सकाम भक्ती मर्यादांमध्ये बंदिस्त झालेल्या दत्तोपासनेत टेंबेस्वामींनी ज्ञानभक्तीचे, अद्वैत तत्त्वदृष्टीचे अधिष्ठान स्पष्ट केले. त्यांच्या कार्यामुळे आणि वाङ्मयसंपदेमुळे दत्तभक्तीचा मूळ शुद्ध प्रवाह ओघवता झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कल्पना करा. एखादी भलीमोठी कविता आपल्यासमोर आहे. आपण ती सरळ वाचतो आहे. अन् कोणी म्हणाले की ‘त्या कवितेतल्या प्रत्येक ओळीतील चौथे अक्षर बाजूला काढ आणि ते सरळ वाच त्यातून एक वेगळी कविता तयार होते.’ तशी ती झाली, तर.. अशी रचना अनेक कवितेंच्या बाबतीत असेल तर अशा कवीला आपण काय संबोधणार? त्यातही अशा कविता संस्कृतमध्ये आणि त्याही अनेक संकटप्रसंगी उपाय असल्यासारखे सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणाऱ्या असतील तर! असे अद्भुत वाङ्मय लिहिणारे होते वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी.

सप्तशती गुरुचरित्रातील प्रत्येक ओळीतील तिसरे अक्षर म्हणजे श्री भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय! श्री दत्तसंप्रदायातील हा महान ग्रंथ. त्यांनी केलेले गणपती स्तोत्रही असेच. त्यातल्या प्रत्येक ओळीतील आधी तिसरे अक्षर घेतले आणि त्यानंतर पुन्हा आठवे अक्षर घेतले तर श्री गणेशाचा वेदांतील गणानांत्वा. हा मंत्र तयार होतो. गंगास्तोत्रातून अशाच काही अक्षरातून गंगेचा मंत्र, हनुमंत स्तोत्रातून हनुमंताचा मंत्र.. अशा अनेक रचना!

त्यांचे घोरकष्टोद्धारण स्तोत्र तर प्रत्येक दत्तसांप्रदायिकाच्या रोजच्या उपासनेत आहेच. कोणतेही संकट असो, स्वामींच्या या स्तोत्राचा आधार सगळ्यांनाच! याशिवाय मंत्रात्मक श्लोक म्हणजे उपायांची खात्रीशीर हमी असे समजले जाते! अशी कितीतरी स्तोत्रे अगदी रोजच्या उपयोगाची. सगळ्या रचना लोककल्याणकारी, अद्भुत व दैवी गुणांनी नटलेल्या. त्यांचे जीवनचरित्रही असेच जगावेगळे. त्यांचे रोजचे जेवण कसे? ते टोपे यांनी १८८७ च्या मे महिन्यात श्रीस्वामींना पाहिल्याची आठवण सांगितली आहे. ‘‘स्वामी रोज दुपारी आमचे घरी भिक्षेला येत असत. भिक्षेत ते तूप वाढू देत नसत. तीन घरची भिक्षा झाल्यावर ते सरळ गंगेवर जात असत. भिक्षान्नाची झोळी तीन वेळा गंगेतील पाण्यात बुडवून ती घेऊन अंताजी पंतांच्या घाटावरील आपल्या झोपडीत परत येत असत. तेथे ती झोळी थोडा वेळ एका खुंटीला टांगून ठेवणार. त्यातील सर्व पाणी गळून गेले की ती खाली घेऊन त्यातील अन्नाचे चार भाग करणार. एक गरीबाला दान करणे, एक कुत्र्याला देणे, एक गंगेला अर्पण करणे व शिल्लक चौथा स्वत: घेणार!’’ जिव्हालौल्य जिंकल्याची, वैराग्याची परिसीमा गाठलेली अशी किती उदाहरणे आज दिसतील हा प्रश्नच आहे.

श्री क्षेत्र माणगाव (कोकण) येथे सन १८५४ मध्ये स्वामींचा जन्म झाला. एकात्म आध्यात्मिक भारतीय राष्ट्रवादाचे प्रतीक म्हणजे स्वामींचे व्यक्तिमत्त्व, वाङ्मय आणि जीवनदृष्टी आहे. स्वामीनी संपूर्ण भारतात पायी अनवाणी भ्रमण केले. या प्रवासात सदैव ध्यान, तपश्चर्या, लेखन व प्रवचन असा त्यांचा नित्यनेम होता. निसर्गाकडे चला असा संदेश त्यांच्या तीर्थक्षेत्र, नद्या यांच्या वर्णनावरून अनुभवाला येतो. त्यांनी श्री गरुडेश्वर येथे सन १९१४ साली समाधी घेतली. स्वामींचा समाधी शताब्दी सोहळा नुकताच भारतात सर्व ठिकाणी साजरा झाला.

‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा विश्वशांती मंत्र जगाला देऊन त्यांनी लोकमंगल, लोककल्याणकारी वाङ्मय लिहिले. भारतीय तत्त्वज्ञान व वाङ्मयामध्ये स्वामींनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांच्या वाङ्मयावर महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात या प्रांतातील अभ्यासकांनी प्रबंध तयार करून विविध विद्यापीठांतून मान्यता मिळवलेली आहे. आजच्या विज्ञान युगात मानव हा एक यंत्र बनू लागला आहे. शाश्वत चिरंतन मूल्याची अवहेलना होत आहे. वैज्ञानिक प्रगती कितीही झाली तरी मानसिक दौर्बल्य वाढत चाललेले आहे. वरवर सुखी समाधानी, दिसणारा समाज अंतर्यामी दु:खी, खिन्न, उदासीन आहे. या दोन्ही गोष्टीतील तफावत कशी कमी होणार? या प्रश्नांची उत्तरे स्वामींच्या वाङ्मयात आहेत. भौतिक प्रगतीबरोबरच शाश्वत चिरंतन मूल्याचा ठेवा आपण प्राणपणाने जपला पाहिजे असे त्यांचे वाङ्मय सांगते.

श्री दत्तोपासना ही सांप्रदायिक आचार व सकाम भक्ती अशा मर्यादांमध्ये बंदिस्त झाली होती. स्वामींनी तिच्यात ज्ञानभक्तीचे, अद्वैत तत्त्वदृष्टीचे अधिष्ठान स्पष्ट केले. त्यांच्या कार्यामुळे आणि वाङ्मयसंपदेमुळे दत्तभक्तीचा मूळ शुद्ध प्रवाह ओघवता झाला. सिद्धप्रज्ञेतून स्फुरलेली ही त्यांची वाङ्मयसंपदा म्हणजे आधुनिक काळातील ‘ईश्वरी लेणे’ आहे. भारतीय तत्त्वज्ञान, धर्म आणि संस्कृती विपुल लेखन केले.

प्रबंधात्मक संशोधनाचा साधक आणि उपासक, आर्त, अर्थार्थी अशा भक्तांना प्रेरणा व अमृतानुभव मिळावा, तसेच जिज्ञासूंना परिचय व्हावा म्हणून ५५०० पृष्ठांचे वाङ्मय स्वामींनी तयार केले. स्वामींच्या जन्मशताब्दी वर्षांच्या निमित्ताने पुण्यातील योगिराज गुळवणी महाराज व ब्रह्मश्री दत्त कवीश्वर महाराज यांनी सन १९५४ मध्ये १२ खंड ९ ग्रंथांत संकलन करून श्रीस्वामींची वाङ्मयीन मूर्तीच जणू काही जगापुढे ठेवली. त्यानंतर समाधी शताब्दी वर्षांचे औचित्य लक्षात घेऊन हे वाङ्मय ‘जसेच्या तसे’ ५५०० पृष्ठांचे (१२ खंड ९ ग्रंथ) वाङ्मयांचे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून श्री वासुदेव निवास पुणे या संस्थेने सन २०१४ मध्ये प्रसिद्ध केले आहे.

या १२ खंडांचा थोडक्यात परिचय घ्यायचा झाला तर पुढीलप्रमाणे पाहता येईल.

पहिला खंड हा ‘शिक्षात्रयी’चा. यात कुमारशिक्षा, युवाशिक्षा व वृद्धशिक्षा असे तीन भाग. दुसरा खंड स्तोत्रसंग्रहाचा. श्रीस्वामीविरचित सर्व स्तोत्रे, प्रार्थना, अभंग एकत्र केलेला. त्यात मराठीतलीही काही पदे व अभंग आहेत. तिसरा खंड हा सप्तशतीगुरुचरित्रसार, श्रीदत्तलीलामृताब्धिसार, स्त्रीशिक्षा अशा रचनांनी भरलेला. चौथा खंड हा ‘दत्तमाहात्म्य’चा. पाचव्या खंडात गुरुचरित्रकाव्य व त्यावरील श्रीस्वामींची टीका असलेला. सहावा व सातवा खंड हा दत्तपुराणाने नटलेला. श्रीदत्तात्रेयांचा संपूर्ण इतिहास सांगणारा हा ग्रंथ म्हणजे श्रीस्वामींची प्रासादिक व स्वतंत्र अशी ग्रंथनिर्मिती आहे. आठवा व नववा खंड हा मराठी गुरुचरित्राचे सार दोन हजार श्लोकांत सांगणारा ग्रंथ आहे. यात शेवटी योग व ज्ञान या दोन मोक्षमार्गाचे विवेचन करणारे प्रकरण आहेत. दहावा व अकरावा खंड हा दत्तसंप्रदायाचा वेद ठरावा अशा ‘समलोकी गुरुसंहिते’चा तर बारावा खंड हा ब्रह्मश्री श्रीदत्तमहाराज कविश्वरांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या टेंबेस्वामींच्या चरित्राचा आहे.

संपूर्ण वाङ्मय हे लोकांसमोर यावे या हेतूने श्री वासुदेव निवास व पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एक राष्ट्रीय चर्चासत्र नुकतेच आयोजित केले गेले. भारतीय तत्त्वज्ञान व वाङ्मयामध्ये स्वामींचे योगदान असा विषय होता. या चर्चासत्रात विविध प्रांतांतून आलेल्या अभ्यासकांनी मराठी, िहदी, संस्कृत व इंग्रजी या भाषेतून विचार मांडले.