‘आंबा उत्पादनाची बापट पद्धती’ हा लेख ‘लोकप्रभा’मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यावर आलेल्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या या प्रतिक्रिया-
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सहा जूनच्या अंकात वि. ज. बापट यांनी लिहिलेला लेख वाचला. मी स्वत: केमिस्ट्रीचा पीएचडी आहे. २५ वर्षांपूर्वी द्राक्ष बागायातदारांसाठी मी भारतात प्रथम ड्रीपिंग ऑइल तयार केले आणि आज या संशोधनाचा द्राक्ष बागायतदारांना खूप फायदा होतो.
सहा वर्षांपूर्वी मी कोकणात आलो तेव्हा प्रत्येक शेतकरी आपापल्या बुद्धीप्रमाणे शेती करताना दिसला. २५ वष्रे द्राक्ष बागयतदाराबरोबर घालवल्यानंतर मला हा मोठाच धक्का होता. तेव्हापासून सर्व शेतकऱ्यांनी डोळसपणे, समजून शेती करावी यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत.
आंब्यासाठी संपूर्ण वर्षांचे वेळापत्रक फार महत्त्वाचे आहे. सर्वसाधारणपणे जूनमध्ये खते घालणे व ऑक्टोबरमध्ये फवारण्या चालू असतात. खते जूनमध्ये का याला उत्तर नंतर गडी मिळत नाहीत हे आहे. म्हणजे निसर्गाचा विचार नाही.
वास्तविक निरोगी झाड आणि सुपीक जमीन दोन गोष्टींवर नीट लक्ष दिल्यास बागायतदारांचे बरेचसे प्रश्न सुटतात. माती परीक्षण ही कमी खर्चाची पण सर्वात महत्त्वाची गोष्ट जेमतेम पाच टक्के शेतकरी करतात. माती परीक्षणाने दाखवलेली, कमतरता असलेली सूक्ष्म द्रव्ये खतांबरोबर घालणे जरूर असते. खते जूनमध्ये घातली तर पावसामुळे ५० टक्केपर्यंत खते वाहून जातात. त्यामुळे पाऊस थोडा कमी झाल्यावर ऑगस्टच्या शेवटी नेहमीपेक्षा ३० टक्के कमी खते घालूनही चांगले परिणाम मिळतात.
झाडांची योग्य छाटणी करून झाडाच्या मधल्या खोडावर भरपूर सूर्यप्रकाश पडणे महत्त्वाचे आहे.
पानांमधून झाडाचे अन्न तयार करण्याची प्रक्रिया होते. त्यासाठी ही पाने व सर्व झाड स्वच्छ असणे जरूर आहे. यासाठी आंबे काढून झाल्यावर व फवारण्या चालू करताना कॉपरची फवारणी आवश्यक. पावसानंतर झाडावर बुरशी येते. म्हणून पावसाळा संपल्यावर कॉपरची फवारणी करावी.
झाडाभोवतीच्या िरगमध्ये खते टाकली की आपले काम झाले असे नाही. खते व सूक्ष्मद्रव्यांचे झाडाच्या अन्नद्रव्यात रूपांतर होणे जरूर असते. हे काम जमिनीतील सूक्ष्म जंतू (Bacteria) करतात. आपण रासायनिक खते वापरल्यास जमिनीतील चांगले व वाईट सर्व प्रकारचे सूक्ष्म जंतू मेलेले आढळतात. त्यामुळे ही खते महिनोन् महिने जमिनीत राहतात आणि मोठा पाऊस आल्यावर वाहून जातात. म्हणून मी विविध प्रकारच्या ११ बॅक्टेरियांचे मिश्रण तयार केले. त्यातील एक बॅक्टेरिया खतांचे रूपांतर झाडाच्या अन्नद्रव्यात करते. सेंद्रिय खतांबरोबर हे मिश्रण घातल्यास आपल्या खतांचे व सूक्ष्म द्रव्यांचे रूपांतर झाडाच्या अन्नद्रव्यात करण्याचे काम ताबडतोब चालू होते व खते झाडाला लवकर उपयोगी पडतात.
झाडाचे अन्न जमिनीतून शोषण्यासाठी पांढऱ्या मुळांची आवश्यकता असते. खतांबरोबर ह्य़ुमिक अॅसिड घातल्यास अशा पांढऱ्या मुळांची वाढ जोरदार होते. ही मुळे िरगमध्ये पसरलेली खते शोषून घेण्यास मदत करतात. झाडांच्या पानांना जशी हवेची आवश्यकता असते तशीच त्याच्या मुळांनासुद्धा मोकळ्या हवेची जरूर असते. बऱ्याच वेळेला माती / चिखल मुळांना चिकटलेला असल्यामुळे झाडांच्या मुळांना श्वास घेता येत नाही. कोकणातल्या जमिनीत, खास करून किनाऱ्याजवळच्या जमिनीत, मोठय़ा प्रमाणात क्षार आहेत. या दोन्ही गोष्टींसाठी सल्फरचा चांगला उपयोग होतो. जमिनीला व झाडालाही सल्फरची आवश्यकता असते. तसेच जमीन भुसभुशीत करणे व क्षार विरघळवणे ही कामेही सल्फर करते. थोडक्यात खते व सूक्ष्म द्रव्यांबरोबर वरील तीन उत्पादने वापरल्यास फायदेशीर असते.
मोहर लवकर येण्यासाठी ज्या केमिकलचा उपयोग फार मोठय़ा प्रमाणावर करण्यात येतो ते म्हणजे Paclobutrazol. याची कल्टार इत्यादी उत्पादने आहेत. झाडाच्या नवीन फांद्यांची पुढे होणारी वाढ थांबवणे हे या उत्पादनांचे काम असते. (बापट लिहितात त्याप्रमाणे झाडाला जोर येऊन फळे येतात असे नाही.) ही वाढ थांबल्यावर ती ऊर्जा झाड दुसरीकडे वापरते त्यामुळे मोहर येण्यास मदत होते. जून पालवी व थंड हवा असे एकत्र असल्यासच मोहर येतो. म्हणजेच ‘‘आमच्या उत्पादनाने मोहर येतो’’ असे सांगणे चूक आहे. त्यामुळेच Paclobutrazol वापरल्यास १०० टक्के मोहोर येतो असे नाही. Paclobutrazol हे रासायनिक उत्पादन जगभरच्या फळबागांमध्ये वापरतात. मात्र हे औषध असून ते योग्य प्रमाणात वापरणे तसेच त्याबरोबर सांगितलेल्या इतर गोष्टींचे पालन करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने ‘जास्त म्हणजे चांगले’ या अडाणी समजुतीमुळे या केमिकलचा वापर डोसच्या दुप्पट, तिप्पट प्रमाणात केला जातो. ‘खतांची मात्रा वाढवा’ ही सूचना दुर्लक्षिली जाते. या सर्वाचा परिणाम म्हणजे जीवनरस हरवून बसलेल्या जमिनी व मरायला टेकलेली अशक्त झाडे.
ऑक्टोबरनंतरच्या फवारण्यांमध्ये विविध प्रकारची कीटकनाशके , जंतुनाशके, भुरीनाशके यांचा होणारा अमर्याद वापर हेच या ऱ्हासाचे मुख्य कारण आहे. निसर्ग नियमाप्रमाणे सर्वच जंतू आपली प्रतिकारशक्ती वाढवत असतात. त्यामुळे दरवर्षी या केमिकल्समध्ये अदलाबदल करणे, डोस वाढवणे असे खेळ झाडाशी खेळणे चालू आहे. एकेकाळी गुडनाइट लावल्यावर डास पळत असत. आज डासांची संध्याकाळची मीटिंग गुडनाइटच्या वडीवरच असते. या अमर्याद फवारण्यांमुळे चांगले व वाईट सर्व प्रकारचे किडे नष्ट होतात. मित्रकिडे नसल्यामुळे परागीकरण नाही. मग ‘‘यंदा वांझ मोहर आला’’ असे म्हणून निसर्गाला दोष देऊन सगळे मोकळे होतात.
पूर्वी केवळ मोहर बघून बागेचा व्यवहार होत असे. आता तसे होत नाही कारण हल्ली मोहोर गळ होणे हा मोठा प्रश्न आहे. यासाठी मोहोर निरोगी असणे महत्त्वाचे आहे. यासाठी संशोधन करून बेसिल (Basil)वर आधारित उत्पादन तयार केले आहे. त्यामुळे मोहोर गळ थांबण्यास मदत होते. बेसिलच्या अर्कामुळे झाडातील व जमिनीतील विषारी द्रव्यांचे साइड इफेक्ट्स कमी होतात. याच उत्पादनामुळे सुंदर, निरोगी कणी सेटिंग होण्यासाठीदेखील मदत होते. या उत्पादनाच्या दर पंधरा दिवसांनी फवारण्या घेतल्यास फळांचा आकार मोठा होण्यास मदत होते.
सर्वसाधारणपणे पहिली फवारणी सल्फरची (गंधक) केली जाते. खरे म्हणजे झाडावर विविध प्रकारच्या कीटकांचा हल्ला मोहोर आल्यावरच सुरू होतो. भुरीसुद्धा चालू होते. अशा वेळेला सल्फर वापरणे आवश्यक असते. अतिशुद्ध सल्फर वापरल्यास त्याने भुरी नष्ट होते. पण त्याचबरोबर मोहरही जळतो. मी अतिशुद्ध सल्फरमध्ये काही वनस्पतिजन्य अर्क मिसळले आहेत. ज्यामुळे सल्फरची तीव्रता कमी होते. (माझी सर्वच उत्पादने बायोहार्बल आहेत. त्यामुळे प्रत्येक उत्पादनात विविध वनस्पतिजन्य अर्क मिसळले आहेत). हे उत्पादन मोहरावर मारल्यास भुरी संपूर्ण नष्ट होतेच पण त्याचबरोबर मोहराला नवसंजीवनी मिळते. या उत्पादनाच्या तीन फवारण्या केल्यास इतर कीटकनाशकांच्या फवारण्या कमी होतात. म्हणजेच वातावरणाचा नाश कमी होतो. याच उत्पादनाने कोवळी पालवी नसíगकरीत्या जून होते. म्हणजेच जर पालवी दहा दिवस आधी जून झाली तर मोहर दहा दिवस आधी येऊ शकतो. म्हणजेच आंबे दहा दिवस आधी येऊ शकतात.
मोहर येण्यासाठी थंड हवामान लागते. कधी कधी मोहर येण्याची सुरुवात होते, पण तापमान वर गेल्यास हा मोहर अडकून पडतो. हे उत्पादन फवारल्यास संपूर्ण झाड मोहरानी भरून जाते.
गेले काही र्वष आंबा भाजण्याचे / जळण्याचे प्रकार वाढत आहेत. तापमान ३६च्या वर गेल्यास आंबा भाजतो. त्याचबरोबर आतील भागात साका होण्याचे प्रमाण वाढते. त्याच्यावर उपाय म्हणून दोन वर्षांपूर्वी मी नवीन उत्पादन शेतकरी बंधूंना दिले. या उत्पादनाची फवारणी केल्यावर सर्व झाडावर एक पातळ आवरण तयार होते. या आवरणावरून सूर्यकिरण परावर्तित होतात. त्यामुळे आंब्याच्या बाह्य़ आवरणावरील तापमान कमी राहते. यामुळे आंबा भाजण्याचे / जळण्याचे तसेच साक्याचे प्रमाण कमी होते. याचा अनुभव शेकडो आंबा बागायतदारांनी यंदा घेतला.
फवारणी केल्यावर ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी जमिनीवर पडते. हे मिश्रण झाडावर चिकटण्यासाठी ‘स्टिकर’ वापरला जातो. सहा वर्षांपूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याएवढे आंबा बागायतदार ‘स्टिकर’ वापरत होते. आता माझ्या पत्रांमुळे बरेचसे शेतकरी ‘स्टिकर’ वापरत आहेत. यापुढील पायरी म्हणजे ‘स्प्रेडर’. फवारणीचे मिश्रण झाडावर पटकन पसरल्यास फायदेशीर ठरते . चांगला ‘स्प्रेडर’ हे काम करतो. यातही गेल्या वर्षी अमेरिकेत प्रथमच ‘नॉन सिलिकॉन स्प्रेडर’ आला. हा पर्यावरणाला सुरक्षित असतो.
हापूस आंबा हा डझनाने विकला जातो त्यामुळे त्याचे वर्गीकरण आकाराने होते. सर्वसाधारणपणे आंबे काढण्यासाठी गडी मोठय़ा झाडांवर सिझनमध्ये आठ-नऊ वेळा चढतो. तयार आंबे काढणे ही कला आहे. त्यामुळे हे काम तरबेज गडीच करू शकतो. नंतर काढलेल्या आंब्यांचे आकाराप्रमाणे वर्गीकरण करणे ही फार मोठी डोकेदुखी असते. यासाठीसुद्धा तयार डोळ्याचे गडी लागतात . एकंदरीत हे काम किचकट व वेळकाढू असते. माझ्या बेसिलच्या उत्पादनाने हे दोन्ही प्रश्न कायमचे सोडवले आहेत. या उत्पादनाच्या फवारणीमुळे फक्त झाडावरीलच नव्हे तर संपूर्ण बागेतील ९०टक्क्यांपेक्षा जास्त आंबे एकाच आकाराचे होतात. याचे फायदे म्हणजे आंबे काढण्यासाठी गडी झाडावर फक्त तीन-चार वेळाच चढतो. वर्गीकरणाचे काही दिवसांचे किचकट काम काही तासांत होते. यामुळे वेळेची व मजुरीचीही मोठी बचत होते. झाडावरील अती मोठय़ा फळांचे प्रमाण कमी होते. अशा मोठय़ा फळात साक्याचे प्रमाण मोठे असते. गेल्या पाच वर्षांत या उत्पादनाने लाखो हापूस आंबे एकाच आकाराचे केलेले आहेत.
थोडक्यात बिनविषारी सेंद्रिय उत्पादनांनीसुद्धा शेती करता येते. अर्थात कीटकांचा हल्ला मोठय़ा प्रमाणावर असल्यास विषारी केमिकल फवारावीच लागतात. आज कोकणातील हजारावर आंबा बागायतदार या उत्पादनांचा वापर करत आहेत. यासंबंधी अधिक माहितीसाठी मला जरूर संपर्क करावा.
बापट यांनी सुचवलेल्या उपायांविषयी :
गोडेतेल + मीठ + गंधक मिश्रण – हे मिश्रण पाण्यात मिसळणार नाही. त्यासाठी ‘इमल्सिफायर’ वापरणे आवश्यक आहे. सर्व फवारण्या पाण्याच्या मिश्रणातून केल्या जातात. त्यामुळे प्रत्येक उत्पादनामध्ये इमल्सिफायर मिसळलेला असतो. या इमल्सिफायरच्या गुणवत्तेवर उत्पादनाची गुणवत्ता ठरते. यामध्ये इमल्सिफायर, मायक्रोइमल्सिफायर व त्याहून उत्कृष्ट नॅनो इमल्सिफायर असतात. माझ्या बेसिलच्या उत्पादनात नॅनो इमल्सिफायर टाकल्यावर त्याची गुणवत्ता कित्येक पटींनी वाढली. गोडेतेल किंवा इतर कुठलेही तेल झाडाला चिकटून बसेल. पानांवर त्याचा थर बसेल व पानांची अन्न तयार करण्याची प्रक्रिया थांबेल. मीठ हे काही प्रमाणात कीटकनाशक म्हणून काम करेल. गंधकाची पावडर वापरणे धोकादायक असते. त्यामुळे फुप्फुसाचे रोग होऊ शकतात. त्याऐवजी द्रवरूप सल्फर वापरणे सुरक्षित आहे.
मोहोर येण्यासाठी मुळांशी बर्फ टाकणे – पाच-पंचवीस झाडांना हा उपाय ठीक आहे. मोठय़ा प्रमाणावर कठीण वाटते.
शेणखत- खत म्हणून चांगले परंतु संपूर्ण खत नव्हे.
गोमुत्र- यातील युरिआमध्ये नत्र असल्यामुळे फायदेशीर. पण संपूर्ण नव्हे.
परागीभवन- वर सांगितल्याप्रमाणे विषारी कीटकनाशकांमुळे मित्र किडे मरत आहेत. माझ्या बेसिलच्या उत्पादनामुळे मित्र कीटक झाडाकडे आकर्षति होतात व त्यामुळे परागीभवनाला मदत होते.
शेतकऱ्यांचे आयुष्य नशीब, निसर्ग व मेहनत यावर अवलंबून असते. पहिल्या दोन गोष्टी आपल्या हातात नसल्यामुळे फक्त मेहनत करणे आपल्या हाती आहे. ही मेहनत योग्य दिशेने झाली तरच आपल्याला फायदा आहे. यासाठी डोळसपणे शेती करणे हा एकच उपाय आहे.