सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने सुरू असलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या एकांकिका स्पर्धाना राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानिमित्त-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नाशिक केंद्रावर एका एकांकिकेचा दिग्दर्शक प्रकाशयोजनेसाठी अधिकचे स्पॉट वापरता येणार नाहीत म्हणून आयोजकांशी भांडू लागला, तर रत्नागिरी येथे पहिल्या एकांकिकेला तयारीसाठी अधिक वेळ मिळतोय हे कळताच आम्हालाही तेवढाच वेळ मिळायला हवा, अशी मागणी करत त्याने लावलेला सेट (नेपथ्य) काढायला लावला. महाराष्ट्रात कोणत्याही शहरात किंवा गावात जा, नाटय़जाणिवा या सारख्याच आहेत, हे लोकांकिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा अनुभवण्यास मिळाले.

समर्पक नाव ‘लोकांकिका’
‘जनमानसाचे विचार’ या एकांकिकांमधून प्रतिबिंबित होत आहेत. त्यामुळे लोकांची एकांकिका ती लोकांकिका असे नमूद करीत ‘लोकांकिका’ या नावाचे कौतुक वामन केंद्रे यांच्यासह परीक्षकांनीही केले. ‘लोकांकिका’ हे नाव एकांकिका स्पर्धामध्ये राज्यभरात तरुणांना परिचयाच्या असलेल्या रवी मिश्रा यांच्या सुपीक डोक्यातून आले आहे. त्यांच्याच अस्तित्व या संस्थेचे मोलाचे सहकार्य या स्पर्धेला लाभले आहे.

सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने सुरू असलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेच्या राज्यभरातील आठही केंद्रांवरील अंतिम फेऱ्या मागच्या आठवडय़ात पार पडल्या आणि २० डिसेंबरला स्पर्धेची महाअंतिम फेरी दादरच्या रवींद्र नाटय़मंदिर येथे रंगणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी, अहमदनगर, औरंगाबाद आणि नागपूर या आठ केंद्रांवर ३० नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या नाटय़जागराची झिंग सर्वप्रथम प्राथमिक फेरी, त्यानंतर अंतिम फेरी अशी चढत गेली आणि आता सर्वानाच उत्सुकता लागून राहिली आहे ती महाअंतिम फेरीची. वर्षांला कमीत कमी पाच ते सहा मोठय़ा स्पर्धाची सवय असलेल्या मुंबई, ठाणे आणि पुण्याच्या नाटय़वेडय़ा मंडळींना स्पर्धा तशा नव्या नाहीत; परंतु या परिघाबाहेरच्या तरुणाईला लोकांकिका ही स्पर्धा म्हणजे एक पर्वणीच ठरली. ‘लोकसत्ता’ लोकमान्य लोकशक्ती असलेल्या वर्तमानपत्रानेच ही आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित केल्यामुळे तिच्याबद्दल सर्वाच्याच मनात आपुलकी आणि एक वेगळे कुतूहल होते. त्यामुळेच पहिल्याच वर्षी राज्यभरातून तब्बल १०६ महाविद्यालयांनी यात सहभाग घेतला आणि स्पर्धेचे ‘लोकांकिका’ हे नाव किती समर्पक आहे हे सिद्ध केले. स्पर्धेसाठी नवीन संहिता ही अट असल्यामुळे नव्याने संहिता लिहिण्यात आल्या. त्यामध्ये मोठय़ा लेखकांच्या कथांचे नाटय़रूपांतर करायचे असो वा महाविद्यालयातील विद्यार्थी लेखकाने लिहिलेली संहिता असो, सर्वच तोडीस तोड होत्या, असे म्हटले तर वावगे ठरणार नाहीत. म्हणूनच प्राथमिक फेरी आणि विभागीय अंतिम फेरीत, एकाहून एक दमदार प्रयोगांनंतर तांत्रिक, वैयक्तिक आणि सांघिक बक्षिसे निवडण्यासाठी एकांकिका सादरीकरणानंतर लगेचच अध्र्या तासाने निकाल लागेल, अशी घोषणा केल्यावर निकालासाठी मात्र प्रत्यक्षात एक तासाहून अधिक वेळ लागत असे. या स्पर्धेचे वैशिष्टय़ म्हणजे आठ केंद्रांपैकी तीन केंद्रांवर सवरेत्कृष्ट दिग्दर्शकाचा मान हा मुलींना मिळाला आहे. अपूर्वा भिलारे (एकांकिका – चिठ्ठी, पुणे), अपूर्वा कुळकर्णी (एकांकिका – बोल मंटो, नागपूर) आणि श्रुती देशमुख (एकांकिका – चिमणी चिमणी खोपा दे, अहमदनगर) या तिघीही विद्यार्थी दिग्दर्शिका आहेत. त्याचप्रमाणे ‘एक दिग्दर्शक’ ही संकल्पना मोडीत काढत मुंबईची विजेती ठरलेली एकांकिका चक्क सुशील, कुणाल, पराग या तीन तरुणांनी मिळून दिग्दर्शित केलेली आहे. नाटक अथवा एकांकिकेच्या सादरीकरणाला प्रयोग असे म्हटले जाते. तसेच प्रयोगागणिक ती अधिक समृद्धही होत जात असते. याचीच अनुभूती लोकांकिकेच्या निमित्तानेसुद्धा आली. प्राथमिक फेरीत एका शाळेच्या खोलीत अथवा हॉलमध्ये कुठलेही नेपथ्य, रंगभूषा, तांत्रिक साहाय्याशिवाय पार पडलेल्या प्रयोगांना अंतिम फेरीमध्ये एक वेगळीच झळाळी प्राप्त झालेली दिसली. उदा. ठाणे विभागात सवरेत्कृष्ट ठरलेल्या ‘मड वॉक’ आणि ‘मोजलेम’ या एकांकिकांमध्ये नेपथ्य हे फार मोलाची भूमिका बजावते; परंतु प्राथमिक फेरीत त्यांनी नेपथ्याचा अभाव जाणवू दिला नाही, तर अहमदनगरच्या ‘चिमणी चिमणी खोपा दे’ व ‘कोंडवाडा’ या एकांकिकांमध्ये प्रकाशयोजनेची भूमिका मोठी होती. ती उणीव त्यांनी प्राथमिक फेरीत जाणवू दिली नाही आणि अंतिम फेरीत त्याचा खुबीने वापर करून बक्षीसही जिंकले.

मुंबई विभाग- अंतिम फेरी निकाल
* सवरेत्कृष्ट एकांकिका प्रथम- ‘बीइंग सेल्फिश’
(एम. एल. डहाणूकर कॉलेज)
* सवरेत्कृष्ट एकांकिका द्वितीय- ‘डज नॉट एक्झिस्ट’
(कीर्ती महाविद्यालय)
* सवरेत्कृष्ट एकांकिका तृतीय- ‘दस्तुरखुद्द’
(साठय़े महाविद्यालय )

ठाणे विभाग- अंतिम फेरी निकाल
* सवरेत्कृष्ट एकांकिका प्रथम- ‘मड वॉक’
(सी.एच.एम. महाविद्यालय )
* सवरेत्कृष्ट एकांकिका द्वितीय- ‘मोजलेम’
(जोशी-बेडेकर महाविद्यालय)
* सवरेत्कृष्ट एकांकिका तृतीय- ‘कुछ तो मजा है’
(सेंट गोन्सालो गार्सयिा महाविद्यालय )

पुणे विभाग- अंतिम फेरी निकाल
* सवरेत्कृष्ट एकांकिका प्रथम- ‘चिठ्ठी’
(आयएलएस विधी महाविद्यालय )
* सवरेत्कृष्ट एकांकिका द्वितीय- ‘फोटू’
(मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालय)
* सवरेत्कृष्ट एकांकिका तृतीय- ‘रुह हमारी’
(गरवारे वाणिज्य महाविद्यालय)

नाशिक विभाग- अंतिम फेरी निकाल
* सवरेत्कृष्ट एकांकिका प्रथम- ‘हे राम’
(के. के. वाघ महाविद्यालय)
* सवरेत्कृष्ट एकांकिका द्वितीय- ‘तहान’
(पंचवटी महाविद्यालय)
* सवरेत्कृष्ट एकांकिका तृतीय- ‘इटर्नल ट्रथ’
(न. ब. ठाकूर विधी महाविद्यालय)
अहमदनगर विभाग- अंतिम फेरी निकाल
* सवरेत्कृष्ट एकांकिका प्रथम- ‘कोंडवाडा’
(पेमराज सारडा महाविद्यालय)
* सवरेत्कृष्ट एकांकिका द्वितीय- ‘चिमणी चिमणी खोपा दे’
(अहमदनगर महाविद्यालय)
* सवरेत्कृष्ट एकांकिका तृतीय- ‘उद्ध्वस्त घरटं’
(संजीवनी महाविद्यालय, कोपरगाव)

रत्नागिरी विभाग- अंतिम फेरी निकाल
* सवरेत्कृष्ट एकांकिका प्रथम- ‘कबूल है ’
(डीबीजे महाविद्यालय)
* सवरेत्कृष्ट एकांकिका द्वितीय- ‘राजा’
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय)
* सवरेत्कृष्ट एकांकिका तृतीय- ‘हिय्या’
(गोगटे जोगळेकर महाविद्यालय)

औरंगाबाद विभाग- अंतिम फेरी निकाल
* सवरेत्कृष्ट एकांकिका प्रथम- ‘मसणातलं सोनं’
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ- नृत्य विभाग)
* सवरेत्कृष्ट एकांकिका द्वितीय- ‘जाहला सोहळा अनुपम’
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ- संगीत विभाग)
* सवरेत्कृष्ट एकांकिका तृतीय- ‘तिच्यासाठी वाट्टेल ते’
(देवगिरी महाविद्यालय)

नागपूर विभाग- अंतिम फेरी निकाल
* सवरेत्कृष्ट नाटक प्रथम- ‘बोल मंटो’,
(एल.ए.डी. महाविद्यालय)
* सवरेत्कृष्ट नाटक द्वितीय- ‘त्या वळणावर’,
(शिवाजी सायन्स कॉलेज)
* सवरेत्कृष्ट नाटक तृतीय – ‘मीडिया’,
(चक्रपाणी पंचकर्म योगतिसर्गोपचार महाविद्यालय)

समांतर किंवा प्रायोगिक रंगभूमीवर जितके प्रयोग सादर झाले नसतील त्याहून किती तरी अधिक पटींनी प्रयोग एकांकिकांमधून होत असतात, असे मत राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाचे (एनएसडी) संचालक वामन केंद्रे यांनी मुंबई विभागाच्या अंतिम फेरीच्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले; पण त्याचा प्रत्यय ‘लोकांकिका’ ही स्पर्धा सुरू झाल्यापासून प्रत्येक केंद्रावर येत होता. काही एकांकिकांमध्ये केवळ दोनच पात्रे तरी काहींची मांडणी समूहनाटय़ाच्या अंगाने करण्यात आली होती. रंगमंचावर दुसऱ्या महायुद्धाचा काळ उभा करायचा असो वा वेश्या वस्ती, प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास केल्याचा प्रत्यय येत होता. पुण्यातील दोन एकांकिकांच्या संघांनी तर जादूचे प्रयोग आणि डोंबाऱ्याचे खेळ रंगमंचावर सादर करायचे आहेत म्हणून डोंबाऱ्याकडून आणि जादूगाराकडून त्याचे रीतसर प्रशिक्षणही घेतले होते. लेखनाच्या बाबतीतही अत्यंत प्रामाणिक आणि वेगवेगळे प्रयोग स्पर्धेच्या निमित्ताने पाहावयास मिळाले. नागपूरमधील एका महाविद्यालयाने ‘लोकसत्ता’त दोन वर्षांपूर्वी छापून आलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातमीवर एकांकिका बसवली होती. यावरूनच तरुण मंडळी किती बारकाईने वर्तमानपत्राचे वाचन करतात आणि किती संवेदनशीलपणे समाजाकडे पाहत असतात याचा प्रत्यय आला, तर पुण्याच्या ‘रूह हमारी’ या एकांकिकेच्या निमित्ताने भारताची प्रतिज्ञा कोणी लिहिली आणि तिचा पाठय़पुस्तकामध्ये कसा समावेश झाला, याचा सखोल अभ्यास करून संहिता लिहिण्यात आली होती, तर ‘मड वॉक’सारख्या एकांकिकेतून बुद्धाच्या विचारांचा शोध घेण्यात आला होता. मिठीबाई महाविद्यालयाच्या ‘एडीबीसी’ एकांकिकेमधून माणसातल्या चांगुलपणातून देवत्व दिसून येऊ शकते, हे परिणामकारकरीत्या मांडण्यात आले होते. नाटकांमधील संवाद हा एकांकिकेचा प्राण असतो. अनेकदा हलक्याफुलक्या अंगाने जाणाऱ्या एकांकिकेतही असे काही छोटे, पण आशययुक्त संवाद असतात, ज्यासाठी तुम्हाला कुठलेही तत्त्वचिंतन मांडावे लागत नाही. याचा प्रत्यय ‘कबूल है’, ‘बोल मंटो’ आणि ‘बीईंग सेल्फिश’ या एकांकिकांच्या निमित्ताने आला. ‘लोकांकि के’च्या निमित्ताने एक बाब प्रकर्षांने जाणवली आणि ती म्हणजे आजच्या काळाचे विषय तरुणांना खूप आकर्षित करत आहेत. म्हणूनच सोशल मीडियासारख्या विषयावर अनेक एकांकिकांमधून भाष्य करण्यात आले होते. सोशल मीडिया, मोबाइल, इंटरनेट यांनी आपले जग व्यापून टाकले असताना त्याचे फायदे-तोटे मांडताना फक्त शहरातीलच नव्हे, तर ग्रामीण भागातील तरुणाईसुद्धा या सगळ्याकडे किती डोळसपणे पाहते याचा प्रत्यय आला. त्यामुळेच तरुणांना भेडसावणाऱ्या समस्यांवर त्यांनीच त्या समजून-उमजून भाष्य करणे ही बाब दखल घेण्यासारखी आहे. 

गावोगावच्या कलाकारांचा शोध
‘लोकांकिका’ स्पर्धेच्या निमित्ताने तरुणांच्या कलागुणांना वाव देण्याचाही उपक्रम हाती घेण्यात आला आहे. अनेकदा एक संघ म्हणून एकांकिका परीक्षकांवर छाप पाडू शकत नाही. मात्र, त्यातील काही कलाकार हे आपला ठसा उमटवण्यात यशस्वी होतात. पण एकांकिका पुढे न गेल्यामुळे त्यांना परत एकदा नवीन स्पर्धेची वाट पाहावी लागते. म्हणूनच ‘लोकसत्ता’ने अशा गावोगावच्या कलाकारांचे गुण हेरण्याचेही कामही यानिमित्ताने केले. आयरिस प्रोडक्शनच्या मदतीने सर्व प्राथमिक फेऱ्यांमधून अशा कलाकारांचा शोध घेण्यात आला आहे. आता या कलाकारांना मालिका, चित्रपट आणि रंगभूमीवर थेट काम करण्याची संधी मिळणार आहे.

विंगेतली धमाल
एकांकिका सादर होत असताना प्रेक्षकांना रंगमंचावर काय चालले आहे ते फक्त दिसत असते. मात्र, त्यापूर्वी मेकअप रूममध्ये आणि विंगेत जी धावपळ सुरू असते ते पाहण्याची मजाही काही औरच आहे. नागपूरच्या अंतिम फेरीत शेवटची एकांकिका सुरू असताना एक पात्र विंगेत बसलेल्या आयोजकांपैकी एका व्यक्तीकडे गेलं, माझी आता एन्ट्री आहे, प्लीज मला तुमचा शर्ट काढून द्या, अशी मागणी केली. आयोजकाला त्याची निकड माहीत असल्याने त्याने लागलीच आपला शर्ट काढून दिला. काही वेळाने तेच पात्र आपली भूमिका बजावून विंगेत आलं आणि त्याने तो शर्ट त्याला परत केला.

या स्पर्धेला शांता गोखले, कमलाकर नाडकर्णी, माधव वझे अशोक समेळ, अशोक पाटोळे, अभिराम भडकमकर, नागराज मंजुळे, प्रसाद वनारसे, देवेंद्र पेम इ. दिग्गज मंडळींनी विविध केंद्रांवर परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रत्येक केंद्रावरील तरुणांचा उत्साह, नाटकाविषयीची समज आणि विषय हाताळण्याची हातोटी याबाबत त्यांनी सर्वाचे अभिनंदन तर केलेच पण त्यांच्या प्रयोगांमध्ये राहिलेल्या काही उणिवाही समजावून सांगितल्या. आम्हाला तुमच्याकडून ठोकळेबाज अभिनय, सादरीकरणाची अपेक्षा नाही. आम्हाला तुमच्याकडून नवीन प्रयोगांची अपेक्षा आहे. कारण हे व्यासपीठ त्यासाठीच आहे, असं मत परीक्षकांनी यानिमित्ताने व्यक्त केलं. ज्या एकांकिका बक्षिसास पात्र ठरल्या किंवा ज्यांना वैयक्तिक पारितोषिके मिळाली त्यांनी अधिक सुधारणा काय करायला हव्यात यासाठी परीक्षकांशी संवाद साधला. परंतु एक बाब सर्वच केंद्रांवर प्रामुख्याने पाहावयास मिळत होती, ती म्हणजे ज्या एकांकिकांना बक्षीस मिळाले नाही, त्या संघांनी परीक्षकांची भेट घेऊन आणखी काय सुधारणा करायला हव्यात याबाबत आवर्जून विचारणा केली आणि परीक्षकांनीही त्यांना मनमोकळेपणाने मार्गदर्शन केले. एकांकिका म्हटलं की धमाल-मस्ती आलीच. तरुणाईचा सळसळता उत्साह, काही तरी वेगळं करून दाखवण्याची ऊर्मी आणि आपले विचार प्रभावीपणे लोकांसमोर मांडण्याची धडपड ही एकांकिकेतून समोर येत असते. स्पर्धेच्या दिवशी प्रयोग सादर करणे हा त्याचा उच्चबिंदू झाला, परंतु त्याआधी लेखनप्रक्रिया, तालमी आणि नंतर रंगीत तालीम ही धावपळ सर्वच केंद्रांवर पाहायला मिळत होती. एवढंच काय औरंगाबाद केंद्रावर ज्या दिवशी ‘लोकांकिका’ स्पर्धेची अंतिम फेरी होती त्याच दिवशी विद्यापीठाच्या स्पर्धाही होत्या, त्यामुळे दोन महाविद्यालयांना त्यांचे येथील अंतिम फेरीचे प्रयोग संपवून लगेचच विद्यापीठात प्रयोग सादर करण्यासाठी पळायचे होते. पण ते करीत असताना ‘लोकांकिका’ अंतिम फेरीचा प्रयोग हा दमदारच झाला पाहिजे, हीच भावना संपूर्ण संघाच्या मनात होती आणि त्याप्रमाणे त्यांनी चोख प्रयोग करूनही दाखवला. एका तासाच्या आत सेट लावणे, प्रयोग सादर करणे आणि पुन्हा रंगमंच मोकळा करणं ही स्पर्धेची अट सर्व केंद्रांवर अगदी काटेकोरपणे पाळली गेली. आपली वेळ सुरू होण्याआधी विंगेमध्ये सामान घेऊन उभं राहणं आणि वेळ सुरू होताच पुढील दहा मिनिटांत रंगमंचावर एक वेगळं विश्व उभं करणं व प्रयोग संपल्यावर काही क्षणांमध्येच रंगमंच पुन्हा मोकळा करण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेची प्रचीती लोकांकिकेच्या निमित्ताने आली. प्रयोगाआधी कलाकार राजा, मात्र प्रयोगानंतर त्याचीही सामान हलवण्यासाठी चाललेली धावपळ हे चित्र केवळ एकांकिका स्पर्धामध्येच पाहावयास मिळू शकते. येत्या २० डिसेंबरला महाराष्ट्रातील आठही केंद्रांवरील पहिल्या क्रमांकाच्या एकांकिकोंचे प्रयोग सादर होतील. मुख्य म्हणजे बऱ्याच कालावधीनंतर एकांकिका स्पर्धामध्ये शहर आणि ग्रामीण भागातील प्रयोगांमधील चुरस प्रेक्षकांना अनुभवण्यास मिळणार आहे. आठ वेगवेगळे विषय मांडणाऱ्या आठ प्रभावी संहिता आणि तितकेच प्रभावी सादरीकरण असलेल्या सर्वच प्रयोगांमध्ये बाजी कोण मारणार आणि महाराष्ट्राची ‘लोकांकिका’ कोणती ठरणार याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला लागून राहिली आहे.