‘क्वालालम्पूर येथून बीजिंगकडे जाण्यासाठी झेपावलेले मलेशियन एअरलाइन्सचे एमएच३७० हे बोइंग विमान बेपत्ता होऊन आता एक महिना झाला. हिंदी महासागराच्या अतिदक्षिणेला हे विमान कोसळले असावे असा अंदाज बांधून तब्बल अडीच लाख चौरस किलोमीटर सागरी परिसरात अकरा देशांची जहाजे, विमाने, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रणा या विमानाचा शोध घेत आहेत. मात्र, अजूनही त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले नाही. काय कारणे आहेत याची, बेपत्ता विमानाचा शोध लागू शकेल का, तपासयंत्रणांच्या हाती ब्लॅक बॉक्स लागू शकेल का, या विमान दुर्घटनेभोवती असलेले गूढाचे धुके कमी होऊ शकेल का.. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप तरी काळाच्या उदरात गडप आहेत. तरीही गूढाचा शोध घेणे या मानवी स्वभावाला अनुसरून विमानाचा शोध सुरूच राहील. बेपत्ता विमानाच्या शोधातील अडथळ्यांच्या शर्यतीचा घेतलेला हा आढावा..

* सॅटेलाइट डेटा
पृथ्वीवरील प्रत्येक हालचाली टिपणारे अनेक उपग्रह पृथ्वीच्या वातावरणात फिरत असतात. मात्र, हिंदी महासागर परिसरातून हे उपग्रह अगदी ठरावीक कालावधीतच फिरतात. त्यामुळे या उपग्रहांनी एमएच ३७०ची छबी टिपली असण्याची आशा अगदी अंधूक आहे. तसेच या भागातील समुद्रपृष्ठावर काही वस्तू तरंगत असतील तर त्या बेपत्ता विमानाच्याच आहेत किंवा कसे याचा शोध घेणेही उपग्रहीय छायाचित्रांवरून लगेचच स्पष्ट होऊ शकत नाही.

Kandalvan, drone filming, flamingos, Mumbai,
मुंबई : फ्लेमिंगोच्या ड्रोन चित्रिकरणाच्या प्रकरणाची कांदळवन कक्षाची चौकशी सुरू
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
dubai visa policy
दुबईचा व्हिसा मिळवताना भारतीय पर्यटकांना अडचणी का येत आहेत? काय आहेत नवे नियम?
Loksatta explained What will be achieved by purchasing Rafale M fighter jets
विश्लेषण: ‘राफेल एम’ लढाऊ विमाने खरेदी करण्याने काय साध्य होणार ?
Despite success in the assembly elections the future is challenging for Eknath Shinde
विधानसभा निवडणुकीतील यशानंतरही एकनाथ शिंदे यांच्यासाठी भविष्यकाळ आव्हानात्मक? दिल्लीतील ‘महाशक्ती’चा पाठिंबा अजूनही? 
pune PMP is likely to increase ticket rates this year
पीएमपीचे तिकीट वाढणार, सर्वसामान्यांचा प्रवास होणार महाग ?
Karthik Raju Bazar selected as sub lieutenant in Indian navy saluted his mother after receiving his navy cap
वर्धा : नौदलाची कॅप प्राप्त होताच आईच्या डोक्यावर चढवून केला कडक सॅल्युट
abhijeet kelkar post for CM devendra Fadnavis
“एक दिवस असाही येईल, जेव्हा देवेंद्रजी आपल्या देशाचे…”, मराठी अभिनेत्याची पोस्ट; तर प्रवीण तरडे म्हणाले…

१९व्या शतकातील गणित
एमएच ३७० रडारवरून गायब झाल्यानंतरही पिंग संदेश पाठवत होते हे आता स्पष्ट झाले आहे. मात्र, हे पिंग संदेश ब्रिटनच्या इन्मरसॅट या ध्वनिलहरी पकडण्यासाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या ध्रुवीय उपग्रहाने पकडले. त्यांनी एकूण सात पिंग संदेश पकडले. त्यावरून त्यांनी या विमानाचा अंतिम प्रवास कोणत्या दिशेने झाला असावा याचा अंदाज बांधला गेला. त्यासाठी कंपनीने डॉपलर इफेक्ट ही यंत्रणा वापरली. विमान किंवा उपग्रहाच्या हालचालीत बदल झाल्यामुळेच ट्रान्समिशनच्या वारंवारतेत (फ्रीक्वेन्सी) बदल झाल्याचे इन्मरसॅटने म्हटले आहे. एमएच ३७० कडून प्राप्त झालेले ट्रान्समिशन पिंग आणि इतर विमानांचा ज्ञात हवाई मार्ग यांच्याशी या डेटाची तुलना केल्यानंतरच एमएच ३७० हिंदी महासागराच्या अति दक्षिणेकडे गेले असावे, असा कयास बांधण्यात आला.

फ्रान्सचे उदाहरण
१ जून २००९ रोजी एअर फ्रान्सचे रिओ दि जानिरो येथून पॅरिसकडे जाणारे एएफ ४४७ हे विमान प्रशांत महासागरात कोसळले होते. या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडायला दोन वर्षे लागली. ब्लॅक बॉक्सचा ठावठिकाणा शोधण्यासाठी कोलीन केलर यांनी गणितीय पद्धत वापरली. अठराव्या शतकात थॉमस बेयस यांनी ही पद्धत विकसित केली होती. त्याचा आधार घेत खोल समुद्रात गडप झालेला ब्लॅक बॉक्स शोधण्यात आला व अपघाताची कारणे शोधून काढण्यात आली. त्याच पद्धतीचा वापर आताही केला जाण्याची शक्यता आहे.

हिंदी महासागराच्या अथांग समुद्री प्रदेशाच्या तळाशी विसावलेल्या विमानाचा शोध घेणे म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखेच आव्हान आहे. या ठिकाणी आपल्याला एखादी वस्तू समुद्रावर तरंगताना दिसते आणि डोळ्याचे पाते लवते न लवते तेवढय़ाच क्षणात एखादी साधी लाटही त्या वस्तूला गायब करून जाते. समुद्राच्या पाण्यावर पडून परावर्तित होणारे सूर्यकिरण साध्या डोळ्यांसाठी घातक ठरतात. त्यामुळे अवघ्या काही अंतरावर असलेली वस्तू दिसायलाही खूप वेळ जावा लागतो. एवढी कठीण परिस्थिती या ठिकाणी आहे.
– सौफेन ग्रुप,
अमेरिकास्थित सामरिक सुरक्षा व गुप्तचर सल्लागार संस्था

अपघाताचा परिसर
* एमएच ३७०चा शोध हिंदी महासागराच्या दक्षिण टोकाला असलेल्या खोल समुद्रात सुरू आहे. हा एक अत्यंत प्रतिकूल परिसर असून येथील हवामान कायमच बिघडलेले असते. अशा या प्रतिकूल परिस्थितीत तब्बल चार लाख ७० हजार समुद्री मैल परिसरात बेपत्ता विमानाचा शोध घेतला जात आहे.
ल्ल सर्व गणिते मांडून विमान याच परिसरात कोसळले असावे असा अंदाज बांधला गेला आहे. आधीचा शोध परिसर पर्थपासून अडीच हजार किमी अंतरावर होता. मात्र, नव्याने गणिते मांडून हा शोध परिसर पर्थपासून ११०० किमी अंतरावर केंद्रित करण्यात आला. मात्र, या ठिकाणच्या समुद्राचे तापमान पाहता समुद्रतळाशी गेलेल्या विमानाचे अवशेष लाटांचा आणि पाण्याचा जोर पाहता अति दक्षिणेकडे मैलोनमैल वाहून गेलेले असावेत.

समुद्राची खोली

* हिंदी महासागराच्या दक्षिणेकडील समुद्राची खोली तब्बल ३,७७० फुटांपासून ते २३ हजार फुटांपर्यंत आहे.
* त्यातच समुद्रतळाशी सातत्याने होत असलेल्या घडामोडींमुळे हा परिसर समुद्रगर्तासाठीही (समुद्रातील दऱ्या) प्रसिद्ध आहे. म्हणजे तळाशी होत असलेल्या भूगर्भीय घडामोडींमुळे येथील तळाचा आकार सतत बदलत असतो. विमानाचे अवशेष समुद्राच्या तळाशी सपाटीवर पडलेले असावेत अशी तज्ज्ञांना आशा आहे. मात्र, गर्तामध्ये हे अवशेष पडले असतील तर शोधमोहीम आणखीनच कठीण होईल.

सागरी वादळे

बेपत्ता विमानाचा शोध घेत असलेल्या विमान आणि हेलिकॉप्टर्सना समुद्री वादळांचा सामना करावा लागत आहे. या भागात हवेचा दाब जास्त असून त्याला रोअरिंग फोर्टीज असे म्हटले जाते. म्हणजे या ठिकाणच्या समुद्रावरील हवा ३० ते ४० मैल प्रतितास या भन्नाट वेगात असते. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहात असलेल्या या वाऱ्यांना आडकाठी करणारे कोणीच नसते. त्यामुळेच येथील हवामान प्रतिकूल आहेच, शिवाय त्याच्या जोडीला समुद्राच्या लाटाही उंचउंच असतात. त्यामुळेच शोधकार्यात अडथळा येतो.

सागरी लाटा

या भागातील महासागराची खोली जास्त असल्याने साहजिकच लाटांचा जोरही प्रवाही आणि वाढता आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे या लाटा वाहात असल्याने त्या समुद्रपृष्ठावरील वस्तू तासागणिक ५० ते ६० मैलापर्यंत वाहून नेऊ शकतात. विशेष म्हणजे या ठिकाणी लाटा एका विशिष्ट लयतेत, म्हणजे घडय़ाळासारख्या वाहात असतात त्यामुळे या भागाला हिंदी महासागराची कचरापट्टी असेही म्हटले जाते. कारण या ठिकाणच्या लाटांमुळे समुद्रातील कचरा एकत्र होऊन तो भरकटत राहातो किंवा लाटांच्या हिंदोळ्यावर झुलत राहातो.

पिंगर्स

* प्रत्येक विमानात ब्लॅक बॉक्स ही यंत्रणा असते. विमानातील घडामोडींची तसेच कॉकपीटमधील संभाषणांची नोंद या ब्लॅक बॉक्समध्ये होत असते. समुद्राच्या तळाशी २० हजार फूट खोलवरही हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहू शकतो. विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यापासून ते ३० दिवसांच्या कालावधीपर्यंत या ब्लॅक बॉक्समधून पिंग संदेश येत असतात. त्याद्वारे त्याचा समुद्रतळाशी शोध घेतला जाऊ शकतो. ३० दिवसांनंतर मात्र त्याच्यातील बॅटरीक्षमता संपते.
* तूर्तास तरी शोध परिसरातीतल समुद्रतळाशी हा ब्लॅक बॉक्स सापडेलच याची शाश्वती नाही. आणि दुर्घटनेला महिनाही उलटून गेला आहे. त्यामुळे ब्लॅक बॉक्सच्या बॅटरीची क्षमता संपलीही असेल. अशा परिस्थितीत आता बॉक्सचा शोध चुंबकीय लहरींच्या माध्यमातून घेतला जाणे क्रमप्राप्त ठरेल. मात्र, यातही एक अडथळा आहेच. कारण बॉक्स दहा किलोचा असतो आणि त्याची रचना ल्युमिनियमची असते. त्यामुळे ब्लॅक बॉक्स कोणताही आघात सहन करण्यास सक्षम असला तरी चुंबकीय लहरी तो पकडेल की नाही याची शंकाच आहे.
* हनीवेल या कंपनीने एमएच ३७०मधील पिंगर्सची निर्मिती केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पिंगर्समधून येणारे सिग्नल केवळ एक मैल अंतरावरूनच पकडता येऊ शकतात. याचा अर्थ असा की, विमानाच्या ढिगाऱ्याखालीच ब्लॅक बॉक्स असणे आवश्यक आहे. अन्यथा ब्लॅक बॉक्स चिखलात बुडाला असेल तर त्याचा शोध लागणे कठीण आहे.
* पिंगर्स बंद पडले तर ब्रिटिश व अमेरिकन जहाजे हायड्रोफोनचा वापर करून हा बॉक्स शोधण्याचा प्रयत्न करतील. परंतु यातही एक अडचण अशी आहे की, पिंग्ज समुद्राच्या थंड किंवा गरम पाण्याच्या संपर्कात आल्यास त्यातील लहरी या पाण्याशी आपटून पुन्हा त्याच्याचकडे परततील आणि हायड्रोफोनचा वापरही उपयुक्त ठरणार नाही.

प्रवासी विमानाला दोन ब्लॅक बॉक्स जोडलेले असतात. एक कॉकपीटमध्ये असतो तर दुसरा शेपटीच्या भागाला असतो. विमान दुर्घटनेनंतर त्याची कारणे शोधण्यासाठी हेच ब्लॅक बॉक्स कामी येतात.

ब्लॅक बॉक्स :
इन्सुलेशन व थर्मल ब्लॉक,
११०० सेल्सिअस तापमानापर्यंत सुरक्षित

फ्लॅश मेमरी
अंडरवॉटर बेकॉन, प्रतिसेकंदाला बिप्स पाठवतो. ३० दिवसांपर्यंत टिकून राहतो.

४,७०,०००
चौरस समुद्री मैल प्रदेशात शोध सुरूच आहे

Story img Loader