फोब्र्ज लिस्टमध्ये जे.के. रोलिंगच्या हॅरी पॉटरला- डॅनिएल स्टीललादेखील मागे टाकत टॉपला पोहोचलेली ब्रिटिश लेखिका ई. एल. जेम्स, म्हणजेच एरिका मिशेल, हिच्या ट्रायालॉजीमधल्या ‘फिफ्टी शेडस ऑफ ग्रे,’ या एका कादंबरीवर त्याच नावाचा रोमँटिक सिनेमा पुढच्या वर्षी येणार आहे. पण जगभरातले सिनेरसिक आत्तापासूनच या सिनेमाची वाट पाहताहेत.

‘‘मि. ग्रे विल सी यू नाऊ!’’
ख्रिश्चन ग्रे या उद्योगपतीची एका विद्यार्थी वृत्तपत्रासाठी मुलाखत घ्यायला गेलेल्या अॅनास्टॅशिया स्टीलला, ग्रेच्या भव्य ऑफिसमधल्या रिसेप्शनवरची ब्लाँड, सुंदर स्वागतिका त्याच्या केबिनमध्ये पाठवण्याआधी उच्चारते ते हे वाक्य! चित्रपटाच्या पोस्टरवर त्याची टॅगलाइन म्हणून वापरलंय!
कादंबरीतल्या खिश्चन-अॅनाच्या प्रथम भेटीच्या प्रसंगाच्या वर्णनात, अशा मुलाखतीसाठी जाण्याची पहिलीच वेळ असलेली अॅना ख्रिश्चनच्या केबिनमध्ये प्रवेश करताना तिचेच पाय एकमेकांत अडकून चक्क साष्टांग नमस्कार घालते, आणि तो तिला उठवून उभे करतो. अॅना ख्रिश्चनच्या प्रथमदर्शनीच प्रेमात पडते, आणि नंतर सुरू होतो तो त्यांच्या कधी दूर जाण्याचा, पण नंतर चुंबकासारखे एकमेकांच्या अधिकाधिक निकट येण्याचा भारावून टाकणारा प्रवास.
२०१५च्या फेब्रुवारीत व्हॅलेंटाईन्स डे ला प्रदर्शित होणाऱ्या ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ चित्रपटाची जगभरातल्या सर्वच थरांतल्या सिनेरसिकांना प्रचंड उत्सुकता आहे. फोब्र्ज लिस्टमध्ये जे.के. रोलिंगच्या हॅरी पॉटरला- डॅनिएल स्टीललादेखील मागे टाकत टॉपला पोहोचलेली ब्रिटिश लेखिका ई. एल. जेम्स, मूळ नाव एरिका मिशेल, हिची ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे,’ ‘फिफ्टी शेड्स डार्कर’ आणि ‘फिफ्टी शेड्स फ्रीड’ ही प्रत्येकी ५०० हून अधिक पानांची ट्रॉयलॉजी हा तिचा पहिलाच प्रयत्न आहे, ही वस्तुस्थिती अविश्वसनीय आहे. ‘व्टिवलाइट सागा (ळ६्र’्रॠँ३ रंॠं)च्या फॅन फिक्शनवरून एरिका मिशेलला ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ ही केवळ फँटसीमय, रोमँटिकच नव्हे, तर इरॉटिक कादंबरी लिहिण्याची प्रेरणा मिळाली, आणि सुरुवातीला ई-बुकच्या स्वरूपात आलेली, अल्पावधीतच लोकप्रियतेचे आणि अर्थातच खपाचे आधीचे सगळे उच्चांक मोडीत काढत नवनवीन उच्चांक स्थापन करणारी ही कादंबरी हार्ड-कव्हर स्वरूपात प्रकाशित झाली. कादंबरीचे पुढचे दोन खंडही एकामागून एक प्रकाशित झाले आणि तितकेच लोकप्रिय ठरले. ‘फिफ्टी शेड्स’ला विशेषत: स्त्रियांचा लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद जेम्सला ठिकठिकाणी दौरे काढून वाचकवर्गाला तिच्या स्वाक्षरीसह पुस्तकं विक्रीला चालना द्यायला पूरकच ठरला. एवढंच नव्हे तर कादंबरीत वर्णन केलेल्या ङ्रल्ल‘८ ऋ४ू‘ी१८साठी आवश्यक अशा ब्लाइंड फोल्डस, हॅन्डकफ्स, फ्लॉगर्स इ. गॅजेटसचा वापर कसा करावा, हे प्रात्यक्षिकांसह दाखवणारे वर्गही अमेरिकेत निघाले! मध्यमवयीन विवाहित स्त्री-पुरुषांनी, त्यांच्या शिळय़ा होत चाललेल्या वैवाहिक जीवनात एक नवीन फ्रेशनेस आणण्याचं काम केल्याबद्दल जेम्सला धन्यवाद दिले.
उत्पन्नाचे एवढे विक्रम करणाऱ्या या कादंबरीकडे सिनेनिर्मात्यांचं लक्ष गेलं नसतं तरच नवल. युनिव्हर्सल स्टुडिओज आणि फोकस इंटरनॅशनल यांनी तब्बल पाच मिलिअन यू.एस. डॉलर्स जेम्सला देऊ केले आणि चित्रपटासाठी कादंबरीचे हक्क विकत घेतले.
कादंबरीची नायिका अॅनास्टॅशिया स्टील, आणि जगभरातील महिला वाचकांच्या गळय़ातील ताईत बनलेला नायक ख्रिश्चन ग्रे, यांच्या भूमिकांत कोणती नटी, आणि नट ‘फिट’ ठरतील या प्रश्नावर बरेच तर्क-वितर्क लढवले गेले. एक अवघी बाविशीची, निळय़ा-निळय़ा मोठय़ा डोळय़ांची, छातीवर तिला आवरत न येणाऱ्या, चेस्टनट ब्राउन रंगाच्या केसांच्या बटा रूळत असणारी आकर्षक बांध्याची, हजरजबाबी, पण सेल्फ-कॉन्शस, नुकतीच ग्रॅज्युएट झालेली, वरचेवर लाजून लाल होणारी, खालचा ओठ चावण्याची सवय असलेली- अशा तरुण नायिकेच्या भूमिकेत कोण चपखल बसेल?
आणि ख्रिश्चन ग्रे? तो तर काय ‘ऑल युवर फॅन्टसीज रोल्ड इन वन..’ असा अतिशय देखणा, स्त्री-दाक्षिण्य, सौजन्य आणि शिष्टाचार अंगात मुरलेला, तेवढाच स्टाफशी वागताना ‘कर्ट,’ ग्रे एन्टरप्राईझेसचा सर्वेसर्वा, अत्याधुनिक गाडय़ांपासून हेलिकॉप्टपर्यंत सुखसुविधांचा सगळा ताफा सज्ज असणारा, अॅनास्टॅशियाला महागडय़ा पुस्तकांपासून ते लॅपटॉप-गाडीपर्यंत सगळं काही भेट देणारा, अद्याप अविवाहित, आणि जिथे जाईल तिथे त्याच्या मर्दानी देखणेपणाने तरुणींच्या हृदयाचे ठोके चुकवणारा- वयाच्या अवघ्या पस्तिशीतच एक यशस्वी उद्योजक- रुपेरी पडद्यावर ख्रिश्चन ग्रे साकारेल असा कोणता नट निवडावा? फॅन्समध्ये अनेक नावांची चर्चा झाली. ‘फिफ्टी शेड्स’च्या फॅन्सनी यू-टय़ूबवर ख्रिश्चन आणि अॅना या प्रणयी जोडीचे रोमँटिक असे बाथटबसीन, ख्रिश्चनची ‘रेड रूम ऑफ पेन’ हातात बेडय़ा घातलेल्या सबमिसिव्हच्या भूमिकेतली अॅना-इ. चित्रफितीही टाकल्या, आणि लाखों लोकांनी त्या आवडीने बघितल्या.
ख्रिश्चनला पियानो उत्तम वाजवता येत असतो आणि अभिजात पाश्चिमात्य शास्त्रोक्त संगीताबरोबरच त्याला समकालीन पॉप संगीतातही तेवढीच रुची असते. त्यामुळे कादंबरीत उल्लेख असलेलं संगीतदेखील यू-टय़ूबवर आलं.
शेवटी अॅनास्टॅशिया स्टीलच्या भूमिकेसाठी डॅकोटा जॉन्सन आणि ख्रिश्चन ग्रेच्या भूमिकेसाठी जॅमी डॉरनॅन- यांच्या निवडीवर ई. एल. जेम्सच्या पसंतीचं शिक्कामोर्तब झालं. चित्रपटाचं दिग्दर्शन सॅम टेलर-जॉन्सन करेल, हे ठरलं.
कादंबरीवरून पटकथा लिहिली आहे केली मार्सेल हिने. डॅकोटा आणि जॅमीबरोबर इतर भूमिकांत झळकणार आहेत- ख्रिश्चनच्या-स्वीय साहाय्यकाच्या, जॅसन टेलरच्या भूमिकेत मॅक्स मार्टिनी, सेट कवानाच्या भूमिकेत एलॉईस ममकोर्ड आणि ख्रिश्चनचा भाऊ इलियट ग्रे होणार आहे ल्यूक ग्राईम्स.
दिग्दर्शिका सॅम टेलर लंडनमध्ये जन्मलेली असून, तिच्या नावावर ‘नोव्हेअर बॉय’ आणि ‘लव्ह यू मोअर’ हे चित्रपट जमा आहेत. तिचा पती एटॉन टेलर-जॉन्सन याने तिच्या चित्रपटात भूमिकाही केली आहे.
सॅमने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांपेक्षा, ‘फिफ्टी शेड्स’ची जातकुळी वेगळी आहे. लेखिकेपासून दिग्दर्शिकेपर्यंत आणि अभिनेत्यांपर्यंतही सगळे ब्रिटिश असले, तरी कादंबरी घडते ती अमेरिकेच्या सीएॅटलमध्ये. म्हणजे संवादांवर त्यांना नक्कीच विशेष मेहनत घ्यावी लागली असणारच.
कादंबरीच्या पहिल्या खंडात, ख्रिश्चन आणि अॅना यांचा योगायोगानेच झालेला परिचय, दोघांनाही एकमेकांबद्दल तीव्र आकर्षण, त्याचं तिला ती ज्या डिपार्टमेंट स्टोअरमध्ये अंशकालीन नोकरी करत असते, तिथे जाऊन भेटणं अशी वरवर साधीसुधी वाटणारी प्रेमकहाणी असली, तरी कथेला एक रहस्यमय काळी किनार आहे ती ख्रिश्चनच्या पूर्वायुष्याची. प्रत्येक गोष्टीला आणि व्यक्तीला स्वत:च्या नियंत्रणात ठेवण्याची त्याला सवय असते, म्हणून अॅना त्याला ‘कंट्रोल फ्रिक’ म्हणते.
ख्रिश्चनच्या पौगंडावस्थेत, त्याच्या आईच्या मैत्रिणीने त्याला सबमिसिव्ह भूमिका करायला लावून त्याचा सेक्सशी परिचय करून दिलेला असतो. अॅना म्हणून त्या एलेनाला, ‘मिसेस रॉबिनसन’ म्हणते.
ख्रिश्चनच्या भूमिकेसाठी निवडण्यात आलेल्या जॅमी डॉरनॅनने ‘मारी अॅन्तोनेत’ (२००६), ‘श्ॉडोज इन द सन’ (२००९) आणि ‘बियाँड द रेव्ह’ (२००८) या चित्रपटांत आणि ‘वन्स अपॉन ए टाईम’ या टी.व्ही. सीरियलमध्ये भूमिका केल्या आहेत. देखण्या, आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे तो कालव्हिन क्लाईनचा मॉडेल म्हणूनही चमकला आहे.
डॅकोटा जॉन्सन, ‘फिफ्टी शेड्स’ची अॅना, एक अमेरिकन-फॅशन मॉडेल आणि अभिनेत्री आहे. व्हॅनिटी फेअर, एल इ. फॅशन मॅगेझिन्सच्या मुखपृष्ठावर तिची छबी झळकली आहे. डॉन जॉन्सन आणि मेलनी ग्रिफिथ या अभिनेता-अभिनेत्री द्वयीची ही मुलगी. अभिनेत्री टिप्पी ह्रेडेन ही तिच्या आईची आई. ‘क्रेझी इन अलाबाया’ हा तिचा डेब्यू चित्रपट. २०१०त प्रदर्शित झालेल्या ‘द सोशल नेटवर्क’ या फेसबुकची कूळकथा सांगणाऱ्या चित्रपटात डॅकोटाने छोटीशी भूमिका केली आहे.
डॅकोटा आणि जॅमी घ्यांनी आतापर्यंत भूमिका केलेल्या चित्रपटांपेक्षा ‘फिफ्टी शेड्स’ पूर्णपणे वेगळा आहे. त्याच्या प्रणयी जीवनात सर्वसाधारण बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड किंवा ‘व्हॅनिला सेक्स’पेक्षा सबमिसिव्ह- डॉमिनंट रिलेशनशिपची अपेक्षा करणारा, ‘एस्केला’ या त्याच्या पॅलेशियस वसतिस्थानात सुसज्ज ‘रेड रूम ऑफ पेन,’ जिथे यातनेतून सुख मिळवण्यासाठी फ्लॉगरपासून ते हँडकफ्सपर्यंत साधनं उपलब्ध ठेवणारा ख्रिश्चन ग्रे, जॅमी डॉरेनॅन उभा करू शकेल?
आणि ख्रिश्चनला बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड नव्हे, तर सबमिसिव्ह-डॉमिनंटच्या रिलेशनशिपचा बारीकसारीक तपशिलांसह लेखीच बनवलेला करार तिने वाचून त्याच्यावर सह्य करून तो मान्य करण्याची अपेक्षा असल्याचं कळल्यावर उलटसुलट विचारांच्या आवर्तनात सापडलेली, आणि त्याच्या तीव्र ओढीने, आकर्षणाचे, ध्यानी-मनी तोच दिसणाऱ्या अॅनास्टॅशियाच्या भूमिकेला डॅकोटा न्याय देईल?
इरोटिका प्रकारात मोडणाऱ्या आणि समीक्षकांनी ‘मम्मी पॉर्न’ हे नामाभिधान बहाल केलेल्या या कादंबरीवरून निर्मिती करण्यात येत असलेल्या चित्रपटात दोघांत घडणाऱ्या सेक्सची ग्राफिक वर्णनं आहेत. पण ते जसजसं घडत जातं, तसंच लेखिकेने दाखवलंय, कुठेही अश्लील शब्दांचा वापर नाही. अर्थात् अॅना-ख्रिश्चनची ही एवढी जवळीक सिनेमाच्या माध्यमातून कशी काय दाखवण्यात येणार आहे, हे पटकथेवर आणि दिग्दर्शकावर अवलंबून आहे.
यापूर्वी बीडीएसएम, म्हणजेच बॉन्डेज-डिसिप्लिन सॅडिस्टिक-मॅसोकिस्टिक रिलेशनशिपवर ‘द सेक्रेटरी’ हा जेम्स स्पेडरची अप्रतिम भूमिका असलेला चित्रपट येऊन गेलाय. ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ कादंबरीत बारीकसारीक तपशिलांचाही समावेश असलेला करार असला, तरी ख्रिश्चन-अॅनाची रिलेशनशिप वेगळीच वळणं घेत जाते. दोघांचा विवाहही होतो, मूलही होते. त्याच्या गतकाळातील राक्षसांचा बीमोड करण्यात अॅना यशस्वी होते काय, हा एक उत्कंठावर्धक प्रश्न ठरावा.
निव्वळ पुस्तकांच्याच तडाखेबंद खपातून ९५ मिलिअन यू. एस. डॉलर्सची मालकीण झालेली ई.एल. जेम्स, ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ चित्रपटानेदेखील पुन्हा एकदा इतिहास घडवेल काय?
लेटस् वेट अॅन्ड वॉच!

Story img Loader