुळे धन-समृद्धी येते. संसारही सुखाचा होतो.
मूलांक १ चा पती आणि मूलांक ६ ची पत्नी यांचं एकमेकांशी चांगलं जमतं. दोघांनाही एकमेकांचं आकर्षण असतं, पण कधी कधी मूलांक ६ च्या पत्नीला असलेला भौतिक सुखांचा सोस मूलांक १ च्या पतीला त्रासदायक वाटतो.  
मूलांक १ चा पती आणि मूलांक ७ ची पत्नी यांचं चांगलं जमतं. त्यांच्यामध्ये प्रेमही निर्माण होतं. यांचं वैवाहिक जीवन सुखी असतं.
मूलांक १ चा पती आणि मूलांक ८ ची पत्नी यांचं फारसं जमत नाही. या लग्नामुळे पतीचं नुकसान होतं तर पत्नीच्या निराशा पदरी पडते.
मूलांक १ चा पती आणि मूलांक ९ ची पत्नी यांचा संसार सर्वसाधारण होतो. मूलांक १ चा स्वामी सूर्य आणि मूलांक ९ चा स्वामी मंगळ हे दोघेही उग्र आहेत. मूलांक ९ ची पत्नी समजूतदारपणे वागली तरच यांचा संसार बरा होईल. अन्यथा सतत भांडणं, वादावादी होत राहील.
स्त्री – मूलांक १ असलेल्या स्त्रीने तिच्या आयुष्यात चातुर्याने वागणे गरजेचे असते. १ या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. सूर्याच्या स्वामित्वामुळे या व्यक्ती थोडय़ाशा उग्र स्वभावाच्या असतात. या स्त्रिया आपल्या आयुष्यात आई, पत्नी आणि सून या तिन्ही भूमिका फार चांगल्या तऱ्हेने पार पाडतात.
मूलांक १ असलेल्या स्त्रीने आपल्या स्वभावात शांतपणा बाणवायचा प्रयत्न केला तरच त्यांचं मूलांक १ असलेल्या दुसऱ्या व्यक्तीशी चांगल्या पद्धतीने पटू शकतं. अन्यथा उग्र स्वभावाची दोन माणसं एकत्र आली तर त्यांचं जगणंच मुश्कील होऊन जातं.
जोडप्यांमध्ये पत्नीचा मूलांक १ असेल आणि पतीचा २ असेल तर त्यांचं एकमेकांशी जमत नाही. मूलांक १ चा स्वामी आहे सूर्य आणि मूलांक २ चा स्वामी आहे चंद्र. चंद्र सूर्याच्या प्रकाशामुळे प्रकाशमान होतो हे खरं असलं तरी पुरुषी अहंकारामुळे मूलांक १ आणि मूलांक २ च्या स्त्री-पुरुषांचं पती-पत्नीचं नातं तणावपूर्ण बनू शकतं. या जोडप्यातल्या पुरुषाने जर स्वत:च्या स्वभावातच लवचीकता ठेवली आणि समजूतदारपणा दाखवला तरच या जोडप्याचं जीवन आनंददायी होऊ शकेल.
मूलांक १ च्या स्त्रीचा मूलांक ३ असलेल्या पुरुषाशी उत्तम संसार होऊ शकतो. त्या दोघांचाही मूलांक विषम असल्यामुळे त्यांची मनं उत्तमरीत्या जुळू शकतात. मूलांक ३ चे पुरुष उग्र स्वभाव असलेल्या मूलांक १ च्या स्त्रीला हुशारीने सांभाळून घेतात.
मूलांक १ असलेली स्त्री आणि मूलांक ४ असलेले पुरुष यांचं साधारण जमू शकतं. समजूतदारपणा कमी असल्यामुळे त्यांच्यात सतत संघर्ष होत राहतो. मूलांक १ असलेल्या पत्नीला मूलांक ४ असलेल्या पुरुषाबाबत खूप तक्रारी असतात. दोघांच्या स्वभावात असलेल्या उग्रतेमुळे त्यांच्यातली जिद्द, हट्टीपणा वाढीला लागतो. त्यांच्यात एकमेकांमध्ये आपुलकी, प्रेम आणि तंटे असं मिश्रण असतं.
मूलांक १ असलेली स्त्री आणि मूलांक ५ असलेले पुरुष यांचे एकमेकांशी स्नेहपूर्ण संबंध असतात. मूलांक १ चा स्वामी सूर्य आणि मूलांक ५ चा स्वामी बुध हे एकमेकांचे मित्र असल्यामुळे हे दोन्ही मूलांक असलेल्या जोडप्याच्या संबंधांमध्ये कटुता येत नाही. दोघांचेही मूलांक विषम असल्यामुळे ते एकमेकांशी समजूतदारपणे वागतात. वास्तविक या दोन्ही मूलांकाच्या व्यक्ती जिद्दी आणि हट्टी असतात. पण त्याचा त्यांच्या संबंधांवर फारसा परिणाम होत नाही आणि त्यांचे एकमेकांशी चांगले जमू शकते.
मूलांक १ च्या स्त्रीचे मूलांक ६ असलेल्या पुरुषाशी बऱ्यापैकी जमू शकते. पण त्या दोघांनाही एकमेकांपासून व्यक्तिगत सुख फारसं मिळत नाही. मूलांक ६ असलेले पुरुष आकर्षक स्वभावाचे असतात. पण त्यांच्या स्वभावात भावनिक समस्या असतात. शिवाय पती पत्नीपेक्षा जास्त आकर्षक असल्यामुळे त्यांच्या संसारातील अडचणी आणखी वाढतात. यांच्या एकमेकांबद्दल खूप तक्रारी असतात.
मूलांक १ असलेल्या स्त्रीचं मूलांक ७ असलेल्या पुरुषाशीही बऱ्यापैकी जमू शकतं. मूलांक ७ असलेल्या पुरुषांना कुणाच्या तरी मानसिक आधाराची गरज असते. आणि ही गरज मूलांक १ असलेली स्त्री पूर्ण करू शकते. त्यामुळे या दोघांनाही एकमेकांबद्दल आपुलकी असते. मूलांक १ च्या स्त्रीने रागावर नियंत्रण ठेवलं तर त्यांचे संबंध दीर्घकाळ उत्तम प्रकारे टिकू शकतात.
मूलांक १ असलेली स्त्री आणि मूलांक ८ असलेले पुरुष यांचं एकमेकांशी फारसं जमू शकत नाही. मूलांक १ चा स्वामी सूर्य आणि मूलांक ८ चा स्वामी शनी यांचं एकमेकांशी पटत नाही. त्याचा परिणाम मूलांक १ आणि ८ असलेल्या जोडप्याच्या नात्यात स्पष्ट दिसतो. त्यामुळे यांच्या नात्यात आनंद कमी आणि कटुता जास्त असते.
मूलांक १ असलेली स्त्री आणि मूलांक ९ असलेला पुरुष यांचे एकमेकांशी सर्वसाधारण जमू शकते. या दोघांच्याही स्वभावातली उग्रता कमी झाली तरच त्यांचे संबंध बरे असू शकतात. अन्यथा त्यांच्या नात्यात संघर्ष उद्भवू शकतो. या दोघांमध्येही भरपूर ऊर्जा असते. उत्साह असतो आणि दोघांचाही स्वभाव उग्र असतो. त्यामुळे त्यांच्यात संघर्षांची शक्यता असते. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवलं तर वादविवाद टाळून हे जोडपं यशस्वी संसार करू शकतं.  

मूलांक २ असलेले स्त्री-पुरुष दिसायला आकर्षक असतात. त्यांचा स्वामी चंद्र असतो. त्याचा यांच्या विचारांवर प्रभाव स्पष्ट दिसतो.  ते चांगले प्रेमिक असतात तसंच संवेदनशील स्वभावाचे असतात.
पुरुष – मूलांक २ असलेल्या पुरुषाचे आणि मूलांक १ असलेल्या स्त्रीचे संबंध तणावपूर्ण असतात. मूलांक २ हा चंद्राचं प्रतीक आहे तर मूलांक १ सूर्याचा. त्यामुळे मूलांक २ ची पत्नी मूलांक १ ची असेल तर त्या दोघांचं जमत नाही, कारण त्याचा पुरुषी अहंकार अडथळा बनतो.  
मूलांक २ असलेल्या पतीचं आणि मूलांक २ असलेल्या पत्नीचं बऱ्यापैकी चांगलं जमतं. या दोघांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम असतं. त्या दोघांमध्येही मतभेद होतात, पण ते लौकर मिटतात. संसार सुखाचा होतो.
मूलांक २ असलेल्या पतीचे आणि मूलांक ३ असलेल्या पत्नीचे संबंध ऊनपावसासारखे असतात. मूलांक २ असलेल्या पतीला या संबंधांमधून बरेच मानसिक क्लेश मिळत असले तरी त्यांना संसार तसंच अपत्यसुख मात्र चांगल्या तऱ्हेने मिळतं. यांची भरपूर आर्थिक तसंच भौतिक प्रगतीही होते. पण तरीही मूलांक २ चा पुरुष मानसिक तसंच आंतरिकदृष्टय़ा असमाधानीच राहतो.  
मूलांक २ चा पती आणि मूलांक ४ ची पत्नी यांचे संबंध प्रेममय असतात. हळूहळू त्यांना समृद्धीही मिळत जाते. मुख्यत: मूलांक ४ च्या पत्नीने आपल्या संतापावर नियंत्रण न ठेवल्याने कधी कधी यांच्या संसारात बेबनाव होऊ शकतो. या दोघांचाही संसार चांगला आणि यशस्वी होतो.  
मूलांक २ चा पती आणि मूलांक ५ ची पत्नी याचा संसार साधारणपणे बरा असतो. मूलांक ५ चा स्वामी आहे बुध आणि मूलांक २ चा स्वामी आहे चंद्र. बुध हा खरं तर चंद्राचा पुत्र आहे. पण तरीही त्यांचे संबंध गोडीतले नाहीत. मूलांक ५ च्या पत्नीने आपल्या स्वभावावर नियंत्रण ठेवलं आणि गोड बोलण्याची वृत्ती ठेवली तरच यांचा संसार चांगला होऊ शकतो.  
मूलांक २ चा पती आणि मूलांक ६ ची पत्नी यांचंही संसारात एकमेकांशी फारसं जमू शकत नाही.  या दोघांमध्ये संवाद आणि सहयोगाची कमतरता असते. दोघांमध्येही फारशी सहनशीलता नसते. शिवाय भावनिक समस्या निर्माण झाल्या तर त्या सोडवण्यासाठीचा समजूतदारपणा नसतो.
मूलांक २ आणि मूलांक ७ हे एकमेकांचे घट्ट मित्र आहेत. त्यामुळे यांच्यात अत्यंत उत्तम मैत्री होऊ शकते. पण मूलांक २ च्या पतीच्या अहंकाराचा यांच्या संसारावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.  
मूलांक २ च्या पतीचं मूलांक ८ च्या पत्नीशी बऱ्यापैकी जमू शकतं.  या दोघांचंही एकमेकांवर प्रेम असतं. मूलांक ८ च्या पत्नीची विचारशीलता कधी कधी काही समस्या निर्माण करू शकते. मूलांक २ चे पती मूलांक ८ च्या पत्नीमुळे प्रभावित होतात पण तिच्या आळशीपणामुळे कधी कधी वैतागतातही. मूलांक ८ ची पत्नी मूलांक २ च्या पतीच्या अस्थिर तसंच मूडी स्वभावाला वैतागते, पण त्याचा संसारावर परिणाम होत नाही.

मूलांक २ चा पती आणि मूलांक ९ ची पत्नी यांचं एकमेकांशी फारसं जमत नाही. मूलांक २ चे पती मूलांक ९ च्या पत्नीच्या क्रोधी तसंच असंवेदनशील स्वभावामुळे दु:खी असतात. मूलांक ९ च्या पत्नीच्याही मूलांक २ च्या पतीबद्दल असंख्य तक्रारी असतात. या दोघांमध्येही समजूतदारपणा, सहकार्याची भावना यांचा अभाव असतो.  

स्त्री – मूलांक २ च्या पत्नीचे मूलांक १ च्या पतीबरोबर साधारण जमते. या जोडप्यातल्या स्त्रीने स्वत:च्या मूडी स्वभावावर तसंच अस्थिर विचारांवर नियंत्रण ठेवलं तर त्यांचा संसार चांगला होऊ शकतो.  चंद्र जसा सूर्याकडून मिळणाऱ्या प्रकाशामुळे तळपतो तसंच ही पत्नी मूलांक १ च्या पतीचा इगो नीट सांभाळून, त्याला ठेच न लागू देता चांगलं जीवन जगू शकते.
मूलांक २ ची पत्नी आणि मूलांक २ चा पती यांचे एकमेकांशी चांगले जमू शकते. त्यांना एकमेकांबद्दल प्रेम, आपुलकी असते.  दोघांचेही स्वभाव सारखेच असल्यामुळे कधी कधी त्यांच्यात बेबनाव होतो पण तो फार काळ टिकत नाही. त्यांचं प्रेम टिकून राहतं.
 मूलांक २ ची पत्नी आणि मूलांक ३ चा पती यांचं एकमेकांशी जमतं. त्यांच्या संसारात सुरुवातीला प्रेम असतं. मग ते कमी होतं. मग काही काळाने ते पुन्हा निर्माण होतं. या दोघांनाही एकमेकांबद्दल तक्रारी असतात पण काळाच्या ओघात त्या तक्रारी मागे पडत जातात.
मूलांक २ ची पत्नी आणि मूलांक ४ चा पती यांच्यामध्ये चांगली समजूत असते आणि त्यांचं नातंही चांगलं रुळतं. त्यांना एकमेकांबद्दल प्रेम असतं. मूलांक ४ च्या पतीमुळे कधी कधी त्यांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण होतो, पण तो कमी करण्यासाठीही मूलांक ४ च्या पतीलाच प्रयत्न करावे लागतात. मूलांक ४ चे पती कधी कधी मूलांक २ च्या पत्नीकडे पूर्ण लक्ष देऊ शकत नाहीत. पण मूलांक २ असलेली पत्नी परिस्थिती नीट हाताळते. एकूण मूलांक २ ची पत्नी आणि मूलांक ४ चा पती यांची जोडी ही पती-पत्नीची चांगली जोडी ठरते.
मूलांक २ ची पत्नी आणि मूलांक ५ चा पती यांचा संसार संमिश्र असतो. त्यांच्यात प्रेमही असतं आणि भांडणंही असतात. मूलांक ५ चे पती खूपदा आपल्या चुका स्वीकारायला तयार होत नाहीत, पण त्याचा मूलांक २ च्या प्रेमावर फारसा परिणाम होत नाही. वादविवाद आणि तणातणीनंतरही हे नातं टिकून राहतं.
मूलांक २ ची पत्नी आणि मूलांक ६ चा पती यांचंही एकमेकांशी बऱ्यापैकी जमतं. मूलांक ६ च्या पतीला खूपदा भावनिक समस्या असतात. पण मूलांक २ ची पत्नी जमवून घेण्याचा प्रयत्न करते.   
मूलांक २ ची पत्नी आणि मूलांक ७ चे पती यांचा संसार बरा असतो. पण मूलांक २ ची पत्नीचा मूडी स्वभाव आणि मूलांक ७ च्या पतीमध्ये असलेला निर्णयक्षमतेचा अभाव यामुळे यांच्या संसारात बेबनाव होतो. असं असलं तरी या दोघांच्या हृदयात एकमेकांबद्दल खूप प्रेम असतं आणि ते दृढ असतं.
मूलांक २ ची पत्नी आणि मूलांक ८ चा पती यांचं एकमेकांशी बऱ्यापैकी जमतं. मूलांक ८ च्या पतीच्या उदासीन स्वभावामुळे यांचे संबंधही उदासीन व्हायला लागतात पण मूलांक २ ची पत्नी परिस्थिती नीट हाताळण्याचा प्रयत्न करते.  
मूलांक २ ची पत्नी आणि मूलांक ९ चा पती यांचा संसार थोडा तणावपूर्ण असतो. मूलांक ९ च्या पतीच्या स्वभावातील उग्रपणा  संसारात बेचैनी निर्माण करतो. मूलांक ९ चा पती आपली मेहनत, जिद्द, एकाग्रता आणि शिस्तीच्या जोरावर पत्नीचे हृदय जिंकून घेतो.

मूलांक ३ चे लोक कौटुंबिक आणि सामाजिक प्रकृतीचे असतात. ते आपल्या जोडीदाराबाबत अतिशय सावध असून काहीसे हट्टी स्वभावाचे असतात. ते त्यांच्या जोडीदाराची व्यवस्थित काळजी घेतात. तसंच त्याच्याबाबत जागरूक असतात.                                    

पुरुष – मूलांक तीनच्या पतीचे मूलांक एकच्या पत्नीशी प्रेमपूर्ण संबंध असतात. दोघांचे मूलांक विषम असल्याने मानसिकदृष्टय़ा दोघे एकत्र असतात. कधी कधी मूलांक तीनच्या पतीला मूलांक एकच्या पत्नीकडून काही तक्रारी असतात. पण, याचा परिणाम त्यांच्यातलं प्रेम आणि वैवाहिक आयुष्य यांवर होत नाही.
मूलांक तीनचा पती आणि मूलांक दोनची पत्नी यांचं एकमेकांशी साधारण जमू शकतं. साध्या गोष्टींबद्दल दोघांना एकमेकांबद्दल तक्रारी, नाराजी असते. दोघांमध्ये छोटे-मोठे वाद असले तरी दोघंही एकमेकांची चांगली काळजी घेतात. मानसिकदृष्टय़ा मेळ नसला आणि अनेक तक्रारी असल्या तरी यांचं नातं टिकून असतं.
मूलांक तीनचा पती मूलांक तीनची पत्नी यांचे संबंध संघर्षमय असतात. दोघांनाही एकमेकांबद्दल असंख्य तक्रारी असतात. बारीकसारीक विषयही या दोघांमधल्या वादाचं कारण ठरू लागतात. दोघांमध्ये समजून घेण्याची पुरेशी क्षमता नसते.  
मूलांक तीनच्या पतीचा मूलांक चारच्या पत्नीशी फारसं जमत नाही. दुसऱ्यांच्या चुका न विसरण्याचा मूलांक तीनचा स्वभाव आणि अति विचार करणारा मूलांक चारचा स्वभाव परस्परसंबंधांमध्ये कटुता आणतो. दोघांचा घटस्फोट होत नाही पण, नात्यात कटूता येते.  
मूलांक तीनच्या पतीचं मूलांक पाचच्या पत्नीशी साधारण जमतं. यांच्यात सामंजस्य आणि सौहार्द यांची कमतरता जाणवते. या दोघांच्या जिद्दी आणि हट्टी स्वभावामुळे एकमेकांवरचे आरोप-प्रत्यारोप वाढत जातात.  दोघांमध्ये सामंजस्याची भावना नसल्यामुळे वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ शकतो.
मूलांक तीनच्या पतीचं मूलांक सहाच्या पत्नीशी उत्तम जमतं. यांच्यात समजूतदारपणा आणि आपलेपणा असतो. मूलांक  सहाच्या पत्नीचं सौंदर्य, कलात्मकता आणि उच्चविचारसरणी हे गुण मूलांक तीनच्या पतीला प्रभावित करतात.  दोघांचं भाग्य एकमेकांना पूरक ठरतं.
मूलांक तीनच्या पतीचं मूलांक सातच्या पत्नीशी साधारण जमू शकतं. सात मूलांकाच्या पत्नीचा कलात्मक दृष्टिकोन आणि मूलांक तीनच्या पतीचा तार्किक दृष्टिकोन दोघांना फायदेशीर आणि नुकसानकारकही ठरतो. मूलांक तीनच्या पतीचं कटू बोलणं मूलांक सातच्या पत्नीच्या निश्चल मनावर दुष्परिणाम करणारं ठरतं. पण, दोघांनाही एकमेकांच्या भाग्यामुळे खूपदा आनंद, सुखही मिळू शकतं.  
मूलांक तीनचा पती आणि मूलांक आठची पत्नी यांचं एकमेकांशी साधारण जमतं. मूलांक आठच्या पत्नीचे नकारात्मक विचार अनेकदा वैवाहिक जीवनामध्ये संघर्ष निर्माण करतात. पण, मूलांक तीनच्या पतीच्या समंजस वृत्तीमुळे परिस्थिती नियंत्रणात असते. एकुणात, यांचे संबंध सर्वसाधारण असतात.
मूलांक तीनचे पती आणि मूलांक नऊची पत्नी यांच्या नात्यातला समजूतदारपणा चांगला असल्यामुळे चांगले संबंध निर्माण होतात. दोघांमध्ये प्रेम असतं. मूलांक नऊची पत्नी बुद्धिमान आणि चैतन्यपूर्ण असते तर मूलांक तीनचा पती दूरदृष्टीचा असतो. दोघांमध्ये लहानसहान तक्रारी, नाराजी सुरूच असतात. पण, याचा वैवाहिक जीवनावर परिणाम होत नाही.   
 
स्त्री – मूलांक तीनची पत्नी आणि मूलांक एकचा पती यांचं एकमेकांशी चांगलं जमू शकतं. दोघांमध्ये प्रेम, सहकार्य, सामंजस्य या भावना असतात. मूलांक एकच्या पतीचा रागीट स्वभाव मूलांक तीनची पत्नी चातुर्याने सांभाळून घेते. दोघे जण चातुर्याने प्रगती करतात. यांना संततीसुखही चांगलं लाभतं.
मूलांक तीनच्या पत्नीचं मूलांक दोनच्या पतीशी चांगलं जमतं.  मूलांक तीनच्या पत्नीच्या हट्टी स्वभावामुळे मूलांक दोनच्या पतीला मानसिकदृष्टय़ा त्रास होतो. पण, दोघांच्या भाग्यरेषांमुळे भौतिक सुखसमृद्धी वाढीस लागते. हे जोडपं अनेकदा वेगळं होण्याचा विचार करतं. पण, अपत्यांचा विचार करून सामंजस्याने आपापसातले नातेसंबंध सुधारण्याचा प्रयत्न केला जातो.  
मूलांक तीनच्या पत्नीचे मूलांक तीनच्या पतीशी फारसे चांगले संबंध नसतात. दोघांचे स्वभाव सारखेच असले तरी एकमेकांच्या इच्छा पूर्ण करण्यात ते सफल होत नाहीत. यांचं प्रेम विनाकारण वादांमध्ये हरवून जातं.  
मूलांक तीनच्या पत्नीचं मूलांक चारच्या पतीशी फारसं चांगलं जमत नाही. मूलांक चारच्या पुरुषाचा उग्र आणि भावनिक स्वभाव मूलांक तीनच्या स्त्रीला त्रास देत रहातो. मूलांक तीनच्या स्त्रीचा प्रत्येकाबाबत तक्रारीचा सूर असणं आणि नकारात्मक दृष्टिकोण मूलांक चारच्या पुरुषासाठी त्रासदायक ठरतो.  
मूलांक तीनची पत्नीचं आणि मूलांक पाचचा पती यांचं एकमेकांशी साधारण जमतं. दोघांमध्ये समजूतदारपणा कमी असतो. ते आपल्या कर्तव्यांबाबत निष्काळजी असतात. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी येतात.
मूलांक तीनची पत्नी आणि मूलांक सहाचा पती यांचं एकमेकांशी चांगलं जमतं. या दोघांमधली सामंजस्य चांगलं असतं. मूलांक सहाचा पती मूलांक तीनच्या पत्नीवर खूप प्रेम करतो आणि उत्तम जीवनसाथी म्हणून सिद्धही होतो.  
मूलांक तीनची पत्नी आणि मूलांक सातचा पती यांचं साधारण जमतं. यांचं आयुष्य ऊन-सावलीप्रमाणे असतं. या नात्यातला मूलांक तीनच्या पत्नीचा कठोर स्वभाव त्रासदायक ठरू शकतो. पण, मूलांक तीनच्या पत्नीने तिच्या स्वभावात माधुर्य  आणलं तर हे संबंध उत्तम प्रकारे टिकू शकतात.
मूलांक तीनच्या पत्नीचं मूलांक आठच्या पतीशी साधारण जमतं. मूलांक आठच्या पतीचा विचारशील स्वभाव मूलांक तीनच्या पत्नीच्या विचारांना पूरक ठरतो. वास्तविक दोघांचे विचार भिन्न असतात. पण, छोटय़ा-मोठय़ा मतभेदांमुळे यांच्या नात्यात कटुता मात्र येत नाही. दोघांमध्ये प्रेम टिकून असतं.
मूलांक तीनची पत्नी आणि मूलांक नऊचा पती यांचं उत्तम प्रकारे जमतं. मूलांक नऊचा पती शिस्तप्रिय असतो. तर मूलांक तीनची पत्नी बुद्धिमान आणि बोलण्यात हुशार असते. आपापसात समजूतदारपणा असतो. वैवाहिक जीवन सुखी असतं. संततीसुखही उत्तम असतं.

मूलांक ४ चे लोक वैवाहिकदृष्टय़ा खूप संवेदनशील असतात. विवाहापूर्वी ते कल्पनाविश्वातच रममाण असतात. मूलांक ४चे लोक आपल्या जोडीदारावर प्रेमही करतात आणि त्यांना तितकंच दुखावतातही. या मूलांकाच्या लोकांनी चुकीचा जोडीदार निवडणं हे त्यांच्या आयुष्याकरिता धोकादायक असतं.
 
पुरुष – मूलांक ४च्या पतीचं मूलांक एकच्या पत्नीशी फारसं जमू शकत नाही. मूलांक एकच्या पत्नीचा उग्र स्वभाव वादाचं कारण ठरू शकतं. पण आपापसातल्या मतभेदांकडे दुर्लक्ष केलं तर आयुष्य सुखकर होऊ शकतं.  
मूलांक ४च्या पतीचं मूलांक  दोनच्या पत्नीशी चांगलं जमतं. यांच्या जीवनात प्रेम आणि सामंजस्य टिकून असतं. सुरुवातीला भौतिक सुखाच्या प्रगतीत काही अडथळे येतात. पण कालांतराने सुख-समाधानाने जीवन जगतात. संततीसुख लाभते. मूलांक चारच्या पतीने मूलांक दोनच्या पत्नीचे मर्म लक्षात घ्यायला हवं.
मूलांक ४चा पती आणि मूलांक तीनची पत्नी यांचं फारसं चांगलं जमत नाही. दोघांचे अहंकार भांडणाला कारणीभूत ठरतात. मूलांक तीनच्या पत्नीला मूलांक ४च्या पतीकडून मानसिक त्रास होतो. हळूहळू दोघांमधलं प्रेम कमी होतं आणि दुरावा येऊ लागतो.
मूलांक ४च्या पतीचं मूलांक ४च्या पत्नीशी उत्तम जमतं. दोघांचेही स्वभाव सारखे असतात.  आपल्याच मूलांकाच्या व्यक्तीशी चांगलं जमून येणं हे मूलांक चारचं वैशिष्टय़ आहे. दोघेही शरीरापेक्षा मनाने एकमेकांच्या जवळ असतात. यांना संतती सुख लाभतं.
मूलांक ४च्या पतीचं मूलांक पाचच्या पत्नीशी उत्तम जमतं. दोघांमध्ये मानसिक सामंजस्य आणि प्रेम चांगलं असतं. मूलांक पाचची पत्नी साधारणत: ठाम असते. पण मूलांक ४चा पती तिचा स्वभाव सांभाळून घेतो.  
मूलांक ४चा पती आणि मूलांक ६ची पत्नी यांच्यात सामंजस्याची भावना साधारणच असते. दोघांमध्ये मानसिक स्तर आणि क्षमता यांच्यात फरक दिसून येतो. तरी दोघांमध्ये प्रेम टिकून राहतं.
मूलांक ४चा पती आणि मूलांक ७ची पत्नी यांचं फारसं जमत नाही. दोघंही एकमेकांना समाधान देऊ शकत नाहीत. असं असलं तरी दोघांचं एकमेकांशिवाय पान हलत नाही. भांडणं, वाद, मतभेद या गोष्टी दोघांच्याही आयुष्यात येतंच असतात. पण यामुळे  वेगळे होण्याची परिस्थिती उद्भवत नाही.  
मूलांक ४चा पती आणि मूलांक आठची पत्नी यांचं साधारण जमतं. मूलांक ४च्या पतीच्या उग्र स्वभावामुळे मूलांक ८च्या पत्नीला मानसिक त्रास होतो. मूलांक ४च्या पतीचं मूलांक आठच्या पत्नीवर खूप प्रेम असतं. मूलांक ८च्या पत्नीला तिच्या संततीच्या शिक्षणाशी निगडित समस्यांमुळे त्रास होतो. या दोघांचे संबंध साधारण असतात.  
मूलांक ४चा पती आणि मूलांक नऊची पत्नी यांचं फार जमू शकत नाही. एकमेकांच्या हेकेखोरपणामुळे त्यांचं वैवाहिक जीवन वाद, मतभेद यांच्या चक्रात अडकतं. त्याची परिणती वेगळे होण्यात होऊ  शकते. संतती सुख लाभत नाही.

स्त्री – मूलांक ४ च्या पत्नीचं मूलांक एकच्या पतीशी फारसं जमत नाही. मूलांक एकच्या पतीच्या उग्र आणि रागीट स्वभावामुळे मूलांक चारच्या पत्नीला मानसिक त्रास होतो. दोघांमध्ये विनाकारण वाद होतात.  
मूलांक ४च्या पत्नीचं मूलांक २च्या पतीशी उत्तमरीत्या जमतं. दोघंही मूडी असल्यामुळे अनेकदा छोटी-मोठी भांडणं होतात. पण त्यांच्यातील समजूतदारपणा मात्र कमी होत नाही. मध्यम वयात सुखसमृद्धी प्राप्त होते.
मूलांक ४च्या पत्नीचं मूलांक तीनच्या पतीशी फारसं जमत नाही. मूलांक ४च्या पत्नीचा भावुक स्वभाव तिच्यासाठी त्रासदायक ठरतो. तिचा हा स्वभाव तिला कधी उग्र तर कधी शांत बनवतो. हळूहळू संसारात विश्वास कमी होत जातो.  
मूलांक ४ची पत्नी आणि मूलांक ४चा पती यांचं चांगल्या प्रकारे जमतं. मूलांक ४ची पत्नी पतीवर नेहमी विश्वास ठेवते. दोघेही आपापल्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडतात. यांना संतती सुख लाभतं. अधिक संततीचा योग नसतो.                  
मूलांक ४ची पत्नी आणि मूलांक पाचचा पती यांचे वैवाहिक संबंध चांगल्या प्रकारे जमून येतात.  मूलांक पाचच्या पतीच्या अधिकार गाजवण्याच्या वृत्तीशी मूलांक चारची पत्नी चांगल्या प्रकारे सांभाळून घेते.  मूलांक पाचचा पती पुरेसा वेळ देत नसल्यामुळे त्याची पत्नी नाराज होऊ शकते.  
मूलांक ४ची पत्नी आणि मूलांक ६चा पती यांचं साधारण जमतं. यांच्या आयुष्यात चांगले-वाईट असे दोन्ही दिवस येत राहतील. पतीला पत्नीकडून अनेक तक्रारी असू शकतील. पण ही समस्या फार मोठी नसल्यामुळे यातून तोडगा निघत राहील. चढ-उतार येत राहतील. वैवाहिक जीवन फार उत्तम नसलं तरी फार वाईट असेल असं नाही. या जोडप्याला चांगलं संतती सुख लाभेल.
मूलांक ४च्या पत्नीचे मूलांक ७च्या पतीशी बरे-वाईट वैवाहिक संबंध असतील. मूलांक ७च्या पतीमध्ये ठामपणाचा अभाव असल्याने पत्नीला त्रास होईल. मूलांक ७च्या पतीच्या जबाबदारीपासून पळण्याच्या सवयीमुळे मूलांक ४च्या पत्नीला त्रास होतो. पण दोघांमध्ये प्रेम असतं. असमाधान आणि वाद यांवर नियंत्रण ठेवल्यास संसार नीट होऊ शकतो अन्यथा त्रास होतो.
मूलांक ४च्या पत्नीचं आणि मूलांक आठच्या पतीचं साधारण जमू शकतं. मूलांक ४च्या पत्नीचा उग्र स्वभाव मूलांक आठच्या पतीला मानसिक त्रास देणारा ठरतो. अनेकदा मूलांक ८च्या पतीची मनातली एखादी गोष्ट सांगू न शकल्यामुळे घुसमट होते. पण दोघांमध्ये प्रेम टिकून राहतं. मूलांक ८च्या पतीचे नकारात्मक विचार मूलांक ४च्या पत्नीला त्रास देत राहतात. पण, समजुतीने सगळ्या गोष्टींचा विचार केल्यास संसार नीट होऊ शकतो. मूलांक चारच्या पत्नीच्या उग्र स्वभावामुळे दोघांमध्ये खटके उडू शकतात. या जोडप्याचे संतती सुख ठीक असते.
मूलांक ४ची पत्नी आणि मूलांक ९चा पती यांचं फारसं जमून येत नाही. दोघांना एकमेकांबाबत फारसा विश्वास वाटत नाही. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याच्या सवयीमुळे त्यांचे आपापसातले संबंध खराब होतात. दोघांच्या मनात प्रेम असतं पण दोघांच्या अहंकारामुळे प्रेम संपत जातं. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्यामुळे जीवनात भांडण, अशांतता पसरते. वैवाहिक आयुष्य संपू लागतं. यांना संतती सुख सर्वसाधरण असतं.

मूलांक ५ चे जोडीदार बुद्धिमान असतात. त्यांच्यात परंपरा व आधुनिकता यांचा संगम असतो. एक जोडीदार म्हणून आपले कर्तव्य ते पूर्ण करतातच, मात्र काही वेळा व्यक्तिगत नात्यांपेक्षा व्यावसायिक हितसंबंधांना महत्त्व देताना दिसतात.

पुरुष – मूलांक ५ च्या पतीचे मूलांक १ च्या पत्नीशी वैवाहिक संबंध उत्तम मानले जातात. मूलांक ५ चा स्वामी बुध आणि एकचा स्वामी सूर्य हे एकमेकांचे मित्र आहेत. एकत्र बुद्धादित्य (बुद्ध+आदित्य) या राजयोगाची निर्मिती करतात. सुखसमृद्धी मिळते. मात्र दोघांचेही स्वभाव हट्टी आढळतात. मात्र वैवाहिक संबंधांवर फारसा नकारात्मक परिणाम होत नाही.
मूलांक ५ च्या पतीचे मूलांक २ च्या पत्नीबरोबर वैवाहिक जीवन संमिश्र असते. मूलांक ५ चा स्वामी बुध असेल तर मूलांक २ चा स्वामी चंद्राचा मुलगा आहे. मात्र दोघांच्या संबंधात सौहार्दाचा अभाव आहे. जर मूलांक ५ चा पती आपला हट्ट व संताप व मूलांक २ ची पत्नी आपल्या रागावर तसेच बोलण्यात कटुता टाळेल तर संबंध टिकू शकतात. अन्यथा व्यक्तिगत जीवनात तणाव निर्माण होतो.
मूलांक पाचचा पती व मूलांक तीनची पत्नी यांच्यात वैवाहिक संबंध फार सौहार्दाचे मानले जात नाहीत. दोघांचा हट्टी स्वभाव प्रेमात अडथळा ठरतो. मूलांक ५ चा पती एखादी गोष्ट मान्य करत नाही तर मूलांक ३ ची पत्नी त्याला समजून घेऊ शकत नाही. एक प्रकारे जुळवून घेण्याच्या वृत्तीचा अभाव असल्याने या दाम्पत्याच्या जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होतो.
मूलांक ५ च्या पतीचे मूलांक ४ च्या पत्नीबरोबर वैवाहिक संबंध मध्यम ते चांगले असतात. पती जरी हट्टी असला तरी पत्नी सांभाळून घेते. काही वेळा तणाव निर्माण होतो, मात्र वैवाहिक जीवनावर त्याचा परिणाम होत नाही. त्यांच्यात प्रेम टिकून राहते. मुलांची स्थिती चांगली असते,  कौटुंबिक वातावरण चांगले असते.
मूलांक ५ च्या पतीचे मूलांक ५ च्या पत्नीशी वैवाहिक जीवन उत्तम असते. दोघांची मानसिक स्थिती सारखी असल्याने परस्पर सामंजस्य उत्तम असते. दोघेही वैचारिक आदानप्रदान चांगल्या प्रकारे करतात. काही वेळा तणाव होतो, मात्र त्यांच्यातील प्रेम कमी होत नाही.
मूलांक ५ च्या पतीचे मूलांक ६ च्या पत्नीबरोबर सौहार्दपूर्ण संबंध असतात. एकमेकांविषयी असलेल्या ममत्वामुळे प्रेम वाढते. पत्नीला जरी सर्वसुखसोयी हव्या असल्या तर पतीला खटकल्या तरी तो पत्नीला विरोध करत नाही. त्यामुळे वैवाहिक जीवन उत्तम असते.
मूलांक ५ च्या पत्नीचे मुलांक ७ च्या पत्नीबरोबर वैवाहिक जीवन संमिश्र असते. काही वेळा पत्नीला तणावाचा सामना करावा लागतो. मात्र जीवनात सुखदु:खे असतातच. काही तणाव असले तरी वैवाहिक जीवन सुरळीत चालते.
मूलांक ५ चा पती व मूलांक ८ च्या पत्नीचे वैवाहिक जीवन उत्तम असते. दोघांच्या जीवनात प्रेम व समृद्धीचे अनेक क्षण येतात. त्यांच्या जीवनात भौतिक सुखांबरोबरच आध्यात्मिक सुखही असते. अनेक वेळा मूलांक ८ च्या पत्नीला जीवनात मानसिक ताणतणाव निर्माण होतात, मात्र अशा वेळी पती समजून घेतो.
 मूलांक ५ च्या पतीचे मूलांक ९ च्या पत्नीबरोबर वैवाहिक जीवन संमिश्र असते. त्यांच्या जीवनात सुखदु:खाचे प्रसंग येतात. पतीचा हट्टी स्वभाव तर पत्नीचा संताप यामुळे वाद निर्माण होतात. मात्र दोघांनी तडजोडीचा मार्ग स्वीकारला पाहिजे.  पतीची बुद्धी व पत्नीचे ज्ञान व शिस्त यांचा योग्य वापर केला तर त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी येते. दोघांनीही एकमेकांना समजून चुकांना माफ करण्याची सवय लावायला हवी.
स्त्री – मूलांक ५ ची पत्नी व मूलांक १ चा पती यांच्या वैवाहिक जीवनात सुखसमृद्धी असते. दोघांमध्ये अफलातून सामंजस्य असते. दोघांच्या संबंधातून राजयोग होतो. याला बुद्धादित्य (बुद्ध+आदित्य) योग म्हणतात. मात्र स्वभावातील रागीटपणा दोघांनी कमी करायला हवा.
मूलांक ५ च्या पत्नीचा मूलांक २ च्या पतीबरोबर वैवाहिक जीवन चांगले असते. त्यांच्या जीवनात अनेक चढ-उतार येतात, मात्र त्यांचे भविष्य चांगले असते. यांनी कौटुंबिक कलह टाळला व मतभेद दूर केले तर त्यांचे भविष्य उत्तम आहे.
मूलांक ५ च्या पत्नीचे मूलांक ३ च्या पत्नीबरोबर वैवाहिक संबंध फार चांगले असतात असे नाही. त्यांच्या जीवनात सुख व आनंदाला पारखे होतात तसेच शांतताही भंग पावते. समृद्धी ऊन-पावसासारखी असते. प्रेम कमी होते. मात्र स्वत:वर नियंत्रण ठेवून शांततामय सहजीवन जगण्याचा प्रयत्न केला तर, एकत्र वाटचाल करता येईल.
मूलांक ५च्या पत्नीचे मूलांक ४ च्या पतीबरोबर वैवाहिक जीवन चांगले असते. मूलांक ४ चे पती भावूक व विचारात पडणारे असल्याने अनेक वेळा समस्या निर्माण होतात. मूलांक ५च्या पत्नीच्या हट्टी स्वभावाने अशांतता निर्माण होते. मात्र अशा स्थितीत योग्य निर्णय घेतल्यास संकटातून बाहेर येता येऊ शकेल.
मूलांक ५ च्या पत्नीचे मूलांक ५ च्या पतीबरोबर वैवाहिक जीवन समृद्ध असते. त्यांच्या जीवनात आनंद व प्रेमाचे क्षण येत राहतात. मानसिक संतुलन उत्तम असेल, सुख, समृद्धी वाढत जाईल.
मूलांक ५ च्या पत्नीचे मूलांक ६च्या पतीबरोबर वैवाहिक जीवन उत्तम असेल. जीवनात आनंद येईल. तसेच आपुलकी व प्रेम टिकून राहील. पत्नीच्या हट्टी स्वभावामुळे काही समस्या निर्माण होतील. मात्र त्यातून मार्ग निघेल. सुख, समृद्धीमध्ये वाढ होईल.
मूलांक ५ च्या पत्नीचे मूलांक ७ च्या पतीबरोबर वैवाहिक संबंध उत्तम असतील. पत्नीचा हट्टी स्वभाव व पतीमध्ये निर्णयक्षमतेच्या अभावाने काही वेळा मतभेद निर्माण होतील. वाद टाळण्याचा प्रयत्न करायला हवा. पैशाची चणचण भासेल. मात्र शांततेने वाटचाल केली तर सर्वकाही व्यवस्थित होईल.
मूलांक ५ ची पत्नी व मूलांक ५ चा पती यांचे वैवाहिक जीवन सुखाचे असते. दोघांमध्ये प्रेम व आपलेपणा वाढत राहतो. भौतिक सुखाबरोबरच आध्यात्मिक प्रगती होते. धनप्राप्तीही होते.
मूलांक ५ च्या पत्नीचे मूलांक ९ च्या पतीबरोबर वैवाहिक संबंध बरे असतात. दोघांच्या जीवनात चढ-उतार येतात. सुख, दु:ख येतात, समस्या निर्माण झाल्या तरी त्यातून मार्ग निघतो. मूलांक ९ च्या पतीची अधिकार गाजवण्याची वृत्ती तर मूलांक ५ च्या पत्नीचा हट्टी स्वभाव समस्या निर्माण करतो. मात्र शांततेने जीवनात वाटचाल केली तर सुख, समृद्धी येईल.

मूलांक ६ च्या व्यक्ती कलाप्रेमी, दूरदृष्टीच्या तसेच आपली प्रतिमा जपण्याच्या दृष्टीने जागरूक असतात. तसेच ते भावूक व प्रेमळही असतात. आपल्या जोडीदाराबाबत हे खूप जागरूक असतात. एक जोडीदार म्हणून ते रोमँटिक, नाटकी आणि संवेदनशील असतात.
मूलांक ६चा स्वामी शुक्र हाच मुळी प्रेमाचे प्रतीक आहे. मूलांक ६ च्या लोकांच्या जीवनात भरपूर प्रेम असते. उमद्या स्वभावासाठी या व्यक्ती ओळखल्या जातात. मात्र अनेक वेळा प्रेमात गैरसमज  होण्याची शक्यता असते.
पुरुष –  मूलांक ६ च्या पतीबरोबर मूलांक १च्या पत्नीचे वैवाहिक संबंध बरे असतात. पतीचे व्यक्तिमत्त्व पत्नीपेक्षा आकर्षक असल्याने काही वेळा प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे काही वेळा भावनिक प्रश्न व तक्रारी असतात मात्र तरीही त्यांच्यातील प्रेम कमी होत नाही. परस्पर सामंजस्यातून त्यांची वाटचाल सुरू राहते.
मूलांक ६ च्या पत्नीचे मूलांक २ च्या पत्नीबरोबरचे वैवाहिक जीवन चांगले असते. काही वेळा पत्नीला भावनात्मक समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र दोघांचे संबंध मैत्रीचे राहतात. काही वेळा क्षुल्लक गोष्टींमुळे मोठे वाद होतात. त्यातून मार्ग काढण्याच्या क्षमतेचा दोघांकडेही अभाव असतो. मात्र तरीही एकमेकांना दोघे मदत करतात त्यांच्यातील प्रेमही कमी होत नाही
मूलांक ६ च्या पतीचे मूलांक ३ च्या पत्नीबरोबर वैवाहिक संबंध उत्तम असतात. त्यांच्यात सामंजस्य असते. मनाने व व्यावहारिकदृष्टय़ा वेगळे असले तरी त्यांच्यात उत्तम सहकार्य असते. ते उत्तम जोडीदार असतात. त्यांच्या भाग्य, प्रगती व क्षमतांचा विकास होतो. त्यांची मुलेही हुशार असतात.
मूलांक ४ च्या पतीचे मूलांक ६ च्या पतीबरोबर वैवाहिक जीवन संमिश्र असते. त्यांच्या जीवनात बरे-वाईट प्रसंग येतात. काही वेळा पतीला पत्नीच्या काही गोष्टी खटकतात मात्र दोघेही त्यातून मार्ग काढतात. जीवनात चढउतार असतात मात्र कठीण प्रसंगानंतर चांगले दिवस येतात. त्यांची मुले हुशार असतात.
मूलांक ६ च्या पतीचे मूलांक ६ च्या पत्नीबरोबर वैवाहिक जीवन उत्तम मानले जाते. जीवनात आनंद असतो. प्रेम व परस्पर सौहार्द यांच्यात वाढ होते. जीवनात सुख-शांततेबरोबर प्रगती होते. पत्नीच्या हट्टी स्वभावाने काही वेळा समस्या निर्माण होतात. मात्र दोघांच्या समन्वयातून मार्ग निघतो. सुख, समृद्धी वाढते.
मूलांक ६ च्या वराचे मूलांक ६ च्या वधूबरोबर वैवाहिक जीवन उत्तम असते. दोघांमध्ये चांगला समन्वय असतो. मात्र स्वभाव एकसारखा असल्याने भावनात्मक समस्या निर्माण होतात. मात्र वैवाहिक जीवनावर त्याचा फारसा नकारात्मक परिणाम होत नाही.
मूलांक ६ च्या पतीचे वैवाहिक संबंध चांगले असतात. दोघांच्या प्रेम तसेच आनंदी जीवन असते. काही वेळा वैचारिक मतभेद निर्माण होतात. मात्र जीवनात सुख-समृद्धी असते. काही वेळा दोघे एकमेकांना वेळ देऊ शकत नाही मात्र त्याचा वैवाहिक जीवनावर परिणाम होत नाही.
मूलांक ६ च्या पतीचे मूलांक ८ च्या पत्नीबरोबर वैवाहिक जीवन आनंदी असते. दोघांच्या जीवनात सुख, समृद्धी असते. यातील पतीचे भावनात्मक प्रश्न व महिलेचा नकारात्मक विचार यामुळे काही वेळा तणाव निर्माण होते. मात्र याचा वैवाहिक जीवनावर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. दोघांचे संबंध मैत्रीपूर्ण राहतील.
मूलांक ६ च्या पतीचे मूलांक ९ च्या पत्नीशी वैवाहिक संबंध उत्तम असतील. दोघांमध्ये उत्तम समन्वय राहील. मूलांक ९ च्या पत्नीचा आक्रमक स्वभाव व मूलांक ६ च्या पुरुषांच्या नम्र स्वभावामुळे काही वेळा किरकोळ तणाव निर्माण होईल. मात्र भिन्न स्वभाव असतानादेखील वैवााहिक संबंध चांगले राहतील. मानसिक पातळीवरही चांगला समन्वय असेल.
स्त्री – मूलांक ६ च्या पत्नीचे मूलांक १च्या पतीबरोबर वैवाहिक संबंध संमिश्र असतात. दोघांमध्ये प्रेम टिकते. मात्र यात पत्नीला काही भौतिक सुखसाधनांचे फार आकर्षण असल्याने पतीला त्याचा त्रास होतो. मात्र परस्पर सामंजस्यातून संबंध सुधारू शकतात.
मूलांक ६ च्या पत्नीचे मूलांक २ च्या पतीशी वैवाहिक संबंध फार चांगले नसतात. हे चांगले मित्र होऊ शकतात मात्र यांच्या पती-पत्नीचे नाते फार सौहार्दाचे नसते. मात्र दोघांनीही प्रामाणिक प्रयत्न केले तर वैवाहिक जीवन चांगले राहील.
मूलांक ६ च्या पत्नीचे मूलांक ३ च्या पतीशी वैवाहिक जीवन उत्तम असते. दोघांच्यात एकमेकांच्या प्रति आदर असतो उत्तम समन्वय असतो. दोघांचा स्वभाव वेगळा असला तरी त्याचा विपरीत परिणाम होत नाही. दोघांच्यात प्रेम टिकून राहते. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्याची ताकद त्यांच्यात असते. दोघांचे नशीब एकमेकांना साथ देते.
मूलांक ६ च्या पत्नीचे मूलांक ४ च्या पतीशी वैवाहिक जीवन बरे असते. दोघांची मानसिक स्थिती, स्वभाव यांचा अनेक वेळा परिणाम होतो. मात्र प्रेम कायम रहाते. कुरबुरी असल्या तरी वाटचाल सुरू रहाते.
मूलांक ६च्या वधूचे मूलांक ५च्या पुरुषाचे वैवाहिक जीवन सुखकर असते. दोघांमध्ये प्रेम व सहकार्य कायम राहते. मूलांक ५च्या पतीचा स्वभाव वेगळा असला तरी पत्नीच्या भौतिक सुखाला अनुकूल अशा गोष्टींना तो पाठिंबा देतो त्यातून त्यांच्या जीवनात वाद होत नाहीत. त्यांचे वैवाहिक जीवन चांगले असते.
मूलांक ६ ची पत्नी व मूलांक ६ चा पती यांचे वैवाहिक जीवन संमिश्र असते. त्यांच्यात सामंजस्य व मदत कायम राहते. सारखा स्वभाव असल्याने भावनिक पातळीवर काही कटकटी निर्माण होतात. मात्र समजून घेण्याच्या वृत्तीने ते यातून मार्ग काढतात.
 मूलांक ६ च्या पत्नीचे मूलांक ७ च्या पतीबरोबर संबंध बरे असतात. दोघांचे संबंध मैत्रीपूर्ण राहतील मात्र पतीच्या निर्णयप्रक्रियेतील वेगळ्या विचाराने वाद उद्भण्याची शक्यता असते. तरीही दोघे एकमेकांना समजून घेतील.
 मूलांक ६च्या पत्नीचे मूलांक ८च्या पतीशी वैवाहिक संबंध चांगले राहतील. दोघांच्यात प्रेम बहरत जाईल. पतीचे नकारात्मक विचार तसेच अनेक वेळा जास्त विचार करण्यामुळे काही वेळा वाद होईल. मात्र वैवाहिक संबंधावर त्याचा परिणाम होणार नाही.
मूलांक ६च्या पत्नीचे मूलांक ९च्या पतीबरोबर वैवाहिक संबंध सर्वोत्तम मानले जातात. स्वभाव वेगळे असले तरी त्यांच्यात स्नेह व सामंजस्य उत्तम असते. त्यांना जीवनात सुख व शांतता मिळते. त्यांच्या भाग्यातून भरभराट होते.

मूलांक ७ च्या व्यक्ती विनम्र, कलाप्रेमी, कलाकार, रोमँटिक तसेच आपल्या जोडीदाराला प्रसन्न ठेवणाऱ्या असतात. तसेच एक जोडीदार म्हणून त्यांच्यात सर्वगुण असतात. त्यांच्या जीवनात पैशापेक्षा वैवाहिक संबंधांना महत्त्व असते. मात्र तरीही आपल्या जोडीदारासाठी पुरेसा धनसंचय करतात. ते कष्टाळू असतात.
पुरुष –  मूलांक ७ च्या पतीचे मूलांक १ च्या पत्नीबरोबर वैवाहिक संबंध सर्वसाधारण असतात. मूलांक ७ च्या पतींमध्ये निर्णयक्षमतेचा अभाव असतो त्यामुळे त्यांना मानसिक आधाराची गरज भासते व मूलांक १ ची पत्नी ते पूर्ण करते. मात्र मूलांक १ च्या पत्नीने आपल्या रागीट स्वभावावर नियंत्रण ठेवायला हवे. त्यामुळे संबंध भक्कम होतील व परस्परांमध्ये प्रेम वाढीस लागेल.
मूलांक ७ च्या पतीचे मूलांक २ च्या पत्नीबरोबर वैवाहिक संबंध बरे असतात. मात्र मूलांक २ च्या पत्नीचा चंचल स्वभाव व मूलांक ७ च्या पतीमध्ये निर्णय घेण्याच्या क्षमतेच्या अभावाने समस्या निर्माण होतात. मूलांक ७ चे पती जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसतात. मात्र एकमेकांबद्दल मनात प्रेम असते. त्यांच्यात चांगले सामंजस्य असते.
मूलांक ७ च्या पतीचे मूलांक ३ च्या पत्नीशी संमिश्र संबंध असतात. काही वेळा मोठय़ा प्रमाणात कटुता होते तर काही वेळा खूप प्रेम असते. मूलांक ३ च्या पत्नीचे कठोर बोलणे या संबंधामध्ये अडसर निर्माण करते. चांगला समन्वय असेल व स्त्रीने आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवले तर संबंध सुरळीत राहू शकतात.
मूलांक ७ च्या पतीचे मूलांक ४ च्या पत्नीशी वैवाहिक संबंध संमिश्र असतात. पुरुषाच्या विचारात ठामपणा नसल्याने त्याचा पत्नीला त्रास व दु:ख होईल. मात्र त्यांच्यात प्रेम व आपुलकी टिकून राहील. असंतोष व वादावर नियंत्रण ठेवले तर वैवाहिक जीवन चांगले राहील अन्यथा वाद उद्भवतील.
मूलांक ७ च्या पतीचे मूलांक ५ च्या पत्नीबरोबर वैवाहिक जीवन उत्तम असते असे नाही. पत्नीचा हट्टी स्वभाव व पतीमध्ये निर्णय घेण्याच्या क्षमतेचा अभाव यामुळे मतभेद निर्माण होऊ शकतात. वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करणे चांगले. दोघांनीही शांततेने प्रश्न सोडवले तर सर्व काही ठीक होईल.
मूलांक ७ च्या पतीचे मूलांक ६ च्या पत्नीबरोबर वैवाहिक जीवन मध्यम स्वरूपाचे असते. त्यांचे संबंध मैत्रीपूर्ण असले तरी अनेक वेळा वादाचे प्रसंग निर्माण होतात. मात्र दोघे एकमेकांना सांभाळून घेतात. आर्थिक स्थिती उत्तम राहील.
मूलांक ७ च्या पतीचे मूलांक ७ च्या पत्नीशी फार चांगले वैवाहिक जीवन नसते. परस्पर विश्वास व सहकार्याची भावना कमी असते. एकमेकाला दोष देण्याची सवय त्रासदायक होते. जबाबदारीतून पळ काढण्याच्या वृत्तीचा वैवाहिक जीवनावर परिणाम होतो.
मूलांक ७ च्या पतीचे मूलांक ८ च्या पत्नीशी वैवाहिक जीवन संमिश्र असते. त्यांच्यात प्रेम व परस्पर सहकार्य चांगले असते. काही किरकोळ वाद उद्भवतात मात्र त्याचा वैवाहिक जीवनावर परिणाम होत नाही.
 मूलांक ७ च्या पतीचे मूलांक ९ च्या पत्नीशी वैवाहिक संबंध सर्वसाधारण असतात. मूलांक ९ च्या पत्नीचा रागीट स्वभाव समस्या निर्माण करतो, मात्र पती ते निभावून नेतो. मात्र अनेक वेळा चूक न मान्य करण्याची स्त्रीची भूमिका व आपणच श्रेष्ठ असल्याची भावना वाद निर्माण करते त्यातून पुरुष मार्ग काढतात. मुले हुशार असतात.
स्त्री – मूलांक ७ च्या पतीचे मूलांक १ च्या पतीबरोबर वैवाहिक संबंध प्रेमाचे असतात. पत्नीचा कुटुंबवत्सल व कलात्मक दृष्टिकोन घर व कुटुंबाला बळ देतो. त्यामुळे वैवाहिक जीवन आनंददायी असते.
मूलांक ७ च्या पत्नीचे मूलांक २ च्या पतीशी गृहस्थी जीवन संमिश्र असते. या दोन्ही मूलांकांचे एकमेकांशी सख्य आहे. त्यामुळे त्या पातळीवर हे संबंध उत्तम असतात. दोघांमध्ये उत्तम समन्वय असतो. मात्र अहंभाव असल्याने त्याचा वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. मात्र श्रेष्ठ न मानण्याची भावना व समन्वय तसेच परस्पर प्रेम-आदर ठेवला तर वैवाहिक संबंध उत्तम राहतील.
मूलांक ७ च्या पत्नीचे मूलांक ३ च्या पतीशी वैवाहिक संबंध संमिश्र असतात. मूलांक ७ च्या पतीचा कलात्मक दृष्टिकोन व मूलांक ३ च्या पतीचे व्यावहारिक दृष्टिकोन त्यासाठी काही वेळा अनुकूल तर काही वेळा हानीकारक ठरतात. पतीच्या कठोर व फटकळ बोलण्यामुळे पत्नी दुखावली जाण्याची शक्यता आहे. मात्र दोघांच्या भाग्यात आनंद असल्याने शेवट गोड होतो.
मूलांक ७ च्या पत्नीचे मूलांक ४ च्या पतीशी वैवाहिक संबंध फार चांगले समजले जात नाहीत. मात्र ते फार ताणलेही जात नाहीत. वार्धक्यात दोघे एकमेकांना उत्तम साथ देतात. दोघांमध्ये काही वेळा वाद होतात मात्र ते फार गंभीर नसतात. संतती सुख उत्तम असते.
मूलांक ७ च्या पत्नीचे मूलांक ५ च्या पतीबरोबर वैवाहिक संबंध संमिश्र असतात. मूलांक ७ च्या पत्नीला काही वेळा मानसिक तणाव येतो त्यातच मूलांक ५ चे पती पत्नीच्या इच्छेविरुद्ध जातात. जीवनात सुख-दु:खे येतात. काही समस्या असल्या तरी जीवन सुरळीत चालते.
मूलांक ७ च्या पत्नीचे मूलांक ६ च्या पतीबरोबर वैवाहिक जीवन सामान्य असते. दोघांमध्ये प्रेम व आनंद असतो. काही वेळा जीवनात वाद निर्माण होतील त्यातून मनस्ताप सहन करावा लागेल. मात्र जीवनात सुख, समृद्धी कायम राहील. काही वेळा जीवनात सामंजस्याचा अभाव राहील, मात्र जीवनावर त्याचा परिणाम होणार नाही.
 मूलांक ७ च्या पत्नीचे मूलांक ७ च्या पतीशी वैवाहिक संबंध फार चांगले नसतात. नकारात्मक भावनेतून दोघांनाही त्रास होतो. किरकोळ कारणांवरून संबंध, प्रेम व आपुलकी कमी होऊ लागते. त्यातून एकमेकांच्या त्रुटी दिसू लागतात. वादामुळे आर्थिक संकटदेखील येण्याचा धोका असतो.
मूलांक ७ च्या पत्नीचे मूलांक ८ च्या पतीशी वैवाहिक जीवन चांगले असते. काही वेळा पुरुषाच्या नकारात्मक विचारामुळे तणाव होऊ शकतो. मात्र काही चांगले क्षणही जीवनात येतात. एकंदरीत संबंध चांगले असतात.
मूलांक ७ च्या वधूचे मूलांक ९ च्या पतीशी वैवाहिक संबंध बरे मानले जातात. त्यांच्यात प्रेम असते मात्र अनेक वेळा मतभेद दिसून येतात. पतीचा रागीट स्वभाव असला तरी पत्नीचा जुळवून घेण्याचा स्वभाव असल्याने सांभाळून नेले जाते. आर्थिक चढ-उतार राहतात मात्र संबंधावर त्याचा परिणाम होत नाही.

मूलांक ८ च्या व्यक्ती विचारी, नियमानुसार वागणाऱ्या संयमी, संस्कारक्षम व दृढनिश्चयी असतात. कोणत्याही विषयावर सखोल व गंभीरपणे विचार करणे हे त्यांच्या स्वभावामध्ये असते. या कल्पनाशील व प्रेमी व्यक्ती असतात. आपल्या जोडीदाराकडून त्यांच्या खूप अपेक्षा असतात. मात्र त्यांच्या अपेक्षा वास्तवात येत नाहीत.

पुरुष – मूलांक ८ चे पती व मूलांक १ ची पत्नी यांच्यातील संबंध सुरुवातीला चांगले असतात, नंतर मात्र ते ताणतणावाचे होत जातात. काळाबरोबरच हळूहळू त्यांच्यात कटुता निर्माण होते. कालांतराने त्यांच्या सहजीवनातील आनंद कमी होतो.
 मूलांक ८ च्या पतीचे मूलांक २ च्या पत्नीबरोबर वैवाहिक संबंध बरे असतात. त्या दोघांच्यात उत्तम समन्वय असतो, मात्र मूलांक ८ च्या पतीची उदासीन वृत्ती व नकारात्मक स्वभाव या मुळे या दोघांच्या नात्यामध्ये संबंधात तेढ निर्माण होते. अनेक वेळा मूलांक २ ची पत्नी आपल्या जोडीदाराशी संबंध टिकवण्याचा प्रयत्न करते मात्र ती संतापावर नियंत्रण ठेवू शकत नाही. या दोघांनी परस्पर सामंजस्य ठेवले तर त्यांचा संसार चांगला होईन ते दोघेही उत्तम जीवन व्यतीत करू शकतील.
 मूलांक ८ च्या पतीचे मूलांक ३ च्या पत्नीशी वैवाहिक जीवन सर्वसाधारण स्वरुपाचे असते. मूलांक ८ च्या पतीची कोणत्याही गोष्टीत सखोल विचार करण्याची वृत्ती तसेच मूलांक ३ च्या पत्नीच्या स्वभावात असलेला समजूतदार यामुळे त्यांच्या वैवाहिक संबंधांना चांगलीच बळकटी मिळते. या दोघांचे विचार भिन्न असले तरी छोटय़ा-मोठय़ा मतभेदांचा त्यांच्या संबंधांवर परिणाम होत नाही. दोघांमध्ये पती पत्नी म्हणून परस्पर  प्रेम व एकमेकांबद्दलची आपुलकी कायम राहते.
मूलांक ८ च्या पतीचे मूलांक ४च्या पत्नीशी संबंध मध्यम स्वरुपाचे असतात. मूलांक ४ च्या पत्नीचा  स्वभाव हट्टी असल्याने तिच्या वागण्याचा तिच्या पतीला कधीकधी मानसिक त्रास होतो. काही वेळा पतीला आपले म्हणणे मूलांक ४ च्या पत्नीसमोर स्पष्टपणे मांडता येत नसल्याने त्याचा मानसिक कोंडमारा होतो. असे असले तरीही यांच्यातील प्रेम कायम राहते.
 मूलांक ८ च्या पतीचे मूलांक ५ च्या पत्नीशी संबंध सौहार्दाचे असतात. जीवनातील भौतिक सुखांच्या उपभोगाबरोबरच त्या दोघांचीही आध्यात्मिक प्रगती व आर्थिक उन्नती होते. या दोघांमधील परस्पर प्रेम व साहचर्य सहवासाबरोबर वाढते.
 मूलांक ८ च्या पतीचे मूलांक ६ च्या पत्नीशी वैवाहिक संबंध उत्तम राहतात. पतीची पत्नीवर मोहिनी असते. दोघांच्यात प्रेम व आपुलकी असते. पतीच्या नकारात्मक विचारांमुळे काही वेळा संसारात समस्या उद्भवण्याची शक्यता असते. मात्र वावाहिक संबंधावर त्याचा विपरीत परिणाम होत नाही.
 मूलांक ८ च्या पतीचे मूलांक ७ च्या पत्नीशी संबंध बरे असतात. काही वेळा पतीचे नकारात्मक विचार पत्नीला त्रासदायक ठरतात. काही दु:खद गोष्टी घडत असल्या तरी काही चांगल्या बाबीही घडतात.
मूलांक ८ च्या पतीचे मूलांक ८ च्या पत्नीशी संबंध उत्तम नसतात. एकमेकांवर आरोपांमुळे परिस्थिती बिघडते त्यामुळे भौतिक प्रगतीत अडथळे निर्माण होतात.
मूलांक ८ च्या पतीचे मूलांक ९ च्या पत्नीशी संबंध फार चांगले मानले जात नाहीत. पत्नीच्या हेकट व हट्टी स्वभावामुळे पतीला मानसिक व भावनिक त्रास होतो. त्यामुळे नाहक आर्थिक हानी होते. त्यातून प्रगतीत अडथळे निर्माण होतात.

स्त्री –  मूलांक ८ च्या पत्नीचे मूलांक १ च्या पतीबरोबर वैवाहिक संबंध फार चांगले नसतात. आपुलकी ते वाद असा हा प्रवास राहतो. पतीला त्रास होतो पत्नीला निराशा येऊ शकते.
मूलांक ८ च्या पत्नीचे मूलांक २ च्या पतीशी संबंध बरे असतात. त्यांच्यात परस्पर सहकार्य व प्रेम असते. मूलांक ८ च्या पत्नीचा अतिविचार करण्याचा स्वभाव तर मूलांक २ च्या पतीचा विक्षिप्त स्वभाव अडचणीचा ठरतो. मात्र वैवाहिक जीवनावर परिणाम होत नाही.
मूलांक ८ च्या पत्नीचे मूलांक ३ च्या पतीबरोबर वैवाहिक संबंध बरे असतात. काही कुरबुरी, वाद झाले तरी आपुलकी व प्रेम कायम असते. दोघांना एकमेकांबद्दल किरकोळ तक्रारी असतात. पत्नीचे नकारात्मक विचार अडचणीचे ठरू शकतात मात्र पती समजूतदार असल्याने स्थिती बिघडत नाही.
मूलांक ८ च्या पत्नीचे मूलांक ४ च्या पतीशी वैवाहिक जीवन बरे असते. मूलांक ४ च्या पतीची वायफळ खर्च करण्याची वृत्ती व रागीट स्वभावाचा पत्नीला त्रास होतो. मात्र मूलांक ८ ची पत्नी शांत राहून त्रास सहन करते व परिस्थिती हाताबाहेर जाऊ देत नाही. मात्र यात तिचा मानसिक कोंडमारा होतो. असे असले तरी मूलांक ४ चे पती मूलांक ८ च्या पत्नीवर खूप प्रेम करतात. मूलांक ८ च्या पत्नीला मुलांच्या शिक्षणाबाबत काही समस्या निर्माण होतील. मात्र एकूणच वैवाहिक संबंध साधारण असतील.
 मूलांक ८ च्या पत्नीचे मूलांक ५ च्या पतीशी उत्तम संबंध असतात. दोघांच्या जीवनात प्रेम व आर्थिक लाभाचे क्षण येतात. दोघांच्या भाग्यात भौतिक व आध्यात्मिक प्रगती आहे. मूलांक ८ च्या पत्नीला काही वेळा मानसिक तणाव निर्माण होतो मात्र पतीचा पाठिंबा व सहकार्य  मिळते.
मूलांक ८ च्या पत्नीचे मूलांक ८ च्या पतीशी वैवाहिक संबंध स्नेहपूर्ण असतात. दोघांच्या भिन्न स्वभावामुळे काही वेळा तणाव निर्माण होतो. मात्र त्यांचे संबंध सौहार्दाचे असतात.
 मूलांक ८ च्या पत्नीचे मूलांक ७ च्या पतीशी वैवाहिक संबंध बरे असतात. पत्नीचे नकारात्मक विचार व पतीमध्ये असलेला निर्णयक्षमतेचा अभाव यामुळे यांच्या संसरात काही प्रमाणात त्रास होऊ शकतो. मात्र याचा यांच्या संबंधांवर परिणाम होत नाही. दोघांच्यात प्रेम कायम राहते.
 मूलांक ८ च्या पत्नीचे मूलांक ८ च्या पतीबरोबर वैवाहिक जीवन फार चांगले मानले जात नाही. दोघांच्या नकारात्मक वृत्तीने अनेक समस्या निर्माण होतात. आर्थिक परिस्थितीवर त्याचा परिणाम होतो.
 मूलांक ८ च्या पत्नीचे मूलांक ९ च्या पतीबरोबर वैवाहिक संबध संख्याशास्त्राच्या दृष्टीने शुभ नाहीत. हे संबंध त्यांच्यात तणाव व द्वेष निर्माण करतात. अनेक मानसिक व भावनात्मक समस्या निर्माण होतात. पतीचा रागीट तर पत्नीचा नकारात्मक स्वभाव समस्या निर्माण करतो.

मूलांक ९ चे लोक शिस्तप्रिय, टीकाकार, उत्साही, उग्र स्वभावाचे आणि अभ्यासू असतात. ते जोडीदारावर खरं प्रेम करणारे आणि जागरूक व कर्तव्यनिष्ठ असतात. त्यांचं प्रेम नाटकी नसतं. त्यांचं प्रेम भावनिक व आत्मिक असतं. याचा कधीकधी त्यांना त्रासही होतो.
पुरुष – मूलांक ९चा पती व मूलांक १ची पत्नी यांचे संबंध सामान्य राहतील. पत्नीने कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळल्यामुळे त्यांचा संसार सुखाचा होतो.
मूलांक ९चा पती आणि मूलांक २ची पत्नी यांच्यात प्रेम व भांडणाचा योग्य मेळ राहतो.
मूलांक ९च्या पतीचा आणि मूलांक ३च्या पत्नीचा संसार अत्यंत सुखाचा होतो. तर्कशास्त्रीय विचारबुद्घी व समजूतदारपणा त्यांच्या नात्याला अधिक घट्ट व परिपक्व बनवतो.
मूलांक ९चा पती व मूलांक ४ची पत्नी यांचे सहजीवन त्रास, भांडणे, सततची चिंता यांनी भरलेले असते. सुरुवातीला भरपूर असणारे प्रेमही नंतर कमी होत जाते.
मूलांक ९चा पती आणि मूलांक ५ची पत्नी यांचे संबंध मध्यम असतात. दोघांची अभ्यासूवृत्ती, पतीचा जबाबदार स्वभाव आणि पत्नीची बुद्घिमत्ता यामुळे त्यांचे संबंध उत्तरोत्तर प्रगती करतात.
मूलांक ९चा पती व मूलांक ६चा पत्नी यांचे संबंध प्रेम, आपलेपणा व समजूतदारपणामुळे श्रेष्ठ समजले जातात.
मूलांक ९चा पत्नी व मूलांक ७ची पत्नी यांचे संबंध सामान्य असतात. पत्नीच्या मनात पतीबद्दल प्रेम असते, पण पतीच्या कोरडय़ा स्वभावामुळे तिची निराशा होते.
संख्याशास्त्रानुसार मूलांक ९चा पती व मूलांक ८ची पत्नी यांचे संबंध सफल होण्याची शक्यता खूपच कमी असते. संबंधात भांडणं आणि तणाव राहतात.
मूलांक ९चा पती आणि मूलांक ९ची पत्नी यांना संसारसुख व संततिसुखही मिळते. कधीकधी दोघांच्याही उग्र स्वभावामुळे तक्रारी होतात, पण त्या वाढू न देण्याची खबरदारी घेतल्यास संसार सुखाचा होतो.

स्त्री – मूलांक ९ची पत्नी व मूलांक १चा पती यांच्यात सुरुवातीला आनंद, तर नंतर भांडणांची स्थिती ओढवते.
मूलांक ९ची पत्नी आणि मूलांक २चा पती यांचे वैवाहिक जीवन सामान्य राहील. पतीचा मूडी स्वभाव व पत्नीचा उग्र स्वभाव काही वेळा समस्या निर्माण करतात, पण संबंधांमध्ये विशेष नकारात्मक परिणाम होत नाही.
मूलांक ९ची पत्नी आणि मूलांक ३चा पती यांचे संबंध उत्तम असतात. पत्नीच्या उग्र स्वभावामुळे समस्या निर्माण झाल्या तरी पती ते सांभाळून घेतो. त्यांच्यातील प्रेमामुळे ते एकमेकांशिवाय जगू शकत नाहीत. उशिरा झाले तरी चांगली मुलं होतात.
मूलांक ९ची पत्नी व मूलांक ४चा पती यांचे संबंध एकमेकांविषयी तक्रारी, असंतुष्टपणा यामुळे अतिशय विस्कळीत होतात. त्यांना मुलांचे सुखही फारसे मिळत नाही.
मूलांक ९ची पत्नी व मूलांक ५चा पती यांचे संबंध मध्यम होतात. पतीची बुद्घिमत्ता व पत्नीचा शिस्तप्रिय स्वभाव कुटुंबाला सांभाळून ठेवतो.
मूलांक ९ची पत्नी व मूलांक ६चा पती यांचे संबंध सर्वात उत्तम मानले जातात. त्यात प्रेम, आपलेपणा एकमेकांना साथ देण्याची क्षमता आढळते.
मूलांक ९ची पत्नी व मूलांक ७चा पती यांचे संबंध ठीकठाक राहतात. पतीचे आकर्षक असणे पत्नीच्या मनात असुरक्षितपणाची भावना पैदा करते.
मूलांक ९ची पत्नी व मूलांक ८चा पती यांचे संबंध मध्यम प्रतीचे राहतात. पत्नीचा उग्र व असंवेदनशील स्वभाव आणि पतीचा अतिविचारशील स्वभाव यामुळे सुरुवातीचे प्रेम हळूहळू कमी होत जाते.
मूलांक ९ची स्त्री आणि मूलांक ९चा पुरुष यांचे संबंध प्रेम व मानसिक जवळिकीमुळे चांगले राहतात. संततिसुख मिळून समृद्घीही मिळते.