हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सायंदेव दत्तक्षेत्र – कडगंची
कर्नाटक राज्यात गुलबग्र्यापासून २१ कि.मी. वर गुलबर्गा-आळंद रस्त्यावर असलेले हे दत्तक्षेत्र सायंदेवाचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्री नृसिंह- सरस्वतींच्या करुणा पादुकांची इथे स्थापना केलेली आहे. दत्तात्रेयांची काळ्या पाषाणातील अत्यंत विलोभनीय मूर्ती इथे विराजमान झालेली दिसते. श्रीदत्तात्रेयांच्या अवतारपरंपरेतील श्रीनृसिंहसरस्वतींचा चरित्र व कार्यविषयक प्रमाणग्रंथ म्हणजे त्याचे शिष्य श्री सायंदेव यांच्या पाचव्या पिढीतील सत्पुरुष श्री सरस्वती गंगाधर यांनी श्रीगुरुचरित्र हा लिहिलेला प्रासादिक आणि
दत्तात्रेयांचे भिक्षाटन स्थान – कोल्हापूर</strong>
साडेतीन शक्तिपीठांपैकी कोल्हापूर हे अर्धे शक्तिपीठ आहे. श्रीदत्तात्रेय याच स्थानी भिक्षा मागण्यासाठी नेमाने येत असत असे मानले जाते. दत्तात्रेयांचे अंशावतार मानले गेलेले कुंभारस्वामी यांनी हे स्थळ आपल्या अवतार कार्यासाठी निवडले होते. स्वामींचा निवास असलेल्या कुंभार गल्लीमध्ये सुंदर असे दत्तमंदिर आहे. या मंदिरात गेलेल्या व्यक्तीला हमखास मन:शांती लाभते असे सांगितले जाते. इथे दत्तजयंती, कुंभारस्वामी जयंती-पुण्यतिथी इत्यादी उत्सव समारंभ साजरे होत असतात. भिक्षा-लिंग-स्थान या नावाचे अजून एक दत्तमंदिर कोल्हापुरात आहे. वेशीजवळचे हे स्थानदेखील जागृत असल्याचे सांगतात. कोल्हापूरपासून ४ किमी.वर प्रयाग नावाच्या तीर्थस्थानी दत्ताच्या पादुका असून हे एक अत्यंत पवित्र ठिकाण मानले गेलेले आहे.
माणिकनगर
सदानंदस्वामी, शिवरामस्वामी, पूर्णानंदस्वामी अशा अनेक संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या जयसिंगपेठ किंवा हुमणाबाद परिसरात दत्तात्रेयांचे चौथे अवतार मानण्यात आलेल्या श्रीमाणिकप्रभूंचा जन्म झाला. हैदराबादमधील कल्याण या गावात मनोहर माणिक आणि बायादेवी यांच्या पोटी माणिकप्रभूंचा जन्म झाला. बीदर तालुक्यातील हुमणाबाद या तालुक्याच्या ठिकाणापासून फक्त एक कि.मी.वर असलेले हे क्षेत्र
दत्तात्रेय क्षेत्र-चौल
ऐतिहासिक शहर चंपावतीनगर म्हणजेच आजचे चेऊल अथवा चौल होय. रेवदंडय़ापासून जेमतेम ४-५ कि.मी.वर वसलेले शांत सुंदर चौल. आजूबाजूला भातशेती, कोंकणी कौलारू घरे आणि फणसाच्या झाडांची सोबत लाभलेलं टुमदार चौल. पावसाळ्यात पाणी घरात येऊ नये म्हणून इथली घरे एका चौथऱ्यावर बांधलेली आढळतात. रायगड जिल्ह्य़ातील अलिबाग, थळ, साखर, अक्षी इत्यादी आठ आगरांच्या मिळून बनलेल्या समूहाला अष्टागर हे नाव पडले आहे. चौल हे या अष्टागरांचे राजधानीचे ठिकाण होते. चौलपासून जवळच असलेल्या एका टेकडीवर हे दत्तस्थान आहे. ही टेकडी दत्ताची टेकडी या नावाने ओळखली जाते. टेकडीच्या पायथ्याशी भोपाळे तळे या नावाचे एक तळे लागते. तळ्याच्या शेजारूनच पुढे दत्तमंदिराकडे जाण्यासाठी जवळजवळ १५०० सिमेंटच्या पायऱ्या चढून जावे लागते. मोठय़ा पायऱ्या आणि दोन्ही बाजूंना असलेली झाडे यामुळे ही चढण त्रासदायक होत नाही. तसेच वाटेत विश्रांतीसाठी बाके केलेली आहेत. डोंगरमाथ्यावरून रेवदंडा परिसराचा देखावा केवळ अप्रतिम दिसतो. वरती गेल्यावर समोर एक मठ लागतो. तिथे दोन औदुंबर वृक्ष आहेत. त्या वृक्षांखालीच पहिल्यांदा दत्तपादुका होत्या. इथेच वरच्या बाजूला एका मंदिरात दत्तमूर्ती व त्या मूर्तीच्या पुढय़ात मूळ पादुका आहेत. इथे हरेरामबुवा, मुरेडेबुवा, बजरंगदासबुवा, दीपवदासबुवा अशा सत्पुरुषांचे वास्तव्य होते. पैकी मुरेडेबुवांची इथे समाधी आहे. सन १९६३ साली या स्थानाचा जीर्णोद्धार करण्यात आला. इथे मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला खूप मोठी यात्रा भरते.
श्री दत्त ब्रह्म यंत्र – कोळंबी
मराठवाडा जसा मंदिर स्थापत्याच्या दृष्टीने संपन्न आहे तसाच तो अनेक वैशिष्टय़पूर्ण गोष्टींनी पण नटला आहे. कोळंबीचे दत्त मंदिर हे पण त्यातलेच एक वैशिष्टय़ होय. नांदेड जिल्ह्यतील नायगाव तालुक्यात नांदेड ते देगलूर मार्गावर काहळापासून अंदाजे ८ कि.मी.वर कोळंबी हे गाव आहे. या गावाच्या पूर्वेला एक मठ आहे, तो मठ म्हणजेच इथले दत्तसंस्थान होय. इथले वैशिष्टय़ म्हणजे इथे श्री दत्तात्रेय आणि त्यांची माता अनसुया यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना केलेली आहेच, शिवाय त्याच्या जवळच एका पाषाणावर कोरलेल्या ब्रह्मयंत्राचीची प्रतिष्ठापनासुद्धा केलेली दिसते. याला श्रीयंत्र असेही म्हणतात. या ब्रह्मयंत्रावर विविध प्रकारची चिन्हे कोरलेली आहेत. एकूणच अशा प्रकारची ब्रह्मयंत्रे फारच कमी आढळतात. नेपाळ, काशी,
दत्तमहाराज मंदिर – अष्टे
वेगळ्या वाटा धुंडाळत चालताना जशी आगळीवेगळी माणसे भेटतात त्याचप्रमाणे काही निराळी आणि छानशी ठिकाणेसुद्धा दर्शन देऊन जातात. खरं तर ही ठिकाणं जायच्या यायच्या वाटेपासून अगदी जवळ असतात, पण मुद्दाम त्यांना भेट देण्याचे राहूनच जाते. असेच एक स्थान आहे सांगली जिल्ह्यतील वाळवा तालुक्यातील अष्टे गावचे. दत्तमहाराज मंदिर या नावाने प्रसिद्ध असलेले हे एक जागृत देवस्थान आहे. अष्टे या नावाच्या मागे काही दंतकथा निगडित आहेत. प्रभू रामचंद्रांनी या ठिकाणी आठ शिवलिंगांची स्थापना केली होती म्हणून या गावास अष्टे हे नाव पडले असे सांगितले जाते. या गावी सदानंदस्वामी या महात्म्याचे वास्तव्य होते. इथे श्रीदत्तमहाराज या नावाचे एक मोठे सिद्ध पुरुष होऊन गेले. त्यांचे मूळचे नाव नरहरी दिवाण. ते एकनाथमहाराजांच्या मुलीच्या वंशाचे असल्याचे सांगतात. ते ब्रह्मचारी होते तसेच ते हठयोगी
भगवान दत्तात्रेय-खामगाव
विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव हे एक ठिकाण. या ठिकाणी संत पाचलेगावकर महाराजांचा मुक्तेश्वर आश्रम आहे. या मंदिरातील पंचधातूची तीन डोकी व सहा हातांची दत्ताची मूर्ती आहे. ही मूर्ती श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांनी करून घेतली होती व आपल्यानंतर ती पाचलेगावकर महाराजांनाच देण्यात यावी असे सांगून ठेवले होती. त्याप्रमाणे ही मूर्ती संत पाचलेगावकर यांना मिळाली आणि त्यांनी तिची मुक्तेश्वर मंदिरात प्रतिष्ठापना केली. परंतु इथले खरे वैशिष्टय़ म्हणजे श्री संत
दासोपंतांचा दत्त-अंबेजोगाई
योगेश्वरी देवीच्या स्थानामुळे प्रसिद्ध असलेले अंबेजोगाई हे ठिकाण मराठीतील आद्यकवी मुकुंदराज आणि संत दासोपंत यांच्या वास्तव्यानेही पुनीत झालेले आहे. दत्त संप्रदायात तीन भिन्न पंथ आहेत. ते म्हणजे दासोपंती, गोसावी आणि गुरुचरित्र पंथ. संत कवी दासोपंत हे त्यातल्या पहिल्या पंथाचे अध्वर्यू होते. त्यांच्याच नावाने तो पंथ ओळखला जातो. दासोपंती पंथाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांचा दत्त हा एकमुखी आणि द्विभुज असतो. दासोपंत हे एक महान दत्तभक्त होते. श्री दत्तात्रेयांनी त्यांना सगुण रूपात दर्शन दिले होते, असे सांगितले जाते. दासोपंतांनी स्थापन केलेले दत्त मंदिर मराठवाडय़ातील बीड जिल्ह्यतल्या अंबेजोगाई
गरुडेश्वर दत्तक्षेत्र
योगी परमहंस श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी यांच्या समाधीने पुण्यपावन झालेले गरुडेश्वर हे एक दत्तस्थान आहे. पुण्यपवित्र नर्मदा नदीच्या काठावरील हे एक अत्यंत निसर्गरम्य असे ठिकाण आहे. इथूनच शूलपाणी या अरण्याचा प्रारंभ होतो. टेंबेस्वामींनी या स्थानी एकांतात तपश्चर्या केली आणि इ.स. १९१४ च्या आषाढ शुद्ध प्रतिपदेला त्यांनी या स्थानी समाधी घेतली. याच स्थानाबद्दल पुराणात एक कथा येते.
श्री क्षेत्र दत्तवाडी – सांखळी गोवा</strong>
पणजीपासून साधारण ३५ कि.मी. अंतरावर डिचोली तालुक्यात सांखळी हे एक टुमदार शहर वसले आहे. म्हापसा-मडगाव रस्त्यावर डिचोलीपासून ७ कि.मी.वर सांखळी आहे. पर्ये, म्हाविळगे, कारापूर या ठिकाणांचे मिळून सांखळी हे गाव बनले आहे. गावातील बस स्थानकापासून केरी-मोर्लेममार्गे चोर्लेघाटाला जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला जवळच सांखळीचे सुप्रसिद्ध दत्तमंदिर आहे. स्थानिक मंडळी या ठिकाणाला क्षेत्र दत्तवाडी म्हणून ओळखतात. अनेक अद्भुत घटना आणि कथा या ठिकाणाशी निगडित आहेत हे इथले विशेष म्हणावे लागेल. अंदाजे सव्वाशे वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. म्हाळू कामत या विठ्ठल भक्ताचे सुपुत्र लक्ष्मण कामत हे निस्सीम दत्तभक्त होते. प्रतिवर्षी नरसोबाच्या वाडीला जाऊन ते गुरुचरित्राचे पारायण करीत असत. अनेक वर्षे हा नेम त्यांनी अत्यंत निष्ठेने चालविला होता, पण हा नेम चालवीत असताना त्यांना स्थानिक सेवेकरी अनेकदा त्रास देत असत, अवहेलना करीत असत. एकदा असाच अपमान सहन न झाल्याने कामत तिथून परत निघाले. आता मीच तुझ्या गावी राहायला येतो असे स्वप्नात त्यांना सांगितले. आणि मग विविध चमत्कारांची मालिकाच सुरू झाली, असे सांगितले जाते. मंदिरासाठी लागणारी साधनसामग्री उपलब्ध असलेल्या पैशांमध्ये मिळणे, मंदिरासाठी योग्य जागा, मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी योग्य मूर्ती, तीसुद्धा जेवढे जमले होते तेवढय़ाच पैशांमध्ये मिळणे, ती ज्यांच्या घरी आणून नुसती ठेवली त्यांच्या घरातील सर्व त्रास दूर होणे अशा एकामागून एक शुभ घटना घडत गेल्या आणि अंतत: ५ एप्रिल १८८२ रोजी या मूर्तीची दुपारी दोनच्या शुभ मुहूर्तावर मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सदर मूर्ती ही काश्मिरी पाषाणातील असून तिला तीन मुखे आणि सहा हात आहेत. अत्यंत जटिल मानसिक त्रास या ठिकाणी दर्शनाला आल्याने बरे होतात अशी दत्तभक्तांमध्ये ठाम श्रद्धा आहे. या ठिकाणी रामनवमी, अक्षय्य तृतीया, नवरात्रोत्सव, महाशिवरात्री आणि दत्तजयंती असे उत्सव-समारंभ साजरे होतात. प्रतिष्ठापना दिन हा दत्तमूर्तीचा वर्धापन दिन म्हणून साजरा होतो. सांखळीचे हे देवस्थान अत्यंत कडक आणि जागृत म्हणून पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध पावलेले आहे. या ठिकाणी सत्पुरुष सुबाण्णा तोडरबुवा आणि साधू जगन्नाथबुवा बोरीकर यांचे दीर्घकाळ वास्तव्य राहिलेले आहे.
श्री दत्तक्षेत्र – नारेश्वर
गरुडेश्वरसारखेच गुजरात राज्यामध्ये असलेले हे अजून एक दत्ततीर्थ नारेश्वर. खूपशी दत्तस्थाने ही त्या पंथामधील सत्पुरुषांमुळे ओळखली जाऊ लागली. दत्त संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार या थोर व्यक्तींनी आपल्या वर्तणुकीतून जनसामान्यांना करून दिला. ही सर्व थोर मंडळी त्यामुळे समस्त दत्तभक्तांच्या मनात कायमचे घर करून राहिली. महाराष्ट्रातील ही मंडळी आपल्या भौगोलिक सीमा ओलांडून पार दूरवर जाऊन स्थायिक झाली आणि दत्त संप्रदाय त्यांनी तिथे रुजवला-वाढवला. श्रीपरमहंस रंगावधूत महाराज हे असेच एक महान दत्तभक्त होत. गुजरातमधील वडोदरा या गावापासून अंदाजे ६० कि.मी.वर नर्मदेच्या रम्य तीरावर नारेश्वर हे तीर्थक्षेत्र वसले आहे. पश्चिम रेल्वेवर नारेश्वर रोड हे स्टेशन लागते. नारेश्वर हे स्थान पूर्वी
आदिलशाहीतले दत्त मंदिर
विजापूरला दत्ताचे एक पुरातन मंदिर असून ते तिथल्या नृसिंह मंदिर परिसरातच वसलेले आहे. या मंदिराबद्दल असे सांगितले जाते की, श्रीनृसिंहसरस्वतींचा एक मुसलमान भक्त त्या वेळच्या विजापूरचा बादशहा इब्राहिम अली याने या मंदिराची स्थापना केली आहे. तर काही संदर्भानुसार इब्राहिम अली या मंदिरात दर्शनासाठी येत असे. गुरुचरित्राच्या ९ व्या आणि ४९ व्या अध्यायात एका रजकाची कथा येते, त्यानुसार श्रीपाद श्रीवल्लभ यांचा एक रजक भक्त त्यांच्याकडे राजा होण्याची इच्छा व्यक्त करतो. श्रीपाद श्रीवल्लभ त्याला तू पुढील जन्मात राजा होशील असा वर देतात. तोच हा इब्राहिम अली होय, असे मानले जाते. त्याच्या पायाला झालेली जखम श्री नृसिंहसरस्वती यांनी केवळ दृष्टीमात्रे बरी केली आणि त्याला पूर्वजन्मीचे स्मरण करून दिले. नंतर हा बादशाह स्वामींचा अनन्यभक्त झाला अशी ही कथा. आपल्या दर्शनाचा लाभ निरंतर घडावा अशी त्याने स्वामीचरणी मनोभावे प्रार्थना केली. त्याचा सद्भाव पाहून स्वामींनी ती मान्य केली. विजापुराभोवती असलेल्या खंदकाच्या मध्यभागी पश्चिमेस जो पिंपळाचा वृक्ष आहे तिथे किल्ल्यात माझ्या पादुका तुला मिळतील त्यावर मंदिर बांधून माझी सेवा कर असे स्वामींनी त्याला सांगितले. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे बादशहास त्या पिंपळवृक्षाखाली पादुका सापडल्या. त्यावर त्याने मंदिर बांधले व श्रींची सेवा केली. पुढे त्या पिंपळवृक्षाला आत घेऊनच नृसिंहाचे देवालय उभारण्यात आले. आणि मंदिरात दत्तमूर्ती बसविण्यात आली. देवालयाला लागून पाण्याचा मोठा खंदक आहे. या खंदकाला देवळाच्या अंगाने एक घाटही बांधण्यात आलाय. या मंदिरात गुरुवारी आणि धार्मिक सणांच्या दिवशी श्री दत्ताचा छबिना काढतात. दत्तजयंती आणि गणेश चतुर्थी हे दोन उत्सव इथे मोठय़ा प्रमाणावर साजरे केले जातात. या मंदिराची माहिती असलेले पुरातन शिलालेख विजापूरच्या पूर्व आणि उत्तर दरवाजाजवळ बसवलेले आहेत.
ही सर्व दत्तस्थाने आपल्या अलौकिक वैशिष्टय़ांमुळे आवर्जून पाहिली पाहिजेत. ही ठिकाणे आपल्या नेहमीच्या प्रवासात कधी तरी लागली असतील. पण ती मुद्दाम थांबून तिथे जाऊन पाहिली पाहिजेत. आपल्या देखण्या महाराष्ट्रामध्ये खरोखरच अशी असंख्य दत्तस्थाने आहेत, जी त्यांच्या ठायी असलेल्या कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे प्रेक्षणीय आहेत. कोणती तरी कथा अथवा चमत्कार त्या ठिकाणांशी निगडित आहेत. दत्तसंप्रदायातील कोणा अधिकारी व्यक्तीच्या वास्तव्यामुळे पुनीत झालेली अशी ही ठिकाणे आहेत. वर उल्लेख केलेल्या स्थानांव्यतिरिक्त पुणे-दौंड मार्गावरील नारायण महराजांचे केडगाव बेट, नाशिकचा एकमुखी दत्त, नाशिक रोडचे घैसास दत्त मंदिर, माहुरचे निद्रास्थान, नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान मानले गेलेले लाडाचे कारंजे, महानुभावियांचा दत्त म्हणून खान्देशात प्रसिद्ध असलेले जळगाव जिल्ह्यतील चोरवड इथले दत्तमंदिर, नगर जिल्ह्यतील श्रीगोंदे तालुक्यातील शेडगावचे दत्तस्थान, जयपूरहून आणलेली शिव-दत्ताची मूर्ती असलेले बीड-नगर मार्गावरील आष्टीचे दत्तमंदिर, बार्शीपासून ५ कि.मी.वर असलेले पळेवाडीचे ब्रह्मनाथ मंदिर, सोलापूर जिल्ह्यतील माढा तालुक्यातील टेंभुर्णीचे दत्तक्षेत्र, सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यातील चिकुर्डे इथले श्री समर्थ सदगुरू दत्तमंदिर, श्री मल्हारस्वामींचे समाधीस्थान असलेले सातारा जिल्ह्यतील पाटण तालुक्यातील नाडोली गावचे दत्तमंदिर, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दत्तवायपूरचे जागृत दत्तस्थान, श्रीनृसिंह सरस्वती यांनी औदुंबर येथून नरसोबाच्या वाडीला जाताना ज्या गावी मुक्काम केला ते कसबे डिग्रज इथले दत्तस्थान, सांगली जिल्ह्यातल्या माधवनगर वसाहतीमधील फडके यांचे दत्तमंदिर, रांजणगाव सांडस इथले श्रीगुरुदेव दत्त देवस्थान, लोणीभापकरचा दशभुज दत्त आणि त्यांच्या शेजारीच असलेले यज्ञवराहाचे शिल्प, कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे देशपांडे दत्त मंदिर, कृष्णामाईच्या काठावर वसलेल्या धोम येथील नाथ पंथीयांचे अध्वर्यू असलेल्या श्रीमच्छिंद्रनाथांचे दत्तमंदिर, श्रीसंत पाचलेगावकर महाराजांचे गुरू श्री माधवानंद सरस्वती महाराज यांचे लीलास्थान असलेले परभणी जिल्ह्यातील पाचालेगावच्या जवळ असलेले नयकोटवाडी येथील दत्तमंदिर, भोर येथे दत्तंभट स्वामींच्या समाधीवर बांधलेले दत्तमंदिर, यादवांच्या देवगिरी किल्ल्यावर जनार्दनस्वामींनी किल्लेदार असताना बांधलेले दत्तमंदिर, प्रति गाणगापूर असलेले नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील देवाची करजी इथले दत्त मंदिर, मांडवगण फराटा इथले औंदुबर महाराज, मौजे खळद येथील खळदकरांचा दत्त, देवगडचा दत्त, अकलूजजवळील खंडाळीचा दत्त.. अशी एक ना अनेक अक्षरश: असंख्य दत्तस्थाने अवघ्या महाराष्ट्राभर पसरलेली आहेत. ती सगळी पाहायची म्हटले तरी एक जन्म पुरणार नाही अशी अवस्था आहे. इथे देव भक्तांची वाट पाहत कधीचा उभा आहे.